हॉलिवुड चित्रपटात आपल्या भारतीय चित्रपटासारखी गाणी नसतात.. बॅकग्राउंड संगीत .. चित्रपटाच्या पार्श्वभुमीला साजेसे संगीत दिलेले असते.. संपुर्ण चित्रपटाचा "रस" हा त्या एका संगीताच्या तुकड्यात ओतप्रोत भरलेला असतो..नुसते हे संगीत ऐकले तरी संपुर्ण चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो.. हीच या "थीम साउंडट्रॅक्स" ची शक्ती आहे.
विविध चित्रपटांमधले गाजलेले साउंडट्रॅक्स बद्दल चर्चा करण्या करीता हा धागा
मी सर्वात आधी साउंडट्रॅक हा .. जगप्रसिध्द "ज्युरासिक पार्क" या चित्रपटाचा ऐकलेला.. सोनी बीएमजी ने त्याच्या संगीताची खास कॅसेट काढली होती.. जॉन विलियम्स यांनी हा साउंड ट्रॅक अतिशय अभ्यास पुर्वक तयार केलेला..
पियानो आणि सॅक्सोफोन यांचा उत्तम मिलाफ केलेला .. ज्युरासिक पार्क मधे त्या भल्यामोठ्या दरवाजातुन आत जातानाचे संगीत नुसते ऐकले तरी आपण त्या दरवाजातुन आत जात असल्याचा भास होतो. हेच या थीम साउंडट्रॅक्स चे यश आहे....
http://en.wikipedia.org/wiki/Jurassic_Park_(film_score)
यावर विस्तृत माहीती दिली आहे
युट्युब वर इथे आपल्या "ज्युरासिक पार्क" ची थीम ऐकता येईल
http://www.youtube.com/watch?v=gOmJLk1lu08
बॅटमॅन (नविन) या चित्रपटाचे संगीत देखील उल्लेखनिय आहे. हन्स झिमर या संगीतकाराने आपल्या संगीताद्वारे "गोथम सिटी मधले बॅटमॅन आणि जोकर चे युध्द " उभे केले आहे. ..विशेषतः " बॅटमॅन - डार्क नाईट" या चित्रपटात तर कमालच केलेली आहे.. जोकर च्या पाठलागाचे संगीत अप्रतिम आहे..व्हायोलिन आणि BASS चा सुंदर वापर केला..
ही युट्युब वरची लिंक ऐका.... कळेलच तुम्हाला...
http://www.youtube.com/watch?v=o0HwDzKoxRg
याच प्रमाणे "मिशन इंम्पोसिबल १-२-३-४" ची संगीत सुध्दा चांगले आहे विशेषतः ४ थ्या भागाचे (घोस्ट प्रोटोकॉल) .. चित्रपटाला रशियन पार्श्वभुमी असल्याने खास रशियन स्टाईल चे संगीत देण्यात आले. एमआय ची थीम ओरिजनल Michael Giacchino यांनी तयार केलेली होती .. त्याला थोडा रशियन बाज Vitaliy Zavadskyy यांनी दिला..
यात सुध्दा संगीताचा कॅनव्हास मोठा होता त्यासाठी खास रशियन सॅक्सोफोन आणि बाझ गिटार वापरण्यात आले ..
http://www.youtube.com/watch?v=Fj_vvPID_Hc
बॉलिवुड मधे असा प्रयोग आरडी बर्मन (पंचमदा) यांनी शोलेच्या वेळेला केलेला.. त्याला चित्रपटाची थीम नाही म्हणता येणार परंतु टायटल ट्रॅक म्हणुन तो म्युझीक पिस प्रचंड गाजलेला.. लहानात लहान भारतीय वाद्यांचा समावेश केलेला... भारतीय व्हायोलिन ( नाव माहीत नाही) संतुर,, तसेच बुलबुल बासरी .. इत्यादीचा वापर छोट्या छोट्या भागात करुन त्यांना "हायलाईट" केलेले होते... तो प्रयोग चांगलाच यशस्वी झालेला .. "शालीमार" या चित्रपटात देखील पंचमदा ने असेच टायटल ट्रॅक तयार केलेले..
त्यानंतर "बॉम्बे" चित्रपटात ए. आर. रेहमान यांनी साउंडट्रॅक चा वापर केलेला.. बासरी, व्हायोलिन आणि सिंथेसाइझर यांचा प्रामुख्याने वापर केलेला .. दंगलीच्या पार्श्वभुमीवर असलेल्या चित्रपटाचे सारांश संगीतात उतरवण्यात रेहमान यांना यश आलेले..
आपल्या माहीतीत असलेले साउंडट्रॅक्स देखील इथे शेअर करा..
मला Splitsvilla Theme मुझिक
मला Splitsvilla Theme मुझिक आवडतं
ते म्युझिक रॉक बँड "अग्नी"
ते म्युझिक रॉक बँड "अग्नी" यांचे आहे
तुझ्या बाफाचे नाव वाचून मला
तुझ्या बाफाचे नाव वाचून मला ज्युरासिक पार्कचेच थीम आठवले. मी पक्की फॅन आहे त्याची. कॅसेट आणून ऐकला होता तेव्हा. जॉन विल्यम्स ने स्पीलबर्गच्या इतर सिनेमांनाही उत्तम संगीत दिले आहे. जॉज आठवा
आणि फेवरिट म्हणजे इंडि. जोन्स ची थीम आणि जेम्स बाँड थीम. संगीत जालावरून उतरवता यायला लागले तेव्हा हे लगेच घरी आले होते.
इन्सेप्शनचा साउंड ट्रॅक व मॅट्रिक्सच्या संगिता बद्दल वेगळे लिहीले पाहिजे. रुमाल टाकून ठेवते. दोन्ही जबरी आहेत. मेन इन ब्ले क सीरीज मध्ये पण मस्त संगीत असते.
मस्तच धागा.. माझ्या मते, या
मस्तच धागा..
माझ्या मते, या क्षेत्रात जॉन विलीअम्स हे नाव जवळ जवळ एव्हेरेस्ट शिखर आहे.
सुपरमॅन, ईंडीयाना जोन्स (तिनही), जॉज, स्टार वॉर्स.. असे एकापेक्ष एक भन्नाट चित्रपट पार्श्वसंगीत त्यांच्या नावावर आहे.
जॉन बॅरी साहेबांचे सर्वच बाँड चित्रपटांसाठी दिलेले पार्श्वसंगीत असेच भन्नाट आहे.
अलिकडच्या 'स्कायफॉल' या बाँड चित्रपटाचे पार्श्वसंगीत थिम साँग मात्र मला सर्वात जास्त आवडते आणि थॉमस न्यूमन या अत्यंत नावाजलेल्या संगीतकाराचे हे 'बाँड' चित्रपटासाठी चक्क पहिलेच पार्श्वसंगीत.
असेच जागतिक दर्जाचे पार्श्वसंगीत असलेला छत्रपती शिवरायांवर चित्रपट व्हावा असे फार वाटते.
The good, the bad, the ugly
The good, the bad, the ugly चित्रपटाचा साऊंडट्रॅक - ultimate.
Beverly Hills Cop चा साऊंडट्रॅक पण खूप आवडता आहे.
दोनच नावे - रॉन गूडविन आणि
दोनच नावे - रॉन गूडविन आणि एनिओ मॉरिकोने!
भारतामध्ये सत्या ची/चा
भारतामध्ये सत्या ची/चा थीम्/साउंडट्रॅक रीलिज केला होता. कॅसेट असेल घरी बहुतेक.
अप/रीओ चित्रपटाचे साउंडट्रॅक्स पण आवडतात.
मस्त बाफ ! जुन्या मायबोलीत
मस्त बाफ !
जुन्या मायबोलीत राहुल फाटक याने काही ट्रॅकबद्दल लिहीलेले इथे त्याच्या रंगीबेरंगी पानावर सापडेल. [जुनी मायबोली असल्याने आय.ई. वापरूनच दिसेल अन्यथा नाही]
त्याने उल्लेख केलेले काही ट्रॅक्स
जाने भी दो यारो
पडोसन
जॉनी मेरा नाम - कल्याणजी आनंदजी.
डॉन - कल्याणजी आनंदजी
रोजा अपहरण हे इथे चालणार नाही बहुदा.
सत्या
माझे आवडते थीम साँग म्हणजे
माझे आवडते थीम साँग म्हणजे "फ्री विली" या चित्रपटातील मायकेल जॅक्सनने गायलेले "Will you be there?"
ऐकुन बघा एकदा.
मी ईंग्लीश फारसे बघीतले
मी ईंग्लीश फारसे बघीतले नाहीत. पण परवाच "हलचल" नावाचा आर.डी. ने संगीत दिलेला चित्रपट बघीतला. पुर्ण चित्रपटाचं बॅकग्राउंड म्युझीक भन्नाट आहे.
गिरीकंद + १००. त्या
गिरीकंद + १००. त्या गाण्याकरता त्या सिनेमाची श्रेयनामावली पूर्ण बघावी लागते.
मेकॅनोज गोल्ड ( उर्फ मस्ताना
मेकॅनोज गोल्ड ( उर्फ मस्ताना का सोना )
मला वाटतं याच थीम म्यूझिकचा एक भाग जल बिन मछलीच्या एका गाण्यात वापरलाय आणि ते गाणेही
खुपसे कुसुमाग्रजांच्या, पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेवर आधारीत आहे.
the bridge on the river kwai
the bridge on the river kwai ह्या पिक्चर मधे पण उत्तम पार्श्वसंगीत आहे.. त्यातली सगळे सैनिक चालत चालत ब्रीज क्रॉस करत असताना वाजवलेली शिट्टी अल्टिमेट आहे..
जाणवलेले खास असे.. मिशन
जाणवलेले खास असे..
मिशन इम्पॉसिबल
पायरेट्स सेरीज
मॅट्रिक्स सेरीज.
सायको (मी बॅकग्राउन्ड म्युजिक) म्हणतोय.
सिस्क्थ सेन्स (इथेही पुर्ण चित्रपटभर एक शांतता आहे बॅकग्राउन्डला असं फील होतं.)
मॅट्रीक्स चे संगीत मला पटले
मॅट्रीक्स चे संगीत मला पटले नाही............फील येत नाही त्यात्न
क्रिश चे देखील बॅकग्राउंड
क्रिश चे देखील बॅकग्राउंड संगीत छान होते..... बासरी आणि गिटार वापरलेले होते..
पण क्रिश ३ मधे मात्र बॅकग्राउंड पुरते फसले गेले
'Dr Zhivago'. Lara's Theme
'Dr Zhivago'. Lara's Theme apratim aahe
ओल्ड स्पाईस च्या जाहिरातीचं
ओल्ड स्पाईस च्या जाहिरातीचं जे म्युझिक आहे, ते (बहुतेक) यान्नीच्या एका म्युझिक ट्रॅकवरून घेतलेलं आहे.
http://www.youtube.com/watch?v=6rbZr7YoqK0
त्याला कदाचित थीम म्युझिक नाही म्हणता येणार, पण सहज आठवलं म्हणून पोस्टतोय.
मस्त धागा. वरची batman ची खुप
मस्त धागा. वरची batman ची खुप आवडली. ज्यु.पा. तर आहेच छान.
इंग्लिश आता जास्त आठवत नाहीत पण काही दिवसांपुर्वीच 'स्पेशल छब्बीस' मधील पार्श्वसंगीत आवडले. त्या सिनेमात सर्वजण दर ६-७ मिनिटाला इथुन तिथे ताडताडताड चालतात ( ).. त्यावेळी दिलेले पार्श्वसंगीत खुप आवडले. दरवेळी बहुतकरुन वेगवेगळे दिले आहे. त्यामुळे त्या लोकांचे चालणे एकदम भारदस्त, छाप पाडणारे वाटते.
स्पीड या हॉलिवुड चित्रपटाचे
स्पीड या हॉलिवुड चित्रपटाचे सुध्दा साउंड ट्रॅक जबरदस्त आहे....... फुल्ल स्पीड चा अनुभव येतो
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=iFx7_HFVgOM
इथे एक चांगले संकलन आहे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=xMmg27YhYIE
स्पीड ची थीम ..............
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=F9KfT8P7h28
अमेझिंग स्पायडर मॅन २ ... चांगले आहे .. पहिल्यासारखे नाही पण
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=RhJaVvyanZk
Pls find time to listen to this tune from '.Come September' 1961 Bobby Darin orchestras
मस्त आहे... राजा चित्रपटात
मस्त आहे...
राजा चित्रपटात "नजरे मिली दिल धडका" हे गाण्याची ट्युन यावरुन घेतली
The Bridge on the River Kwai
The Bridge on the River Kwai
या चित्रपटातील शिट्टी ची theme वापरूनच आर डी बर्मन यांनी "ये दिल ना होता बेचारा.." हे गाणं तयार केलंय. लक्ष देऊन ऐकायला लागेल.
आणि आणखी एक.
त्याच्या बॅकग्राऊंड ला जे स्कोअर आहे.
तेच आपल्या विविध भारती ला वापरली आहे.