इंटरनॅशनल बॅक्युलॉरिएट ऑर्गनायझेशन काय आहे?
जिनिव्हा (स्वि.) येथील या संस्थेची स्थापना १९६८ साली झाली. आयबी कोणत्याही एका देशाशी अथवा राजकीय /सामाजिक विचारधारेशी संलग्न नाही. जवळपास १२५ देशातील अडीच हजार शाळात हा अभ्यासक्रम राबवला जातो. भारतात जवळपास ६५-७० आयबी शाळा आहेत.
वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयबीचे तीन शैक्षणिक कार्यक्रम आहेत.
प्रायमरी इअर प्रोग्रॅम (PYP) - केजी ते पाचवी
मिडल इअर प्रोग्रॅम (MYP) - सहावी ते दहावी
डिप्लोमा प्रोग्रॅम (DP) - ११ वी व १२ वी
हे तिन्ही अभ्यासक्रम एकसूत्री असले तरी विद्यार्थी ते वेगवेगळे देखील अभ्यासू शकतात. उदा. दहावीपर्यंत MYP करुन पुन्हा भारतीय अभ्यासक्रम घेता येतो किंवा १०वी पर्यंत अन्य अभ्यासक्रमात शिकून ११-१२वीसाठी डिप्लोमा प्रोग्रॅम असेही करता येउ शकते.
अन्य अभ्यासक्रमांपेक्षा आयबीचे अभ्यासक्रम कशा प्रकारे वेगळे आहेत?
हे अभ्यासक्रम प्रयोग व उपयोजनावर (practical and application-based) आधारित आहेत. दहावीपर्य़ंत कोणतीही शालाबाह्य परिक्षा नसते. ’काय शिकायचे?’ यापेक्षा आयबीचा भर ’कसे शिकायचे?’ यावर आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्याने केलेल्या कामाच्या गुणवत्तेला जास्त महत्व आहे किती परिक्षा दिल्या याला नाही.
भारतात व जगात आयबी अभ्यासक्रमास मान्यता आहे का? आयबी डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना भारतात/बाहेर प्रवेश कसा मिळतो?
जगभरातील(११० देशातील) कॉलेज व विद्यापिठांनी आयबीला मान्यता दिली आहे. असोसिएशन ऑफ इंडिअन युनिव्हर्सिटीजने(AIU) व सर्व आय.आय.टीजनी आयबी डिप्लोमाला, CBSE, ICSE व स्टेट बोर्डस यांच्या १२वी प्रमाणापत्राच्या समकक्ष दर्जा दिला आहे.
भारतातच १२वी नंतरचे शिक्षण करण्याची इच्छा असेल तर आयबी ग्रेडसचे मार्कात रुपांतर (कन्हर्जन) करुन मिळते. हे कन्व्हर्जन आयबी स्वत: करुन देते किंवा AIU कडूनही ते करुन मिळते.
आयबीच्या विद्यार्थ्यांसाठी अजूनतरी कोणताही वेगळा कोटा मात्र अस्तित्वात नाही.
अनेक परदेशी विद्यापिठात प्रवेश घेताना उत्तमरित्या आयबी उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अॅडव्हान्स क्रेडीट्स मिळतात. एकंदरीतच परदेशी विद्यापिठात आयबी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे जास्त सोपे जाते. अर्थात आयबी केल्याने सॅट अथवा तत्सम परिक्षेतून सूट मिळत नाही.
आयबी अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्याला काय फ़ायदा आहे?
वेगवेगळ्या विषयांमधला एकसूत्रीपणा कळण्यात मदत होणे, पुस्तकी ज्ञानाचे उपयोजन करता येणे, प्रयोगशीलता वाढीस लागणे, विषयाशी संबंधीत वेगवेगळ्या क्षमतांचा विकास होणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतंत्र विचार करण्याची संधी मिळून सर्वंकष विचारक्षमता निर्माण होणे हे आयबी अभ्यासक्रमाचे काही महत्वाचे फ़ायदे आहेत.
विद्यार्थ्यांना सहनशील, प्रज्ञावंत आणि उत्सुक विश्वनागरिक बनवणे हे आयबीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी हा सर्व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमधे काही विशिष्ट गुण विकसीत व्हावेत या दृष्टीने तयार केलेला आहे. या गुणांना 'लर्नर प्रोफ़ाईल' असे म्हटले जाते. आयबीतील प्रत्येक परिक्षा, प्रकल्प अथवा पाठ या प्रोफ़ाईलना समोर ठेऊन बनवला जातो. हे गुण पुढीलप्रमाणे आहेत-
Inquirers - जिज्ञासू
Knowledgeable - प्रज्ञावान
Thinkers - विचारक्षम
Communicators - संवादक
Principled - तत्वनिष्ठ
Open-Minded - मुक्तमनस्क
Caring - सहृदय
Risk-takers - धाडसी
Balanced - संतुलित
Reflective- चिंतनशील
आयबी अभ्यासक्रमातून पालक काय अपेक्षा ठेउ शकतात?
आयबी अभ्यासक्रम पाल्याच्या व्यक्तिमत्वाचा उत्तम विकास घडवू शकतो. ज्ञान, तंत्र, क्षमता, कृती आणि वृत्ती यासर्वांचा संतुलित विकास हे आयबीचे मोठे वैशिष्ठ्य आहे. विद्यार्थ्यांकडून उच्च प्रतीच्या कामाची अपेक्षा ठेवली जाते. अशा प्रकारच्या अपेक्षा असल्याने आपसूकच शाळा व शिक्षक या दोन्ही पातळ्यावर उत्तमतेचा आग्रह धरता येतो.
एखाद्या शाळेला आयबी अभ्यासक्रम राबवण्याची परवानगी सुरुवातीला फक्त ५वर्षापुरतीच असते. त्यादरम्यान शाळेला सतत आपल्या पायाभूत सुविधा, शिक्षक इत्यादींमध्ये काय सुधारणा केली, विकास केला याची इत्यंभूत माहिती आयबीला द्यावी लागते. ही सततची सुधारणा समाधानकारक असेल तरच शाळेची मान्यता टिकून राहते. या प्रक्रियेमुळे शाळेला आपला दर्जा सांभाळावाच लागतो.
खुप मस्त माहिती. माझ्या निवडक
खुप मस्त माहिती. माझ्या निवडक १०त!!!!!
पहिला भाग
पहिला भाग http://www.maayboli.com/node/35620 येथे आहे.
९०ज मधे इंडोनेशियाला शाळेत
९०ज मधे इंडोनेशियाला शाळेत शिकवताना आय.बी. इंट्रोड्यूस केले गेले होते. त्यावेळी १२ वीच्या काही भारतीय मुलांना मी आय बी हिन्दी चं ट्रेनिंग दिलं होतं..
पण आम्हाला ट्रेन करण्याकरता जे शिबिर घेतलं गेलं होतं ते समजायला बरंच किचकट गेलं होतं..
नंतर आधिकाधिक समजून घेण्याची मेहनत आम्हाला स्वतःच घ्यावी लागली होती ..
नंतर आधिकाधिक समजून घेण्याची
नंतर आधिकाधिक समजून घेण्याची मेहनत आम्हाला स्वतःच घ्यावी लागली होती ..>>> ती घ्यावीच लागते, कारण ते शिबीर फक्त इंट्रोडक्टरीच असते. एक शिक्षक म्हणून स्वतःला सतत अपडेट ठेवावे लागणे हा माझ्यासाठी आयबीचा फार मोठा अॅसेट आहे.
सुंदर,अभ्यासपुर्ण लेख,
सुंदर,अभ्यासपुर्ण लेख, सत्यजीत,
माझ्यासारख्या "ढ" पालकांसाठी अतिशय उपयुक्त!
छान माहिती. अजुन खुप खुप
छान माहिती. अजुन खुप खुप वाचायला आवडेल. प्लिज लिहा.
तुम्ही कोण्ता विषय / कोण्त्या प्रोग्रामला शिकवता? (आय होप, आगावपणा करत नाहिय)
छान माहिती. आयबीचे विषय आणि
छान माहिती. आयबीचे विषय आणि त्यांची निवड याबद्दलही लिही ना प्लीज.
माझा मुलगा आयबी मधे शिकतोय.
माझा मुलगा आयबी मधे शिकतोय. अभ्यासाबरोबरच इतर अॅक्टिविटिज सुद्धा आयबी लर्नर प्रोफाईल डेवलप करण्याच्या द्रुष्टीने आखलेल्या असतात. त्यामुळे मुले जेव्हा इतर स्पर्धांमधे भाग घेतात तेव्हा त्यातुन कोणते स्किल्स एन्हान्स होणार आहेत याची आपल्यालाही कल्पना असल्याने आणखी हुरुप येतो. एकुणात मुलाचा अभ्यास तापदायक न होता एक्सायटिंग आणि आनंददायी होतो असा माझा अनुभव आहे.
@ निवांत पाटील- मी आयबीच्या
@ निवांत पाटील- मी आयबीच्या डिप्लोमा प्रोग्रॅममधे 'थिअरी ऑफ नॉलेज' आणि बायॉलॉजी हे दोन विषय शिकवतो.
@ चंचल- प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद, आयबीत शिकवणेही तितकेच एक्सायटिंग आणि आनंददायी आहे!
@ मामी- डिप्लोमा प्रोग्रॅमचे
@ मामी- डिप्लोमा प्रोग्रॅमचे विषय सहा विषयगटात विभागले आहेत, ते पुढीलप्रमाणे
गट १- प्रथम भाषा - इंग्रजी (दोन पातळ्यावर हायर किंवा स्टँडर्ड लेव्हल- अनिवार्य)
गट २- द्वितीय भाषा - हिंदी, स्पॅनिश, फ्रेंच इ.
गट ३- ह्युमॅनिटीज- इकॉनॉमिक्स, बिझनेस अँड मॅनेजमेंट, हिस्ट्री, सायकॉलॉजी, इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन ग्लोबल सोसायटी इ.
गट ४- शास्त्र - फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी, एनव्हायरॉनमेंटल सिस्टीम्स अँड सोसायटीज इ.
गट ५- गणित- गणित तीन पातळ्यावर- हायर, स्टँडर्ड, स्टडीज- कोणतीही एक पातळी अनिवार्य. कॉप्युटर सायन्स
गट ६- कला - व्हिज्युअल आर्ट्स, थिएटर, फिल्म स्टडीज, फोटोग्राफी इ.इ.- हा सर्व गटच ऑप्शनल आहे.
प्रत्येक मुलाला डिप्लोमासाठी सहा विषय घ्यावे लागतात. साधारपणे प्रत्येक गटातील एक विषय घ्यावा लागतो.
सहाव्या गटातील विषय न घेता ३-४-५ गटामधील दोन विषय घेण्याची मुभा आहे.
एनव्हायरॉनमेंटल सिस्टीम्स अँड सोसायटीज हा विषय घेतल्यास ३र्या अथवा ४थ्या गटातील एकही विषय न घेण्याचीही मुभा आहे.
बहुतेक सर्वच विषय हायर व स्टँडर्ड लेव्हलला आहेत. सहापैकी तीन विषय हे हायर लेव्हललाच घ्यावे लागतात.
फ्रेंच/स्पॅनिश पहिल्यांदाच शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी 'अॅब इनोशिओ' ही अत्यंत बेसिक लेव्हलही असते.
याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला थिअरी ऑफ नॉलेज हा विषय आणि 'क्रिएटीव्हीटी-अॅक्शन-सर्व्हिस' कार्यक्रमाअंतर्गत कार्यानुभव पूर्ण करणे अनिवार्य असते.
उत्तम माहिती सीबीएसई
उत्तम माहिती
सीबीएसई बोर्डानंही लर्नर प्रोफाईलमधल्या गुणांसारख्याच गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यास काही वर्षांपासून सुरूवात केलेली आहे.
शाळेला सतत आपल्या पायाभूत सुविधा, शिक्षक इत्यादींमध्ये काय सुधारणा केली, विकास केला याची इत्यंभूत माहिती आयबीला द्यावी लागते. ही सततची सुधारणा समाधानकारक असेल तरच शाळेची मान्यता टिकून राहते. >>> हे प्रत्येक बोर्डाच्या बाबतीत व्हायला हवं, खरं म्हणजे....
आगाउ मस्त माहिती. सिलॅबस
आगाउ मस्त माहिती. सिलॅबस मस्तच आहे. परत शाळेत जावावसं वाटतयं. म्हणजे विषय आपण सेलेक्ट करायचा हे अगदी भारी वाटलं.
थेअरी ऑफ नॉलेज वाचतोय आता नेट वर. धन्यवाद
आणि हो असाच अभ्यासक्रम बोर्डाला देखिल लागु होइल (लवकरात लवकर) अशी अपेक्षा ठेवुया...
खूप छान माहिती, यावर्षीच मी
खूप छान माहिती, यावर्षीच मी जयच्या अॅडमिशन वेळी खराळवाडीत असणार्या एका शाळेची सगळी माहिती घेऊन कॅम्पस पाहुन आले होते पण हे आयबी ऐकले आणि खूप संभ्रमात होते तसेच विचार्पुसही केली पण पॉझिटीव्ह काहीच वाटले नव्हते.....त्यामुळे त्याचा विचार केला नाही पुढे......
पण ते स्कूल ईतके छान आहे की परत विचार करायला हरकत नाही.......
खूप खूप धन्यवाद आगाऊ, पुढे अजुन वाचायला आवडेल......
धन्यवाद आगाऊ. मला पुढे ही
धन्यवाद आगाऊ. मला पुढे ही माहिती अतिशयच उपयोगी पडणार आहे.
आगाऊ धन्यवाद आगाऊ मला पण
आगाऊ धन्यवाद आगाऊ मला पण उपयोग होणार आहे ह्या माहितीचा.
ह्या माहितीसाठी मनःपूर्वक
ह्या माहितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद आगाऊ. पुढे निर्णय घेताना फार उपयोग होईल.
<<एक शिक्षक म्हणून स्वतःला सतत अपडेट ठेवावे लागणे हा माझ्यासाठी आयबीचा फार मोठा अॅसेट आहे.>>
स्वतःला अपडेट ठेवण्याची इच्छा...ह्या गुणाचा मला फार आदर वाटतो !
आणि अशा व्यक्तींबद्दल जास्त विश्वास वाटतो.
विद्यार्थ्याच्या बौद्धिक
विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून कोणता अभ्यासक्रम बरा असे सांगता येईल का? म्हणजे मूल फार हुशार नसेल तर त्याला हा आय बी चा अभ्यासक्रम झेपेल का?
आगाऊ , खूप मस्त माहीती.
आगाऊ , खूप मस्त माहीती.
म्हणजे मूल फार हुशार नसेल तर
म्हणजे मूल फार हुशार नसेल तर >>>> इथे लिहणे योग्य नाही पण तरीही याचा जरा अर्थ स्पष्ट कराल का प्लिज.
@ डेलिया- विद्यार्थ्याची
@ डेलिया- विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता कमी आहे की त्याची प्रयत्न/कष्ट करण्याची तयारी नाही हा कळीचा मुद्दा आहे.
बौद्धिक क्षमताच कमी असेल (इथे मी आयक्यू, लर्निंग डिसॅबिलिटी इ. सबळ कारणे गृहीत धरतो आहे) तर कोणताही सिलॅबस जडच जाईल.
आयबीबाबत सांगायचे तर इथे सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थीही उत्तम यश मिळवू शकतो मात्र प्रचंड आणि सतत कष्ट करायची तयारी हवी.
फारच उपयुक्त माहीती! धन्यवाद
फारच उपयुक्त माहीती! धन्यवाद आगाऊ!
म्हणजे मूल फार हुशार नसेल तर
म्हणजे मूल फार हुशार नसेल तर >>>> इथे लिहणे योग्य नाही पण तरीही याचा जरा अर्थ स्पष्ट कराल का प्लिज.>> फार हुशार नसेल तर म्हण्जे शैक्षणिक सामान्य बुद्धिमत्ता असलेले. साधारण शाळेत ४५- ५०% च्या आसपास मार्क मिळवू शकणारी मुले किन्वा गरवारे सारख्या शाळांमधे ड, फ, ग ई. तुकड्यांमधे असणारी मुले.
‘सिल्व्हर ओक’ची मनमानी सुरूच
‘सिल्व्हर ओक’ची मनमानी सुरूच