Submitted by सह्याद्रीमित्र on 3 December, 2013 - 13:33
झी मराठीवरचा एकमेव विनोदी Reality Show असलेल्या फू बाई फू चं नवीन पर्व कसं वाटतंय ??
माझ्या मते आधीचीच पर्व आणि त्यांच्यातले विनोद सरस होते. यातल्या जोड्या आणि सगळे स्कीट ओढूनताणून केल्यासारखे आहेत. विशेषत: माधवी जुवेकर आणि विजय पटवर्धन अतिशय सुमार… बळंच लाऊड होतात (हेमावैम). स्वत: परीक्षकही खूप कमी वेळा हसतात !!
तुम्हाला काय वाटतं ??
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे व्वा ! सुरु झालं फु बाई
अरे व्वा ! सुरु झालं फु बाई फु चं नवं पर्व ?
प्रियदर्शन जाधव अँड भारत
प्रियदर्शन जाधव अँड भारत गणेशपुरे टु वाॅच.
माझ्या मते आधीचीच पर्व आणि
माझ्या मते आधीचीच पर्व आणि त्यांच्यातले विनोद सरस होते>>>>> अनुमोदन.. मला तर पहिल्या पर्वानंतर जास्त कोणती नाहीच आवडली.... वैभव मांगले आणि विशाखा सुभेदार बेस्ट जोडी आहे... पहिल्या पर्वात सुप्रिया पाठारे बरोबर कोण होत. तिची आणि भाउची जोडी नाही पटत....
उलट मला प्रियदर्शन जाधवचा
उलट मला प्रियदर्शन जाधवचा अभिनय आवडतो, कारण तो सतीश प्रमाणे अभिनय करण्याचा प्रयत्न करतो. पण हे मात्र मान्य करावंच लागेल कि तोच-तोच पणा आहे अभिनयात. शिवाय जबरदस्तीने करायला लावल्याप्रमाणे विनोद केले जातात. पैसे मिळतात म्हणून परीक्षक पण बत्तीशी दाखवत खदाखदा हसतात.
एकवेळ, इतरांच्या विनोदांमुळे हसू नाही आल, तरी परीक्षकांच हसण पाहून नक्कीच हसायला येत मला.
निलेश साबळे एक चांगला निवेदक आहे पण आधीच्या पर्वात त्याला निवेदन करायला जास्त वाव मिळाला होता.
नाटुकल्यांमध्ये उगाच गाणी वगैरे घुसडतात....एखाद्या वेळी ठीक आहे पण प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये????
हे जरा जास्तच होत. मग कलाकारसुद्धा एन्ट्रीला वेडवाकड होत नाचत बसतात. दुसऱ्याच (गाजलेल्या) गाण्यांच्या चालीवर शब्दांची मोड-तोड करून लिहिलेली गाणी (????) तो गायक शास्त्रीय संगीत गायल्याप्रमाणे गातो.
पण संध्याकाळी काहीतरी मराठी बघायचं हा घरातला नियम असल्याने, 'फु बाई फु' शिवाय दुसरा उपाय नाही.
एक दोन पार्ट्स पाहिले. एक दोन
एक दोन पार्ट्स पाहिले. एक दोन चांगले विनोद असतात, पण बाकी भरताड असते उगाच. आणि ते मागे उगाच "टॉइंग", "टूऊऊंग" सारखे आवाज का काढतात प्रत्येक पंच ला? लोकांना विनोद कळत नाहीत असे वाटते काय त्यांना?
हो
हो
निलेश साबळे आता जरा आळसलेला
निलेश साबळे आता जरा आळसलेला वाटतो
भाउ बेस्ट आहेत पण जरा ओव्हर वाटतो
प्रियदर्शनच आवडतोय
प्रियदर्शनच आवडतोय
तद्दन बकवास आहे
तद्दन बकवास आहे
'फू-बाई-फू' मधुन 'मायबोलीकर
'फू-बाई-फू' मधुन 'मायबोलीकर त्रयी' बाहेर पडल्यापासुन बघणं सोडून दिलेलं आहे...
कलाकार कितीही चांगले, गुणी... असले, तरी मुळ-लेखनातच जर जीव नसेल तर 'कामचलावू' पंचेस जमवून आणण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो; अशावेळि "टॉइंग", "टूऊऊंग" सारखे आवाज, आणि हसण्याचे व्हाईस-ओव्हर लादले जातात...
भारत गणेशपुरे त्यातल्या त्यात
भारत गणेशपुरे त्यातल्या त्यात बेस्ट आहे… प्रियदर्शन जाधव बद्दल अनुमोदन… माझ्या मते ह्या जोड्या अश्या आहेत की एकाला विनोदाचा जराही गंध नाही आणि दुसरा त्याला सावरून घेण्यासाठी असलेला त्यातल्या त्यात बरा विनोदवीर पार्टनर… उदा. विजय पटवर्धनच्या एकाही जोकला हसायला येत नाही पण सुनील तावडे निभावून नेतात.तिच केस माधवी जुवेकरची. अत्यंत लाऊड,सुमार आणि विनोदाचं अजिबात अंग नसलेली भसाड्या आवाजाची… पण प्रियदर्शन जाधव सावरून घेतो… हेमंत ढोमे आणि त्याची पार्टनर हे तर आऊट ऑफ क्वेश्चन… दोघांनाही काहीही जमत नाही. हेमंत ढोमे बळंच इकडेतिकडे पळत असतो. दोघंही उगाचच आवाज वाढवतात…
स्वप्नील जोशीचं ते मध्ये मध्ये " ए ए ए ए ए ए ए" करणं डोक्यात जातं. आता विनोदच इतके पांचट आणि सुमार असतात की तो तरी बिचारा काय करणार… बहुदा एखादं स्कीट चांगलं नसतानाही "तुम्ही उत्तम सादर केलंत" "मजा आली" 'गॉड ब्लेस यू" असं म्हटलंच पाहिजे अशी सक्ती परीक्षकांवर असावी…. कारण सारेगमप सारखं… "अजून सुधारलं पाहिजे" वगैरे वाक्य कधीही येत नाहीत. बहुदा त्यांनाही विनोदाचा हाच दर्जा मान्य असावा !!!
बाय द वे सुरुवातीच्या काही भागात असलेले मेघना एरंडे किंवा अजून काही लोक बाहेर का पडले ???
आता कार्यबाहुल्यामुळे फू बाई
आता कार्यबाहुल्यामुळे फू बाई फू पहायला मिळत नाही. याआधीचे सर्व सिझन मी न चुकता पाहिले आहेत. फू बाई फूने वैभव मांगले, भाऊ कदम यांच्यासारख्या विनोदवीरांना उभे केले. सतीश तारे तर क्या बात है. पण दुर्दैवाने सतीश तारे लवकर गेले. पण त्यांची जागा प्रियदर्शन जाधव भरुन काढेल असे वाटते. सतीश तारेंना मानवंदना देणारा एक अॅक्ट प्रियदर्शनने केला होता. लिखाणही त्यानेच केले होते बहुतेक. आणि सादरीकरणही अप्रतिम झाले होते. त्याच्या माध्यमातून एक चांगला कलाकार मिळाला आहे. आणि भारत गणेशपुरेसारख्या चांगल्या अभिनेत्याला जास्त संधी का मिळत नाही, हे कळत नाही. त्याची ती विदर्भी भाषा तर बाप रे बाप... हसून हसून पुरेवाट होते.
गणेश भरतपुरेंचे पहिले काही
गणेश भरतपुरेंचे पहिले काही प्रयोग तुफान आवडले.. पण आता ते एक Format होऊन बसताहेत.
प्रियदर्शनचे सुध्दा जवळपास तेच होतंय..
बाकी खोटं हसणं वगैरे .. चालायचेच..
गणेश भरतपुरें नाही हो, भारत
गणेश भरतपुरें नाही हो, भारत गणेशपुरे...:)
पुरे तर पुरे... पण चुकलेच..
पुरे तर पुरे...
पण चुकलेच.. भारत गणेशपुरे.... भारत गणेशपुरे.... भारत गणेशपुरे.... भारत गणेशपुरे.... भारत गणेशपुरे....
भारत गणेशपुरे आणि प्रियदर्शन
भारत गणेशपुरे आणि प्रियदर्शन जाधव चांगले वाटतात..
आणि हे परिक्षक सगळ्यांनाच कसे ९-९.५-१० गुण देतात?
काही काही तद्दन बकवास, अजिबात हसू न आणणार्या स्किट ना पण ९.५ गुण..
तो स्वप्नील जोशी बगळ्यासारखी मान का हलवतो सारखी?
गोष्टी गावाचे, आता पुरे!
गोष्टी गावाचे, आता पुरे!
स्वप्नील जोशी चे परीक्षक
स्वप्नील जोशी चे परीक्षक म्हणून credetntials काय आहेत?
सुनील तावडे वगरे सिनीअर मंडळींना हा कसा काय जज करू शकतो कुणास ठावूक.
स्वप्नील जोशीवर आपल्या
स्वप्नील जोशीवर आपल्या नवज्योतसिन्ग सिद्धु चा प्रभाव आहे. त्याच्या नकली हसण्यावरुन लक्षात नाही आले का कोणाच्या?:फिदी:
स्वप्निल जोशी 'Comedy Circus'
स्वप्निल जोशी 'Comedy Circus' मधे होता. त्याच्या काही चांगल्या Skits पण मी बघितल्या आहेत.
एकदा कपील शर्मा आल्यानंतर मात्र तो(आणि VIP , अली) वगैरे मंडळी मागे पडले..
तेव्हा सिध्दू आणि पुरनसिंग एकत्र ....:)
बाय द वे सुरुवातीच्या काही
बाय द वे सुरुवातीच्या काही भागात असलेले मेघना एरंडे किंवा अजून काही लोक बाहेर का पडले ???...>>>...
ही चॅनेल्सची आप-आपसातली पळवा-पळवी सुरु आहे... विशेषतः झी-मराठी आणि ई-टीव्ही मराठी मधली...
या पर्वात ई-टीव्ही मराठी वरचे (कॉमेडी एक्सप्रेसवाले) बहुतेक कलाकार (लेखका सकट) झी-मराठी वर उपलब्ध आहेत, त्यामुळे इथले काही कलाकार 'तिथे' जाणारच...
बरेचवेळा कलाकारांच्या 'मानधना'च्या कारणाने कलाकार स्वतः बाहेर पडतात. काहीवेळा निर्मिती-संस्था (Production House) कुठली आहे?, त्यावर कलाकारांचे सादरीकरण अवलंबून असते. सादरकर्त्यांच्या अचाट आणि अफाट मागणीमुळे बरेच चांगले कलाकार अशा कर्यक्रमांतून बाहेर पडतात. उदा. निनाद शेट्ये, कौतुक शिरोडकर, रविन्द्र मठाधिकारी, आशिष निंबाळकर या लोकांनि 'फू-बाई-फू' ला दिलेली सोडचिट्ठी... मधेच कधीतरी या लोकांची स्किट्स पडद्यावर दिसतात, ती देखिल सुरुवातीच्या काळात Production House ने नाकारलेली पण 'त्यांच्या' जवळच शिल्लक राहिलेली स्किट्स असतात...
मेघना येरंडे एक सॉलिड कलाकार
मेघना येरंडे एक सॉलिड कलाकार आहेत.. पण फू-बाई मधे त्यांचे दोन्ही एपिसोड अत्यंत सूमार झाले होते.. (१० पैकी ५ गूण द्यावेत एवढे)...
दिवसेंदिवस हा शो कमालीचा
दिवसेंदिवस हा शो कमालीचा सुमार होत चाललाय एवढं मात्र नक्की. कारण एकही स्क्रीप्ट विनोद या शब्दाला साजेसं नाहीये. लवकरात लवकर बंद व्हावा हीच अपेक्षा आहे.
दिवसेंदिवस हा शो कमालीचा
दिवसेंदिवस हा शो कमालीचा सुमार होत चाललाय एवढं मात्र नक्की. कारण एकही स्क्रीप्ट विनोद या शब्दाला साजेसं नाहीये. लवकरात लवकर बंद व्हावा हीच अपेक्षा आहे.>>> तुमची प्रार्थना आकाशातल्या बाप्पाने ऐकली आहे समि. सारेगमपच्या ऑडिशन्स सुरु झाल्या आहेत.... काही दिवसात फु बई फुच्या जागी सारेगमप येईल.... तोपर्यंत कळ काढा
तुमची प्रार्थना आकाशातल्या
तुमची प्रार्थना आकाशातल्या बाप्पाने ऐकली आहे समि. सारेगमपच्या ऑडिशन्स सुरु झाल्या आहेत.... काही दिवसात फु बई फुच्या जागी सारेगमप येईल.... तोपर्यंत कळ काढा >>> झी मराठीवाल्यांचे याबद्दल खरोखरच आभार. या सगळ्या तथाकथित आणि दर्जाहीन विनोदवीरांनी (हा शब्द मनावर दगड ठेऊन लिहावा लागतोय) आणि त्यांच्या पापकृत्यात तितकच जबाबदार असलेल्या स्क्रीप्ट लेखकांनी किमान एकदा बनवाबनवी,एकापेक्षा एक,गंमत जंमत किंवा यासारखे अतिशय उच्च दर्जाचे विनोद आणि प्रसंग असलेले सिनेमे मन लावून पाहावेत आणि काहीतरी धडा घ्यावा. खुद्द परीक्षकही अख्ख्या एक तासात १-२ वेळा हसतात… ते पण अगदीच rude वाटू नये म्हणून.