विन्डोज फोन - माहिती

Submitted by निनिकु on 28 November, 2013 - 03:47

विन्डोज फोन चे अजून तितकेसे वापर कर्ते नसल्याने नवीन घेणार्‍यांना याबद्दल फार्शी माहिती नसते, सर्वांना माहित व्हावे म्हणून दुसर्‍या धाग्यावर दिलेया प्रतिसादाचा वेगळा धागा करत आहे.

मी नोकिया ल्युमिया ७२० वापरतेय गेले सहा महिने.

काही छान वाटलेल्या गोष्टी:
- २जी आणि नेहमीचा फोन म्हणून वापर करून सुद्धा बॅटरी २ दिवस चालते.
-मेट्रो लु़क - मला व्यक्तिशः फार आवडला.

-टच आणि एकूण बिल्ड क्वालिटी - अतिशय उत्तम

-कॅमेरा सुद्धा अतिशय छान आहे.

-पुर्वी एफ.एम रेडिओ सुद्धा नव्हता, पण आता अँबर अप्डेटनंतर रेडिओ आहे.

-अ‍ॅप्स सुद्धा मला हवी असलेली जवळ जवळ सर्व मिळाली. (व्हॉट्सॅप, फेस्बूक, डिक्शनरी, बॅटरी,
स्पीड डायल, स्काइप, एक्स्पेन्स मॅनेजर, फिटनेस संबंधी, एडोबे रिडर,कंपास आणि अशी बरीच
छोटी छोटी उपयोगी पडणारी, ऑनलाईन बँकिंग या घडिला तरी फक्त HDFC आहे)

-५१२ रॅम असून सुद्धा टेम्पल रन उत्तम चालते

-किड्स कॉर्नर आहे - ज्यामुळे मुलांसाठीचे फक्त एक वेगळे दालन करता येते. मुलांच्या हातात फोन देताना
तो मोड चालू केला की त्यांनी चुकून कोणाला फोन लावणे, महत्वाच्या गोष्टी डिलिट होणे वगैरे चिंता राहात नाही.

मला फारशा वापराव्या लागत नाही त्यामुळे.त्रास नाही पण बाकी काही लोकांना त्रास दायम ठरतील असे काही मुद्दे:
१. फाईल एक्स्प्लोरर नाही
२. पीसी ला कनेक्ट केल्यावर सुद्धा तो स्वःतःची अक्कल लाऊन एक वेगळे अ‍ॅप देतो फाईल एक्स्प्लोर्/मॅनेज करायला, ज्याचा या घडीला तरी दर्जा "झ" आहे. मी एक रजिस्ट्री हॅक वापरून त्याला मेमरी डिव्हाइस म्हणून उघडायचा मार्ग शोधला आहे पण तरी हे राजरोस पणे करायचा मार्ग त्यांनी द्यायलाच हवा.
युजर ला बुद्दू समजणारे आणि गोष्टी करायला अडवणारे मला आवडत नाहीत.

३. इ मेल पाठवताना सध्या तरी इमेज सोडता दुसर्‍या कोणत्याही प्रकारच्या फाइल सध्या तरी अ‍ॅटॅच करता येत नाहीत ( मला परवाच हा शोध लागला - सहा महिन्यांनी)

४. म्युझिक प्लेयर मध्ये हवी ती गाणी काढून सुरू करणे त्रासाचे आहे (पटकन एखाद्या फोल्डर मधून - क्र. १ शीच संबंधित)

माझा निष्कर्ष -

ऑफिस साठी वापरणार असाल - विशेषतः ऑफिस जर आउट्लूक वापरत असेल तर - अवश्य घ्या - कॅलेंडर आणि बाकी गोष्टी अतिशय मस्त सिंक होतात. हे मला अँड्रॉइड मध्ये तितकेसे छान वाटले नाही

कॉन्टक्ट्स सुद्धा आउट्लूक ला ठेवता येतात जे मला बेहद्द आवडले.

मजा/ करमणूक साठी वापरणार असाल -

फाईल एक्स्प्लोरर जोवर येत नाही तोवर वाटेला जाऊ नका. चिडचिड होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रजिस्ट्री हॅक वापरून त्याला मेमरी डिव्हाइस म्हणून उघडायचा मार्ग शोधला आहे पण तरी हे राजरोस पणे करायचा मार्ग त्यांनी द्यायलाच हवा. >> सह्मत आहे. कसे केले कळेल का? मी लुमिया ६२० वापरतो. ६२० मध्ये अम्बर अपडेट करुन पण एफ.एम रेडिओ नाही. कारण कळले नाही.
बाकी फोन मस्त आहे.

मीही वापरतेय लुमिया (५२०). मस्त आहे. म्युझिक सिस्टीम एकदम झकास !
फाईल एक्स्प्लोरर नाहीये पण मी देखील काही युक्त्या शोधतेय.

आता तर SBI चे अ‍ॅप पण आलेय.

अर्थात लुमिया आत्ताच आलाय आणि त्यात बरेचसे अपडेट्स होणार आहेत.
एकएक करून आता अ‍ॅप्स येत आहेत . काही अ‍ॅप्स जे अँड्रॉइड मध्ये पैसे टाकून घ्यावे लागत होते ते इथे फ्री आहेत. पण काही अ‍ॅप्स विशेषतः गेम्स फ्री नहियेत.

म्युझिक प्लेयर मध्ये हवी ती गाणी काढून सुरू करणे त्रासाचे आहे
a, b,c ने सेअर्च नाही करत का आपण? कटकट आहे खर पण मग मी तरी गाणी सेव करताना नावाने सेव करते.

मी ही लुमीया ५२० वापरतोय जुलै पासून. तुम्ही उल्लेख केलेल्या त्रासांव्यतिरीक्त आणखी एक त्रास मला जाणवला तो म्हणजे फाईल्स ची मिरर ईमेज रहाणे. उदा. एखादी म्युझीक किंवा व्हिडीओ फाईल मी डिलीट केल्यानंतर सुद्धा लिस्ट मधे दाखवली जाते. अर्थात ती चालू होत नाही. पण लिस्ट मधे उगाचच गर्दी वाढते. मी ऑनलाईन हेल्प मधे ही गोष्ट नोकीयाला सांगीतली. तर त्यांनीही हा बग मान्य केला. आधी मला वाटलं होतं की व्हायरस आहे म्हणून पण क्लोज्ड अ‍ॅप्लीकेशन्स असल्याने सध्या तरी हा त्रास नाहीये (व्हायरसचा). बाकी तुम्ही दिलेली माहिती उत्तम. धन्यवाद ! Happy

२. पीसी ला कनेक्ट केल्यावर सुद्धा तो स्वःतःची अक्कल लाऊन एक वेगळे अ‍ॅप देतो फाईल एक्स्प्लोर्/मॅनेज करायला, ज्याचा या घडीला तरी दर्जा "झ" आहे. मी एक रजिस्ट्री हॅक वापरून त्याला मेमरी डिव्हाइस म्हणून उघडायचा मार्ग शोधला आहे पण तरी हे राजरोस पणे करायचा मार्ग त्यांनी द्यायलाच हवा.
युजर ला बुद्दू समजणारे आणि गोष्टी करायला अडवणारे मला आवडत नाहीत >> हे विचित्र आहे. मी दिड वर्ष ९२० वापरतो आहे जो windows 7 बरोबर external HDD म्हणून दाखवला जातो. बहुधा हे regression आहे.

ल्युमियातल्या खास गोष्टी म्हणजे construction quality, camera and MS office integration.

>>>>>. तुम्ही उल्लेख केलेल्या त्रासांव्यतिरीक्त आणखी एक त्रास मला जाणवला तो म्हणजे फाईल्स ची मिरर ईमेज रहाणे

हो, समजा मी एक नवीन रिंगटोन पीसी वरून तिकडे टाकला किंवा तिकडची एखादी फाईल डिलिट केली तर ती गोष्ट रिफ्लेक्ट व्हायला वेळ लागतो. मला वाटते तो ठराविक अंतराने इंडेक्सिंइ/ क्रोलिंग करतो ते झाल्या नंतरच
लिस्ट मध्ये नवीन गोष्ट दिसणे, जुने नाहिसे होणे हे होते.

अर्थात मला त्याचा तितकासा त्रास होत नाही,

मी ICICI च्या अ‍ॅप ची वाट पाहतेय

>>>ल्युमियातल्या खास गोष्टी म्हणजे construction quality, camera and MS office integration.

१००% सहमत.

मी ल्युमिआ ९२० गेले ११ महिने वापरतोय. मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे PEOPLE, Onenote\Office, Outlook (Basically MsExchange integration). मी अश्या अनेक गोष्टी करू शकतो ज्या Android device करू देत नाही. e.g. Opening a secure mail on the device.
सगळ्यात महत्वाचए म्हणजे Windows Android पेक्षा जास्त सुरक्षीत आहे.

एक बेसिक शंका:

अँड्रॉइडवर व्हायरसचा त्रास मला तरी जाणवलेला नाही. अ‍ॅप्स आपला पर्सनल डेटा अ‍ॅक्सेस करू शकतात पण अ‍ॅप टाकण्याआधी आपली त्याकरता परवानगी घेतली जाते. काही फ्री अ‍ॅप्समध्ये जाहीराती येत रहातात. पण याव्यतिरीक्त काही त्रास जाणवलेला नाही.

विंडोज मोबाइलमध्ये OS च विंडोज असल्याने त्यात संगणकावर येणारे सगळे व्हायरस येऊ शकतात ना? का काही जास्तीची खबरदारी घेतली आहे OS मध्ये?

मी ही लुमीया ५२० वापरतेय.
प्लिज मला पुढिल माहिती द्या.
१. मोबाईल पीसी ला कसा जोडायचा.( mobile PC la connect hoat nahi, PC var XP ahe)
२. रिंगटोन म्हणुन गाण कसा ठेवायच.
३. आलेला मेल र्फरर्वड करताना, पाठवलेल्या व्यक्तिची मेल मधील डाटा डिलिट/एडीट नाहि करता येत.
४. अंबर चे अपडेट कसे घ्यायचे ?

Pc la jodnyasathi data cable dili ahe sobat pan pc var Windows7. Kinva Windows 8 os asane jaruri ahe.
ringtone mhanun gan thevanyasathi phone pc la connect karayacha ani je gan thevayach she te phone memory madhil ringtone ya folder madhe cipy kaarayache....

मला ५२० घ्यायचा आहे .मला काही शंका आहेत .

१.याचा ब्राउजर किती डेटा खातो ?वेबसाईट फुल बैंडविड्थ लोड होतात का ? ओपेरा मिनि अथवा डॉल्फिन टाकता येतात का ?

२)सिम कार्ड कापावेच लागते का ? कापलेले दुसऱ्या फोनमध्ये (X2 00)कधीकधी वापरायचे आहे .

३)५२० मध्ये एफेएम रेडिओ आहे का ?

४)मला फोन हा स्वतंत्र वापरायला आवडतो त्यामुळे PC ला जोडता येणे महत्वाचे नाही .जेवढा फोन पिसिपासून दूर तेवढा तो सुरक्षित राहातो .फोन मेमरी करप्ट होत नाही .

५)ऑडिओ रेकार्डींगची AMR फाईल मेल अटैचमंट म्हणून जाते का ?

६)माझे fastmail dot fm चे email फ्री अकाउंट आहे .त्यात नोटपैड आहे .ऑफलाईन नोटस तिथे टाकल्यावर मला कुठूनही त्या मिळतात .गुगल ड्राईव असेच असावे .

७)मराठी टायपिंग करता येते का ?

८)#निनिकु ,
आताचे स्माटफोन स्मार्टपध्दतीने वापरावे अशी त्यांची अपेक्षा आहे := मेमरीसाठी SKYDRIVE वापरणे .
इमेलची अटैचमंटने jpg , amr फाईल जाईल पण बाकिच्या बहुतेक कॉपिराईटमुळे गाळतात .यासाठीच एफेएम रेकॉर्डींग गाळलेले असते .

९)#वर्षा देसाई ,इमेल फॉवर्डशी विन्डोजचा संबंध नाही .

@ एसआरडी -

प्रश्न : याचा ब्राउजर किती डेटा खातो ?वेबसाईट फुल बैंडविड्थ लोड होतात का ? ओपेरा मिनि अथवा डॉल्फिन टाकता येतात का ?

उत्तर : याचा ईनबिल्ट ब्राउजर आयई ९ आहे. पण तो कमालाची स्लो आहे. वेबसाईटची मोबाईल व्हर्जन लोड होतात. फुल वेबसाईटचा पण ऑप्शन आहे. पण मोबाईल व्हर्जन लोड होतानाच ३जी मधेही खुप वेळ लागतो. त्यामुळे फुलचा ऑप्शन टाळलेलाच बरा. ऑपेरा मिनी अथवा डॉल्फीन अजून टाकता येत नाही. पण युसी ब्राउजर चा ऑप्शन आहे. जो बर्‍यापैकी फास्ट आहे.

प्रश्न : सिम कार्ड कापावेच लागते का ? कापलेले दुसऱ्या फोनमध्ये (X2 00)कधीकधी वापरायचे आहे .

उत्तर : हो. कापावेच लागते. पण कापलेल्या सिमकार्डाची फ्रेम तशीच ठेवून त्यात परत ते बसवता येते. याव्यतिरीक्त एक फ्रेम विकतही मिळते. जी वेळप्रसंगी दुसर्‍या मोबाईलमधे कार्ड वापरण्यासाठी उपयोगी पडते.

प्रश्न :५२० मध्ये एफेएम रेडिओ आहे का ?

उत्तर : अँबर अपडेट मधे रेडीओ आणि स्मार्टकॅम ही दोन नविन अ‍ॅप्लीकेशन्स आहेत.

४)मला फोन हा स्वतंत्र वापरायला आवडतो त्यामुळे PC ला जोडता येणे महत्वाचे नाही .जेवढा फोन पिसिपासून दूर तेवढा तो सुरक्षित राहातो .फोन मेमरी करप्ट होत नाही .

उत्तर : यावर वापरता येणारी अ‍ॅप्लीकेशन्स ची स्पेशल विंडोज व्हर्जनच आहेत. त्यामुळे सध्यातरी व्हायरस चा धोका फोन मेमरीला नाही. पण मेमरी कार्ड मधे व्हायरस असेल तर कदाचित धोका संभावतो.

प्रश्न : ऑडिओ रेकार्डींगची AMR फाईल मेल अटैचमंट म्हणून जाते का ?

उत्तर : हो. पण ते ऑडीओ रेकॉर्डीग फोन मधे केलेले असले पाहीजे. बाहेरील एम्पी थ्री फाईल्स शेअर होतात. व्हिडीओ फाईल्स शेअर होत नाहीत.

प्रश्न : मराठी टायपिंग करता येते का ?

उत्तर : हो. पण देवनागरी कीबोर्ड डाउनलोड करून घ्यावा लागतो.

मला माहिती असलेली, मी वापरलेली उत्तरे दिली आहेत. मला हा फोन घेऊन अजून सहा महिनेपण झालेले नाहीत. बर्‍याचशा गोष्टी मी स्वतः वापरल्यानंतरच मला कळल्या. Happy

रिंगटोन साठी ते mp3 मधून m4r की काहीतरी कन्वर्ट करावे लागते शिवाएक्रिंगटोन्स साठीच्या फोल्डर मध्ये टाकावे लागते.

>>>आताचे स्माटफोन स्मार्टपध्दतीने वापरावे अशी त्यांची अपेक्षा आहे := मेमरीसाठी SKYDRIVE वापरणे .
इमेलची अटैचमंटने jpg , amr फाईल जाईल पण बाकिच्या बहुतेक कॉपिराईटमुळे गाळतात .यासाठीच एफेएम रेकॉर्डींग गाळलेले असते .

हे पटले नाही. SKYDRIVE फक्त पहिले वर्ष फ्री आहे शिवाय मला हव्या तितक्या साइझ चे मेमरी कार्ड जर टाकततेयेत असेल शिवाय ते इंटर्नेट कनेक्शन शिवाय उपल्ब्ध असेत तर का नाहि? मला वाटते सद्यपरिस्थिर्ती मध्ये सुरक्शिततेसाठी ते
युजर ला पुर्ण ताबा न देणे यावर बरेच अवलंबून आहेत - पण अँड्रॉइड ला टक्कर द्यायची असेल तर त्यांना ह्यावर उपाय शोधावा लागेल.

कॉपिराईट मुद्दा पण पटलेला नाही, मी असलेली फाईल - वर्ड / पीडीएफ पाठवतेय, जे कॉपिराईट भंग करत नाहीआणि इ मेल साठी आवश्यक आहे.

#sherloc ,धन्यवाद .

इतक्या सविस्तर उत्तरांबद्दल धन्यवाद .

लुमिआची माहिती पटली पण ब्राउजरची गोची आहे हे जालावर वाचून इथे विचारले . नेहमीच्या नेटसर्फींगसाठी कमी डेटा खाणारा फास्ट वेब ब्राउजरच हवा .

#निनिकु ,
वड आणि पिडिएफ पण अटैच करता येत नाही ?का ?तुम्ही म्हटता तसा युजरला ताबा द्यायचा नसेल .बरोबर .

मेमरी कार्डचे ठीक आहे .मला असे म्हणायचे आहे की 'क्लाउड' स्टॉरिज ची सवय लावणार आणि नंतर फी घेणार .

पुढे जिमेल ,आउटलुक वार्षिक फी चालू करतील असे वाटते . 'फास्टमेल'ने फ्री अकाउंट एक वर्षापूर्वीच बंद केले .
धन्यवाद .

रिंगटोन म्हणुन गाण कसा ठेवायच.

The limit for ringtone is only for 40 seconds & to keep any song you will have to download "Nokia Ringtonemaker' from store. Once you edit the desired 40 seconds of the song as your ringtone, WP8 itself saves the tune in the ringtone list. Happy

वड आणि पिडिएफ पण अटैच करता येत नाही?

Have you tried via Skydrive? It works for me everytime.


मला माहिती असलेली, मी वापरलेली उत्तरे दिली आहेत. मला हा फोन घेऊन अजून सहा महिनेपण झालेले नाहीत. बर्‍याचशा गोष्टी मी स्वतः वापरल्यानंतरच मला कळल्या
+१.

कृपया....................सिमकार्ड कापण्यापेक्षा......मायक्रोसिम् मधे आपला नंबर कन्वर्ट करुन घ्यावे........

सिमकार्ड कापलेले वापरल्यास वायफाय आणि नेटवर्क चा सिग्नल कमी मिळतो......

(अनुभव)

एवढ्या चांगल्या गोष्टी म्हणजे चरे न पडणारी स्क्रिन ,दहा सेंमीपर्यँत फोकसचा कैमरा ,क्वॉलकॉम प्रसेसर ,मैपस नोकिआ ने दिले पण मायक्रो सिम ठेवले Sad

पण युसी ब्राउजर चा ऑप्शन आहे. जो बर्‍यापैकी फास्ट आहे. >> मी बरेच दिवस वापरतो आहे नि माझा अनुभव तरी चांगला आहे पण अर्थात मला data plan issue नाही नि बर्‍यापैकी 4G coverage आहे तेंव्हा YMMV.

माहीत नाही कारण?
मला पण हे दुसर्यांनी सांगितले
जेव्हा खरच मायक्रोसिम वापरले तेव्हा वायफाय चा सिग्नल वाढला

कृपया.. सिमकार्ड कापण्यापेक्षा मायक्रोसिम् मधे आपला नंबर कन्वर्ट करुन घ्यावे.
सिमकार्ड कापलेले वापरल्यास वायफाय आणि नेटवर्क चा सिग्नल कमी मिळतो.

तसेच कहि दिवसन्नि ते बन्द देखिल पडु शकते. माझ्या मैत्रिनीच अनुभव!

सिम रिप्लेस ला १५मिंट लागतात. वोडाफोनचा स्वानुभव...
एरटेलचाही..