Submitted by आरती. on 26 November, 2013 - 10:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. पातळ भाजलेले पोहे - पाव किलो
२. कुरमूरे - पाव किलो
३. भाजकी डाळ - १ वाटी
४. भाजलेले शेंगदाणे - १ वाटी
५. लिंबाचा रस - ४ चमचे
६. खवलेल ओल खोबर - १/२ वाटी
७. कोथिंबीर - १ वाटी
८. हिरव्या मिरच्या - ३- ४
९. साखर - चवीनुसार
१०. मीठ - चवीनुसार
क्रमवार पाककृती:
डाळ, कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, दोन चमचे लिंबाचा रस, साखर, मीठ सर्व मिक्स करुन मिक्सरला बारीक वाटून घ्यावी. ह्या मिश्रणाचे छोटे लाडू (तिळाचे लाडू बनवतो त्या आकाराचे) बनवून घ्यावेत.
एका मोठया बाऊलमध्ये पोहे, कुरमूरे, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, २ चमचे लिंबाचा रस, मीठ व थोडी साखर, ओल खोबर घालून सर्व मिक्स कराव.
त्यावर डाळ्याचे लाडू ठेवून सर्व्ह कराव.
खाताना लाडू कुस्करून त्यात मिक्स करून खावेत.
आले पाक व ऊसाचा रस हा बेळगावचा संध्याकाळचा नाश्ता....
वाढणी/प्रमाण:
खाल तेवढ कमीच आहे.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्याच्यात आलं नसतच का?
ह्याच्यात आलं नसतच का?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पराग, आल ही नाही आणि पाक ही
पराग, आल ही नाही आणि पाक ही नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बेळगाव स्पेशालिटी आहे..
मला वाटलं नारळाच्या दुधात
मला वाटलं नारळाच्या दुधात भिजवतात तसं आल्याच्या रसात भिजवतात की काय पोहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही आलं असेल असं वाटलं
मलाही आलं असेल असं वाटलं होतं. भाजकी डाळ म्हणजे पंढरपुरी डाळं का?
सिंडरेला बाई, हो पंढरपूरी
सिंडरेला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाई, हो पंढरपूरी डाळ. ह्याला पंढरपूरी डाळ बोलतात हे उदगीर बाफवर समजल. आम्ही भाजकी डाळ किंवा चटणीची डाळ असच बोलतो.
मी तर आलेपाक जे वडी सारखं
मी तर आलेपाक जे वडी सारखं दिसत ते असेल म्हणुन आले इकडे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तर भलतीच इंटरेस्टिंग रेसिपी निघाली
आरती मस्त गुगली टाकली, पदार्थ
आरती मस्त गुगली टाकली, पदार्थ छानच आहे पण मी आल्याची काहीतरी कृती असेल गृहीत धरून आले.
आरती , आलं हरवलय ह्यात.
आरती , आलं हरवलय ह्यात. आमच्याकडे त्यात सढळ हातानी आलं घालतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चनस, अन्जू धन्यवाद. इन्ना,
चनस, अन्जू धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इन्ना, मी बिन आल्याचा खाल्ला आहे. आई असच बनवते. थोडसच आल घालून ट्राय करेन. सढळ हाताने नको ग बाई.
मलाही आलं असेल असच वाटलं
मलाही आलं असेल असच वाटलं होतं. मस्त वाटतायत. हे करुन बघेन आणि सांगेन कसं जमलं ते.
कविन, मला लगेच गोड पोंगलची
कविन, मला लगेच गोड पोंगलची आठवण झाली.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
केलस की नक्की सांग.
हे हे आरती, मस्त आठवण करून
हे हे आरती, मस्त आठवण करून दिलीस गोड पोंगलची. बर्याच दिवसात झालीच नाही ही रेसिपी घरी. करेन करेन म्हणत कोर्टात जसं तारिख पे तारिख देतात तसं झालं हिचं
आता दोन्ही करेन
कविन, तू कर आणि मी येते
कविन, तू कर आणि मी येते खायला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ह्या वेळेस मूगाची डाळ अजिबात करपवू नकोस.
डाळवं मिळाली की करुन बघेन.
डाळवं मिळाली की करुन बघेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आरती रेसेपीच्या नावात किंवा शब्दखुणांमध्ये "पोहे" लिही ना म्हणजे नंतर शोधायला सोप्पं पडेल.
धन्स अल्पना, तुमच्या ईकडे
धन्स अल्पना, तुमच्या ईकडे Spar असेल तर तिकडे नक्की डाळवं मिळतील.
रेसिपीच्या नावात पोहे नाही लिहीता येणार ओरिजिनल नाव आले पाक आहे. शब्दखूणांमध्ये पोहे लिहील आहे.
इथे कोणत्याच सुपरमार्केटात
इथे कोणत्याच सुपरमार्केटात कधी डाळवं दिसली नाहीत. कदाचीत छोट्या किराणा दुकानात मिळू शकतिल पण मला डाळव्याला हिंदी /पंजाबीत का म्हणतात ते अजून कळालं नाहीये. भावानी एकदा puffed chana dal या नावानी विचार म्हणून सांगितलं होतं, पण आमच्या किराणा दुकनदाराला काही ते नाव कळालं नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अल्पना, डाळव्याला हिंदी
अल्पना, डाळव्याला हिंदी /पंजाबीत का म्हणतात <<< तसच मला कडवे वालाला हिंदीत काय म्हणतात ते कळल नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुमच्या गावावरुनच मागव आता डाळव.
साऊथच्या स्पारमध्ये सर्व नॉर्थ इंडियन किराणा सामान अगदी मखाणापासून आहे म्हणून सेम तिकडे असेल अस वाटल.
अल्पना चटनी वाला दलिया असे
अल्पना चटनी वाला दलिया असे विचारून बघ. इथला बिहारी(?) दुकानदार असे म्हणले की डाळं आणून देतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चटनी वाला नाही म्हणले की मग आपला गव्हाचा दलिया!!
मला वाटतं 'अवलक्कि पाक ' चे
मला वाटतं 'अवलक्कि पाक '
चे सोपे नाव आले पाक
झाले असेल .
माझ्या माहिताप्रमाणे -
अवलक्कि = पोहे ,ओले खोबरे .हिरवी मिरची ,मीठ ,साखर
अथवा पोहे ,तेल ,मेतकूट घातलेलं दुपारचं खाणं .
पाक =खारीक ,शेंगदाणे ,चणे ,डाळं ,गुळ वगैरे थंडीतले मुलांचे पौष्टीक खाणं .
Srd, अवलक्कि = पोहे कन्नड
Srd, अवलक्कि = पोहे कन्नड आणि तेलगूमध्ये.
मला वाटल आल्याची वडी असेल. पण
मला वाटल आल्याची वडी असेल.
पण प्रकार छान आहे.
धन्स जागू , करा आणि इकडे
धन्स जागू
, करा आणि इकडे फोटो डकवा.
मस्तच.. लावलेले पोहे म्हणतात
मस्तच.. लावलेले पोहे म्हणतात ते हेच का ?
बेळगावला बर्याच वेळा जाणे झाले ( गोवा - कोल्हापूर असा प्रवास करताना ) पण असे खास बेळगावी पदार्थ चाखता आलेच नाहीत.
#आरती ,बरोबर . बळगाव ,धारवाड
#आरती ,बरोबर .
बळगाव ,धारवाड ,हुबळीकडे
"काय खाणार ?"
"अवलक्कि !" उत्तर मिळते .असे आमचे वडील सांगायचे .
दिनेशदा धन्स. लावलेले पोहे हे
दिनेशदा धन्स. लावलेले पोहे हे नसावेत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Srd, आता ओल खोबर, साखर, मीठ सगळ्यांना मिळून अवलक्की बोलू नका.
यात आलं नाहीये. मग 'आले' आणि
यात आलं नाहीये. मग 'आले' आणि 'पाक' याला कानडीत काही अर्थ आहे का पोह्यांशी निगडित?
मी तर आलेपाक जे वडी सारखं
मी तर आलेपाक जे वडी सारखं दिसत ते असेल म्हणुन आले इकडे >>>>>१
लाडू न वळता तसेच मिक्स करून
लाडू न वळता तसेच मिक्स करून खाईन म्हणते.
बेळगावी खाद्यपदार्थांबद्दल हा
बेळगावी खाद्यपदार्थांबद्दल हा एक लेख वाचनात आला होता.
>>>मी तर आलेपाक जे वडी सारखं
>>>मी तर आलेपाक जे वडी सारखं दिसत ते असेल म्हणुन आले इकडे >>>>>१<<
+१
Pages