दम आलू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 November, 2013 - 02:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो छोटे बटाटे
२ कांदे (किसुन)
पाऊण वाटी दही
२ टोमॅटो (गरम पाण्यात थोडा वेळ ठेउन साल काढून चिरून घ्या.)
२-३ तमालपत्रे
अर्धा चमचा जिरं
१ चमचा मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पूड
१ चमचा गरम मसाला
थोडी कोथिंबीर चिरुन
अर्धा चमचा हळद
चवीनुसार मिठ
गरजे नुसार तेल

क्रमवार पाककृती: 

बटाटे उकडून घ्या. अगदी लगदा होई पर्यंत उकडू नका. ते सोलून काट्याने त्याला हलक्या हाताने सर्व बाजूने टोचा.

हे बटाटे कढईत तेलातून तळून घ्या.

एका भांड्यात २ चमचे तेल गरम करुन त्यावर जिर, तमाल पत्र यांची फोडणी देऊन किसलेला कांदा खरपूस तळून घ्या.

आता ह्यात हळद, मसाला, गरम मसाला, मिठ, दही घालून ढवळून घ्या.

२-३ मिनीटांनी त्यात टोमॅटो व तळलेले बटाटे घाला. एक उकळी येऊ द्या.

उकळी आली की वरुन कोथिंबीर पेरा आणि गॅस बंद करा.

पेश आहे दम आलू.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाथी
अधिक टिपा: 

बटाटे मौ केलेत तर टोचताना तुटतात म्हणून बेताचेच शिजवा आणि तांबूस होई पर्यंत कढईत तळा.
दही अगदी आंबट नको. ताजे लावलेले असेल तर उत्तम.

माहितीचा स्रोत: 
पुस्तक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव किती ही मी भाज्यांबद्दल कुप्रसिद्ध Lol
मी असे बरेच प्रकार बनवते. चायनिज तर चालूच असतात पण ते इथे आधी टाकलेले असतात त्यामुळे मी परत टाकत नाही.

आदिती धन्स.

मस्त मस्ताड झालेत........उद्या परवा कडे करुन बघणेत होईल......

'दम' द्यायचा नाही का?
मी करते तेव्हा भांड्यावर झाकण ठेवून ते कणकेने सील करून दम देते. त्यामुळे, मसाला मस्त मुरतो बटाट्यांमध्ये. फोर्कने टोचलेले असतात, त्यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो.

दक्षिणा, डिप फ्रायच करायचे बटाटे.

मस्त रेसिपी !
बटाटे उकडण्याआधीच टोचून मीठाच्या पाण्यात कांही वेळ बुडवून ठेवले तर ? तसं केल्यास << बटाटे मौ केलेत तर टोचताना तुटतात म्हणून बेताचेच शिजवा >> ही अडचण येणार नाही, असं वाटतं.

सही दिसतेय ग्रेव्ही. मी सेम ह्याच रेसिपीने करते. हॉकिन्सच्या भांड्याबरोबर ( बहुतेक हंडी) आलेल्या कुकबुक मधली आहे माझी रेसिपी.

हायला जागुतै येकदम बटाट्यांवर!!! मासे संपलेत का काय समुद्रात्ले!
झक्क पाकृ! Happy

छान आहे रेसिपी
<१ चमचा मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पूड
१ चमचा गरम मसाला>
हे दोन्ही मसाले वेगळे आहेत का ?

.

जागुले........आर यू ऑलराइट? Proud नाही म्हणजे एकदम बटाट्यांवर घसरलीस ती??????????
असो........ पाकृ भारीच!

Pages