फोटो
इथे खालीआहेत.
१प्रवासाची पूर्वतयारी : राजसथान पूर्ण पाहाण्यास तीन आठवडे लागतात.तीन भागात करायचा हे दहा वर्षांपूर्वीच ठरवले होते.दिल्ली आगऱ्या बरोबर जयपूर,वाळवंटी मारवाड जोधपूर जैसलमेर ,मेवाड मधील उदयपूर चितोडगड.अबु हे हिलस्टेशन मात्र स्वतंत्र पाच दिवस वेगळे केले होते.मध्ये आलटून पालटून दक्षिणेकडे गेलो होतो.आता मेवाड करणार होतो.
तसे चार वर्षांपूर्वी बाँद्रा चितोडगड मार्गे उदयपूर थेट गाडीपण सुरू झाली आहे.कोटा,बुंदीला कमी लोक जातात तेपण पाहू असे ठरले.कोटा मोठे रे स्टे आहे.मुंबईतून भरपूर गाड्या आहेत.येण्यासाठी राणकपूर पासून चाळीस किमी असलेले फालना स्टे सोईचे आहे.मधे राजस्थानच्या बसेसने प्रवास (चांगला अनुभव).सप्टे ११ ते १९ साठी २१जुलैला तिकीटे निघाली.येण्याची १४७०७ तीन वाजताच बुक झाली.जाण्याची पुणे जयपूर १२९३९ रिकामीच होती.
माझ्याकडे नकाशे ,माहितीपुस्तके भरपूर साहित्य होते त्यामुळे गाईडची गरज नव्हती .पांडुरंग पाटणकरांचे 'चला राजसथानला ',राजस्थान सरकारचेच 'रा.दर्शन' (मराठीत)आणि Everyman series चे Rajasthan .
११ सप्टेंबरचा दिवस उजाडला .रोज दुपारी तीन ते पाच गडगडाट होऊन पाऊस पडत होता .गाडी कल्याणला संध्याकाळी पावणे सहाला होती तरी आम्ही डोंबिवलीहून साडेतीनलाच बाहेर पडलो .जेमतेम स्टेशनात आलो नी वादळी पाऊस सुरू झाला . गाडी सवासहाला आली .विरारपर्यँत साडेआठ झाले पुढे गाडीने वेग घेतला .वडोदरानंतर पाऊस गायब .
इकडे गाडी घाट चढून वर जात नाही सपाटीलाच राहाते त्यामुळे गारवा येतच नाही . तरी रात्री जाण्याच्या उत्साहामुळे चांगली झोप लागली .
सकाळी उजाडले तेव्हा राजस्थानातली भातशेती (होय) बाभळी कडुनिंबाची झाडे आणि मोर दिसत होते .झालावारनंतर राखाडी कोटा स्टोन शेताच्या गडग्यांवर दिसू लागला .वेळेवर सवानऊला कोटयात उतरलो.
कोटा स्टेला बाहेर पडतांना रिक्षा आणि मिनीबस स्टैँडचा बॉड पाहिला .रिक्षावाले गराडा करून फक्त सत्तर रुपयात बस स्टैंडला न्यायला तयार(!) होते .आम्ही मिनी बसकडे(१५सिटर) वळल्यावर त्यांचा फारच हिरमोड झाला .स्टैंडच्या बाजूला एक मोठा सार्वजनिक गणपती होता .एक मोठा 'कुलकर्णी मंगल कार्यालयाचा 'फलक दिसला . बस दर पाच मिनीटांनीगणपतीला सुटतात .पंधरा रुपयात तिघे कोटा बस डेपोला(विवेकानंद सर्कल) आलो .
सप्टेंबर मध्ये पर्यटन स्वस्तात होते ,रेल्वे तिकीटे सोईची मिळतात ,हवामान छान असते ,आणि गणपतीच्या सुटट्या . गोकुळ इनमध्ये रूम घेतली .तयार होऊन जेवण करून गढ पैलिसला आलो .वाटेत एका मोठ्या तलावाच्या कडेने रस्ता, आहे .हे जुने कोटा .नवीन कोट्यात कॉलेजिझ आहेत .अनंत चतुर्दशीला(अन्चतदस) मोठी मिरवणूक आणि सुटटी असते . फार मानतात .राजवाडयाचा थोडा भाग दाखवतात .शुक्रवारी बंद .नेहमीच्याच वस्तु हत्यारे ,तोफा ,मेणे ,पालख्या ,चित्रे आहेत .एक रत्नजडीत खुर्ची आहे .
ब्रिटिशांशी मैत्री केल्यामुळे काही परदेशी गोष्टी आहेत .खास म्हणजे ग्रहयंत्र .दुसरी आहे लॉरेन्स अॅंड मेयो ने बनवलेली सहा इंची पितळी तोफ .यावर एक भिँग आहे महिन्याप्रमाणे भिंग फिरवायची सोय आहे .सूर्य बरोबर वर आला की भिँगातले किरण तोफेची वात पेटवतात ,छोटासा गोळा उडतो .मग टोलेबाज बाराचे टोले देतो .हे चालू स्थितीत ठेवायला हवे .चार चांगल्या वस्तु म्युझिअम मध्ये ठेवल्याबद्दल वारसांचे आभार मानले .
राजवाडा चंबळ नदीकाठी आहे .उजवीकडे धरण दिसते (बैरेज) डावीकडे पंधरा मिनीटांवर चंबळ गार्डन आहे .तीन वाजताचे उन फार होते तिकडे न जाता परत आलो .
अर्बुद पर्वतावर(अबु) वसिष्ठ ऋषिंच्यासह एक यज्ञ झाला त्यातून जे राजपूत निर्माण झाले ते हाडा चौहान .ते सर्वश्रेष्ठ समजतात . त्यांना महमद घोरीने ११९२ च्या लढाईत अजमेर मधून हुसकल्यावर त्यांनी खाली बुंदीला दुसरे राज्य वसवले .नंतर त्यांनी अकबराशी मैत्री केली .नवीन राजपुत्रांसाठी चंबळच्या पूर्व किनाऱ्यावर कोटा वसवण्यात आले .पुढे १८१८ मध्ये कोट्याच्या हुशार (!)मंत्र्याने झलिमसिँगाने ब्रिटिशांना मदतीच्या बदल्यात स्वत:करता झालावार झालारपाटण राज्य मिळवले .
कोटा-बुंदी-झालावार हे हाडोती मंडळ म्हणतात .याउलट चितोडगडचे सिसोदिया शेवटपर्यंत मोगलांना आणि ब्रिटिशांना विरोध करत राहिले .*
सकाळी सहाला बाहेर चहा आणायला गेलो तर पोहेपण तयार होते .इथले पोहे ईंदोरपेक्षा चांगले वाटले .छानपैकी नाश्ता करून हॉटेल सोडून आठला बसडेपोत आलो .
बुंदीसाठी खूप बस असतात .स्वच्छ .सीटकव्हर्स फाडलेली नाहीत ,मागे लिखाण नाही .इकडच्या मुलांना दुसरे चांगले उद्योग आणि ध्येय असावीत .तिकीटात महिलांना तीस टक्के सूट !रस्ता छान .दोन्हीबाजूला हिरवी शेते आणि घराघरांवर मोर .
बुंदी थोडे सुस्त गाव आहे . रानीजी की बावडी बस सटैंडपासून पंधरा मिनीटावर आहे तिथे एका हॉटेलात रूम घेऊन लगेच बावडीला आलो . पायऱ्या असलेली विहिर(बुंदीत पन्नासएक आहेत) ,दगडी छत्र्या ,सुरेख बांधकाम .पण कबुतरांनी फार घाण केली आहे .
तारागडकडे निघालो चालत अर्ध्या तासावर आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुकाने . छान बाजार .एका ठिकाणी बुंदी शैलीत चित्रकला करणारा होता .सर्व चित्रे दाखवली .सातशे आठशे रु ची चित्रे आपल्यासाठी दोनशेची आहेत असे म्हणाला .मग गडाच्या दाराशी आलो .
आज १३सप्टेंबर राजाचा वाढदिवस म्हणून मुलींना तिकीट नव्हते .बाजूच्या जिल्ह्यांतून शाळेतील मुलींचे बरेच गट खेळाकरता बुंदीत आले होते .
तारागड म्हणजे डोंगराच्या उतारावर बांधलेले अनेक महाल .हत्ती घोडे जाऊ शकतील असा दगडी फरसबंदी रूंद चढाचा रस्ता सर्वांना जोडतो .
डोंगरमाथ्यावरच्या तलावातले पाणी एकदा या वाटेने सोडतात .वरती गर्भ गुंजम नावाची मोठी तोफ आहे .काही महाल पाहता येतात .भिँतीचित्रे खास आहेत . बुंदीसाठी दोन दिवस पाहिजेत . बाकी आहे .
भाग तिसरा
धन्यवाद आपले अनुभव आणि नियोजन
धन्यवाद आपले अनुभव आणि नियोजन इथे शेअर करता आहात त्याबद्दल. पुढील भाग लवकर येवू द्या.
फोटो बघता येत नाही आहेत
फोटो बघता येत नाही आहेत
फोटो १)बुंदी
फोटो
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()

![]()







![]()
![]()

![]()
![]()
![]()
१)बुंदी चित्रकला.
२)तारागड, बुंदी.
३)कमान रानी जी की बावडी, बुंदी.
४)फतेहसागर, उदयपूर.
५)तीज उत्सव इथे साजरा होतो. उदयपूर.
६)लायब्ररी, साजनबाग उदयपूर.
७)सहेलियों की बाडी, उदयपूर.
८)कुंभा महाल चितोडगड
९)पद्मिनी महाल चितोडगड
१०)त्रिमूर्तीमंदिरातील खांब चितोडगड
११)वानरं
१२)गौमुख तलाव, चितोडगड.
१३)गणपती, त्रिमूर्ती मंदिर चितोडगड.
१४)गणपती, कुंभशाम, चितोडगड.
१५)पूर्व द्वार, चितोडगड.
१६)विजयस्तंभ, चितोडगड.
१७)विजयस्तंभ, चितोडगड.
१८)कीर्तिस्तंभ, चितोडगड.
१९)कुंभा महाल, चितोडगड.
२०)कुंभशाम मंदिर, चितोडगड.
२१)चौमुख मंदिर राणकपूर
एस आर डी, छान लिहीले आहे.
एस आर डी, छान लिहीले आहे. पुढील प्रवासवर्णनाच्या प्रतिक्षेत!
एकच सूचना, ते उदेपूर ऐवजी उदयपूर असे लिहीणार का?
दुसरा भाग : फोटो इथे
दुसरा भाग :
फोटो
इथे वरआहेत.
छत्तर महालातली भिँतीचित्रे कृष्णाच्या कथेतील रागमाला चित्रे आहेत .ही आणि भारतातील बहुतेक 'म्युरल्स' आहेत 'फ्रेस्को' नाहीत .कुटलेल्या शिँपल्यांचा गिलावा घोटून गुळगुळीत करतात .चांगले सुकल्यावर रंगवतात .गेरू ,नीळ ,काजळी वापरतात .त्यामुळे कालांतराने रंग पडतात . (फ्रेस्कोत ओल्या गिलाव्यावर रंगवतात .चुना आणि रंग एकजीव होतो ).
गडाच्या एका सज्जातून एक मोठे चौकोनी तळे दिसते नवलसागर .दोन किमी दूर आणि एक सरोवर सुखसागर आणि त्याकाठी आहे सुखमहाल (नाही गेलो).याचे ,बावडी आणि चौरासी खंभों की छत्रीचे एकत्रित तिकीट रुपये १५ आहे .चांगला चालणारा पाहिजे .परदेशी पर्यटक फार येतात.
बाजारात दुधवाले पितळी घागरींतून दुध सारखे आणतांना दिसतात .रबडी खूप .मोठी लिंबे १०रु अर्धा किलो मिळाली म्हणून सरबतासाठी साखरही अर्धा किलो घेतली .काकडी २०रु किलो आणि कच्चे आवळे ५रुअर्धा किलो घेतले .
उद्या चितोडगडला जायचे होते .१३० किमी आहे .थेट बस नाही .सकाळी ९.२०चि कोटा ते मंदसोर(मप्र) इक्सप्रेस .
सकाळी चहा पोहे खाऊन सवा आठला हॉटेल(डायमंड) सोडले ,रिक्षाने बुंदी स्टे (५किमी ५०रु)ला आलो .कोणीच नाही .एकदम स्वच्छ .रेझ. काउंटरपण आहे . गाडीत स्लिपरचे तिकीट करून घेतले .बुंदीचेच एक मराठी पती पत्नी भेटले आनंद झाला.त्यांना इकडे सत्तर वर्षे झाली .खूप बोलले .माहिती दिली .
चितोडगडच्या अगोदर चांदेरिआला एक सिमेंट आणि एक जस्ताची बिनानी झिँक फैक्टरि दिसते इकडच्या मातीत जस्त आहे .गंभिरि नदी दिसते . आले चितोडगड .उजवीकडे गड आणि त्यावरच्या इमारतीही दिसतात .स्टेशानच्या बाहेर जवळ हॉटेल्स आहेत पण आम्ही रिक्षाने बस स्टैंड (२किमी) आलो .रिक्षावाला शंकर मीणा (9799668411)फो नंबर देऊन चितोडगड दर्शन साडेतीन तास अधिक गाईड असे साडेचारशे रु घेतो ,लागल्यास फोन करा म्हणाला . बाजूच्या रस्त्यावर हॉटेल अंबरमध्ये रूम घेतली .नंतर चूक लक्षात आली .कूलर नव्हता आणि कार्पेट होते .कार्पेटची रूम कधिही घेऊ नये ते कधिच साफ करत नाहीत .
दुपारी गडावर गेलो नाही .उद्या सकाळी सात ते साडेअकरा पाहून हॉटेल सोडता येत होते .संध्याकाळी आराम आणि जोधपूर स्विटसची रबडी ,पाणीपुरीची चव घेतली .
रात्री शंकरला फोन करून सकाळचा गडाचा कार्यक्रम नक्की केला होता . सकाळी नेहमीप्रमाणे चहा पोहे(!) खाऊन पावणे सातला तयार राहिलो .बैगापण भरून ठेवल्या .शंकर वेळेवर आला .गंभिरि नदीचा पूल ,जूने शहर ,गडाचे दरवाजे पार करून सवासातला तिकीट खिडकीला आलो .
जातानाच शंकरने माहिती सांगायला सुरूवात केली .गडावर रिक्षाच फिरतात बस नाही .इथे वरती पाच हजार लोक राहातात .तुमच्या केसरी आणि सचिनचे पर्यटकांना नेतो .
सूर्य वर आलेला होता आणि कुंभा महालापासून सुरुवात केली .नंतर कुंभ शाम मंदिर ,मीराबाई मंदिर ,कालिका माता मंदिर ,
जयमाल आणि पटटा महाल ,विजय स्तंभ ,गौमुख तलाव ,पद्मिनी महाल आणि तलाव ,कीर्ति स्तंभ आणि मंदिर या सर्व गोष्टी पाहिल्या .
या सर्वांचा इतिहास ऐकत आपण पाहातो तेव्हा जाणवते की इतिहास केवळ भुर्जपत्रांवर ,कागदावर ,चित्रांत ,दगडी शिल्पांत नाही तर तिथल्या वातावरणातही दरवळतो आहे .इथे तीनदा हजारो स्त्रियांनी जोहार केला . सुदैवाने मुसलमान आणि मोगलांनी फक्त महाल तोडले ,मंदिरे आणि कीर्तिस्तंभ ,विजयस्तंभ तोडले नाहीत .चितोडगड अवर्णनीय आहे एवढेच इथे लिहिता येईल .
गड पाहून साडे अकराला परत आलो .रूमचा चोवीस तासांचा चेक आउट संपायला एक तास होता . रूम सोडून बाजूच्या सटैंडला आलो .चितोडगडहून मावळीमार्गे नाथद्वारा ११२ किमी आहे .तिथून(भिलवाडा रूट) एकलिंगजी पाहून उदयपूर ५०किमी आहे .चि'गड मावळीमार्गे अथवा मंगळवाडमार्गे (हायवे ,सावरिया मंदिर)उदयपूर ११६ किमी आहे .आम्ही उदयपूरला वस्ती करून सर्व पाहायचे ठरवले . या तीनही रूटवर बस भरपूर आहेत .रस्ते छान .वाटेत संगमरवर ,लाल जोधपुरी आणि लाल हिरव्या ग्रानिटच्या मोठ्या वखारी दिसतात .राजस्थानला अमूल्य दगडांची देणगी मिळाली आहे .
दोन वाजता उदयपूर आले .हॉटेल शोधायला गेलो .काही पाहिली नंतर मेवाड मोटर्सच्या गल्लीत जिनदत्त सूरी जैन धर्मशाळामध्ये एसी रूम पाचशे रुपयात घेतली .(तीच नॉन एसीचे २५०!)अडीच हजाराच्या लायकीची रूम होती .सर्विस टैक्स नाही ..
शांत ,आवारात एक आदिनाथाचे संगमरवरी दुमजली शीशमहाल पध्दतीने मढवलेले देऊळ .केवळ अप्रतिम ! परत बैगा आणायला गेलो तर दोन तास वादळी पाऊस झाला . बस स्टैंडच्या बाहेर चार फुट पाणी भरले .ओसरल्यावर पाच वाजता रूमवर आलो .संध्याकाळी आराम केला .
उदयपूर मोठे आणि स्वच्छ शहर आहे .तलावांचे शहर म्हणून ओळखतात आणि आजूबाजूला अरवली डोंगरही आहेत येथे सिटी बस नाहित .उदयसिंगाने सोळाव्या शतकांत वसवले म्हणून उदयपूर .पन्नाधाय (दाई)ने स्वत:च्या मुलाचा बळी देऊन या मेवाडच्या वारसाला चितोडगडावरून येथे आणले .
उद्या सोमवारी उदयपूर शहरातील ठिकाणे आणि मंगळवारी एकलिंगजी नाथद्वाराकडे जाऊन येण्याचे ठरले . बुधवारी राणकपूरला मुक्काम ,गुरुवारी फालना स्टेशनहून परत .
कुंभालगड वाटेवर नसल्यामुळे गाळला .नंतर जाऊ .हा गड राणा कुंभाच्या नावाने ओळखला जात असला तरी त्याचा इतिहास तिसऱ्या शतकापर्यंत जातो .१९००मिटर्स उंचीवर आहे आणि वनदुर्ग आहे .आता हे अभयारण्य आहे .किल्याची खूप रुंद भिंत ३६किमी लांबीची आहे .आत बरीच देवळे आहेत .इकडे उदयपूरहून ,एक दिवसाची कार घेऊन काही जण जातात .
उदयपूरवरून थेट बस एक दोन आहेत अथवा फालना/जोधपूर बसने 'सायरा '(६५किमी उंचावर आहे)ला उतरून २५ किमी कुंभालगड आहे . तो पाहून परत सायरा मार्गे राणकपूर करता येते .दोन दिवस राहून पायी फिरलो तरच न्याय दिल्यासारखे होईल .
भाग तिसरा
srd छान माहिती देत आहात.
srd छान माहिती देत आहात. योग्य ठिकाणी पॅरेग्राफ द्या.
चांगली माहिती देता
चांगली माहिती देता आहात.
वास्तव्य कोठे केलेत तेथील पण अनुभव लिहा कृपया, चांगले/ वाईट दोन्ही.
#मिलिंदा , कोटा औद्योगिक आणि
#मिलिंदा ,
कोटा औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे येथले विवेकानंद
सर्कल जवळचे
हॉटेल गोकूळ इन चांगले आहे .
तीन बेड सहाशे रुपये .
(साधारणपणे फैम्लिसाठीची
आहेत का एकट्या सेल्समनची रूम आहेत हे लगेच जाणवते .
सहाशे एक ग्रेडची हॉटेल आम्ही घेत नाही .तसेच रिक्षा करून हॉटेल शोधू नये
.पैन काड ,वीजबिल ,टेलिफोन बिल फोटोकॉपीसह तयार असावी ,ऐनवेळी झेरॉक्स
मिळत नाही.
राणकपूर अरण्यात आहे .मोठा ग्रूपसाठी एकाच ठिकाणी हव्या तेवढ्या
रूम्स नसतात .
सर्वांची सोय लावतांना सकाळचा बराच वेळ वाया जातो .रेटपण
वाढवतात .)जेवण्यासाठी सटैंडजवळील १४०रूमवाल्या
एका जैन धर्मशाळेच्या
भोजनालयात गेलो होतो .बुंदीला मुळात हॉटेल्सच कमी आहेत .
आम्ही परदेशी लोकांसारखे सकाळीच आठला (पोहे खाऊन) पाणी घेऊन निघायचो
संधयाकाळी नीट जेवण .
साडे आठला नाश्ता ,दीडला जेवण करू तर पाहाणे होत
नाहीचितोडगडला बारा वाजता घाईने अंबरप्लाझा घेतले चांगले नव्हते .पण इकडे
बरीच हॉटेल्स आहेत .जेवण: विनायकमध्ये केले .मेन्युकाड पाहून पंजाबी पदार्थ
मागवण्याची रेस्टॉ आता सगळीकडे झाली आहेत .
तिसरा भाग फोटो इथे
तिसरा भाग
फोटो
इथे वरतीआहेत.
इकडचा जेवण बनवणारा सुट्टीवर होता त्यामुळे बाहेरच जेवलो .काल पाऊस पडताना उदयपूर स्टैंडवर अडकून पडलो तेव्हा एक शोध लागला होता .इथे 'झिरो ब' कंपनीच्या किओस्कमध्ये पाच रु लिटर थंड पाणी देत होते ते तीन लि घेतले होते त्याची चव नंतरही चांगली लागत होती .अगोदर घेतलेले सर्व बिसलेरी नंतर चंबळ नदीचेच वाटायचे .
सकाळसोलरच्या गरम पाण्याची आंघोळ करून कोपऱ्यरून आणलेले चहा पोहे (!)खाऊन तयार झालो .
सिटी पैलेस साडे नऊला उघडतो त्याचे एक प्रवेशद्वार जगदिश मंदिराकडे आहे .तिकडे रिक्षाने निघालो .वाटेत अर्धा तास चालण्याच्या अंतरावर साजनबागची कमान दिसली .पैकेज हवे का ? नको म्हणालो .काय पाहाण्यासारखे आह ? त्याची त्याने. माहिती दिली .
जगदिश मंदिर तीनशे वर्षे जुने आहे .छान शिल्पे आहेत .उंच जोत्यावर आहे .पितळी तीनफुटी दाढीवाला गरूड नेपाळी वाटतो .देऊळ बराच वेळ उघडे असते .डावीकडच्या रस्त्यावर पैलेसचे भव्य प्रवेश दिसतो .अजून तीन वैष्णव मंदिरे आहेत .हळूहळू पर्यटक जमा होऊ
सवा नऊला पैलेस उघडणयाची वाट पाहात होतो .नाथद्वारासाठी आलेला एक गुजराती बायकांचा गट आणि परदेशी पर्यटक होते .
एका रिक्षावाल्याने येऊन पैकेज आहे ,पैलेसचे ११५ रु प्रवेश बेकार आहे(!) त्यापेक्षा सहेलियों की बाडी ,साजनबाग रोपवे नेतो म्हणाला .
गर्दी आत गेल्यावर तिकीट खिडकीपाशी आलो .दरफलक असा होता :प्रवेश सिटी साईड ११५रु ,लेक साईड १७५ ,पिछोला लेक बोट राईड ५६०रु ,शिवपैलेसची क्रिस्टल गैलरी ३२०रु ,कोणताही कैमरा २२५ रु ,गाईड २००रु .गाईड लोक मागे लागत होते .मेवाडचा इतिहास माहित होता गाईडची गरज नव्हती .शिवाय कोणत्याही ठिकाणी माहितीफलक असतातच . आमच्याकडच्या चिँटुकल्या मोबाईलच्या गळ्यात २२५चा टैग न घालण्याचा
निर्णय घेतला .
प्रथम मोठ्या आवारातून आत जातो त्यावेळी सूर्यदर्शन कमान आहे .महालात वंशावळ आणि मेवाडसाठी त्याग ,बलीदान करणाऱ्यांची नावे 'नतमस्तक' होऊन कुठे कायचे विवरण केलेले फलक आहेत .पुढे एकेका दालनांतून हत्यारे ,चिलखते पोशाख मांडलेले आहेत .दालने अथवा खोल्या मोठया असल्या तरी ती जोडली आहेत तीस इंची अरुंद वाटेने .
राणा कुंभा ,संग्राम उर्फ सांगा आणि प्रताप यांच्या चित्रांवर शस्त्रांवर संबंधित प्रसंगांवर अधिक दालने सिटी पैलीसमध्ये आहेत .१५५९ मध्ये उदयपूर वसवल्यावर नंतर मोगलांशी युध्दाचे प्रसंगही कमी झाले .मोगलांची सत्ता कमकूवत होऊ लागली होती .त्यामुळे इकडे राजांच्या शिकारीचे महत्व वाढू लागले .त्याची बरीच भिंतीचित्रे येथे चांगल्या स्थितीत आहेत .
वरच्या मजल्यांवर गेल्यावर सज्जांतून पिछोला तलाव ,त्यामधले जगमंदिर ,जगनिवास ,जगमहल (आता महागडी हॉटेल्स) तसेच शहर सुंदर दिसते .काहीतरी रत्नजडीत वस्तु ,झुंबरे दिसण्याची आशा सोडा त्याऐवजी खिडकीतून खाली गच्चीवर अस्ताव्यस्त टाकलेले मोडके फर्नीचर ,डबे भंगार दिसेल .मौल्यवान गोष्टी पाहाण्यासाठी ३२०रुपयाचे क्रिस्टल गैलरीचे आणखी तिकीट काढा .
वरच्या दालनांत दुर्गंधी येते .चित्रे संपतच नाहित .तलावाकडचा महालाचा जो भाग आहे तिकडे जाता येत नाही .तीन तासांनी बाहेर आलो .कंटाळा आला .
आता जगदिश मंदिराच्या जवळून एक रस्ता पिछोला लेक कडे जातो त्याने पाच मिनीटांत लेकवर आलो .येथे मार्च महिन्यात तीज साजरी होते.
येथूनच तलावाच्या काठाने पाउण तास चालत मोती मगरी या छोटयाशा टेकडीपाशी आलो .येथे राणा प्रताप स्मारक उभारले आहे .ऊन फार होते आणि आता आणखी चित्रे पाहायचा त्राण उरला नव्हता .प्रवेश रु ५० !
हा तलाव फतेहसागर पिछोला तलावाला जोडला आहे .संध्याकाळी येथे गर्दी असते कारण बोटीने तलावातल्या एका समोरच्या बेटावर जाता येते .तेथे एक बाग केली आहे 'नेहरू उद्यान' .
गेटवर चहा घेऊन सहेलियों की बाडी कडे रिक्षा(५०रु) केली .सिटी बस नसल्याचा(दोन खाजगी ठेकेदारांना ठेका हवा आहे) रिक्षावाले फायदा उठवतात .
अठराव्या शतकांत उदयपूरच्या एका राजपुत्राच्या लग्नात वधुबरोबर तिच्या चाळीस मैत्रीणी बहीणी करवल्या म्हणून आल्या होत्या त्यांना विरंगुळा हवा यासाठी ही बाग बनवण्यात आली .आले राजाजीच्या मना . सतत उडणारे कारंजे आणि कमळांच्या पुष्करण्या हे वैशिष्टय
.तलावापेक्षा थोड्या कमी उंचीवर असल्याने फवारे अखंड उडतात .कमानी ,छत्र्या ,सोंडेतून पाणी फेकणारे हत्ती फारच सुंदर .आणि हो तिकीट पाच रुपये !आता बागेकडे थोडे दुर्लक्ष झाले आहे तरी अडीचशे वर्षांपूर्वींची कल्पना करु शकतो .
येथून दीड किमीवर सुखाडिआ सर्कलच्या अगोदर भारतीय लोककला संग्रहालय आता बनवण्यात आले आहे तिकडे गेलो नाही .सरळ हॉटेलवर आलो .आराम केला .
आज मंगळवार १७सप्टेंबर .सकाळी आठला साजनबाग(गुलाब बाग)ला आलो .मोठी बाग आहे .भरपूर भारतीय वृक्ष आहेत .पेरु आणि आवळे लगडलेले होते .पडलेले गोळा केले .सकाळी इथे स्थानीक लोक व्यायाम ,फिरणे ,हास्यमंडळासाठी आले होते .बागेत पुढे कारंजे ,गुलाबवाटिका ,जुने ग्रंथ असलेली इमारत आहे .आणखी शेवटी एका छोटया डोंगरावरच्या देवीच्या देवळात जाण्यासाठी रोपवे आहे .फारच छान जागा आणि मध्यवर्ती आहे .
दहा वाजता बस स्टैंडला आलो (रिक्षाने पाच मिनीटस).भिलवाडाकडे जाणाऱ्या बसने(भरपूर असतात) एकलिंगजी (=कैलाशपुरी)ला अकरा वाजता आलो .बावीस किमी आहे .दोन किमी अगोदर नागदा येथे सासबहू मंदिरे आहेत .
एकलिंगजीचे देऊळ रस्त्याला खेटूनच आहे .दुपारी साडेबारा ते चार बंद असते .परदेशी पर्यटकांना जाऊ देतात .दगडी शिल्पे असलेल्या खांबांना चांदीने मढवले आहे .कशाला ? रजपूतांचे खास दैवत असून फार दबदबा वाटला नाही .साधेपणा आहे .
पुढचे भाग मूळ पोस्टमधेच का
पुढचे भाग मूळ पोस्टमधेच का नाही टाकत ? असे तोडत तोडत लिहिल्यावर मग प्रतिसादात मूळ लेख हरवतो.
भाग चौथा सवा अकरा वाजले होते
भाग चौथा
सवा अकरा वाजले होते आणि कळले की इथून अर्धातास लागतो नाथदवाराला जायला.तिथले देऊळ साडेअकरा ते साडेबारा उघडतात.आम्हाला बस लगेच मिळाली सवा बाराला पोहोचलो.
नाथद्वाराला देऊळ स्टैंडपासून एक किमी दूर आहे.अरूंद रस्त्याने पुढे जाईपर्यंत दरवाजा बंद झाला.आम्ही भाविक नाही पण आत काय आहे ही उत्सुकता होती.नंतर पावणेचारला पंधरा मिनीटे आणि पाचला एक तास उघडणार होते.देव चराचरांत आहे पण इकडे त्याचे दर्शन घडवण्याचा अतिरेक होता.एवढेच नाहितर वेळेच्याअगोदर दर्शनार्थी गर्दी करतात आणी झुंडीने आत घुसावे लागते असे कळले.
बाजारातल्या दुकानांत कपडे,बांगड्या,फोटो,मुर्त्या होत्या.अर्धाएक तास गर्दी होती.अधिकतर अहमदाबादच्याच स्त्रिया होत्या.एका दुकानात वस्तु घेतल्यावर दुसरीकडे निम्म्या किंमतीत पाहून पुन्हा पहिल्याकडे येऊन हुज्जत घालण्याचा प्रकार दोनतीन ठिकाणी दिसला.
खरेदीचा विचार सोडला.दीड वाजला होता एका भोजनालयात गेलो.वीस रुपयात भरपूर साधे जेवण मिळाले.बस स्टैंडला आलो.उन फार होते.परततांना पाचेक किमीवर हलदिघाटी फाटा लागतो पण तिकडे जाणार नव्हतो.
अगदी भाविक नसेल तर नाधद्वारा एकलिंगजी नाही गेलो तरी चालणार आहे .चार वाजता परत आलो .येतानाच झिरो बीचे पाणी आणले . संध्याकाळी आराम .
१८सप्टें बुधवार .आज सकाळी रूम सोडली .आठला बससाठी स्टैंठवर आलो .जोधपूर जालोर ,नाकोडा कडे जाणाऱ्या बस गोगुंदा मार्गे राणकपूर(९०किमी) ,फालना(१३०) वरून जातात .नाकोडा बस
साडेआठला सुटली .
उदयपूरच्या उत्तरेला अरवलीचे डोंगर आहेत .घाट लागतो .वैराण भाग आहे .इथे कमी प्रतीचा ग्रानिट आहे .तुरळक आदिवासी वस्ती आहे .गोगुंदा मोठे गाव आहे .जसवंतगढनंतर अबूचा वेगळा फाटा निघतो .पासष्ट किमीवर सायरा मोठे गाव येते . येथून कुंभालगडाचा वेगळा रस्ता आहे .आता घाट उतरून खाली येतांना राणकपूर मंदिर अधुनमधून दिसते .
साडेअकराला राणकपूरच्या गेटपाशी आलो .बसेस वीस मिनीटे थांबतात .आत जाऊन कार्यालयातून एक दिवसाकरता खोली घेतली .दोनशे रुपये तीनशे अनामत . स्वच्छ आणि सुरेख रचना .१६ खोल्या मध्ये उघडे अंगण त्यात एक बकुळीचे झाड .हा सर्व सायरापासूनचा भाग कुंभालगड अभयारण्य आहे . परिसरांत देऊळ ,कार्यालय ,धर्मशाळा ,भोजनालय ,पार्किंग .
एक वाजता भोजनालयात जेवून दुपारी आराम केला.तीन वाजता चहा घेऊन साडेतीनला आदिनाथ मंदिरात आलो.हे एक छोटेसे मंदिर आहे.हे एका स्वतंत्र आवारात आहे.बाहेरच्या भिंतीवर खूप भावपूर्ण आणि काही कामूक शिल्पे आहेत.लक्ष्मी आहे.आतमध्ये आदिनाथाच्या खूप मूर्ती आहेत.नंतर चौमुख मंदिराच्या आवारात आलो.मंदिरातला पर्यटकांसाठीचा प्रवेश बारा ते पाच आहे.फोटो काढणयासाठी रु शंबर शुल्क आहे.बाहेरच्या भिंती शिल्पाविना आहेत पण एकापेक्षा एक अधिक उंचीची असंख्य शिखरे हिमालयाची आठवण करून देतात.
हे मंदिर मेवाडच्या राणाच्या एका मंत्र्याने पंधराव्या शतकात बांधले.आतमध्ये जाणयासाठी बूट,मोजे,चामडयाचे पट्टे पर्सेस काढून ठेवावे लागतात.हाफ पैंट नको.
याची रचना इतर मंदिरांप्रमाणे चौकोनी आयताकार नाही गोल आहे.आपण जी शिखरे पाहातो ती एकूण १४४० खाबांवर तोलली आहेत.प्रत्येक खांबावरची नक्षी वेगळी आहे.शिल्पे मात्र यांत्रिक वाटतात.दोन मजले आहेत आणि मधेमधे उजेड येणयासाठी घुमट आणि सज्जे आहेत.वरच्या मजल्यावर सकाळी जैनांना जाता येते.मूर्ती आदिनाथाची आहे.
येथे देवळातले अपेक्षित पवित्र आणि मूर्तीकडे लक्ष केंद्रित होण्याचे ध्येय खांबांच्या अतिरेकात लुप्त झाल्यासारखे मला वाटले.कलाकुसरीच्या आणि शिल्पांच्या बाबतीत अबुचे दिलवाडा फारच उजवे आहे हा विचार आल्याशिवाय राहात नाही.
पाच वाजता बाहेय आलो. चहा घेतला (एक खाजगी उपहारगृहपण आहे).भोजनालयात जेवण साडेपाच ते साडेसहापर्यंतच सूर्यास्तापूर्वी (जैनांची पध्दत) मिळते.खिचडी कढी खाऊन परिसरांत फिरलो.सातभाई,टकाचोर,कावळे,मैना आणी वानरे खूप आहेत.वानरे गुणी आहेत.अजिबात अंगावर येत नाहित.खायला दिले तर एकेकजण शिस्तीत हात पुढे करून घेतो.पिलुवाली वानरीण अगोदर घेते .दात वाचकून धावून येत नाहित.
नंतर रस्त्यावर येऊन बाजूच्या आवारातल्या सूर्यमंदिरात गेलो.हे राणा कुंभाने बांधले .छान आहे.पुढे नदीकाठी फेरी मारून आलो.
रात्रीमात्र खोलीत कूलर नसल्यामुळे फारच गरम होत होते.थोडावेळ ओसरीवर काढला.दुसरे दिवशी सकाळी नाश्ता करून नदीपुढे गेलो तर पांढऱ्या पोटाचा गाणारा कोतवाल,सोनपाठी सुतार आणि गरूड दिसले.दहा वाजता रूम सोडली.
स्टॉपवर आलो.एक जैन कुटुंब फालन्याचेच होते.त्यांनी कोठून आला कुठे जाणार वगैरे विचारपूस केली.फालन्याला स्टेशनजवळच जैनांचे सुवर्ण मंदिर पाहा तिथे आज पोर्णिमेचे प्रसादाचे जेवण असते हे सांगितले.
साडेअकराची कालचीच बस मिळाली.एक वाजता फालना स्टेशनला उतरलो.बाजूलाच मंदिर दिसले.प्रथम स्टेशनात वेटिंगरूममध्ये मुलीला सामानाजवळ बसवले.आम्ही दोघे सुवर्णमंदिरात गेलो.दगडी मूर्तीला सोन्याचा वर्ख रंगासारखा लावला आहे.पावणेदोन झाले होते.प्रसादाचे उत्तम बुफे जेवण होते.आम्ही दोघे शेवटचेच होतो.जैन आदरातिथ्याचा तिनदा लाभ मिळाला.
बाजारात मिठाईच्या दुकानात नेण्यासाठी आणि चार पाच दिवस टिकेल असे तिकडचे खास रबडी के घेवर त्याने दिले ते आठ घेतले.गाडी कधी येते याची वाट पाहात होतो.एक तास उशिरा आली.पण आल्यावर फालना सोडवत नव्हते.दहा दिवस भुरकन उडाले.
आठवण घेऊन गाडीत बसलो.तीनही साईड अप्पर बर्थ होते.खूप गरम होत होते.नंतरची गरिबरथचे तिकीट घ्यायला हवी होती.असो.बांदऱ्याला वेळेत आलो.रिक्षाने कुर्ला येऊन डोंबिवलीला साडेअकराला घरी पोहेचलो.मजा आली.समाप्त.
खूप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती दिली आहे लेखात. पण आता माझा थोडा गोंधळ होतो आहे. राजस्थान ट्रिप करायची तर सुरुवात कुठुन करावी ? मला दोन तीन तुकड्यात करायची आहे आणि अगदी व्यवस्थित बघायचे आहे. ट्रिपचा पहिला तुकडा आम्ही मार्च मध्ये सुरु करणार आहोत. ३-४ ज्येष्ठ नागरिक आणि ३-४ लहान मुले यांना घेऊन जास्त न फिरता दोन किंवा तीन ठिकाणे करायचे आहेत. बेस्ट ऑफ राजस्थान मधुन काय सुचवु शकाल ?
तसेच राजस्थानात एका जागी खूप मोर आहेत असे ऐकले आहे. कदाचित एका छोट्या गावांत. कुणाला ठाऊक आहे का ?
#प्रिंसेस धन्यवाद तुमचा
#प्रिंसेस धन्यवाद
तुमचा ग्रुप मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांचा असल्यामुळे हे सुचवतो .
(१)म्युझिअम नको .मार्च महिन्याच्या ऐवजी फेब्रु पंधरा घ्या गरमी वाढेल .
(२)अबु साठी गणपति काळात उत्तम स्वस्तात होते नंतर दर वाढवतात .
(३)जोधपूर जैसलमेर बिकानेर परत .
(४)चितोडगड उदयपूर अजमेर जयपूर परत .
(५)जयपूर दिल्ली आग्रा बरोबर वेगळे करू शकता .
(६)सप्टेंबर महिना राजसथानसाठी उततम असतो .
धन्यवाद एसआरडी. तुमच्या सुचना
धन्यवाद एसआरडी. तुमच्या सुचना लक्षात ठेवेन.
प्रिंसेस , उदयपूर ला गेलात तर
प्रिंसेस , उदयपूर ला गेलात तर बागोर की हवेली मधे संध्याकाळळी१ तासाचा लोककलांचा कार्यक्रम असतो (६०/- तिकीट). तो चुकवू नका. त्यात लोकसंगीत, पपेट-शो, आणि लोकननृत्य दाखवतात. जरूर बघा.
#रावी ,सुखाडिआ सर्कलजवळच्या
#रावी ,सुखाडिआ सर्कलजवळच्या लोककला संग्राहलयातही संध्याकाळी एक पपेट शो असतो तो वेगळा आहे का ?बागोर की हवेली कुठे आहे ?
तो वेगळा असावा. मी पाहिला
तो वेगळा असावा. मी पाहिला नाही. बागोर की हवेली जगदीश मंदिर च्या जवळच आहे.