भाग्यांक आणि अक्षरांक

Submitted by Anvita on 20 November, 2013 - 22:38

शरद उपाध्ये ह्यांच्या 'राशीचक्र ' ह्या पुस्तकात त्यांनी अक्षरांक आणि भाग्यांक विषयी माहिती दिली आहे. अक्षरांक म्हणजे तुमच्या नावाची एक अंकी बेरीज . प्रत्येक इंग्रजी अक्षराला एक number आहे. त्याप्रमाणे तुमच्या नावाचे स्पेलिंग लिहून मग एक अंकी बेरीज करायची . जो number येईल तो अक्षरांक .

प्रत्येक अक्षराला एक number आहे.

A-1
B-2
C-3
D -8
E-5
F-8
G-3
H -5
I-1'
J-1
K-2
L-1
M-4
N-5
O-7
P-8
Q-1
R-2
S-3
T-4
U-6
V-6
W-6
X-5
Y-1
Z -7

प्रत्येक ग्रहाचा एका संख्येवर अंमल असतो.
१- रवि , २-चंद्र ,३- गुरु , ४-हर्शल ,५-बुध, ६- शुक्र ,७-नेपचून ,८-शनि ,९-मंगळ

उदा . प्रिया
Priya = p+r+i+y+a
= 8+2+1+1+1
= 13
= 4
म्हणजे प्रिया चा अक्षरांक ४ आहे.

भाग्यांक म्हणजे तुमच्या पूर्ण जन्मतारखेची एक अंकी बेरीज

उदा. प्रियाची जन्मतारीख जर १ जानेवारी १९८० असेल तर
१+१+१+९+८+०= २० = २
आता प्रिया चा भाग्यांक २ आहे.

प्रियाचा भाग्यांक ४ आहे म्हणजे ती हर्शल ह्या ग्रहाच्या अमलाखाली आहे. स्वभावात त्या ग्रहाचे गुणधर्म असतात.

आता प्रत्येक number चे शत्रू आणि मित्र ठरलेले आहेत

संख्या मित्र शत्रू
1. 5,6 3,7,9
2. 7 5,8
3. 7 1,5
4. 7 6,8
5. 1,8 3,7,2
6. 1,8 4,7,9
7. 3,9,2,4 1,5,6,8
8. 5,6 2,4,7
9. 7 1,6

तुमचा भाग्यांक आणि अक्षरांक एक असेल तर तुम्हाला तुमचे नाव खूप लाभेल . जर ते एकमेकांचे मित्र असतील तरी चांगले परंतु जर शत्रू असतील तर मग लाभणार नाही
आता प्रियाच्या बाबतीत भाग्याक २ आणि अक्षरांक ४ म्हणजे मित्र हि नाहीत आणि शत्रूही त्यामुळे neutral effect येईल.

बघा बरे तुमचा अक्षरांक तुम्हाला लाभतो आहे का?
तुमचे नाव आणि मायबोली id पण बघा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेच तर table मला नीट edit करता येत नाहीये. प्रतिसाद तपासा मध्ये नीट दिसते आणि save केले कि परत असेच होते आहे.
w - 6 आहे

नावाच्या स्पेलिन्ग मद्ये बदल करुन काही होत नाही. मला वाटत केला तर नावच बदललायला हव. कारण बदलामागील कारण अस आहे की तुमच्या नावाचा उपयोग तुमच्यापेक्षा इतरजणच तुम्हाला हाक मारायला करतात. म्हणजे ती तरन्गे तुमच्या पर्यत पोहचतात. आता मी माझे नाव सध्या English मध्ये Ramesh असे लिहतो आणि सर्वजण मला रमेश असच बोलवतात. आता समजा उद्या मी माझ नावच स्पेलिन्ग Raamesh अस केल तरी सर्वजण मला रमेश अशीच हाक मारनार. त्यामुळे तरन्गात कहीच फरक पडत नाही.

लग्नानंतर नाव बदलले की भाग्यांक बदलतो का? धर्म बदलला की अक्षरांक पण बदलतो का?

नंदिनी हे इकडे साऊथमधे nandhini असे लिहितात, मग लकी नंबर कुठल्या स्पेलिंगवरून ठरवणार. समजा माझे स्टेज नेम नंदिनी देसाई नसून कुमारवल्ली असेल तर माझा भाग्या़क कशावरून ठरणार?? लोक मला ज्य अनावावरून ओळखतात त्यावरून की कागदो पत्री जे नाव आहे त्यावरून?

माझा या न्युमरोलॉजीवर अर्थातच काडीचाही विश्वास नाही. कारण त्याला काय अर्थच नाहीये.

>>माझा या न्युमरोलॉजीवर अर्थातच काडीचाही विश्वास नाही. कारण त्याला काय अर्थच नाहीये.<<
खर आहे. त्याला काही अर्थ नाही. पण अशा गोष्टी टिकून राहतात. याचे कारण आपल्याला मेंदूच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकात काही अंशी तरी मिळेल
पुर्वी बाल मृत्यूंचे प्रमाण जास्त होते. मूल जगत नसत. बाळंतपणानंतर काही दिवसातच मूल दगावे. अशा वेळी उपाय म्हणुन काही आईबाप मुलाचे नाव दगड्या धोंड्या असे ठेवीत. कधी कधी अशी नावे ठेवल्यावर ते मूल जगत असे. मग मोठेपणी ते लोक दगडूशेट किंवा धोंडोपंत असे होत.

हे नाव बदलणे, स्पेलिग बदलणे याचा कुणाला फायदा होवो वा ना हो, इंदिरा बाय आणि तिच्या फॅमिलीला चांगलाच फायदा झाला. Happy