Submitted by tejas13 on 13 November, 2013 - 12:42
बाळंतपणानंतर वजन वाढले होते.आता जरा ठीक आहे.म्हणजे फेब्रुवारीत 90 होते आणि आता 69-70 आहे. परंतु हाताचे दंड कमी होत नाही कृपया उपाय सांगा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरतर मुलाला हातात घेऊन, घेऊन,
खरतर मुलाला हातात घेऊन, घेऊन, त्यान्च सामान उचलून दन्ड कमी व्हायला पहिजेत. पण एकूनच हातान्साठी व्यायामच लागतो. सूर्यनमस्कार चान्गला उपाय आहे. You can also do weight excercises for Biceps and Triceps. And also when lifting any kind of weight, including baby, use arm muscles instead of back.
We tend to put pressure on back while lifting things. Try lifting them with arm muscles.
Vidya.
धन्यवाद, पण व्यायाम करायला
धन्यवाद, पण व्यायाम करायला वेळ नाही मिळत
डायेटिशियनला भेटा, किंवा
डायेटिशियनला भेटा, किंवा रुजुता दिवेकरची पुस्तके वाचून त्याप्रमाणे डाएट करा, बराच फरक पडेल, पण डाएट सोबत व्यायाम महत्वाचा - तसा वेळ कोणालाच मिळत नाही , मलासुद्धा ...
कथा-कादंबरी विभागातून हा धागा
कथा-कादंबरी विभागातून हा धागा हलवा. तसेच मायबोलीवर वजन कमी करण्याबद्दल आधीचे धागे आहेत ते वाचून पहा. त्यात बरेच उपाय सापडतील.
सोपा उपाय सांगते. उभे रहायचे.
सोपा उपाय सांगते.
उभे रहायचे. पाठ सरळ,पोट आत घेवून.... गुडघे जरासे कोनात ठेवून.. दोन्ही हात छातीच्या रेषेत आणायचे. . जरासा कोन ठेवायचा व गोलाकार फिरवायचे....
ह्याने फक्त दंडच नाहीत तर शोल्डर वगैरे पन छान होतील.
कळेल अशी अपेक्षा.
घरातील बाकी मंडळी म्हणते काही
घरातील बाकी मंडळी म्हणते काही करु नको आणि नवरा म्हणतो कि liposuction अस काही बघ कुणाला काही कल्पना आहे का की कमी खर्चात कुठे होऊ शकेल?
झंपी माफ करा आपला उपाय कळला नाही:|
१ तास चालणे... पैसे न भरता
१ तास चालणे... पैसे न भरता कधीही कुठेही करता येतो हा व्यायाम....वेळ कधीच मिळत नाही ...तुम्हालातो काढावा लागतो...मी पण आई आहे आणि यातुन जातेय....हळु हळु होईल कमी ...१-२ महिन्यात अपेक्षा करु नका...बाळंतपणात वजन नऊ महीन्यात वाढते...मग १-१.५ वर्शाच टारगेट ठेवा कमी करायला कारण बाळामुळे दुर्लक्ष होण सहज घड्ते...
zampi tumhala wind mill
zampi tumhala wind mill mhanaych ahe ka?
http://www.womenshealthmag.co
http://www.womenshealthmag.com/fitness/arm-workout-0
नवरा म्हणतो कि liposuction अस
नवरा म्हणतो कि liposuction अस काही बघ कुणाला काही कल्पना आहे का की कमी खर्चात कुठे होऊ शकेल?>>
हा एक रिस्की शॉर्टकट असु शकतो.
अधिक माहिती तज्ञ डॉ देउ शकतील.
लायपोसक्शन अज्जिब्बत करू नको,
लायपोसक्शन अज्जिब्बत करू नको, मी विचारलं होतं माझ्या स्किन स्पेशालिस्ट मैत्रिणीला, तिने साफ सांगितलं नाही करायचं रोज पंधरा- वीस मिनिटे व्यायाम कर म्हणाली त्याऐवजी, शिवाय व्यायाम केल्याने फ्रेश वाटेल ते वेगळेच.सुरुवातीला पाच सूर्यनमस्कार किंवा आपण शाळेत पीटीच्या तासाला व्यायाम करायचो तेवढे केले तरी सुरुवातीला पुरे.
फिडींग चालू असेल तर वजन कमी होत नाही फारसं, फीडींग बंद झालं की केलेले प्रयत्न रिझल्ट दाखवतात.
आणि घरातले मोठे म्हणतात ते बरोबर आहे, कशाला जास्त काळजी करतेस, काळजीने त्रास होईल वजन कमी होणार नाही. ज्या शरीराने नऊ महिने बाळाल सांभाळलं स्वतःमध्ये, त्यानंतर त्या बाळाचं खाणं पिणं बनवलं त्याला सध्या थोडं पॅम्परिंगची गरज आहे, त्याने लगेच मूळ शेपमध्ये यावं असा अट्टाहास चुकीचा आहे, जेव्हा वाटेल ना मी खूप जाड झाले आहे तेव्हा बाळाकडे पाहा, विचार निघून जातील मनातले. स्वतःच्या जाड झालेल्या शरीराचा तिरस्कार नको करूस बस्स इतकच. घरातल्यांची मदत घे, बाळ झोपलेलं असताना अर्धा तास घरातल्या घरात व्यायाम कर किंवा चाल, मग पाऊण तास, मग एक तास.
बारीक कशाला व्हायचं/ दिसायचं? जुन्या कपडे पुन्हा घालता यावेत म्हणून की सगळ्यांनी कित्ती छान बारीक झालीस तू असे म्हणावे म्हणून? ते चूक आहे? अग, एखादा माणूस टायफॉईड कावीळ, टीबी झाला तरी बारीक होतो. व्यायाम नकरता बारीक होणं चूक आहे. आता शरीराला व्यायामाची गरज आहे, शरीरातले कमी झालेले घतक पुन्हा नॉर्मलला यायची गरज आहे नुसते बारीक दिसण्याची नाही.
फिटनेसची गरज आहे, योग्य आहार घेऊन व्यायाम झाला तर हळू हळू नक्की बारिक होशील
आणि हो, सगळ्या शरीराचा मेद एकावेळी घटतो, इथला गेला, तिथला नाही असं होत नाही. त्यामुळे खास दंडाच्या, खांद्याच्या व्यायामाने मदत होईल, जेव्हा वेट ट्रेनिंग करशील पण ती सगळीकडचा मेद घटायला होईल. . नुसते हात गोल गोल फिरवण्याने फारसा फरक पडणार नाही (-इति माझी डायेटिशियन आणी जिम इंस्ट्रक्टर)
धन्यवाद
धन्यवाद
धागा चुकीच्या ग्रूपमध्ये
धागा चुकीच्या ग्रूपमध्ये उघडलाय तरी इथेच देतेय प्रतिसाद. तेजस्विनी मला पाहशील तर तुला तू बरीच बारीक वाटशील. असो जोक्स अपार्ट पण सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे सुरूवातीला १५-२० मिनिटे नंतर हळूहळू वाढवत न्यायची व्यायामाची. सध्या प्रायोरिटी बाळ आणि त्याचं फिडींग, त्यातून थोडा वेळ स्वतःसाठी चक्क चोरायचा (मिळत नाहीच). मला शक्य झालं नाही व्यायाम वै. करणं कारण बाळाला सांभाळायला घरी कोणीच नव्हतं. दूध अॅलर्जी त्यामुळे सहा महीने आमचा निम्मा वेळ त्याची आजारपणं, फ्रस्ट्रेशन आणि त्याची कमजोर इम्युनिटी, कमी वजन यातच गेली (पेडीला मी निराश होऊन विचारलेलं माझं वजन त्याला ट्रान्स्फर नाही करता येणार ) फिडींग नाही त्यामुळे वजन जैसे थे! वर खाण्यापिण्याची पथ्य बाजूला. बाळाचं खाणं, त्याची औषधं, आजारपणं...
मध्ये नित्यनेमाने करायचे व्यायाम... तेव्हा थोडसं उतरल्यासारखं वाटतंय.. पण मग दिवाळी आली असो तसंपण मी डाएट वै. कधी नाही करू शकत. जॉब चालू झालाय तर उतरेल वाटतंय हळू हळू. बाळाची प्रगती बघतेय आणि धन्य वाटतेय. तसंही बाळंतपणानंतर छोट्या छोट्या गोष्टींचं विनाकारण टेन्शन येतंच सो बाळाचं कर, जमेल तसा व्यायाम कर आणि आवडत्या गोष्टी कर मन रमव. ( छान गाणी अगदी बाळांची गाणी ऐकणे, कार्टून्स बघणे, पेंटिंग करणे...) मन चंगा तो...
शुभेच्छा! असे धागे वाचले की पुढचे २-४ दिवस आवर्जून व्यायाम केला जातो.
आपल्या सर्वाना मनापासुन
आपल्या सर्वाना मनापासुन धन्यवाद.
फिडींग चालू असेल तर वजन कमी
फिडींग चालू असेल तर वजन कमी होत नाही फारसं, फीडींग बंद झालं की केलेले प्रयत्न रिझल्ट दाखवतात.>>>>> मला उलटं वाटत होतं की फिडींग चालू असताना कॅलरीज बर्न होतात म्हणुन.
अंजली मी पण असच ऐकल होत पण
अंजली
मी पण असच ऐकल होत पण काही खास फरक वाटत नाही