चिकनचे ८-१० लहान (बोनलेस) तुकडे, चमचाभर आलं-लसूण (बारीक चिरून किंवा ओबडधोबड वाटून), १ /२ छोटा कांदा बारिक चिरुन, ३-४ चमचे शेपु चिरुन, ऑलिव्ह ऑइल, चिमुटभर साखर, मीठ, व्हाइट व्हिनेगर / लिंबाचा रस, हवं असल्यास पिझ्झा सिझनींग (मी डॉमिनोज सोबत मिळणार्या सिझनींगचं अर्धं पाकिट वापरलं)
एका फ्रायपॅनमध्ये थोडं ऑलिव्ह ऑइल घेवून त्यावर कांदा परता, कांदा किंचीतसा शिजल्यासारखा वाटला की त्यात आलं-लसूण घाला. थोडंसं (३०-४० सेकंद) परतून लगेच त्यात चिरलेला शेपु घाला. थोडं परतून त्यात चिकन घाला. चिकन परतत असतानाच त्यात मीठ, हवं असल्यास पिझ्झा सिझनींग घाला. कमी आचेवर परतत रहा. ४-५ मिनीटातच चिकन शिजेल. चिकनचा रंग बदलला (चिकन शिजलं) की त्यात अर्धा चमचा व्हिनेगर घाला. किंचीत परतून लगेच त्यात चिमुटभर साखर घाला. अर्धा-एक मिनीट परता.
शेपु चिकन तयार.
व्हिनेगर ऐवजी लिंबु पण चालेल. माझ्याकडे आज घरात लिंबु नव्हतं म्हणून मी व्हिनेगर घातलं.
व्हिनेगर घातल्यावर जरा आंबट चव वाटली म्हणून मग त्यात साखर घातली चिमुटभर.
काल मेथी चिकन करतो तसं शेपु चिकन करुया म्हणून वाटीभर निवडलेला शेपु बाजूला ठेवला होता. आज मायबोलीवर शेपु चिकन कुठे दिसतंय का बघितलं पण सापडलं नाही. ऐनवेळी करायला घेताना आधी नवर्याने आणि मग मी कच खाल्ली. शेवटी मेथी चिकनसारखं न करता लेमन चिकनप्रमाणे थोड्या प्रमाणात स्टार्टर करून बघावे असा विचार करून घरात असलेलं सामान वापरून हे चिकन केलं.
बटर वापरून छान होईल असं वाटत होतं, पण घरात बटर नसल्याने ऑलिव्ह ऑइल वापरलं. आणि त्याची चव आली.
काहीच तिखट, मसाला न घातल्याने बरं लागेल की नाही अशी शंका आल्याने ऐनवेळी पिझ्झा सिझनींग अॅड केलं.
पोरगा चिकन खात नाही सहसा म्हणून त्याला एकच पीस वाढला होता. पण त्याने तो संपल्यावर आमच्या दोघांच्याही ताटातून मागून घेतलं. म्हणजे एकूण प्रयोग सफल झाला असं म्हणायला हरकत नाही.
अरे वा .. मस्त आहे रेसिपी,
अरे वा .. मस्त आहे रेसिपी, त्याहीपेक्षा शेपू आणि चिकन एकत्र करण्याची आयडिया ..
चिकन किंवा मग टोफू/पनीर/ बटाट्यासोबत ट्राय केले जाईल .. :हाआ:
फोटो नाही का?
मट्रेयलः चिकनचे ८-१० लहान
मट्रेयलः
चिकनचे ८-१० लहान (बोनलेस) तुकडे
*
चखन्याला नुस्तं खायचं. पोळीबिळीसोबत नै.
*
आन म्हने:
वाढणी/प्रमाण:
दोन - अडीच जण
ह्यॅ!
न्हेमी चिकन न खानार्या ल्हान्यासार्की दोन आडीच लोकं का?
***
ओ तै, लै तोंपासू पाकृ. आम्हाला बोलवा नेक्ष्ट टाईम केलं की. अन कढईभर करा. ८-१० बोन्लेस तुकड्यांत आमचं काय व्हायचं नाय.
आज प्रयोग केला होता.
आज प्रयोग केला होता. खाल्ल्यावर कळालं सक्सेसफुल झाला प्रयोग हे. आता पुढच्या वेळी फोटो काढेन.
चिकनऐवजी मश्रुम पण छान लागेल. पोरगा चिकनचा तुकडा खाताना हे मश्रुमसारखं लागतंय म्हणाला आधी.
इब्लिस उरलेल्या चिकनचा गावरान रस्सा केला होता, म्हणून अडिच जणांनी खाल्लं हे. पण हे नुसतंच खायचं असेल ड्रिंक सोबत वैगरे तर एवढं एका माणसाला पण कमी पडेल.
पहिलाच प्रतिसाद बटाट्यांबद्दल
पहिलाच प्रतिसाद बटाट्यांबद्दल नको म्हणून मी थांबले तर सशल तेच म्हणतेय
पनीर/टोफु आणि शेपू एकत्र चांगलं लागणार नाही असं मला वाटतंय. बटाटे चालतील.
wow तोंपासू अगदी
wow
तोंपासू अगदी
आँ !!! ही रेसिपी खाल्ली तर
आँ !!! ही रेसिपी खाल्ली तर चालेल का? ( ही पाकिस्तानची डिश आहे. असे ऐकून आहे.)
व्हीनीगर बरोबर नेहमीच थोडी
व्हीनीगर बरोबर नेहमीच थोडी साखर वापरावी. त्याने स्वाद खुलतो.