१ कप रवा,
पाऊणकप नारळाचा चव,
पाऊणकप पिठीसाखर,
२ टीस्पून तूप,
१ टे स्पून मिल्क पावडर
थोडे दूध
केशर (ऑप्शनल)
स्वादाला वेलची,
बदाम, काजू, बेदाणे - आपल्याला आवडेल ते.
सोप्पे लाडू... हो... मला जमले म्हणजे सोप्पेच म्हणायचे
रव्याचे लाडू मला प्रचंड आवडतात पण तो पाक करणे म्हंटले की अंगावर काटा येतो... त्यामुळे रव्याचा लाडवाचा कधी घाट घातला नव्हता. पण मायाजालावर कुठेतरी ही लाडवाची रेसिपी वाचली आणि ट्राय तर करुया...म्हणून यंदा केलेच...आणि जमले हां तर सोप्प्या लाडवाची सोप्पी कृती...
कृती:
१. बारीक रवा चाळुन एका घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्ब्यात भरा,
२. डब्बा कुकर मधे ठेऊन ८-१० शिट्ट्या करा (हो, पहिल्यांदाच प्रयोग केला म्हणून आणखी बीना शिट्यांचा प्रयोग नाही केला ). कुकर चे प्रेशर उतरू द्या.
३. एकीकडे पिठीसाखर, नारळाचा चव, वेलची एका हिटप्रूफ बोलमधे मिक्स करुन घ्या.
४. प्रेशर उतरले की कुकर मधुन डब्बा बाहेर काढुन त्यातला गरम रवा नारळ् + साखर मिश्रणात घाला आणि नीट सारखे करुन घ्या.
५. यात २ चमचे साजुक तूप आणि मिल्क पावडर घाला. थोडे दूध घालुन सारखे करा आणि मावे मधे १ मिनीट - बाहेर काढुन ढवळा असे २ वेळा करा. सारखे करुन घ्या.
६. हाताला तूप लावुन लाडू वळा.
आहेत की नै सोप्पे....
१. मूळ कृतीमधे मावे ची स्टेप नव्हती. पण मला नुसता वाफवलेला रवा कच्चा वाटला म्हणुन थोडा मावेमधे परत गरम केला. मुळ रेसिपी मधे मिल्क पावडर पण नव्हती. पण मिल्क पावडरमुळे लाडु छान मिळून आलेत.
२. लाडु अगदी ओलसर नाहित पण अगदी 'रांगोळी'ही नाहित असे मध्यम झाले आहेत.
३. नारळाचे अन तूपाचे प्रमाण थोडे वाढवले तर बहुतेक अजुन थोडे मऊसर्/ओलसर होतिल.
४, मुळ रेसिपीमधे १ कप साखर होती पण मी पाऊण कप घातली तरी बर्यापैकी गोड झाले आहेत.
५. लाडू वळताना मिश्रण कोरडे होत्येय असे वाटले तर थोडे दूध घाला आणि सारखे करुन घ्या आनि परत लाडू वळायला लागा
लाडू जमतिल असे वाटले नव्हते म्हनून स्टेप बाय स्टेप फोटो नाहित
मस्त आहेत...पण हे लाडु किती
मस्त आहेत...पण हे लाडु किती दिवस टिकतील??? फ्रिज मधे ठेवावे लागतील?? रांगोळीच्या लाडवांपेक्षा नक्कीच मस्त आहेत हे...
वा ! छान आहे कृती !!
वा ! छान आहे कृती !!
मस्त सोप्पी आहे कृती एक शंका
मस्त सोप्पी आहे कृती
एक शंका - कुकरमध्ये ठेवायलाच हवा का रवा ? मावेचीच वेळ वाढवली तर ?
tula jamale mhanaje
tula jamale mhanaje :ao:
annapurnene ase mhanane mhanane mhanaje
diwalichya shubhechaa ga
मावेशिवाय करता येतील का?
मावेशिवाय करता येतील का?
@ अनिश्का - या लाडवात नारळाचा
@ अनिश्का - या लाडवात नारळाचा चव आहे त्यामुळे मुंबईच्या हवेत फ्रिजमधे ठेवायला लागतिल बहुतेक.
@ भारतीताई - मावे मधे केले तर ते भाजलेल्या रवा लाडवांसारखे होतिल ... करुन बघायला हरकत नाही.
@ विनीता - मावे मधे मी थोडे गरम केले कारण मला रवा थोडा कच्चा वाटला पण कदाचित अजुन २-४ शिट्ट्या जास्त दिल्या असत्या तर शिजला असता... रवा जास्त वेळ वाफवुन मावे शिवाय करता यावेत. मूळ रेसिपी मधे मावे स्टेप नव्हतीच.
लाजो लाडू छान, पण मला रव्याचे
लाजो लाडू छान, पण मला रव्याचे नाही आवडत
लाजो, खूप सोपी रेसिपी टेस्टी
लाजो, खूप सोपी रेसिपी
टेस्टी झालेत लाडू...
अरे व्वा चिवा, धन्स गं...लाडू
अरे व्वा चिवा, धन्स गं...लाडू केलेस आणि इथे कळवलेस म्हणून
दक्षे... काय गं तु... रव्याचा लाडू आवडत नाही... अरेरे....
रवा कच्चा वापरायचा की कोरडा
रवा कच्चा वापरायचा की कोरडा भाजून घ्यायचा ?
छान आहेत लाडू. पण कूकर
छान आहेत लाडू. पण कूकर मधे ८-१० शिट्या केल्याने काय होइल? रवा शिजतो, फुलतो -- काय होत? मला कळल नाही म्हणून विचारते. क्षमस्व.
लाजो-- -/\- धन्यवाद! लाडु
लाजो-- -/\- धन्यवाद!
लाडु लगेच करुन बघितले...मस्त जमले..फ़ोटो देते आहे.
मी दिवाळीत हे लाडु करुन
मी दिवाळीत हे लाडु करुन पाहिले...
मस्त झाले...
मी काही बदल केले होते
रवा भाजुन मग कुकर ला लावला...
रवा व नारळ प्रमाण एकास एक घेतले
दुध न वापरता मिल्क्मेड वापर्ले..सो पिठीसाखर अगदी १-२ चमचे चवीनुसार घातली.
खुप खुप धन्यवाद या सोप्या रेसिपी साठी.
बारीक रवा म्हणजे झीरो नंबरचा
बारीक रवा म्हणजे झीरो नंबरचा रवा का? जो नॉर्मल रव्यापेक्षा बारीक असतो.