Submitted by स्वप्ना_राज on 28 October, 2013 - 09:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
तेल, लवंगा, वेलची, ३ कांदे, तिखट, दही, १ टोमेटो, आलं लसूण पेस्ट, खडा मसाला, अर्धा किलो मटण, मीठ, पाणी, कोथिंबीर
क्रमवार पाककृती:
तेल तापवा. त्यात २ लवंगा, २ वेलच्या घाला.
गॅस बंद करा. तिखट आणि ३ कांद्याची पेस्ट घाला.
गॅस चालू करून चांगलं परता. तेलाचा तवंग येऊ दया.
दही घुसळून त्यात १ टोमेटोचे बारीक तुकडे घाला.
दह्याचं हे मिश्रण वरील मिश्रणात घाला.
१ चमचा आलं लसूण पेस्ट घालून परता.
खडा मसाला भाजून त्याची पूड करा. ही पूड वरील मिश्रणात घाला.
मटणाचे तुकडे घाला. मीठ घाला. पाणी घालून कुकरमध्ये ३ शिट्ट्या काढा.
कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
माहितीचा स्रोत:
खवय्ये (झी मराठी) किंवा फूड फूड वरील संजीव कपूरचा कार्यक्रम
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. ( मी सुरणाचा किंवा
छान आहे.
( मी सुरणाचा किंवा लाल भोपळ्याचा करीन
)
माफ करा ताई... पण रोगनजोश
माफ करा ताई... पण रोगनजोश वनस्पती तुपात करतात असं ऐकुन आहे... !
ही मात्र साधी कुकर मधे शिजविलेली भाजी दिसते.
ह्यात मटण नाही दिसते......
ह्यात मटण नाही दिसते......

एक अनभिज्ञ बापड्याचा निरागस सवाल...
५ मिनीटांत होईल हे सगळं ?
५ मिनीटांत होईल हे सगळं ?
>>ह्यात मटण नाही दिसते हा
>>ह्यात मटण नाही दिसते
हा माझ्या ताटाचा फोटो आहे. मी रेड मीट खात नाही म्हणून नुसता रस्सा घेतलाय.
>>५ मिनीटांत होईल हे सगळं ?
ती 'डिफॉल्ट व्हॅल्यू' होती.
स्वप्ना, तु दिलेली कृती मस्त
स्वप्ना, तु दिलेली कृती मस्त आहे, एकदा असेही करुन पाहेन.
मी अन्नपुर्णामधली कृती वाचुन केलंय खुप वेळा, साजुक तुपात. इतकं मस्त लागतं हे मटण की आता आठवुन डब्यातली भाजी तोंडातच फिरायला लागली, घशाखाली उतरेनाच.
मुंबईत दिल्ली दरबार मध्येही खाल्लंय. तिथेही तुपातच बनवलेलं. तुही बनवुन बघ एकदा तुपात (वनस्पती तुप मात्र अज्जिबात वापरु नकोस)
तुम्ही रेड मीट का खात नाही?
तुम्ही रेड मीट का खात नाही? काही विशेष कारण?
३ शिट्ट्यांमधे मटण शिजत नाही,
३ शिट्ट्यांमधे मटण शिजत नाही, खिचडी शिजते.
>>तुही बनवुन बघ एकदा तुपात
>>तुही बनवुन बघ एकदा तुपात (वनस्पती तुप मात्र अज्जिबात वापरु नकोस)
असंही करुन बघेन. धन्यवाद ग