ग्रामपंचायतीच्या हद्दितल घर लीगल असत का?

Submitted by दिनेश चिले on 24 October, 2013 - 06:56

ग्रामपंचायतीच्या हद्दितल घर लीगल असत का? मग त्याला राष्ट्रीय बँका कर्ज का नाही देत? अस घर कुणी तोडत का अनाधिकृत ठरवून? उदा. महानगरपालिका. तुमचा काय मत आहे, अस घर विकत घ्याव का? हे घर तुम्ही विकत घेताना कोणती काळजी घ्यावी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रामपंचायत हद्दीतले घर लीगल असते. त्याला बँकाकडून कर्ज आरामात मिळू शकते. आमचे घर ग्रामपंचायत मधेच आहे. महानगर पालिकेचा ग्रा.पं.शी काहीही संबंध नसतो. महानगरपालिका ग्रा.पं हद्दीतील घर तोडू शकत नाही. अनधिकृत बांधकाम असल्यास ग्रापं घर तोडू शकाते.

महानगरपालिका अथवा नगरपालिकेपेक्षा ग्रा पं चे टॅक्सेस वगैरे कमी असतात.

धन्यवाद नंदिनी.
माझी शंका अशी होती कि, वर्तमान पत्रामध्ये आपण ज्या जाहिराती पाहतो त्यामध्ये असा का लिहितात कि लोन मिळणार नहि. पूर्ण कॅश पेमेंट करावी लगेल. कधी पतपेढीतून कर्ज मिळवून देतो, असही लिहितात. पण व्याज ज्यास्त असणार. अस का?

र्तमान पत्रामध्ये आपण ज्या जाहिराती पाहतो त्यामध्ये असा का लिहितात कि लोन मिळणार नहि. पूर्ण कॅश पेमेंट करावी लगेल. कधी पतपेढीतून कर्ज मिळवून देतो, असही लिहितात. पण व्याज ज्यास्त असणार. अस का?> नक्की अशी जाहिरात मी कधी वाचली नाही. पूर्ण कॅश पेमेंट असली तर तो मामला ब्लॅक मनीचा असतो.
पतपेढीतील कर्जाबद्दल देखील काही कल्पना नाही.

ग्राम पंचायत हद्दीमधे १-२ गुंठ्यावर बांधलेल्या घरांसाठी कलेक्टर एन.ए. / टाऊन प्लॅनिंग परवाने मिळत नाहीत. आणी मग ह्या कारणामुळे बँका कर्ज देत नाहीत.
आणी मध्यंतरी राज्य सरकारने ग्रामपंचायतींकडुन बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार काढुन घेतले होते असे माझ्या वकील मित्राकडुन कळाले होते.

मला कल्याण-डोंबिवली या भागात बिल्डिंगमध्ये flat विकत घ्यायचा. ती जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते.
flat घेताना कोणती काळजी घ्यावी? बिल्डरची कोणती कागदपत्रे तपासावीत? जेणेकरून फसवणूक होणार नाही.
तसेच अशा भागात बिल्डर तात्पुरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतो. (१ वर्ष महानगर पालिकेकडून पाण्याची permission इ.) नंतर हात वर करतो, असा माझ्या मित्राचा अनुभव आहे. मला कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे. तसेच असा flat विकताना काही अडचणी येतात का? धन्यवाद.

ग्रा,प, हद्दीतील घरे लीगल असतात मात्र त्यांना राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज मिळत नाही , इतर बँका (सहकारी, पतपेढ्या वगैरे) कर्ज उपलब्ध करुन देतात त्यांचा दर साधारण जास्त असतो प्रामुख्याने एन ए आणि टाऊन प्लॅनींग सँक्शन असेल तर लोनसाठी कोणतीही अडचण नाही ( यात किमान ग्रा.पं चा बांधकाम परवाना असणे आवश्यक .

ब-याच वेळा आहे त्या परवानगीपेक्षा जास्त मजल्याचे बांधकाम केल्यामुळे अशा इमारती लीगल ठरत नाही.
म्हणजे तुमच्या बिल्डींगला ३ मजल्याची परवानगी असेल आणि तुमचा फ्लॅट दूस-या मजल्यावर असेल आणि बांधकाम ५ मजल्याचे केले असेल तर तुमचे घरही लीगल नाही संपूर्ण इमारतच अनधिकृत ठरते

........... धन्स

ग्रा,प, हद्दीतील घरे लीगल असतात मात्र त्यांना राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज मिळत नाही , इतर बँका (सहकारी, पतपेढ्या वगैरे) कर्ज उपलब्ध करुन देतात त्यांचा दर साधारण जास्त असतो प्रामुख्याने एन ए आणि टाऊन प्लॅनींग सँक्शन असेल तर लोनसाठी कोणतीही अडचण नाही ( यात किमान ग्रा.पं चा बांधकाम परवाना असणे आवश्यक .<<< टिंबक टू, बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय या दोन बँकाकडून कर्ज घेतलेले आहे. माझे घर ग्राम पंचायत हद्दीमधेच येते. गावातली इतर काही घरे ही बँकाकडून कर्ज घेऊन बांधून, रिनोव्हेट करून, विकून झाली आहेत. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, अ‍ॅक्सीस बॅक अशा विविध बँकानी कर्जे दिलेली आहेत.

आणी मध्यंतरी राज्य सरकारने ग्रामपंचायतींकडुन बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार काढुन घेतले होते असे माझ्या वकील मित्राकडुन कळाले होते.>>> गिरीकंद, आमच्याकडे तरी बांधकाम परवाना तलाठ्याकडून (तालुका पातळी) काढून आणावा लागतो. मात्र, तो परवाना ग्रामपंचायतमधे सादर करावा लागतो. गामपंचायत अनधिकृत बांधकाम असेल तर ताबडतोब अ‍ॅक्शन घेऊ शकते. कलेक्टर एन ए परवाना घर बांधायचे असल्यास लागतोच अणि शेतजमीन असेल तर फार्म हाऊस म्हणून (फक्त) एक आर सीसी घर बांधता येऊ शकते.

ब-याच वेळा आहे त्या परवानगीपेक्षा जास्त मजल्याचे बांधकाम केल्यामुळे अशा इमारती लीगल ठरत नाही.
म्हणजे तुमच्या बिल्डींगला ३ मजल्याची परवानगी असेल आणि तुमचा फ्लॅट दूस-या मजल्यावर असेल आणि बांधकाम ५ मजल्याचे केले असेल तर तुमचे घरही लीगल नाही संपूर्ण इमारतच अनधिकृत ठरते

<>>>> ओह, हे ग्राम्पंचायत भागामधील "बिल्डींगमधला फ्लॅट" घेण्याबद्दल आहे का? मग मला जास्त माहिती नाही. आम्ही स्वतंत्र घरे बांधलेली आहेत.

खेड्यामध्ये फ्लॅट अ‍ॅक्ट लागू नसतो. जमीन व त्यावरील घर असे एकत्र विकता येते. पण एकाच जमिनीवरील एक फ्लॅट याचा, एक त्याचा असे विकायला फ्लॅट अ‍ॅक्ट लागतो.

तो नसेल, तरीही बाँड पेपरवर व्यवहार करतात. तो ब्यांकेला लोन द्यायला लीगल ठरत नसेल.

( ऐकीव माहिती.)

-------

ग्रामपंचायत हद्दीत फ्लॅट घेण्यापेक्षा चाळीतील घर घ्यावे असे मला वाटते. कारण ते एक मजलीच असते, त्याला ग्रामपंचायतीची पमिशन मिळू शकते . आणि भविष्यात फ्लॅट अ‍ॅक्ट लागू झाला तर त्या जागेला सोन्याचे भाव मिळू शकतात.

पण फ्लॅट अ‍ॅक्ट लागू नसताना फ्लॅट विकत घेणं हे रिस्कीच वाटतं.