Submitted by आरती. on 22 October, 2013 - 07:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
बेसन लागेल तस घालावे. पीठाचा गोळा होईपर्यंत.
२ टे. स्पून तांदूळाच पीठ
१ पुदीन्याची जुडी
१ मोठा उकडलेला बटाटा
८-९ हिरव्या मिरच्या
१/२ टी स्पून काळि मिरी पावडर
१/२ टी स्पून दालचिनी पावडर
१/२ टी स्पून चाट मसाला
मीठ चवीनुसार
२ टेबलस्पून गरम तेल
तेल तळण्यासाठी
क्रमवार पाककृती:
१. पुदिन्याच्या पानांची व हिरव्या मिरचीची बारीक पेस्ट करून घ्यावी.
२. उकडलेला बटाटा किसून घ्या.
३. पुदिना + मिरचीच्या पेस्टमध्ये तांदूळाच पीठ, किसलेला बटाटा, काळि मिरी पावडर, दालचिनी
पावडर, चाट मसाला आणि त्यात मावेल तेवढ बेसन व चवीनुसार मीठ घाला.
४. २ टेबलस्पून गरम तेल घालून मळून घ्या. एकदम घट्ट गोळा करु नका. पीठाचा थोडा सैलसर गोळा
मळून घ्या.
५. शेवेच्या सोर्याची बारीक होलची जाळी वापरून गरम तेलामध्ये शेव पाडा आणि तळून घ्या.
फोटो विकएन्डला टाकते.
वाढणी/प्रमाण:
दिवाळीचा फराळ खाल तेवढा :)
माहितीचा स्रोत:
अम्मा
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच प्रकार आहे. केला असता पण
छानच प्रकार आहे. केला असता पण सोरा नाही. या मिश्रणाचे दुसरे काहीतरी करून बघीन.
दिनेशदा धन्यवाद तुमच्या
दिनेशदा धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्द्ल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही या मिश्रणाचे नक्कीच काहीतरी चांगला डेकोरेटीव्ह पदार्थ बनवाल ह्यात शंकाच नाही.
अरे वा! हे वेगळंच आहे
अरे वा! हे वेगळंच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अश्विनी, हिरवी शेव दिवाळीसाठी
अश्विनी, हिरवी शेव दिवाळीसाठी हटके पदाथे आणि टेस्टीपण लागते. नक्की बनव.
सही आहे. दिवाळीत नक्की
सही आहे. दिवाळीत नक्की बनवणार.
ए आरती मस्त पदार्थ आहे
ए आरती मस्त पदार्थ आहे गं!!
दिवाळीत नक्की करेन. पण टिकेल ना व्यवस्थित???
पण टिकेल ना व्यवस्थित??? <<<<
पण टिकेल ना व्यवस्थित??? <<<< हो अग आपली नॉर्मल तिखट शेव असते तसाच प्रकार आहे. हल्दीरामच आलू भूजीया मिळत तशीच टेस्ट असते.
धन्यवाद गितान्जली. बनवली कि
धन्यवाद गितान्जली. बनवली कि फोटो नक्की टाका.
बेसन नक्की किती घ्यायचे?
बेसन नक्की किती घ्यायचे?
पीठाचा मऊ गोळा होईपर्यंत बेसन
पीठाचा मऊ गोळा होईपर्यंत बेसन घालाव.
पुदिना न घालता करायचं असेल तर
पुदिना न घालता करायचं असेल तर काय करायचं?? कृपया सांगाच!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुदिना न घालता करायचं असेल तर
पुदिना न घालता करायचं असेल तर << पुदिना न घालता मिरचीची पेस्ट करा.. आणि आलू भुजिया मिरचीवाले असं म्हणा.. हा का ना का![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा त्या पिठाची छानशी
दिनेशदा त्या पिठाची छानशी थालिपिठे करा मस्त लोणी बीणी भरपूर सोडून (नुसत्या बेसनाऐवजी भाजणीचे पीठ घाला /चकलीचे पीठ )
मिलिंदा रोचीन, पुदिना +
मिलिंदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रोचीन, पुदिना + मिरचीच्या पेस्टऐवजी लाल मिरची पावडर घाला किंवा तिखट नको असेल तर नुसती हळद घालून करू शकता.
ठिक आहे!!धन्स!!
ठिक आहे!!धन्स!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान दिसतोय हा पदार्थ! बेसनाचे
छान दिसतोय हा पदार्थ!
बेसनाचे प्रमाण किती?
गमभन, पीठाचा मऊ गोळा
गमभन, पीठाचा मऊ गोळा होईपर्यंत बेसन घालाव.
वरच्या प्रकाराने मी अजुन करुन
वरच्या प्रकाराने मी अजुन करुन पाहिले नाही पण मी असेच एकदा स्वतःचे डोके चालवुन आलु भुजिया करायचा प्रयत्न केलेला उकडलेले बटाटे आणि बेसन वापरुन. चवीला झालेला मस्त अगदी हलदीरामसारखा पण एक इश्यु होता. आपण शेव सो-यातुन पाडतो ती अखंड पडते कढईत. मी केलेला प्रकार असा अखंड पडत नव्हता तर तुटत तुटत पडत होता, साधारण अर्धा इंच लांबीच्या तुकड्यात पडत होता. मला शंकरपाळ्याच्या झारण्याने काढुन घ्यावा लागला कढईतुन.
वरची शेव अखंड पडते काय>
साधना हो शेव अखंड पडते. फोटो
साधना हो शेव अखंड पडते. फोटो दिला आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे पाक्रु...
छान आहे पाक्रु...