प्रश्नकुंडली : कृष्णमुर्ती पद्धत
फलज्योतिषशास्त्रात प्रश्नकुंडली हा एक महत्वाचा विभाग आहे. ह्या पद्धती मध्ये जातकाचे जन्मासबंधी तपशीलाची गरज नसते . कोणत्याही प्रश्न करता कृष्णमुर्ती पद्धतीने प्रश्नकुंडली मांडण्या करता प्रश्नकर्त्यास १ ते २४९ मधील कोणताही एक नंबर देण्यास सांगतात .
जो प्रश्न विचारायचा आहे तो मनात धरून १ ते २४९ मधील जो नंबर पहिल्यांदा डोळ्यासमोर/ मनात येईल तो नंबर सांगावा . नंबर देताना लकी नंबर वगेरे सांगू नयेत . प्रश्नकुंडली मांडताना पहिला सगळ्यात महत्वाचा नियम असा कि प्रश्न कर्त्याच्या मनात त्या प्रश्नाबाबत तळमळ हवी . उगीचच टाइम पास म्हणून किंवा ज्योतिषाची टर उडवण्यासाठी म्हणून विचारलेला नसावा . सर्वसाधारणपणे पत्रिकेत चंद्र प्रश्नाशी संबंधित असतो.प्रश्न ज्या भावाशी संबंधित असतो त्या भावात चंद्र असतो अथवा कर्क रास असते.
प्रश्नाच्या स्वरूप प्रमाणे कोणती स्थाने बघावीत ह्या बद्दल काही नियम आहेत. जसे घर घेण्याबाबत प्रश्न असेल तर चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र बघावा लागतो . चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र जर मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून तो जर चतुर्थ(घराचे स्थान), लाभ ( सर्व प्रकारचे लाभ) , व्यय ( गुंतवणूक ) ह्या स्थानांचा कार्येश असेल तर घर घेण्याचा योग त्या स्थानाच्या दशेत अंतर्दशेत असतो.
(चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर तृतीय स्थानाचा बलवान कार्येश असेल तर घर घेणे बाबत अडचणी येतील कारण तृतीय हे चतुर्थाचे व्यय स्थान आहे.)
अजून अचूक कालनिर्णयाकरता ruling planets (r .p ) घेऊन त्यातून रवि भ्रमणाप्रमाणे महिना काढावा .
घर लाभेल का ? हे बघण्यासाठी चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी कोणत्या स्थानाचा बलवान कार्येश आहे ते बघावे तसेच महादशा व अंतर्दशा ह्याचा विचार करून मग ठरवावे .
कृष्णमुर्तीच्या मते प्रश्नकुंडली हे दैवी मार्गदर्शन आहे .त्यामुळे प्रश्नकर्त्याने किती प्रामाणिक पणे प्रश्न विचारला आहे त्यावर त्याच्या उत्तराचा पडताळा येतो .
खालील प्रकारचे प्रश्न प्रश्नकुंडलीने बघता येतात .उदाहरणार्थ
घरासंबंधी प्रश्न:
घर विकत घेणे , विकणे , घराला भाडेकरू मिळणे , भाडेकरू जागा सोडून जाणे.जागेत बदल आहे का?
तसेच जमिनीची खरेदी / विक्री .
नोकरीत बदल आहे का? नवीन नोकरी मिळेल का? प्रमोशन मिळेल का? ठराविक नवीन प्रोजेक्ट मिळेल का?
बदली होईल का? कधी?
ठराविक व्यवसाय करावा का?
विवाह कधी होईल?
प्रेमविवाह होईल का?
इच्छित व्यक्ती कडून होकार येईल का?
एखादी वस्तू हरवली असेल तर ती मिळेल का? साधारण कधी व कुठे ?
चोरलेली वस्तू/ऐवज मिळेल का ? चोर सापडेल का?
परदेशगमन योग आहे का? कधी?
असे अनेक प्रश्न प्रश्नकुंडलीने सोडवता येतात.
प्रश्नकुंडलीची मुख्य मर्यादा म्हणजे हि फक्त एका प्रश्नाशी निगडीत असते. प्रश्नकुंडली विषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी हे लिहिले आहे.
ज्यांनी कोणी कृष्णमुर्ती पद्धतीने प्रश्नकुंडलीचा अभ्यास केला आहे किंवा ज्यांना ह्या पद्धतीचा उपयोग झाला आहे त्यांनी जरूर आपले अनुभव सांगावेत .
प्रश्नकुंडली मांडताना पहिला
प्रश्नकुंडली मांडताना पहिला सगळ्यात महत्वाचा नियम असा कि प्रश्न कर्त्याच्या मनात त्या प्रश्नाबाबत तळमळ हवी . उगीचच टाइम पास म्हणून किंवा ज्योतिषाची टर उडवण्यासाठी म्हणून विचारलेला नसावा .
>>
हे सहीय. या वाक्याने जोतिष्याची परीक्षा करणारे, वाद घालणारे यांना फाट्यावर मारले.
कोणत्याही प्रकारच्या
कोणत्याही प्रकारच्या प्रश्नकुंडली विषयी पुस्तकात अथवा ग्रंथात तुम्हाला हा नियम (प्रश्न कर्त्याच्या मनात त्या प्रश्नाबाबत तळमळ हवी) लिहिलेला दिसेल .
व.दा भटांनी पण ' प्रश्न कोणाचा व केव्हा पाहावा ? '
ह्या विषयी ' संपूर्ण प्रश्न-शास्त्र ' ह्या त्याच्या पुस्तकात लिहिले आहे. ( पान क्र. ६ )
प्रश्नकुंडलीतून सर्वप्रथम तो प्रश्न दिसला पाहिजे . ते तेव्हाच होईल जेव्हा प्रश्नकर्ता त्या प्रश्न विचारण्याच्या उद्देशाबाबत गंभीर असेल.
तुम्ही कोणत्या उद्देशाने जाता हे सगळ्याच ठिकाणी महत्वाचे आहे (केवळ ज्योतीषाकडेच असे नव्हे ). कोणत्याही गोष्टीची अनुभूती येण्यासाठी श्रद्धा महत्वाची असतेच .
>>>उगीचच टाइम पास म्हणून
>>>उगीचच टाइम पास म्हणून किंवा ज्योतिषाची टर उडवण्यासाठी म्हणून विचारलेला नसावा .<<<
अगदी बरोबर, नैतर काय होते की अशाच प्रकारे डॉक्टरकडे गेला अन पोटात दुखत नसताना त्यास सांगितले की पोटात दुखतय, तर त्या डॉक्टरची जी गत होईल, तीच गत ज्योतिषाचीही होईल, तिथे डॉक्टर वा ज्योतिषान्नी कितीही डोके आपटले तरी ते ते शास्त्र त्यास (म्हणजे डॉक्टर वा ज्योतिषास )काहीही मदत करू शकणार नाही.
अर्थात, पण अपवादात्मकरित्या, एक्स्पर्ट डॉक्टर समोरिल व्यक्ति पोटात दुखण्याबद्दल धादांत खोटे बोलते हे समजु शकेल, तसेच ज्योतिषीही समजु शकतो. पण मूळात अशा घटना अपवादात्मकच असल्याने समोरील व्यक्ति "खरेच" बोलत आहे असे गृहित धरुनच बहुषः ज्योतिषांचा अभ्यास होत असतो, नि:ष्कर्ष काढले जात असतात. समोरिल व्यक्ति नालायक खोटारडी आहे/ वा अशी नालायक-खोटारडी व्यक्ती आज आपल्या नशिबाला आहे हे दरवेळेस ज्योतिषी तपासुन घेत नसतो, सज्जनांच्या जगात घेणे आवश्यक नसते! मात्र अन्निसच्या कायद्यात/कायद्यामुळे, स्ट्रिन्गऑपरेशनचे "पोटार्थी" उपद्व्याप करणार्यांच्या उपस्थितीत कलियुगात हे अभ्यासणेही आवश्यक असेल!
हे म्हणजे असे झाले की लोकल/बस मधुन जाताना शेजारीलपुढीलमागिल प्रत्येक स्त्रीपुरुष व्यक्ति पाकीटमारच आहे अशा संशयाने बघत २४ तास खिसापाकीट चाचपत सांभाळत बसणे तशागत झाले काय करणार? सर्व समाज असा संशयग्रस्त व्हावा हीच कित्येकांची इच्छाही अस्ते ना!
(No subject)
डॉक्टरचे उदाहरण अगदी समर्पक
डॉक्टरचे उदाहरण अगदी समर्पक आहे .
हा हा. डॉक्टरचं उदाहरण अगदी
हा हा. डॉक्टरचं उदाहरण अगदी चुकीचं आहे. त्यापेक्षा मी एका लहान बाळाचा एक्सरे घेउन हा माझाच एक्सरे आहे असं म्हणालो तर कंपाउंडरसुद्धा मी खोटं बोलतो आहे हे सांगेल.
अन्विता, लिंबूटिंबू, १००%
अन्विता, लिंबूटिंबू,
१००% अनुमोदन. डॉ. चे उदाहरण खरंच समर्पक आहे.
अन्विता,
कृष्णमुर्ति पद्धतिने प्रश्नकुंडलीचा मला अनुभव आहे.
फारच चांगले मार्गदर्शन मिळाले होते ज्यामुळे बरेच काही आणखीन सुरळीतपणे होऊ शकले.
जास्त लांबवित नाही.
धागा छान आहे.
नमस्ते.
कृष्णमुर्ति पद्धतिने
कृष्णमुर्ति पद्धतिने प्रश्नकुंडलीचा मला अनुभव आहे.
फारच चांगले मार्गदर्शन मिळाले होते ज्यामुळे बरेच काही आणखीन सुरळीतपणे होऊ शकले.
सहमत.
ह्या विद्येत काही कलर
ह्या विद्येत काही कलर काँबिनेश्न्स वापरुन सुद्धा काही वेळेस मार्गदर्शन करतात का ?
कलर कॉम्बीनेशन म्हणजे काय ?
कलर कॉम्बीनेशन म्हणजे काय ? प्रश्न नीट कळला नाही .
.
.
>>>> कलर काँबिनेश्न्स वापरुन
>>>> कलर काँबिनेश्न्स वापरुन सुद्धा काही वेळेस मार्गदर्शन करतात का ? <<<<< होय. पण त्याचा संबंध कृष्णमूर्ति पद्धतीशी किती आहे ठाऊक नाही. पाश्चात्य देशात यावर बरेच संशोधन झालेले असून, व्यक्तिच्या मुड्स प्रमाणे त्या त्या वेळचे आवडते कलर्स वेगवेगळे असू शकतातच, शिवाय व्यक्तिची मूळ मनोवृत्ती जशी असेल, त्याप्रमाणे व्यक्तिस मूलभूतरित्या रंग आवडतात, त्यापद्धतीची रंगसंगती व्यक्ति अवतीभोवती/कपड्यात वगैरे वापरते/त्या त्या रंगसंगतीमधे व्यक्तिस अपरिचित वाटत नाही.
विशिष्ट मनोवृत्ती बदलावी /संभाव्य घटनाक्रम बदलावा म्हणून विशिष्ट रंगसंगती वापरावी असे सूचविले जाते.
पण रंगांबद्दल माझा अधिक अभ्यास नाही.
लिंबूटिंबू, धन्यवाद,
लिंबूटिंबू,
धन्यवाद,
अन्विता,
क.काँबिनेश्न्स म्हणजे विशिष्ट रंगाचे कपडे, रुमाल वगैरे वापरायला सांगतात. त्यांमुळे वर लिंबू म्हणतात
त्याप्रमाणे घटनाक्रम बदलण्याची अथवा निहमीपेक्षा जास्त प्रभावी रितीने उपयोग व्हावा हे एक्सपेक्टेड असते.
रंगा बद्दल मला हि माहिती
रंगा बद्दल मला हि माहिती नवीनच आहे. कृष्णमुर्ती पद्धती मध्ये माझ्या तरी वाचनात रंगाबद्दल अजून काही आले नाहीये .
फक्त ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी हिरव्या रंगाची शाई वापरावी असे वाचनात आहे. कदाचित बुधाचा रंग हिरवा म्हणून असू शकेल .
रंगा बद्दल माझ्यामते शरद उपाध्ये ह्याच्या राशीचक्र पुस्तकात काही माहिती दिली आहे बहुतेक . नीट आठवत नाही.
फार तर ग्रहाच्या रंगाचा उपयोग
फार तर ग्रहाच्या रंगाचा उपयोग प्रश्नकुंडली सोडवताना काही ठराविक वेळी करता येऊ शकतो . जसे गुरु म्हणजे पिवळा , बुध म्हणजे हिरवा वगेरे .
>>काय करणार? सर्व समाज असा
>>काय करणार? सर्व समाज असा संशयग्रस्त व्हावा हीच कित्येकांची इच्छाही अस्ते ना!<<
अहो किमान स्वतःची फसवणुक टाळण्यासाठी थोडाफार चिकित्सक झाला तरी खूप झाले. बाकी सातत्याने संशयग्रस्त असणे हे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते हे मात्र अगदी खरे
> ह्या विद्येत काही कलर
> ह्या विद्येत काही कलर काँबिनेश्न्स वापरुन सुद्धा काही वेळेस मार्गदर्शन करतात का ?
म्हणजे १ ते २४९ मधील आकडा मनात धरतात त्याचप्रमाणे एका रंगाचा RGB code सांगून पण भविष्य सांगता येतं. अर्थात हा आकडा १ ते २५६ (= २^८) या मधला असावा लागतो. आणि R G व B करता एक-एक आकडा सांगीतला की मागचा जन्म, हा जन्म आणि पुढचा जन्म या बद्दल कळते. कृष्णमुर्ती एकदा रूबीक क्युब सॉल्व्ह करत असतांना त्यांच्या हे लक्षात आले. सहाही रंगांचे पण काहीतरी होते, पण त्यांच्या तंद्रीची मार्जीन थोडी कमी पडल्यामुळे त्या ज्ञानास आपण कायमचे मुकलो आहोत.
aschig, तिकडे एक नविन धागा
aschig,
तिकडे एक नविन धागा आणि तुमच्या ज्ञानाला शोभेल असा " भय ईथले संपले नाही ", नुकताच सुरु झाला आहे.
तुम्हीअश्या धाग्यांवर जाऊन जर आपले ज्ञान बाकि लोकां बरोबर शेअर केलेत तर खरे ज्ञानी.
आपल्या ज्ञानाचा दुसर्या धाग्यांवर जाऊन जो तमाशा तुम्ही दाखवता तो तुम्हाला शोभत नाही. टवाळां मध्यी
तुम्ही सुद्धा टवाळ पणा करता हे पाहुन ह्सु येते.
ह्यापुढे तुमच्याशी बोलणे बंद.
अहो राजपूर , तुम्ही कशाला दखल
अहो राजपूर , तुम्ही कशाला दखल घेताय अशा लोकांची.
टवाळकी करणे खूप सोपे काम आहे . विषयाचा काही अभ्यास न करता उगीच काहीतरी खरडत बसण्यात त्यांना आनंद
मिळत असेल तर मिळू देत .
अन्विता, + १००० , पूर्ण
अन्विता,
+ १००० , पूर्ण सहमत.
प्रश्नकुंडलीचे बर्याच वेळा
प्रश्नकुंडलीचे बर्याच वेळा चांगले अनुभव येतात त्यापेकी एक म्हणजे माझ्या मुलाचा चष्मा हरवला होता तेव्हा प्रश्नकुंडली
मांडून अंदाज आला होता कि मिळेल . बहुतेक स्कूल बस मध्ये पडला असेल त्याप्रमाणे मिळाला.( प्रश्नकुंडली बघायच्या
आधी घरात पण खूप शोधला कारण मुलाला नक्की आठवत नव्हते कि शाळेतून घरी आणला आहे कि नाही कदाचित घरी
आणल्यावर हरवला असे त्याला वाटत होते.)कुंडली बघून दोनदा driver काकांना विचारले कि चष्मा सापडला का कोणता
तेव्हा ते दोन्ही वेळेस नाही म्हटले . पण परत दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वत:हून फोन करून सांगितले कि चष्मा मिळाला .गाडी
साफ करताना मिळाला सीट खाली पडला होता.
कदाचित प्रश्नकुंडली मंडळी नसती तर एकदा driver काकांना विचारून ते नाही म्हणतायत म्हणजे बहुतेक हरवला असे
वाटले असते .
aschig, अभिनंदन.
aschig, अभिनंदन.
अन्विता, छान लेख! के.पी. वर
अन्विता,
छान लेख! के.पी. वर अजुन लेख येऊ देत.
गमभन , खूप उशिरा प्रतिसाद
गमभन , खूप उशिरा प्रतिसाद लिहिते आहे . त्याबद्दल क्षमस्व .
धन्यवाद ! तुम्हाला लेख आवडल्याबद्दल . प्रश्नकुंडली वरून साधारण कोणते प्रश्न बघता येतात ह्या बद्दल माहिती देण्याचा
उद्देश होता.
ज्यांचा ह्या पद्धतीचा फारसा कधी संबंध आला नाही त्यांना कदाचित कंटाळवाणे होईल असे वाटते . बघू जमले तर
अजूनही लिहीन .
मला या निमित्ताने
मला या निमित्ताने प्रश्नज्योतिष व प्रचीतीचे गौडबंगाल हा आमच्या ज्योतिषमित्र राजीव उपाध्ये यांच्या चिंतनिकेतील पोस्ट आठवली
माझे लेख माझ्या ब्लोगवर
माझे लेख माझ्या ब्लोगवर वाचू शकता . anaghabhade.blogspot.in
तुमच्या प्रतिसादांचे / सूचनांचे स्वागत आहे .
संपादन
DOB 25 sept. 84 / B. TIME
DOB 25 sept. 84 / B. TIME 5.56 AM.
LAGNA vishayi problem. Expert opinion milel ka ? patrika julali tar mulga pasantis yet naahi. aani mulga pasant tar patrika julat naahi.