Submitted by योकु on 5 October, 2013 - 09:59
कोक / कोकाकोला - थम्सअप
स्प्राईट - सेवन अप
लिम्का - ड्यूक्स
फँटा - मिरिंडा ई. ई.
हे सगळे बेवरेजेस एकाच कंपनीचे आहेत (बहुतेक). पण मग यात नक्की काय फरक आहे?
फक्त नावाचा की काही अजून? सर्वसाधारणपणे किंमतही सारखीच असते...
मला स्वतः ला तरी चवीत काहीच फरक नाही जाणवत.
कुणी सांगेल का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थम्स अप हा एका भारतीय कंपनीचा
थम्स अप हा एका भारतीय कंपनीचा (पार्ले?)ब्रँड होता. कोका कोलाच्या चवीचाच. ती कंपनीच कोकाकोलावाल्यांनी टेक ओव्हर केली. थम्स अप ला ब्रँड व्हॅल्यू होती. म्हणून तो ब्रँड तसाच कायम ठेवला.
कोक परत भारतात आला तेव्हा अगदी उत्सुकतेने घेतला होता आणि थम्स अपच अप असे तिथे हजर असलेल्या सगळ्यांनी एकमताने ठरवले होते.
फँटा कोकचा ब्रँड आहे. मिरिंडा
फँटा कोकचा ब्रँड आहे. मिरिंडा वेगळ्या कंपनीचा आहे.
product parity !
product parity !
स्प्राईट - वॉव सेवन अप -
स्प्राईट - वॉव
सेवन अप - यॅक
असा फरक आहे.
मध्यंतरी कोकाकोला आणि तत्सम
मध्यंतरी कोकाकोला आणि तत्सम विदेशी कंपन्यांवर भारतात बंदी होती.
पण काही वर्षे भारतात असल्यामुळे भारतीयांना त्याची चटक लागली होती.
काही स्वदेशी कंपन्यांनी साधारण जवळपास जाणार्या चवीचे ब्रँड विकसित केले.
परदेशी कंपन्याना भारताने कवाडे उघडल्यावर मार्केटींगच्या जोरावर त्यांनी परत बाजार काबिज केला.
मग इंडियन ब्रँड घश्यात घातले.
त्यातल्या ज्या ब्रँडसना थोडी फार किंमत होती त्यांची नावे तीच ठेवली.
चवीने पिणार्याला फरक नक्कीच कळेल.
डाय हार्ड फॅन्स तर दुसरे ड्रिंक तोंडात घेणारही नाहीत.
ह्म्म्म...
ह्म्म्म...
मला काबुल एक्स्प्रेस मधे
मला काबुल एक्स्प्रेस मधे हर्षद वारसी आणि जॉन अब्राहम कोक की पेप्सी असे भांडतात ते आठवले.
माझ्यासाठी सगळं एकच 'सोडा' कारण मी यातले काहीच पीत नाही. लगेच नाकात झिणझिण्या येतात
थम्स अप / कोक >> दोन्ही मध्ये
थम्स अप / कोक >> दोन्ही मध्ये कॅफीन असते.
लिम्का >> आर्टीफिशियल लिंबू फ्लेवर
फँटा >> आर्टीफिशियल ऑरेंज फ्लेवर
चवीत फरक असतो, कार्बोनेशनने तो कमी जाणवतो एवढेच.
मला स्वतः ला तरी चवीत काहीच
मला स्वतः ला तरी चवीत काहीच फरक नाही जाणवत.
<<
जीभ तपासून घ्या
व्यक्तिशः मला स्वतःला (नुस्ती) कोल्ड ड्रिंकं आवडत नाहीत.
तपासा! :जीभ दाखवणारा
तपासा! :जीभ दाखवणारा बाहुला:
व्यक्तिशः मला स्वतःला (नुस्ती) कोल्ड ड्रिंकं आवडत नाहीत >>>
एकेकाळी थम्स अप अतिशय
एकेकाळी थम्स अप अतिशय आवडायचे.पेप्सी तितके आवडायचे नाही. आता कुठलेच तसे फारसे आवडत नाही.
भारतातली ड्रिंक्स स्ट्राँग
भारतातली ड्रिंक्स स्ट्राँग असतात (व्हिस्की, बीयर मधलं अल्कोहोलचं %); कार्बोनेटेड ड्रिंक्स त्याला अपवाद नाहि. कोला या कॅटेगरीत थंब्स अप मध्ये सिरप आणि सोडा दोन्ही जास्त प्रमाणात आहेत - कोक क्लासीकच्या तुलनेत.
बॉटल्ड्/कॅन्ड किंवा डिस्पेंस्ड ड्रिंक मधलं सिरप आणि सोड्याचं प्रमाण चवीला कारणीभुत असतं.
पीत नाही.
पीत नाही.
सगळ्या ड्रिंक्सच्या चवीत फरक
सगळ्या ड्रिंक्सच्या चवीत फरक आहे.. दिसायला एक सारखी असली तरी..
पेप्सी - बर्यापैकी गोडूस लागते..
कोक - ठिकठाक
थम्प्स अप - सगळ्यात स्ट्रॉंग.
थम्प्स अप, गोल्ड स्पॉट, लिम्का.. हे पूर्वी पारले चे ब्रँड्स होते. जे भारतात जोरात चालत होते. पण जेव्हा कोक ची एंट्री परत एकदा झाली तेव्हा त्यांनी हे विकत घेतले. पण गोल्ड स्पॉट सोडल्यास बाकी दोन्ही ब्रँड बंद करणे त्यांना शक्य नव्हते एव्हढे मार्केट त्या ब्रँडसनी काबीज केलेले होते.. म्हणून हे दोन ब्रँडस आहेत तसेच चालू आहेत.. त्याच जुन्याच फॉर्म्युला सहित..
पार्ले अता परत सॉफ्ट
पार्ले अता परत सॉफ्ट ड्रिन्क्स घेऊन येतेय.
रुनी +१००
रुनी +१००
चवीतला फरक माहिती नाही. पण
चवीतला फरक माहिती नाही.
पण त्यातले कॅफिन लहान मुलांसाठी योग्य नसते हे मात्र नक्की. रोज एक कॅन कॅफिन असलेले पेय पिणारे मूल स्थूलपणाकडे झटकन वळते. कारण त्यात भरपूर साखर असते. भारतात मुलांना हौसेने कॅफिन असलेले पेय दिले जाते असे पाहिले आहे हे मला मुलांसाठी धोकादायक वाटते. माझ्या एका मित्राच्या मुलाचा अशा पेयामुळे दातांचा मोठ्ठा प्रॉब्लेम तयार झाला आहे.
कॅफिन विषयी अधिक माहिती http://www.abc.net.au/quantum/poison/caffeine/caffeine.htm येथे आहे.