ज्योतिष शिक्षण : अभ्यासकांसाठी प्रश्नोत्तरे

Submitted by shikau on 9 May, 2011 - 14:03

ज्योतिषाचा अभ्यास करू इच्छिणार्‍यांनी इथे प्रश्न विचारुयात का? .

मी नुकताच ज्योतिषाचा स्व-अभ्यास सुरु केला आहे. काही दिवसांनी शक्य झाल्यास क्लास लावणार आहे.
तोपर्यंत पुस्तक वाचताना काही प्रश्न पडल्यास ते विचारावेत असे वाटल्याने येथे लिहीत आहे.
जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आभारी असेन.

सुरुवात मी करतो. माझे प्रश्नः

१. सत्वगुणाच्या राशी, रजोगुणाच्या राशी आणि तमोगुणाच्या राशी म्हणजे काय?
ह्या गट पाडण्यामुळे काय फरक पडतो?

२. मूल त्रिकोण रास म्हणजे काय? ग्रह मूल त्रिकोण राशीत येतो म्हणजे नक्की काय होतं?

असे इतरही प्रश्न हळूहळू येतील. आपणही प्रश्न विचारा. आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलमान खानच्या पत्रिकेत ( मेष लग्न, रास लक्षात नाही) दशमात मकर राशीत शुक्र आणी मंगळ युती आहे, मंगळ मकरेत उच्चीचा. अंदाज/ परीणाम डोळ्यासमोर आहेतच्.:फिदी:

ज्यांना निवडणुकींचे भविष्य हवे आहे त्यांनी विजय केळकर आणी सिद्धेश्वर मारटकर ( दोघेही पुण्यातले) यांच्याकडे जावे. कृपया आपल्या खिशातुनच त्यांना फी द्यावी, लिंबुभाऊ किंवा इतर माबोकरकरांकडे हात पसरु नये.:खोखो:

रश्मी... Lol Lol Lol

मूळ कुंडलीत असलेले:
शुभसंबंधित गुरू अन रवि दोन्ही ग्रह आदर्शवादि वृत्तीचे कारकत्व देतात.
मात्र दोन्हीमधे महत्वाचा फरक म्हणजे, गुरू ग्रह पूर्णतः ज्ञानाधारीत/शास्त्राधारीत/तर्काधिष्ठीत आदर्शवाद देतो, तर रवि अहंकाराधारीत/व्यक्तिवादी/व्यक्तिपूजक आदर्शवाद देतो. हा फरक लक्षात ठेवणे महत्वाचे ठरते.
मंगळ स्थानपरत्वेच्या कारकत्वासाठी/सोबतच्या ग्रहाच्या अनुषंगाने आत्यंतिक कृतिशीलता देईल.
तर शुक्र, स्थानपरत्वे सहसा "नजाकतताच" देईल.
बुध मात्र व्यक्तिस त्यात्या स्थानकारकत्वाचे बाबतीत विचार देईल, पण कृतिशून्यताही असेल.
चंद्र स्थानाचे कारकत्वा प्रमाणे मिळू शकणार्‍या फळात/फळाबाबत वैविध्य/संख्यात्मक चढउतार/मानसिक ताणतणाव/व्यग्रता देईल
शनि खरे तर यापासून अलिप्त राहू पाहील, व योग्य वेळेस जातकाचे पाय जमिनीवर टेकविण्याचे काम करील. मात्र ज्यास्थानी शनि असेल, त्या स्थानाचे फळाचे दृष्टीने शनि विलंब/धीमेपणा/चिकाटी इत्यादी गुणावगुणही दर्शवेल.
राहू सहसा ज्यास्थानी वा ज्या ग्रहासोबत असेल, त्याचे कारकत्वात प्रचंड प्रमाणात वाढ/आकस्मितता दर्शवितो, तर केतू नेमके याचे उलट, ते ते कारकत्व लौकरात लौकर संपुष्टात कसे येईल ते दर्शवितो.

वरील विचार करताना, ग्रहांची अंशात्मक स्थिती/अंशात्मक परस्पर योग लक्षात घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर, ग्रह स्वगृही आहे/निर्बली आहे/नीचेचा वा उच्चीचा आहे/अन्य कोणाबरोबर आहे या बाबीदेखिल विचारात घेणे आवश्यक असते.
इतके सारे बघितल्यावर एकंदरीत रित्या जातकाची मूळ प्राक्तनाची बैठक समजुन येते, व त्यात अपेक्षित्/अनपेक्षित बदल घडून येण्यासारखी परिस्थिती किती आहे वा नाही हे गोचर ग्रहभ्रमणाचे साथीने प्रथम/तृतिय/पंचम/सप्तम/भाग्य स्थानावरुन अवलोकता येते, वाईट परिणामांकरता अर्थातच षष्ठ/अष्टम/व्यय ही स्थाने तपासावि लागतात.
याचे जोडीने, विशोत्तरी दशा/अंतर्दशा, भावचलित/नवांश कुंडली यांचेही सहाय्य कालनिर्णयासाठी घेतले जाते.
अवकडहा चक्रातील घातचक्रदेखिल उपयोगी पडते.

आव्हान न स्विकारता पळून जाणारे ज्योतिषी ,सर्वाँसमोर एवढा पचका झाला तरी निर्लज्जपणे इथेच लिहित आहेत. Proud Proud
जे शास्त्र बिनबुडाच्या गल्लाभरु दाव्यांवर चालते त्याचे पाईक असेच पळपुटेपणा करणार. Biggrin
असो ,आव्हान स्विकारण्याचा पुरषार्थ नसलेल्यांकडून उत्तरे मिळणार नाहीत. Wink
इब्लिस ते विबासंच योग्य धाग्यावर विचारा, ज्यांचा या विषयाशी सुतराम संबंध नाही आणि त्यातली गतीही नाही(का ते वरती लिहलेय) त्यांना विचारत बसू नका.

मात्रा अचूक पडली, गळाला मासा अचूक गुन्तला!
<<
लिंबाजीराव,
ते लिहिताना तुम्हास माझ्या प्रतिसादाची काडीचीही कल्पना नव्हती. नेहेमीच्या ज्योतिषी थाटात थापा मारू नका. अन यापुढे शेण बिण बोलत / खात जाऊ नका. तुम्हाला सवय असली तरी लोक शेण खात नसतात.

***

टुनटुन / रश्मी / रीमा ताई,

माझ्या विबासंची काळजी तुम्ही करू नका. तुमच्या वैनी अन मी काय ते पाहून घ्यायला सक्षम आहोत. इथे मी 'किती' होतील हा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर काय लिंबाजींना येईना. मग त्यांनी शेणसडे घातले.

हे "शास्त्र" "गूढ" आहे म्हणे.
वा! मग त्याला शास्त्र कशासाठी म्हणायचे?
जर त्याची "पुरातन" पुस्तके सगळी अ‍ॅवेलेबल नाहीत तर मग गेली हज्जारो वर्षे त्यात भर का घातली नाही कुणी? ज्या "शास्त्रात" अनेकानेक वर्षे काडीचीही प्रगती नाही, ते शास्त्रच नव्हे. (आता मुरली वाजवा, की भारत सरकारने परवानगी दिली नाही. सरकार थोतांडांना सहजी परवानगी देत नसते.)¶

राहिला प्रश्न तुमचा. तुम्ही माझं टेन्शन का घेताय? Proud

टेन्शन गाववाल्यांनाच येत की.:फिदी: मी खानदेशातली आहे, भुसावळची.:फिदी: ओके, तुम्ही प्रश्न सिरीयसली विचारला होता की गंमतीने हेच कळले नाही, म्हणून मी तुम्हाला तसे संबोधले. राग आला असेल तर सॉरी.:स्मित:

इतका गोंधळ!??!
पूर्वग्रहदूषित असलं की आसंच होतं..

आत्ता घाइत आहे पण नंतर सविस्तर लिहेन.
विषयाला धरुन लिहीणार्‍यांचा आभारी आहे.

काय शिकाऊराव,

ग्रहांचाच गोंधळ आहे हा सगळा. पूर्व / पश्चिम / उत्तर / दक्षिण जे काय असतील ते अन तसे दूषित अथवा स्वच्छ ग्रह. Happy

राहू केतु नावाचे कोणतेच ग्रह अस्तित्वात नसताना पत्रिकेत हे आले कोठून?, पत्रिकेत नवग्रह असतात परंतु ज्या ग्रहावर आयुष्य जाते तो पृथ्वी हा ग्रह का नसतो ?
जर भविष्यात एखादे मुल चंद्रावर जन्मल्यास त्याची रास कोणती ?आणि त्याच्या पत्रिकेत चंद्राचे स्थान कुठे लिहणार?
एखादा पाहुणा धूमकेतू आपल्या सौरमालेत येतो तेव्हा त्याला तेवढ्यापुरते पत्रिकेत स्थान का देत नाहीत?>>>>>>

जिज्ञानसेपोटी ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास केल्याशिवाय तसेच त्यामध्ये गती प्राप्त करून हाडाचा ज्योतिष झाल्याशिवाय हे असे प्रश्न पडणे शक्यच नाही. तेव्हा लिंबूभौ !! तुम्हाला अज्ञात असा एखादा तुमचा प्रतिस्पर्धी किंवा एखादा प्रतिएकलव्य तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी कार्यरत तर नाही ना ? याची एकदा खातरजमा करून बघा. आणि पुढे जाऊन ‘प्रश्नार्थींचे या धाग्यावर कोणतेही भले होणार नाही परंतु जे 'पोटार्थी' या धाग्यावर आहेत त्यांचे मात्र होईल... go ahead’ हे वाचल्यावर तर माझी खातरी झालेली आहे.

त्यामुळे रॅशनल चर्चेत हे 'रणछोडदास' टिकत नाहीत ... फिदीफिदी (हास्य) .... >>>>>
पण अनादिकालापासून ज्योतिषशास्त्र तर टिकून आहे आणि आज २१व्या शतकात देशोविदेशातील विविध मान्यवर विद्वान लोकांच्या उपस्थिती मायबोलीनामक राजप्रासादातील ‘ज्योतिष्य, भविष्य’ नामक सभाकक्षात ज्योतिषशास्त्राविषयी कुतूहल असणारे आपण सर्वजण सामील होऊन त्याच्याविषयी चर्चा करत आहोत.

आणि शेवटी shikau यांना एक विनंती.....
आपण म्हणता की ‘‘ ज्योतिषाचा अभ्यास करू इच्छिणार्‍यांनी इथे प्रश्न विचारुयात का? मी नुकताच ज्योतिषाचा स्व-अभ्यास सुरु केला आहे.’’
मी पण सुरुवात करायची म्हणतो तर त्यासाठी तुम्ही काय काय स्व-अभ्यास केलेला आहे ते जरा येथे टाइपलं तर बरे होईल. कारण जर कोहळा हवा असेल तर कमीत कमी आवळ्याची इन्व्हेसमेंट तरी करावी अशी अपेक्षा.

शेवटी प्रतिसाद समाराोप .....
धिरज कांबळे | 1 October, 2013 - 10:45
या देशात कोणताही नागरीक घटनास्वातंत्र्याने राष्ट्रहीताच्या गोष्टीत नाक खुपसू शकतो फिदीफिदी
भोळ्याभाबड्यांनी इथे प्रश्न विचारावेत आणि>>>>>>>
अतिशय उत्तम विचार !!! तरी लोकांचा भोळेभाबडेपणा दूर करण्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी प्रथम ‘‘अजून यांनी काही लेखन केले नाही’’ हे कीटाळ दूर करावे ही नम्र विनंती.

आणि शेवटी shikau यांना एक विनंती.....
आपण म्हणता की ‘‘ ज्योतिषाचा अभ्यास करू इच्छिणार्‍यांनी इथे प्रश्न विचारुयात का? मी नुकताच ज्योतिषाचा स्व-अभ्यास सुरु केला आहे.’’
मी पण सुरुवात करायची म्हणतो तर त्यासाठी तुम्ही काय काय स्व-अभ्यास केलेला आहे ते जरा येथे टाइपलं तर बरे होईल. कारण जर कोहळा हवा असेल तर कमीत कमी आवळ्याची इन्व्हेसमेंट तरी करावी अशी अपेक्षा.

--

हरिहर ,
तुमच्या कुंडलीत अर्णवग्रह वक्री झाला आहे म्हणूनच दिसेल त्याला ग्रिल करत सुटलाय. असो.
चिलव्हा..

हरिहर ,
तुमच्या कुंडलीत अर्णवग्रह वक्री झाला आहे>>>>>
असू शकेल बाबा नशिबाचा भोग ! चिल होण्यासाठी त्यावर एखादा धार्मिक उपाय आहे का? तुम्ही शिकाउ आहात म्हणून अभ्यास करून एखादा उपाय सांगितल्यास मी तुमच्यासाठी गिनीपिग होण्यास तयार आहे.
रच्याकने ‘दिसेल त्याला ग्रिल करत सुटलाय’ ह्यावरून ग्रिल्ड कुंडलीमधील कोणता ग्रह वक्री झालेला आहे ?

अनेक वर्षांपासून मला दोनच शंका / प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे आजवर मिळू शकली नाहीत.

१. एखाद्या ज्योतिषाने सांगितलेले भविष्य खरे ठरले नाही तर त्याला जाब विचारण्याची व दक्षिणा परत मिळवण्याची सोय का नसावी?

२. ज्योतिषांना आयकर का लागू होऊ नये?

भविष्य खरे ठरले नाही तर मागच्या जन्मीचे पुर्वसंचीत, पुर्वसुकृत तिकडे खापर फोडण्याची सोय या ठग मंडळींनी करुन ठेवलिए.. आणि ज्योतिषी दक्षिणा घेतो थोडक्यात दान घेतो त्याला आयकर कसा लावणार?

भारतिय शास्त्रे(?) पोथीपुराणे, ज्योतिष इत्यादी एकमेकांमध्ये इतके बेमालूम मिसळले आहे कि त्यातले 'अर्थकारण' लक्षात यायला बहुतजनांना बराच काळ लागला ,सुरवातीला चार्वाक , बुद्ध यांनी यातला फोलपणा निर्देशीत केला होता. पुढे फुले यांची सत्यशोधक चळवळ ,आगरकर कर्वेआदी समाजसुधारक व डॉ आंबेडकर यासारख्यांनी या ठग लोकांना व त्यांच्या शोषण करणार्या संस्कृतीला प्रचंड भगदाडे पाडली व खर्या अर्थाने आम्हाला माणसात आणले.

बेफिकीर
>>१. एखाद्या ज्योतिषाने सांगितलेले भविष्य खरे ठरले नाही तर त्याला जाब विचारण्याची व दक्षिणा परत मिळवण्याची सोय का नसावी?<<
केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. जर भविष्य चुकले तर इश्वराची इच्छा दुसरे काय! तो काही ज्योतिषी व जातक यातील कॉन्ट्रॅक्ट नाही. की प्रॉडक्टची वॉरंटी वा ग्यारंटी दिली आहे. उपचार करताना रुग्ण मेला तर फी परत मिळते काय? डॉक्टर स्वतः मरत नाहीत काय? डॉ.नितू मांडके ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर हृदय शस्त्रक्रिया केली ते स्वतः हृदयविकारानेच गेले ना? असे अनेक युक्तिवाद केले जातात. थोडक्यात ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या कचाट्यात पकडता येणार नाही. शेवटी तो एक प्रकारचा मानसोपचार आहे. काही लोकांना त्याचा फायदा होतो.
>>२. ज्योतिषांना आयकर का लागू होऊ नये?<<
त्यांनी जर आपल्या इन्कम स्टेटमेंट मधे या व्यवसायपासून मिळणारे उत्पन्न दाखवले तर त्यांनाही तो लागू होईल. इतर ही अनेक व्यवसाय असे आहेत की ते खरे उत्पन्न दाखवत नाहीत. प्रत्येक माणसाने आपल्या इनकमचा अगदी बारीक सारीक हिशोब देणे हे व्यवहार्य पण नाही.

>>>>> संस्कृतीला प्रचंड भगदाडे पाडली व खर्या अर्थाने आम्हाला माणसात आणले. <<<< Lol Lol Lol अच्छा, अच्छा, म्हणजे बौद्ध धर्मात आले ते माणसात आले, बाकी जनावरेच राहिले, असेच ना? Wink

झाले एकदाचे सुरू!

१. एखाद्या ज्योतिषाने सांगितलेले भविष्य खरे ठरले नाही तर त्याला जाब विचारण्याची व दक्षिणा परत मिळवण्याची सोय का नसावी?

असं काही लिखित काँट्रॅक्ट जातक आणि भविष्यवेत्ता यांच्यात झालं असेल तरच कोर्टात जाब विचारता येईल.
अन्यथा नाही.

२. ज्योतिषांना आयकर का लागू होऊ नये?
असं काही नाही , एखाद्या ज्योतिषाला वाटलं की आपलं उत्पन्न आयकर भरण्यालायक आहे तर तो भरू शकतो , सरकारने
ज्योतिषांना आयकरात शेतकर्‍यांसारखी सूट दिलेली नाही.
तसेच आयकर खात्याला जर कर न भरता कुणा ज्योतिषकडे बेहिशोबी मालमत्ता साठली आहे असा संशय आला तर ते धाड घालु शकतात. त्यावेळी मला मिळालेले उत्पन्न ज्योतिषातून आहे म्हणुन आयकर भरला नाही असे स्पष्टीकरण चालत नाही.

दात काढण्यापेक्षा आव्हान स्विकारा आणि सिद्ध करुन दाखवा तुमचे शास्त्र... Proud
नाहीतर कुंभमेळ्यात जाऊन खारट गंगाजल प्या Proud Biggrin
लिंबुभाऊंकडे कुंभातल्या 'गंगेचे' Wink पूजन आहे, सहपरीवारे अगत्य येण्याचे करावे.
http://mpcb.gov.in/images/kumbhdetailed.pdf

अच्छा, अच्छा, म्हणजे बौद्ध धर्मात आले ते माणसात आले, बाकी जनावरेच राहिले, असेच ना? डोळा मारा
<<
स्क्रीनशॉट काढूण ठेवला आहे.

बौद्ध 'धर्म' हा धर्म नसून हिंदू धर्माचाच एक पंथ आहे, इतकेच नव्हे तर बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, असे अनेकदा मायबोलीवरच वाचनात आले.

आत्ता तुम्ही बौद्ध धर्म वेगळा आहे असे म्हटलेत, म्हणून तुमचे हे 'ब्रह्म'वाक्य, वरीलप्रकारचा अपप्रचार करणार्‍यांच्या बोलत्या बंद करण्यास उपयोगी येईल म्हणुन साम्भाळून ठेवीत आहे.

धन्यवाद!

>>>> आत्ता तुम्ही बौद्ध धर्म वेगळा आहे असे म्हटलेत, म्हणून तुमचे हे 'ब्रह्म'वाक्य, वरीलप्रकारचा अपप्रचार करणार्‍यांच्या बोलत्या बंद करण्यास उपयोगी येईल म्हणुन साम्भाळून ठेवीत आहे. <<<<
येवढे महत्व देत अस्ल्यामुळे अगदी "गहिवरुन" आले हो इब्लिसराव.
पण मी काय म्हणतो/म्हणालो याला महत्व नसुन, बौद्धधर्मिय/बौद्धधर्म स्विकारलेले स्वतःला काय म्हणत आहेत्/मानत आहेत हे तुम्ही विचारात घेणे आवश्यक आहे, मी त्यांचा संदर्भ दिला आहे, हिंदुधर्मिय काय मानतात याचा नव्हे. असो.

इब्लिस, तो स्क्रीनशॉट समाजकल्याण खात्याच्या वेब ऐड्रेसवर अथवा सायबर क्राईम सेलकडे पाठवा ,त्याशिवाय यांना अक्कल यायची नाही.या लिंबुने याआधिपण बरीच ऑफेन्सिव्ह स्टेटमेंट लिहिलीत.

>>>> इब्लिस, तो स्क्रीनशॉट समाजकल्याण खात्याच्या वेब ऐड्रेसवर अथवा सायबर क्राईम सेलकडे पाठवा ,त्याशिवाय यांना अक्कल यायची नाही.या लिंबुने याआधिपण बरीच ऑफेन्सिव्ह स्टेटमेंट लिहिलीत. <<<<
तुमचा या आयडीचा येथिल नुकताच महिन्यापूर्वी झालेला हा अवतार कशासाठी झालाय हे लपुन राहिलेले नाही, ते इब्लिसरावान्ना सांगण्यापेक्षा तुम्हीच का पाठवित नाही? (अर्थात इब्लिसरावान्ना तुम्हाला त्याकरता मदत करायची असल्यास अतिउत्तम)
पण क्राईमसेलकडे/समाजकल्याणखात्याकडे स्क्रिनशॉट पाठवायच्या कसल्या इनडायरेक्ट धमक्या देऊ पहाताय? चर्चेमधे स्वतःस सोईचे तेवढेच समोरच्याचे शब्द/मजकुर उचलुन हवा तो अर्थ काढण्याचे तुमचे कसब महान आहे. तुमच्या या "पावित्र्याला शुभेच्छा".

अहो तूम्हाला तूमच्याच क्षेत्रातले भविष्यकथनाचे आव्हान केले तर गैरसोय होते ,आमच्या सोईची कशाला काळजी करताय.

हायला, थोतांडवादाचा तो जुना धागा कुठे आहे? हे पुन्हा नवीन रिमेक कशाला? Proud का, ग्रह गोल गोल फिरतात, तशे आय डी ही पुन्हा पुन्हा फिरुन त्याच चर्चेवर येतात?

> धिरज आपल्या व लिंबुटिंबु यांच्या सदस्यत्वाच्या कालावधीत ९ वर्षांचा फरक दिसला.

असे म्हणणे हे एखादी व्यक्ती दूसऱ्या व्यक्ती आधी जन्मल्यामुळे (केवळ) जास्त मानाची असे म्हणण्यासारखेच आहे.
मान कमवावाच लागतो. धिरज स्वत:चे मुद्दे लेखरुपानी एकत्र मांडून तो मिळवतील अशी आशा आहे.

पैसे मिळवण्याकरताच म्हणून भविष्याचा धंदा करणारे अनेक असतात. पण लिंबूटिंबूसारखे तसे असतात असे वाटत नाही. त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांइतकाच दुर्दैवानी (?) यांचाही त्या अगम्य प्रकारावर गाढ विश्वास असतो.

> हायला, थोतांडवादाचा तो जुना धागा कुठे आहे? हे पुन्हा नवीन रिमेक कशाला? का, ग्रह गोल गोल फिरतात, तशे आय डी ही पुन्हा पुन्हा फिरुन त्याच चर्चेवर येतात?

अनेक मुद्दे पुन्हा-पुन्हा येतात खरे. पण कधी उजळणी होते तर कधी नवा कोन दिसतो. लोक तीच-तीच स्तोत्र म्हणतात त्या पेक्षा हे नक्कीच बरे.

आतापर्यंतच्या प्रतिसांदांवरून सुचलेले एक-दोन मुद्दे:

धिरजनी निवडणुकींबद्दलचे एक आव्हान दिले. त्यात शेवटी म्हंटले आहे:
> लिंबुने भविष्य लिहिल्यास व ते खरे ठरल्यास ज्योतिष हे शास्त्र आहे हे मान्य करु. 
पण विज्ञान पद्धतीचे काम तसे नसते. भाकीत करता येणे महत्वाचे आणि आवश्यक असते, पण ते एकदाच करून पुरेसे ठरत नाही. कारण त्यात causation ऐवजी correlation पण असु शकते. उदा. लिंबूने काही पुस्तकं वाचून त्यासंबंधी भाकीत केले (उदा. राहूलला गुरू निचीचा आहे पण शुक्र वरचढ असल्यानी तो विजयी होणार. त्याचा निवडणूकीतला प्रतिस्पर्धी आहे राकेश. त्यानेही तेच पुस्तक वाचले, आणि राहूलची पत्रीका पाहिली, आणि त्यावर विश्वास असल्यामुळे ठरवले की राहूलच जिंकणार म्हणून नीट प्रचार - आणि काम - केले नाही व त्यामुळे त्याचा पराभव झाला. हे होईल correlation. कारण त्या ग्रहांमुळे काही न होता - causation - एकच पुस्तक दोघांनी वाचल्यामुळे ते झाले आहे).

डेटा वाढल्यापासून डेटा सायन्सही वाढले आहे. ते (म्हणजे खऱ्या अर्थी शास्त्र) वापरून मात्र अशी भाकीते करणे शक्य आहे. नेट सिल्व्हरनी तेच केले. २००८ मध्ये डेटा वापरून अमेरीकेच्या ५० पैकी ४९ राज्यांचे निकाल अचूक सांगीतले. २०१२ मध्ये ५० पैकी ५०! केवळ संख्याशास्त्र - सतत सुधारणा होणारे, कुणालाही समजून घेण्यासारखे, आणि महत्वाचे म्हणजे reproducible - वापरून. तो स्वत: संख्याशास्त्रज्ञ नाही. तरी त्याच्या ते वापरण्याच्या प्रभुत्वामुळे दोन महिन्यांपुर्वी मॉन्ट्रिअलला उत्तर अमेरीकेतील ४००० संख्याशास्त्रज्ञ त्याचे बोलणे तासभर ऐकत बसले होते.

याच्याशीच थोडाफार संबंधीत दूसरा मुद्दा:
तुम्ही पृथ्वीवर कुठे जन्मता यापेक्षा केंव्हा जन्मता याला जास्त महत्व दिले जाते (तेंव्हाच्या त्या स्थानानुसार असलेल्या ग्रहमानाला).
मंगळ-शुक्र-चंद्र-रवी यांना विवाह बाह्य संबंधांबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे.
चंद्राची सापेक्ष गती इतरांच्या मानानी जास्त असली तरी सरासरी पृथ्वीच्या कोणत्याही भागात ठरावीक ग्रहांची एका प्रकारची स्थीती सारख्याच वारंवारीतेनी येणार. मग प्रत्येक देशात सरासरी विबासं सारखेच असायला हवेत. ते तसे असतात का? आणि असल्यास, ते ग्रह-स्थितीमुळेच आहेत, संबंध ठेवणाऱ्यांचा थेट दोश नाही असे म्हणून त्यांना माफ करण्याची तयारी नैतीक ब्रिगेडची असेल काय? की ग्रहस्थीती असूनही ती नाकारायला गंड्या-अंगठ्यांची तरतूद असतेच?

Pages