Submitted by shikau on 9 May, 2011 - 14:03
ज्योतिषाचा अभ्यास करू इच्छिणार्यांनी इथे प्रश्न विचारुयात का? .
मी नुकताच ज्योतिषाचा स्व-अभ्यास सुरु केला आहे. काही दिवसांनी शक्य झाल्यास क्लास लावणार आहे.
तोपर्यंत पुस्तक वाचताना काही प्रश्न पडल्यास ते विचारावेत असे वाटल्याने येथे लिहीत आहे.
जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आभारी असेन.
सुरुवात मी करतो. माझे प्रश्नः
१. सत्वगुणाच्या राशी, रजोगुणाच्या राशी आणि तमोगुणाच्या राशी म्हणजे काय?
ह्या गट पाडण्यामुळे काय फरक पडतो?
२. मूल त्रिकोण रास म्हणजे काय? ग्रह मूल त्रिकोण राशीत येतो म्हणजे नक्की काय होतं?
असे इतरही प्रश्न हळूहळू येतील. आपणही प्रश्न विचारा. आभारी आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो शिकाऊ. तुम्ही जर पुण्यात
अहो शिकाऊ. तुम्ही जर पुण्यात रहात असाल तर बुधवार पेठेत अनमोल प्रकाशन च्या बाजुची जी गल्ली आहे ना, जिथे हिंदुस्तान की भारत अशा नावाची कुठलीशी बेकरी आहे. तर, तिच्या समोरच ग्रहांकीतचे चंद्रकांत शेवाळे यांचे ऑफिस आहे, तिथे तुम्हाला ज्योतिष्य, भविष्य, गुढ्कथा अशा सदरावर खूप पुस्तके मिळतील. त्यांचे ऑफिसचे नाव आहे रोहिनी प्रकाशन.
मी काही महिन्यांपुर्वी तिथे गेले होते, पण घरी तातडीचे काम निघाल्याचे कळल्याने परत आले. तेव्हा आता तुम्ही जाऊन बघा, तुमचे काम होईल.
आणी हो, आधी पंचांग नीट
आणी हो, आधी पंचांग नीट अभ्यासा म्हणजे सर्व सोपे होईल.
लिंबाजीराव, तुमच्यासाठी धागा
लिंबाजीराव,
तुमच्यासाठी धागा आला.
मला वाटते , हे प्रश्न फार
मला वाटते , हे प्रश्न फार उच्च लेव्हल चे आहेत. बेसिक पासून सुरुवात करा.
उपाध्य काकांचे राशीचक्र वाचा न.. !
मी त्यांची Distant - स्तुदेंत आहे. आता प्र्यापैकी पत्रिका कळते मला.
हणम-लग्न कुंडली बर का..
* जन्म - लग्न कुंडली
*
जन्म - लग्न कुंडली
बुधाच्या महादशेतील फले काय
बुधाच्या महादशेतील फले काय असतात ? ते कृपया कोणी सांगेल का ?
काही प्रश्न राहू केतु नावाचे
काही प्रश्न
राहू केतु नावाचे कोणतेच ग्रह अस्तित्वात नसताना पत्रिकेत हे आले कोठून?
पत्रिकेत नवग्रह असतात परंतु ज्या ग्रहावर आयुष्य जाते तो पृथ्वी हा ग्रह का नसतो ?
जर भविष्यात एखादे मुल चंद्रावर जन्मल्यास त्याची रास कोणती ?आणि त्याच्या पत्रिकेत चंद्राचे स्थान कुठे लिहणार?
>>>> लिंबाजीराव, >>>>
>>>> लिंबाजीराव,
>>>> तुमच्यासाठी धागा आला. <<<<<
नाही, हा धागा अन्निसवाल्यान्कर्ताच बहुधा आहे. अन्निसवाले/बुप्रावादी वगैरे लोक हा धागा त्यान्चे आचरट अपप्रचारात्मक अडाणी प्रश्न विचारण्यास "हायज्याक" करतील असे (भविष्य वगैरे न बघताच) कळते आहे.
तरीही, मूळ धागाकर्ता खरोखरच ज्योतिष शिकणे या प्रामाणीक उद्देशाने प्रश्न विचारित असेल असे थोडावेळ गृहित धरुन उत्तरे देऊ पहातो:
>>>> १. सत्वगुणाच्या राशी, रजोगुणाच्या राशी आणि तमोगुणाच्या राशी म्हणजे काय?
ह्या गट पाडण्यामुळे काय फरक पडतो? <<<<
तुमच्या आजुबाजुस तुमच्या संपर्कात येणार्या प्रत्येक माणसाचे मूल्यमापन तुमच्या मनाचे कोपर्यात होत असतेच, ते होताना, वरील सत्व/रज/तम या गुणांवर आधारित असेच ते मूल्यमापन घडत असते, व घडताना, व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः कोणत्या गुणाच्या प्रभावाखाली आहात त्याचाही परिणाम मूल्यमापनावर होत असतो. बहुधा तिन्ही गुण माणसात असतातच. मात्र कोणत्या गुणाचा प्रभाव जास्त आहे हे व्यक्तिच्या रोजच्या वागण्याबोलण्यातुनही प्रतित होत असतेच, व हेच गुण राशींना दिले जाऊन त्या त्या राशी अंतर्गत येणार्या व्यक्तिंमधे ते ते गुण जास्त प्रभावी असू शकतात हे कळते.
>>>>> २. मूल त्रिकोण रास म्हणजे काय? ग्रह मूल त्रिकोण राशीत येतो म्हणजे नक्की काय होतं? <<<<<
याबद्दल श्री भट यांचे पुस्तकातून तसेच अन्य पुस्तकातुनही सखोल विश्लेषण केले आहे. नेटमाध्यमात इथे प्रश्नोत्तराद्वारे त्याचे स्पष्टीकरण अशक्य नसले तरी अवघड नक्कीच आहे. याबद्दल सल्ला असा राहील की मूळ अभ्यासक्रमातील पुस्तके वाचावयास घ्या, त्यात या सर्व प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे उपलब्ध आहेत.
>>>>> राहू केतु नावाचे कोणतेच ग्रह अस्तित्वात नसताना पत्रिकेत हे आले कोठून? <<<<<
याबद्दल शेकडोवेळा सांगुन झालेले आहे. मी पुन्हा पुन्हा सान्गु इच्छित नाही. राहूकेतू हे मानलेले ग्रह आहेत, व त्या छेदन बिंदूचा बाकी ग्रहांचे साथीने मानवी जीवनावरील सूक्ष्म परिणाम कळून येतो.
>>>>> पत्रिकेत नवग्रह असतात परंतु ज्या ग्रहावर आयुष्य जाते तो पृथ्वी हा ग्रह का नसतो ? जर भविष्यात एखादे मुल चंद्रावर जन्मल्यास त्याची रास कोणती ?आणि त्याच्या पत्रिकेत चंद्राचे स्थान कुठे लिहणार? <<<<<
वरील दोन्ही प्रश्न ज्योतिषविषयक गैरसमज पसरविण्याचे परिणामस्वरुप निर्मित /प्रसारित आहेत व इथे तुमचेकडुन जाणते/अजाणतेपणे पुनरुद्ध्रुत केले गेले आहेत.
मेदिनीय हा शब्द ऐकुन असाल, तर समजुन घ्या की जे ज्योतिष इथे चर्चिले/अभ्यासले/वापरले जाते ते मेदिनीय ज्योतिष अर्थात पृथ्वीस केंद्रस्थानी/मुख्य मानून रचलेले आहे.
उद्या जर एखादे मुल चंद्र वा अन्य कोणत्या ग्रहावर जन्मल्यास, त्या त्या ग्रहास केंद्रस्थानी गृहित धरुन ज्योतिष नव्याने रचावे लागेल व चंद्रावर जन्म झाल्यास चंद्रा ऐवजी तिथे पृथ्वी हा ग्रह मांडावा लागेल. चंद्रराशी ऐवजी, पृथ्वीरास मानुन तसेच लग्नरास महत्वाची मानुन भविष्य वर्तवावे लागेल. बाकी ग्रहांचे परिणाम समानच असतील, गृहित धरतोय की तुम्ही याच सौरमालेतील याच पृथ्वीच्या चंद्राबद्दल बोलताय, असे नाही की तुम्हास कोणत्या दुसर्याच सौरमालेचा शोध लागलेला आहे व त्या दुसर्या सौरमालेतील भलत्याच ग्रहाच्या भलत्याच चंद्रावर जन्म घालणे तुम्ही योजलेले नाहीये.
फर्दर, होप सो , की सध्या तुम्ही वा तुमचे नात्यागोत्यातील कोणी चंद्र वा मंगळावर लग्न/हनिमून/बाळंतपणासाठी जायचे नजिकच्या काळाकरता योजलेले नाहीये. जर योजले असल्यास, त्याचे पुरावे दाखवा, निश्चित केलेला ग्रह सान्गा, तुम्हाला मेदिनीय ऐवजी त्या त्या ग्रहाधारीत जसे की चान्द्रीय वा भौमिक भविष्य नक्किच रचून देऊ.
धिरज, ज्योतिषाकडे
धिरज, ज्योतिषाकडे मार्गदर्शनासाठी जो जातो त्याला हे प्रश्न पडत नाहीत. तो अडचणींनी त्रासलेला असतो. त्याला आधार हवा असतो.
धिरज, ज्योतिषावर टीका
धिरज, ज्योतिषावर टीका करण्यासाठीच म्हणून जो जातो त्यालाही खरे तर हे प्रश्न पडत नाहीत, शिकवले जातात. तो बुद्धिभेदाने ग्रासलेला असतो त्यामुळे अभ्यास करण्याची इच्छा नसते. अभ्यास न करताच त्याला त्याचे मताचे टेकूसाठी जनसामान्यांचा आधार हवा असतो. म्हणून मग तो जिथे तिथे आपल्या अर्धवट प्रश्नाच्या फैरी झाडून आपल्याप्रमाणेच अन्यजनांचाही बुद्धिभेद करण्यास प्रवृत्त होतो. असो.
शरद उपाध्ये यांच्या राशीचक्र
शरद उपाध्ये यांच्या राशीचक्र पुस्तकात प्रत्येक राशी आणि ग्रहाविषयी छान माहिती दिली आहे. हे पुस्तक एकदा वाचून बघा, जेणेकरुन बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील.
कोणास ज्योतिषशास्त्रावरील चांगल्या, अभ्यासकांसाठी उपयुक्त पुस्तकांची नावे माहिती असतील तर कृपया इथे लिहा.
या धाग्याचे भविष्य बघितले का?
या धाग्याचे भविष्य बघितले का?
एकदा महात्मा फुलेंकडे एक
एकदा महात्मा फुलेंकडे एक ज्योतिषी आला, भविष्य सांगतो म्हणाला, फुल्यांनी त्याला चाबकाने फोडून काढला. ज्योतिषी म्हणाला, का मारत आहात ?तर फुले म्हणाले तुला चाबकाचे फटके बसणार आहेत हे तुझेच भविष्य तुला माहीत नाही आणि चाललाय जगाचा कालनिर्णय करायला.
धिरज कांबळे, अशा कथा
धिरज कांबळे, अशा कथा कर्णोपकर्णी फैलावत असतात. इथे महात्मा फुल्यांच्या जागी कधी एखादा राजा येतो तर कधी अन्य महात्मा येतो. असो महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार इथे वाचायला मिळतील. http://faljyotishachikitsa.blogspot.com/2009/02/blog-post.html
>>>>> तर फुले म्हणाले तुला
>>>>> तर फुले म्हणाले तुला चाबकाचे फटके बसणार आहेत हे तुझेच भविष्य तुला माहीत नाही आणि चाललाय जगाचा कालनिर्णय करायला <<<<<
फुलेंनी खरोखर चाबकाचे फटके मारले की नाही, वा खरोखरच असा कोणी ज्योतिषी त्यांचेकडे गेला होता वा नाही, हे ठाऊक नाही, मात्र हल्ली गेली काही वर्षे वरील कथेत अप्रत्यक्षरित्या सुचविल्याप्रमाणे ज्योतिषी/हिंदुत्ववादी/ब्राह्मण वगैरे कोणी आले/भेटले तर त्यांना चाबकाचे फटके मारून फोडून काढायची सूप्त मनिषा असंख्य बुप्रा/ब्रिगेडी/नक्षल्यांच्यात बळावते आहे हे समजण्यास वेगळे ज्योतिष बघायची गरज नाही आहे.
वर दिलेली ब्लॉगची लिन्क
वर दिलेली ब्लॉगची लिन्क आमच्यात उघडत नाही! ब्यान आहे.
(अरेच्च्या, हल्ली कॉम्प्युटर सिस्टिमलाही समजु लागलय की काय की टाकाऊ/अनुल्लेखात्मक काय आहे ते? )
एखादा पाहुणा धूमकेतू आपल्या
एखादा पाहुणा धूमकेतू आपल्या सौरमालेत येतो तेव्हा त्याला तेवढ्यापुरते पत्रिकेत स्थान का देत नाहीत?
मंगळ प्रभावी ,गुरु प्रभावी पण यांच्यामध्ये लघुग्रहांचा एक पट्टा आहे त्या बिचार्यांना का वंचित ठेवत आहात? कि त्यांचे पुर्वसूकृत संचित प्रारब्ध यामुळे ते याजन्मी वंचित.. कि तुमच्या नावाप्रमाणेच तुमी त्यांनि लिंबुटिंबु समजता काय..
पंचांगाप्रमाणे व्यवहार करणारी पेशवाई पंचांग माहित नसलेल्या ब्रिटीशांनी कशी बुडवली हो?
छेदन बिंदू
छेदन बिंदू
पंचांगाप्रमाणे व्यवहार करणारी
पंचांगाप्रमाणे व्यवहार करणारी पेशवाई पंचांग माहित नसलेल्या ब्रिटीशांनी कशी बुडवली हो?
वर दिलेली ब्लॉगची लिन्क
वर दिलेली ब्लॉगची लिन्क आमच्यात उघडत नाही! ब्यान आहे.
(अरेच्च्या, हल्ली कॉम्प्युटर सिस्टिमलाही समजु लागलय की काय की टाकाऊ/अनुल्लेखात्मक काय आहे ते?)>>>>> तसे नसेल हो लिंबुभाऊ..
फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भुक्कड गोष्टी आणि चारपाच रुपयाची थोतांड ज्योतिषी पुस्तके काखोटीला मारुन धंदा करणारी, पिढ्यानपिढ्या समाजाला प्रयत्नवाद आणि वास्तववादापासून लांब ठेवणारी बांडगुळे आजही अस्तित्वात आहेत याची माहीती त्या काँम्पमध्ये फिड केली असावी.बादवे कोणत्या कंपनीचा संगणक आहे हो ?....कंपनीला धन्यवाद
>>>> एखादा पाहुणा धूमकेतू
>>>> एखादा पाहुणा धूमकेतू आपल्या सौरमालेत येतो तेव्हा त्याला तेवढ्यापुरते पत्रिकेत स्थान का देत नाहीत? <<<<<<
धूमकेतूचे आगमन अशूभ संकेताचे मानले जातेच.
पण म्हणून त्यास पत्रिकेत मांडून दाखविण्याइतके त्याचे मोठपणही नसल्याने कोणताही धूमकेतू पत्रिकेत दाखविला जात नाही.
>>>>> मंगळ प्रभावी ,गुरु प्रभावी पण यांच्यामध्ये लघुग्रहांचा एक पट्टा आहे त्या बिचार्यांना का वंचित ठेवत आहात? <<<<<<
त्यांचा शुभाशुभ परिणाम पूर्वजांना न दिसल्यामुळे/न जाणवल्यामुळे नवग्रहाव्यतिरिक्त बाकी कशास गृहितात धरले नाही. असे असले तरी नक्षत्र व त्याचे चरण विचारात घेता, जन्मकालिन त्या त्या नक्षत्रचरणाच्या पृथ्विसापेक्ष दिशेचे सर्वच "मटेरिअल" आपोआपच विचारात घेतले जातेच.
>>>> कि त्यांचे पुर्वसूकृत संचित प्रारब्ध यामुळे ते याजन्मी वंचित.. <<<<< वंचित वगैरे भाषा अन शब्द आम्हाला कळत नाहीत.
>>>>> कि तुमच्या नावाप्रमाणेच तुमी त्यांनि लिंबुटिंबु समजता काय.. <<<<< इश्वरापुढे बाकी सारी केवळ लेकरेच नव्हेत तर "लिम्बुटिम्बुच", तेव्हा उगा एखाद्याने अहंकारी मोठेपणा स्विकारू नये असे आमचे मत.
>>>>> पंचांगाप्रमाणे व्यवहार करणारी पेशवाई पंचांग माहित नसलेल्या ब्रिटीशांनी कशी बुडवली हो? <<<<< माफ करा पण पंचांगामधे "फितुरांची" नावपत्ते सान्गितले जात नाहीत. पाचपन्नासवर्षे आधीपासूनच इंग्रजान्ची तैनाती फौजेची मांडिलकी स्विकारणार्यात "पेशवाई" व्यतिरिक्त बाकीचे कोण कोण होते ते जरा इतिहासात नीटपणे डोकावुन बघा, असल्या लोकांची माहिती देखिल पंचांगात येत नसते!
इतिहासात हेच नमुद आहे की हिंदुस्थानात इंग्रजांशी शेवटपर्यंत लढणारी (भले ती हरली तरी) एकमेव राजवट म्हणजे "पेशवाई" होती. इतकेच नव्हे तर पुढे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात देखिल याच पेशवाईचे वंशज प्रामुख्याने पुढाकार घेऊन होते जेव्हा इतर सर्व संस्थानिक मांडलिक राजे बनुन चैनित जगत होते, ते कोण होते त्याचा जरा शोध घ्या!
याव्यतिरिक्त १८५७ नंतर इंग्रजांचे विरोधात सशस्त्र क्रान्ती करणार्यात बहुसन्ख्येने याच पुण्यनगरीतील पेशवाईचे पाईक व वंशज होतेच शिवाय इंग्रजांचे पोटात शिरुन कचाप्रमाणे त्यांची विद्या ग्रहण करुन ती एतद्देशीयांमधे सुयोग्यरित्या प्रसारित करण्यातही हेच "पेशवाईचे" वंशज पुढे होते, जेव्हा की इतर तत्कालिन बुप्राजन इंग्रजी विद्येचे अर्धवटरित्या आत्मसात हळकुन्ड "हिंदू धर्मशास्त्र हे थोतांड कसे व निरुपयोगी कसे" अशाप्रकारे उगाळून पिवळे होण्यात अन निरर्गल टीकाखोरीत मश्गुल होते.
बाकी ज्योतिषाचे धाग्यावर "पेशवाईवर" घसरण्याचे तुमचे कौशल्यही वाखाणण्यासारखेच आहे.
गमभन, कुंडली तंत्र आणी मंत्र
गमभन, कुंडली तंत्र आणी मंत्र हे व.दा.भट यांचे पुस्तक फलज्योतिषाच्या प्राथमिक अभ्यासासाठी उपयुक्त आहे.पुण्यात अप्पा बळवंत चौकात कुठेही मिळेल.
सपष्टपणे बोलायचे झाले तर ज्या
सपष्टपणे बोलायचे झाले तर ज्या विषयाशी आपला संबंध नाही, ज्यात अज्जीबात रस नाही, जो अती नावडता आहे, ज्यापासुन आपणास काहीच फायदा होणार नाही असे वाटते आहे, त्याकडे वळुच नये.:फिदी: मग ते राहु केतु, धुमकेतु या विषयी माहिती मिळवुन काय फायदा? जर त्यावाचुन आपले काहीच अडत नाही तर इतरांना ते का आणी कशाला आवडते याचा राग का? आणी उगाच मग आपला अमुल्य वेळ का दवडावा म्हंते मी.:फिदी:
आणी राहता राहीले इंग्रज. तर त्यांची आत्ता नितांत गरज आहे असे नाही वाटत का तुम्हाला? येऊ द्या की त्यांना परत इथे. आता कुठे पेशवाई उरलीय आणी साडेतीन टक्क्यांचे राज्य आहे की ज्यामुळे तुम्हाला ज्योतिष्य शास्त्राची पण भिती वाटायला लागली?:फिदी: आता कुणाचे राज्य आहे वळखा तुम्हीच.
वर्गात गणिताचा तास चालू
वर्गात गणिताचा तास चालू असतो.. शिक्षक प्रश्न विचारतात.. शिक्षक- बंड्या काल मी तुला शंभर रुपये दिले..
बंड्या -सर काय खोटे बोलताय, कधी दिलेत पैसे
शिक्षक- अरे समजायला काय हरकत आहे!
शिक्षक- आज मी तुला आणखि शंभर रुपये दिले
बंड्या -अहो गुरुजी कालच्या शंभरचा हिशोब लागला नाही तर हे अजून शंभर कशाला ?
शिक्षक- अरे गधड्या समजायला काय हरकत आहे!... तर कालचे शंभर रुपये आणि आजचे शंभर रुपये एकूण किती झाले?
बंड्या -तीनशे रुपये झाले
शिक्षक- कसे काय रे?
बंड्या -अहो गुर्जी समजायला काय हरकत आहे...
.
.
इथल्या ज्योतिषादी थोतांडवाद्यांना कोणताही प्रश्न विचारल्यास 'समजायला काय हरकत आहे 'असेच ते म्हणत आले आहेत. त्यामुळे रॅशनल चर्चेत हे 'रणछोडदास' टिकत नाहीत ...
लिंबूटिंबू, जन्मतारीख, वेळ
लिंबूटिंबू, जन्मतारीख, वेळ नक्की माहित नसेल पण समजा १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट च्या दरम्यान, अमुक साली, अमुक ठिकाणी केंव्हातरी आहे, असे म्हंटले तर पत्रिकेत काही फरक पडेल का?
आणि अश्या कुठल्या गोष्टी खात्री पूर्वक सांगता येतात? लग्न होणे, न होणे, शिक्षण कमी की उच्च, पैसे बक्कळ का गरजेपुरते, प्रकृति साधारण बरी की सतत रोगांनी ग्रासलेली, आयुष्य कमी की जास्त, या गोष्टी सांगता येतात का?
जर माझी पत्रिका पाहून तुम्ही माझ्या आयुष्याबद्दल काही कयास बांधलेत ते मी मा़झ्या आयुष्यात प्रत्यक्ष जे घडले त्याच्याशी ताळा मांडून पत्रिका, भविष्य यांचा खरेपणा पडताळून पाहू शकतो का? कदाचित माझ्या बाबतीत खरे पण इतर कुणाच्या बाबतीत खोटे असे असू शकते का?
बाकी माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचे तर मला काहीहि जाणून घ्यायचे नाहीये, एकच गोष्ट उरली, मृत्यू. तो यायचा तेंव्हा येईलच. कशाला उगाच उठाठेवी? तोपर्यंत नेहेमी आनंदी रहाण्याचा प्रयत्न करावा.
अहो झक्की असं काय लिहिताय
अहो झक्की असं काय लिहिताय निरवानिरवीचं ? तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य लाभो आणी शंभर वर्शाचा काउंटडाऊन आज सुरु होवो.
सपष्टपणे बोलायचे झाले तर ज्या
सपष्टपणे बोलायचे झाले तर ज्या विषयाशी आपला संबंध नाही, ज्यात अज्जीबात रस नाही, जो अती नावडता आहे, ज्यापासुन आपणास काहीच फायदा होणार नाही असे वाटते आहे, त्याकडे वळुच नये.
जर त्यावाचुन आपले काहीच अडत नाही तर इतरांना ते का आणी कशाला आवडते याचा राग का?
आणी उगाच मग आपला अमुल्य वेळ का दवडावा म्हंते मी. + १
ज्योतिष विरोधक ज्योतिष्याला फार वेळ देतात असे माझे निरिक्षण आहे. कदाचित खुद्द ज्योतिषांपेक्षाही जास्त त्याऐवजी अनेक प्रकारचे आपल्या आवडत्या विषयात लेखन वाचनाचा पर्याय असू शकतो.
निनाद.. समाजाला अंधश्रद्धा
निनाद..
समाजाला अंधश्रद्धा आणि धर्मांधता जातियता यांच्या गर्तेत धडकणार्यांना विरोध करण्यासाठी फुले आंबेडकरांनी आयुष्य वेचले आहे, असल्या प्रचारकी धग्याला आपण जर प्रखर विरोध केला तर बिघडले कुठे?
>>>>> लिंबूटिंबू, जन्मतारीख,
>>>>> लिंबूटिंबू, जन्मतारीख, वेळ नक्की माहित नसेल पण समजा १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट च्या दरम्यान, अमुक साली, अमुक ठिकाणी केंव्हातरी आहे, असे म्हंटले तर पत्रिकेत काही फरक पडेल का? <<<<<
जवळपास दर दोन तासांनी सूर्याचे राशीभ्रमणानुसार लग्नराशीमधे फरक पडतो, तसेच साधारणतः दोन ते अडीच दिवसांचे कालावधीत चंद्रराशीत फरक पडतो. मात्र जन्मदिवशी, सकाळ दुपार संध्याकाळ वगैरे काळ माहित असेल, तर दर बदलत्या लग्नराशीच्या तितक्या कुंडल्या मांडून, त्यावरुन जातकाचे आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या घटनांशी ताळा करुन त्यातिल जुळणार्या कुंडलीस ग्राह्य धरता येते. अर्थातच अचूक वेळ नसल्याने सूक्ष्मातिसूक्ष्म कालघटनेबाबतची भविष्ये वर्तविणे अशा कुंडलीवरुन अवघड होते खास करुन विशोत्तरी दशा तसेच अन्य षोडषवर्गीय कुंडल्याबाबत. मात्र आत्यंतिक महत्वाचे मोजक्या घटनांबाबत सांगता येऊ शकते, तसेच ताळा घालुन बघायला हस्तसामुद्रिकाचा आधारही घेता येऊ शकतो.
मला वाटते की २००५ साली आपण भेटलो होतो तेव्हा या विषयावर चर्चा होऊन, तुमची जन्मवेळ/दिनांक इत्यादी निश्चित केले होते, घरच्या कॉम्प्युटरवर ती कुम्डली असू शकेल.
>>>> आणि अश्या कुठल्या गोष्टी खात्री पूर्वक सांगता येतात?
>>>> लग्न होणे, न होणे, <<<<< होय, सांगता येते, एक होणार वा अनेक, विबासं इत्यादिही सांगता येऊ शकते
>>>>>> शिक्षण कमी की उच्च, <<<<< होय, मात्र शिक्षणाबाबत फार जपुन सांगावे लागते, कारण उच्च शिक्षणाची व्याख्या देशकालवर्तमानपरिस्थितीप्रमाणे बदलती असते. तसेच, शिक्षण मिळाले, पण सर्टिफिकीट नसेल, तर शिक्षणाचा उपजिविकेसाठी काय उपयोग? अन असा संबंध लावावाच काय? इत्यादी अनेक बाबी आहेत. मात्र व्यक्ति बहुश्रुत/शिकलेली वा ज्ञानी/प्रकांडपंडीत असेल वा नाही हे नक्की सांगता येते, शिक्षणामुळे प्रतिष्ठा व पैका मिळेल की नाही हे देखिल सांगता येते. जर चूक झालीच तर ती ज्योतिशी व्यक्तीची असते, शास्त्राची नव्हे.
>>>> पैसे बक्कळ का गरजेपुरते, <<<<<< होय, पण बक्कळ वा गरजेपुरते म्हणजे किती हे समजण्यातही व्यक्तिव्यक्तिनुसार संख्यात्मक फरक असतो. पण व्यक्ती सांपत्तिक द्रुष्ट्या कशी ओळखली जाईल, मिळालेला पैका कसा गमावेल्/साठवेल्/कुजवेल हे नक्कीच सांगता येते.
>>>>>प्रकृति साधारण बरी की सतत रोगांनी ग्रासलेली, <<<<< हे तर बहुतेक ज्योतिषी कुंडलीचे प्रथमदर्शनातच सांगु शकतात. अधिक तपशीलात जाण्यासाठी अंशात्मक कुंडली व विशोत्तरी दशांचा विचार करावा लागतो.
>>>> आयुष्य कमी की जास्त, <<<<<< होय, मात्र दीर्घायुष्याशिवाय अन्य ते उच्चारूही नये असे संकेत आहेत. केवळ "काळजी घ्या, सांभाळा, पाण्यापासून्/आगीपासून वगैरे जपा" इत्यादी मोघमच उच्चारले जाते.
>>>>>> जर माझी पत्रिका पाहून तुम्ही माझ्या आयुष्याबद्दल काही कयास बांधलेत ते मी मा़झ्या आयुष्यात प्रत्यक्ष जे घडले त्याच्याशी ताळा मांडून पत्रिका, भविष्य यांचा खरेपणा पडताळून पाहू शकतो का? <<<<<<<< होय.
२००५ मध्ये, तुमचे कन्येचे विवाह संभाव्यतते विषयी चर्चा झाली होती, व मी निश्चित पणे पुढील कोणत्या वर्षात लग्न ठरेल्/होईल हे सांगितले होते, ते वर्ष काय तो तपशील मी विसरलो (अन मला विसरणे भागच असते), पण नंतर लग्न झाल्यावर, मी जे वर्ष-(महिना) सांगितले होते त्याच प्रमाणे झाले का याचा फिडब्याक मला तेव्हा मिळू शकला नाही. आता इतके जुने आठवत बसणे मला अन तुम्हालाही शक्य होणार नाही पण ताळ मांडण्याकरता आधीचे असलेलेच उदाहरण म्हणून सांगितले इतकेच.
>>>>> कदाचित माझ्या बाबतीत खरे पण इतर कुणाच्या बाबतीत खोटे असे असू शकते का? <<<<< नाही. चूक झालीच तर ती ज्योतिषी व्यक्तिची असू शकते, वा वेळ्/दिनांक खोटा दिलेला असू शकतो, शास्त्र खोटे/चूक असत नाही.
>>>>> बाकी माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचे तर मला काहीहि जाणून घ्यायचे नाहीये, <<<<<
ते जौद्याहो, पुण्यात परत केव्हा येताय? आपल्याला बर्याच गोष्टी एकत्रितपणे करता येण्यासारख्या आहेत. तुम्हाला घेऊन लिम्बीच्या शेतावर जायचे आहे, गप्पागोष्टी करायच्या आहेत. तुमचे पूर्वीचे अनुभव ऐकायचे आहेत.
>>>> एकच गोष्ट उरली, मृत्यू. तो यायचा तेंव्हा येईलच. <<<<< का? अजुनही मनात शंकाबिम्का आहे की काय?
नाही, म्हणजे तारुण्यात मस्तीच्या कैफात मृत्यु वगैरेची फिकीर कुणालाच नस्ते, मी देखिल अपवाद नाही, पण विशिष्ट वयानंतर त्याची अपरिहार्यता समजुन येते, व त्यास "दूर ठेवण्यासाठी" वा मृत्युची घटना लांबविण्यासाठीच मनुष्य बहुतेक वैचारिक/शारिरिक ताकद पणाला लावत रहातो, अन त्याचवेळेस, चराचर सृष्टोबरोबरच, स्वदेहांतर्गत वास करुन असलेल्या इश्वरी शक्तिला ओळखण्यापासूनही लांबच रहातो. तेव्हा उपलब्ध वेळ गतआयुष्याच्या नफातोट्याचा /काय कमावले-गमावले याचा विचार करण्यापेक्षा, हातात आहे तो वेळ इशचिंतनात व्यतित केला, इश्वराचे अस्तित्व शोधण्यात, आजुबाजुलाच तर आहे, अन माझ्यातही आहे, त्यास अध्यात्माद्वारे समजुन ओळखुन घेण्यात व्यतित करावा हा निदान माझा तरी "प्लॅन" आहे.
>>> कशाला उगाच उठाठेवी? तोपर्यंत नेहेमी आनंदी रहाण्याचा प्रयत्न करावा. <<< अगदी खरे.
जीवेत शरदः शतम.
लिंबूदा, अंदाजे माहिती असलेली
लिंबूदा,
अंदाजे माहिती असलेली जन्मवेळ/तारीख कृष्ण्मूर्तीपद्धतीने देखील निश्चित करता येते ना?
Pages