पाणी - २ ते ३ कप
अगर अगर पावडर - २ / ३ टी स्पुन , एका कपाला एक टीस्पुन
फळे - आवडीची. डाळींब, अननस, केळं, सफरचंद
क्युब चीज - १ क्युब
रुहअफझा - १ टे स्पु.
साखर - चवीपुरती साधारण १ ते २ टी स्पुन.
मीठ - कणभर
- डाळींब सोडून फळे इतर अगदी बारीक स्लाईस करुन घ्या.
- चीज क्युब चे बारीक स्लाईस करुन घ्या.
- एका सपाट भांड्यात तळाशी फळे पसरवुन टाका. त्यावर चीज चे काप पसरवा.
- आता दुसर्या एका भांड्यात २ कप पाणी ( किंवा फळांच्या थराच्या वरपर्यंत येईल इतके) उकळत ठेवा. त्यात साखर , मिठ घाला.
- पाणी उकळले की एका कपाला एक टी स्पुन या प्रमाणात अगर अगर पावडर घालुन लग्गेच ढवळा.
-८ ते दहा मिनीटे मंद आचेवर हळु हळू ढवळत रहा.
- गॅस बंद करुन त्यात रुहअफझा टाका
- आता हे मिश्रण मांडलेल्या फळांवर ओता
- फ्रिजमधे ठेवुन एक तासात जेली सेट होते. ( अगर अगर असल्याने बाहेर ठेवुनही जेली सेट होते पण त्याला वेळ लागेल )
- थंडगार खायला घ्या. उन्हाळ्यात खायला मस्त पदार्थ आहे!
- फळात पपई, टरबुज वापरु नका जेली सेट होत नाही ( असे नेटवर वाचलेले आठवते )
- अगर अगर टाकल्यावर लगेचच ढवळा नाहीतर त्या गुठळ्या होतात .
- आधी नुसती फळे घालुन केले होते, स्पर्धेसाठी चीज घालुन करुन पाहिले. चीझ चेरी पायनॅपल स्टीक्स सारखी चव लागते.
वॉव! काय फोटो आलाय.
वॉव! काय फोटो आलाय.
छान प्रकार आहे. कच्चा अननस
छान प्रकार आहे.
कच्चा अननस आणि किवी यांनी जेली सेट होत नाही. बाकी बहुतेक फळे चालतात.
मुंबईत अगर अगर कुठेही नाही मिळाले तर क्रॉफर्ड मार्केटमधे नक्की मिळेल.
किवीचे माहित नाही पण कच्च्या
किवीचे माहित नाही पण कच्च्या अननसाने काही प्रॉब्लेम आला नाही. मी वरच्या जेलीमधे घातलाय अननस.
देखणी पाककृती सावली!
देखणी पाककृती सावली!
सावली,
सावली,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पुर्णब्रह्म' असं लिहा.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383
मस्तच लागेल हे. सावली,
मस्तच लागेल हे. सावली, कल्पना आणि फोटो दोन्ही आवडले
संयोजक, शब्दखुणांमध्ये 'पूर्णब्रह्म' असंच लिहायला हवं. शुद्धलेखन सांभाळले गेले नाही तर सगळ्या पाककृती एका टॅगखाली येणार नाहीत. अजूनही एका धाग्यात, कुठल्या ते आठवत नाही, 'पूर्णबम्ह' असे लिहिले गेल्याने ती टॅगखाली आलेली नाही. सध्या एकवीस प्रवेशिकांपैकी पूर्णब्रह्म टॅगखाली फक्त नऊ पाककृती दिसत आहेत.
मस्तच... घरी आहे अगरअगर नि
मस्तच...
घरी आहे अगरअगर नि फळं पण आहेत. पिल्लुला आवडेल.
रुहअफ्जा नसेल तर काय घालु शकतो??
अगरअगर क्रॉफर्ड मार्केट ला मिरचि गल्लीतल्या ड्रायफ्रुटच्या दुकानात मिळेल गं मंजु!!
कसली भारी
कसली भारी दिसतेय....................
करून बघितली. पोरगा खूश झाला.
करून बघितली. पोरगा खूश झाला.
मस्तच... punyat kuthe milel
मस्तच...
punyat kuthe milel agar agar
(sorry mala aaj Marathi lihitach yet nahi ,
kay karave
help)
agar agar nahi milale mhanun
agar agar nahi milale mhanun readymade jelly pkt chi fruits pieces ghalun jelly keli. sanu ekdam khush. mala mhanali savli mavshila thanks sang
मस्त दिसतोय फोटो... प्रकार पण
मस्त दिसतोय फोटो... प्रकार पण tempting दिसतोय!
मस्त ग , अगदी टेम्प्टिंग
मस्त ग , अगदी टेम्प्टिंग दिसतय
Pages