सानुचे प्रश्न

Submitted by कविन on 15 June, 2009 - 01:03

देवबाप्पाच घर कुठे असतं आई?
त्यालाही असतात का बाबा आणि आई?

त्यालाही असते का शाळेत जायची घाई?
होमवर्क नाही केला तर ओरडतात का बाई?

बाबा म्हणतो "फ़िशू" आपला बाप्पा कडे गेला
बाप्पा एकटा कंटाळतो म्हणुन खेळायला का गेला?

खेळुन त्यांच झाल की येईल का मग घरी?
वाट पहाते सांग त्याला त्याची सानु घरी

अभ्यास पण मी करुन टाकला एकदम झटपट
दुध पण मी पिऊन टाकल एकदम घटघट

सांग त्याला आता मी शहाणी सानु झालेय
लवकर ये बाप्पा कडुन मी खाऊ घेऊन आलेय

(ही देखील लेकीसाठी, तिच नाव असलेली कविता तिला हवी होती म्हणून केलेली, तिच्याच प्रश्नांमधुन सुचलेली)

गुलमोहर: 

सुंदर. खुष झाली असेल सानु Happy
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |

छान छान छान..
कविताची कविता किती छान...

०------------------------------------------०
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका!!!

कवे कित्ती गोड, सहज, सुंदर कविता, सानु खुष ना आता ?

Happy

आता एक कविता ची उत्तरे पण येउदे Happy

ही पण मश्त!

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

धन्यवाद मावशांनो आणि काकांनो, मामांनो Happy

मस्त गं.... Happy

***********************************
"ARISE ! AWAKE ! STOP NOT TILL THE GOAL IS REACHED !"
(Swamy Vivekanand)

Happy

~~~
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

मस्तच ! Happy
हि पण खुप छान !

मस्त (सुरेश वाडकर इष्टाइल Happy ) तुमच्या सानुसारखी. लेक खुष झाली असणार!
धनु.