Submitted by मंजूताई on 18 September, 2013 - 05:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मुख्य घटक - चीज/पनीर, फळे - १ वाटी पनीर, १ वाटी नारळाचा चव, २ चिकू
उपघटक - २ वाट्या साखर, ३ छोटे चॉकलेट, १ वाटी दूध, ३ चमचे मिल्क पावडर
क्रमवार पाककृती:
एका भांड्यात कुस्करलेलं पनीर, नारळाचा चव, दूध, साखर घालून गॅसवर शिजत ठेवावे. घट्ट ( हे मिश्रण परत शिजवायचे आहे) होत आले की गॅस बंद करावा. त्याचे तीन सारखे भाग करावे.http://farm6.staticflickr.com/5526/9797020766_a5e18f3854_z.jpg
एक भाग घेऊन त्यात मिल्क पावडर टाकून शिजवावे. घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत पसरवावे. दुसरा भाग घेऊन त्यात बारीक चिरलेले चिकू, चॉकलेट, मिल्क पावडर टाकून शिजवून त्याच थाळीवर ह्या मिश्रणाचा थर द्यावा.
पहिल्या थराप्रमाणेच तिसर्याची कृती करावी.
वड्या कापल्या की खाय्रला तयार.
वाढणी/प्रमाण:
आवडी प्रमाणे
अधिक टिपा:
ह्यात चिकू ऐवजी इतर फळे वापरता येतील. रंग गडद येण्यासाठी व चवीसाठी चॉकलेट वापरले आहे.
माहितीचा स्रोत:
स्वप्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोप्प आहे हे फोटो मला दिसत
सोप्प आहे हे
फोटो मला दिसत नाहीयेत
मी करुनच बघते आणि सांगते
नारळ आणि चोकोलेत एकत्र
नारळ आणि चोकोलेत एकत्र खाल्लाय पण नारळ आणि चिकू एकत्र म्हणजे तुम्ही आधी करा आणि मला खाऊ घाला
मंजू,
मंजू,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383
मस्त दिसत आहे...
मस्त दिसत आहे...
लाडूंची कृती दिसली नाही कोठे
लाडूंची कृती दिसली नाही कोठे ?
१ वाटी नारळाचा चव आहे त्याला १ वाटी नारळाचा घरी काढलेला चव असं करा
photo disat nahiyet
photo disat nahiyet