कदाचीत माझ्या कुंडलीत कष्टच लिहीलेले असतील म्हणून मला काही मार्केट मध्ये मक्याचे दाणे मिळाले नाहीत. मायबोली गणेशोत्सवाला आता शेवटचे २-३ दिवसच आहेत आणित त्यात भाग घ्यायचा म्हणून दाणे मिळेपर्यंत वाट न पाहता सरळ मक्याची कणसे घेउन आले. तुम्ही मात्र दाणे घ्या म्हणजे कष्ट कमी पडतील.
प्रथम मक्याची कणसे किसणीवर किसुन घ्या. जर मक्याचे दाणे असतील तर ते मिक्सरमधून वाटून घ्या.
आपल्याला सार करायचा आहे म्हणून किसलेल्या/वाटलेल्या कणसांत थोडे पाणी घाला.
जर सार स्मुथ हवे असेल मक्याच्या सालांचा चरचरीत पणा नको असेल तर हे मिश्रण पिठ चाळायच्या चाळणीत किंवा गाळणीत गाळून घ्या. पण जर वेळ कमी असेल/ कंटाळा आला असेल तर साले पौष्टीक असतात, फायबर वगैरे मिळेल असे मनातल्या मनात स्वतःशी वदवून तसेच राहूद्या. मलाही वेळ नव्हता म्हणून मी तशीच ठेवली.
आता भांडे गॅसवर ठेऊन चांगले तापले की त्यात तेल तापवा आणि जिर, लसुण कढीपत्ता, मिरची ह्यांची फोडणी द्या. फोडणी करपऊ नका. पनिरचे तुकडे आधीच थोड्या तेलात तळून ठेवा. आमच्या कामवालीने मायबोली आय डी मामीच्या कामवालीचे पत्र वाचून बहुतेक मलाही तसाच दगा दिलाय आणि ती गेले १० दिवस आजारपणाचे कारण सांगून येत नाही. आता ती घरातील १० दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करूनच येणार हे अनुभवाने माहीत असल्याने जास्त भांडी घासायला नको, ऑफीस गाठायला पाहीजे ह्या विचाराने मी पनिर डायरेक्ट फोडणीतच परतवले.
नंतर त्यात मक्याचे मिश्रण ओतले. मिठ व थोडी साखर घालून मिश्रण मध्यम आचेवर ५ मिनीटे उकळू दिले.
अशा प्रकारे झाला मका पनीर सार तय्यार. ( फोटोही शॅडोचा विचार न करता घाई-घाईत काढले आहेत)
लहान मुलांना मक्याचे दाणे आवडतात म्हणून तुम्ही तेही सोबत टाकू शकता.
दाटपणा हवा असेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा बेसनचे थोडे पिठ पाण्यात मिसळून ते ह्यात उकळवू शकता.
है य्या! आली जागू! छान दिसतंय
है य्या! आली जागू! छान दिसतंय सार! नक्की पाहीन करून...
रच्याकने, ते पनीर डायरेक्ट फोडणीत परतले त्याकरता किती ती प्रस्तावना! मस्त लिहिलंय पण!! आवडलं
छान दिसतयं सार आणि सजावटही
छान दिसतयं सार आणि सजावटही मस्त आहे.
रंगासेठ धन्यवाद. रच्याकने, ते
रंगासेठ धन्यवाद.
रच्याकने, ते पनीर डायरेक्ट फोडणीत परतले त्याकरता किती ती प्रस्तावना! मस्त लिहिलंय पण!! आवडलं.
ते माझ्या मनीचे गुज (भडभडाट/दु:ख) मी इथे व्यक्त केले आहे
मस्त दिसतय! पौष्टिकही आहे
मस्त दिसतय!
पौष्टिकही आहे (ना?)
मी करेन हे
आली आली, जागूची रेसिपी आली.
आली आली, जागूची रेसिपी आली. मस्त दिसतंय ते सार. शेवटचा फोटो तर महान. प्लेट, कणिस, त्याची पानं, सार, कोवळं उन ... खूप सुरेख हिरव्या-पिवळ्या छटा आल्यात.
>>> फोडणी करपऊ नका. >> लै भारी
>>>> पण जर वेळ कमी असेल/ कंटाळा आला असेल तर साले पौष्टीक असतात, फायबर वगैरे मिळेल असे मनातल्या मनात स्वतःशी वदवून तसेच राहूद्या. मलाही वेळ नव्हता म्हणून मी तशीच ठेवली. >>
>>> आमच्या कामवालीने मायबोली आय डी मामीच्या कामवालीचे पत्र वाचून बहुतेक मलाही तसाच दगा दिलाय आणि ती गेले १० दिवस आजारपणाचे कारण सांगून येत नाही. आता ती घरातील १० दिवसांच्या बापांचे विसर्जन करूनच येणार हे अनुभवाने माहीत असल्याने जास्त भांडी घासायला नको, ऑफीस गाठायला पाहीजे ह्या विचाराने मी पनिर डायरेक्ट फोडणीतच परतवले. >>>
रिया धन्यवाद. मामे कोवळे उन
रिया धन्यवाद.
मामे कोवळे उन म्हणजे डी व्हिटामीन तेही उतरले की त्यात
मस्त रेसिपी जागु अगदि सोपी
मस्त रेसिपी जागु अगदि सोपी
जागु, पौष्टीक,चवदार सूप खूपच
जागु,
पौष्टीक,चवदार सूप खूपच छान आहे.लिहीण्याची शैली आवडली.
हा बे... ते विट्यामिन डी चं
हा बे... ते विट्यामिन डी चं लक्श्यात नाय आलेलं
सार आणि वर्णन दोन्ही आवडले!
सार आणि वर्णन दोन्ही आवडले!
मस्तच लिहिलयस पण भारी
मस्तच लिहिलयस पण भारी
मस्त. सोप्पी आहे रेसिपी. करुन
मस्त. सोप्पी आहे रेसिपी. करुन बघणार.
रच्याकने मक्याचे दाणे काढणे सोपे करण्यासाठी - मका उभा ( देठाचा भाग हातात) येईल असा पकडायचा. धारदार सुरी घेऊन उजव्या बाजुला साधारण दाण्याएवढी जागा ठेवुन उभा काप करायचा. त्या बाजुचे दाणे कापुन खाली येतील. मग तसाच मका थोडा थोडा फिरवत सर्व बाजुंनी कापायचा. मधला घट्ट भाग तेवढा राहातो. ही ( उभा) किंवा ही (आडवा) लिंक बघा
सुरी धारदार आणि सवयीची हवी.
मस्त!
मस्त!
मस्त रेसीपी जागू. करुन बघणार.
मस्त रेसीपी जागू. करुन बघणार.
वा! वा! छान. गरमा गरम प्यायला
वा! वा! छान. गरमा गरम प्यायला मज्जा येईल थंडीत.
मामे कोवळे उन म्हणजे डी
मामे कोवळे उन म्हणजे डी व्हिटामीन तेही उतरले की त्यात >>> शाब्बास!
मस्तच लागेल हे सार. स्वीट
मस्तच लागेल हे सार. स्वीट कॉर्नला ओगले आज्जी मधु मका म्हणत असत.
यम्म्मी तोंपासू
यम्म्मी
तोंपासू
वा!
वा!
सार आणि वर्णन दोन्ही आवडले!
सार आणि वर्णन दोन्ही आवडले!
वेगळाच आहे प्रकार. शेवटून
वेगळाच आहे प्रकार. शेवटून दुसरा फोटो बघून गरम गरम प्यावंसं वाटतंय.
मस्तच!
मस्तच!
मस्त रेसिपी आणि फोटो.
मस्त रेसिपी आणि फोटो.
मस्त रेसिपी! साले पौष्टीक
मस्त रेसिपी!
साले पौष्टीक असतात,>>>> मी पहिल्यांदा दचकलेच हे वाचून..
जागू प्रस्तावना आणि सार
जागू प्रस्तावना आणि सार दोन्ही छानच.
पाककृती आवडली.
पाककृती आवडली.
वा... छान. मनातल्या मनात
वा... छान. मनातल्या मनात प्यायले पण.
अरे वा मस्तच. चक्क मासे
अरे वा मस्तच. चक्क मासे नसलेली पाकृ.
जागूले खमंग ..........पदार्थ
जागूले
खमंग ..........पदार्थ आणि लिखाण दोन्ही!
पनीर वगळता उर्वरित सार मी पण
पनीर वगळता उर्वरित सार मी पण करते अनेकदा. आता पनीर घालून करून बघेन.
Pages