ग्रूप- पनीर + फळ
साहित्यः
१) पनीर २०० ग्रॅम
२) साखर- २ वाट्या (साधारण पाव किलो)
३) मैदा- २ टटीस्पून
४) सफरचंद- दोन
५) मिल्क पावडर- ५० ग्रॅम
६) खजूर, काजू, बदाम- सर्व मिळून एक वाटी
७) दूध- एक लिटर
८) केशर- १५-२० काड्या
रसगुल्ले:
१) पनीर किसून घेणे (मी विकतचे पनीर आणले आहे. मूळ बंगाली पद्धत अर्थातच दूधात लिंबू पिळून पनीर घरी करायची आहे)
२) किसलेले पनीर मोकळे करून घेणे आणि भरपूर मळून घेणे. मळताना त्यात दोन चमचे मैदा घालणे. सगळा मिळून एक मऊ गोळा करून घेणे. त्याचे छोटे छोटे रसगुल्ले करणे. रसगुल्ला अगदी छोटा असावा.
३) पाणी उकळायला ठेवणे. सहा वाट्या पाण्याला एक वाटी साखर घालणे. साखर विरघळवून घेणे. पाणी उकळले की त्यात रसगुल्ले घालून भांड्यावर झाकण ठेवणे. पाच-सात मिनिटानी झाकण काढून बघणे. रसगुल्ले आकाराने जवळपास दुप्पट झाले असतील आणि पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगत असतील.
सफरचंद रबडी:
१) खजूर, काजू, बदाम- भिजवून ठेवणे. पाव वाटी दुधात केशराच्या काड्या भिजत घालणे.
२) दोन सफरचंदांची सालं काढून त्याचा कीस करून घेणे. कीसात दोन चमचे साखर घालून कीस शिजवून घेणे.
३) दूध उकळायला ठेवणे. सतत ढवळत रहाणे. दूध निम्म्यापर्यंत आटले की त्यात साखर घालून परत उकळवणे.
४) थोड्या दुधात दूध पावडर एकत्र करून ते मिश्रण दुधात घालणे.
५) पाण्यात भिजवलेल्या खजूर, काजू आणि बदामाची पेस्ट करून घेऊन ती दुधात घालणे.
६) दूध पुरेसे आटले की गॅस बंद करणे आणि रबडी रूम टेम्परेचरला थंड होऊ देणे.
७) रबडी किंचीत गार झाली की किसून शिजवलेले सफरचंद त्यात एकत्र करून नीट एकजीव करणे.
८) रबडी जशी निवत जाईल, तशी घट्ट होत जाईल. रूम टेम्परेचरला आली, की फ्रीजमध्ये ठेवणे.
सर्व्ह करताना:
१) रसगुल्ल्यातील साखरेचा पाक/ पाणी चमच्याने दाबून काढून टाकणे. ते रसगुल्ले बाऊलमध्ये ठेवणे.
२) वरून गार सफरचंद रबडी घालणे.
कश्मिरी अंगूर आस्वाद घेण्यासाठी तयार आहेत.
वाह! गोड- पौर्णिमा >> अगदी
वाह!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गोड- पौर्णिमा >> अगदी अगदी
मी करुन बघेन हे
पण न फसण्याची शक्यता किती?
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त! रिया, करुन बघायचे
मस्त!
रिया, करुन बघायचे बिनधास्त.
सफरचंद रबडी- कॉमन सेन्स आणि
सफरचंद रबडी- कॉमन सेन्स आणि स्वयंपाकाच्या अनुभवातून >>> _/\_
अमेझिंग दिसतंय हे प्रकरण.
अमेझिंग दिसतंय हे प्रकरण. मस्तच, पौ.
गोड - पौर्णिमा ...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ए गोड पौर्णिमाला हसताय का?
ए गोड पौर्णिमाला हसताय का? संयोजकांनीच ती स्वतःचं वर्णन करवून घ्यायची सोय केलेली आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भारीच होते ही रबडी. अवश्य करून बघा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आणि वेळ आली की मत द्या म्हणजे झालं
गोड पौर्णिमा, गोड आहेत अंगूर
गोड पौर्णिमा,
गोड आहेत अंगूर .
धन्यवाद.
प्रचंड टेम्प्टिंग दिसतायत
प्रचंड टेम्प्टिंग दिसतायत कश्मिरी अंगूर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पनीरसकट सर्व साहित्य घरात उपलब्ध आहे. पण... भय इथले संपत नाही..!
पण... भय इथले संपत नाही..!
पण... भय इथले संपत नाही..! >>> आशूडी
सेम हिअर! गोड पदार्थांना हात घालताना तर नाहीच संपत माझं... ![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
ए गोड पौर्णिमाला हसताय का?>>>
ए गोड पौर्णिमाला हसताय का?>>> बघ की
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ए मस्त वाटतेय गं रबडी.
तोंपासु.
फोटो एकदम टेंपटींग आहे..
फोटो एकदम टेंपटींग आहे..
मस्त रेसिपी...फोटो अफाट सुंदर
मस्त रेसिपी...फोटो अफाट सुंदर आलाय..
स्लर्प! स्लर्प! येऊ का गं
स्लर्प! स्लर्प! येऊ का गं खायला? शिल्लक आहे का?
स्लर्प! स्लर्प! स्लर्प!
स्लर्प! स्लर्प! स्लर्प! स्लर्प! स्लर्प! स्लर्प!..... केवळ तोंपासू
छानच आहे.
छानच आहे.
मस्त दिसतायत कश्मिरी अंगूर!
मस्त दिसतायत कश्मिरी अंगूर!
मस्त .. तोंपासु आहेत अंगूर
मस्त .. तोंपासु आहेत अंगूर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोंपासु
तोंपासु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओ वॉव्,फारच सुरेख ,टेस्टी
ओ वॉव्,फारच सुरेख ,टेस्टी प्रकरण दिस्तंय..:)
आई गं..... कसले सही दिसताहेत
आई गं..... कसले सही दिसताहेत हे अंगुर .....जियो यार !!
मस्त दिसतेय रबडी !
मस्त दिसतेय रबडी !
वॉव! सही आहे
वॉव! सही आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त, मस्त. रबडी टेम्प्टिंग
मस्त, मस्त. रबडी टेम्प्टिंग आहेच पण रसगुल्लेही मस्त जमले आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घरी अंगूर करण्याचा कॉन्फिडन्स नाही वाटला तर फक्त रबडी करुन त्यात विकतचे अंगूर सोडून बघेन. रबडी मात्र नक्कीच करुन बघणार.
ह्या उपक्रमाअंतर्गत अजून
ह्या उपक्रमाअंतर्गत अजून आलेल्या पाकृ नेहेमीच्या गृपमधे दिसत नाहीत का?
गोड पौर्णिमा, भारी दिसताहेत
गोड पौर्णिमा, भारी दिसताहेत काश्मिरी अंगूर. तोंपासु!!
फोटो फार्फारच सुंदर आलेला आहे.
मस्त दिसत आहेत अंगूर आणि
मस्त दिसत आहेत अंगूर आणि रबडी. थोडी खतपट आहे खरी पण चव वर्थ इट असेल असं वाटतय. वेळ असेल भरपूर तेव्हा करून बघणार.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
सह्ही दिसत्येय अंगूर रबडी
सह्ही दिसत्येय अंगूर रबडी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान.आकर्षक दिसते आहे कश्मिरी
छान.आकर्षक दिसते आहे कश्मिरी अंगूर रबडी.
सारंच गोडंमिट्ट आहे.. आवडलंय
सारंच गोडंमिट्ट आहे..
आवडलंय ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages