मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ७ (सावली)

Submitted by संयोजक on 12 September, 2013 - 12:12

मायबोली आयडी - सावली
सावलीची बाहुली

ganpatiLetterpg1.jpgganpatiLetterpg2.jpg

मायबोलीवर गणपतीबाप्पाला पत्र लिहायचे आहे असे सांगितल्यावर थोडावेळ काय लिहू वगैरे विचार करून झाला. 'झाडे लावा टाईप काही लिहू नकोस हां, तुला काय हवं ते सांग किंवा माग' असे सांगुन मी किचनमध्ये गेले. थोड्यावेळाने लेकीने पूर्ण पत्र लिहीलेली आणि चित्र काढलेली वहीच हातात दिली!!! बहुधा मला हा मायना आधी सांगितला तर मी लिहू देणार नाही असा तिला संशय आला Wink

स्वप्नाली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणुल्या... Wink
अन पत्रही एवढे लाडात लिहिलेय की गणुल्याची बालमैत्रीणच त्याच्याशी बोलतेय..:)
पत्राबरोबर गणुल्याचे चित्रही भारी, आणि खाली मोदकांचा स्टॅम्प .. पत्त्याची गरज नाही आता, पत्र पोहोचलेच पाहिजे..

बाकी ते झाडे लावा टाईप नको सांगूनही तेच लिहिणे... पर्यावरणप्रेमी दिसतेय Happy

गणुल्या - हे फारच मस्तए ....

एवढ्या छोट्या वयात झाडांवर इतके प्रेम .... खूपच छान ....

गणुल्या !!!
बाप्पाची बालमैत्रीण जोरदार आहे अन तिच्या मागण्याही खासच आहेत.

गणुल्या! वाचून बाप्पालाही गुदगुल्या होतील. Happy
'कधीतरी नाही पण म्हणू शकतोस ना?' वा! केवढं मोठं स्वातंत्र्य दिलंस गणुल्याला! आवडेशच.

एकदम गप्पिष्ट गणुली दिसते आहे ही! गणुल्याला बोलायला काही शिल्लकच ठेवलेलं नाही. Lol
मस्त पत्र! चित्रही भारी. Happy

गणुल्याच्या गोडुल्या आणि समंजस बालमैत्रिणीला गोग्गोड पप्पी Happy
बाहुले, तुझं पत्रं जितकं गोड, तितकाच तुझा आवाजही गोड आहे गं.. मागे तुझ्या रेकॉर्डेड कथा ऐकल्या आहेत, इथेच- मायबोलीवर Happy

gaNulyachI goDulI maitrin tichya aai var geley agadI

faarach goad patra Happy

(majhya keyboard la madhech jhatka yeto mhanun he asa type kartey)

Pages