वड्यांसाठी:
१ कप डाळिचे पीठ
१ कप दही
२ कप पाणी
चवीनुसार मीठ
१/४ चमचा हळद
चिमुट्भर हिंग
१/४ चमचा किसलेलं आलं
फोडणीसाठी:
तेल
मोहरी
हिंग
कढीपत्ता
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
तीळ
सजावटीसाठी
बारीक चिरून कोथींबीर
ताज्या नारळाचा चव.
१. एका मायक्रोवेव्हमध्ये चालणार्या भांड्यात वड्यांसाठी लागणारं सामान एकत्र करणे
२. विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
३. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
४. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
५. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
६. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
७. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
८. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
आता हे मिश्रण अगदी गरम असतानाच तेल न लावलेल्या अल्युमिनम फॉईलवर कालथ्याने पट्पट पसरणे. अगदी पातळ लेअर करण महत्वाचं( मिश्रण फॉईलच्या एका बाजुला चमच्याने घालून कालथ्याने पटपट पातळ लेअर होईल असे ओढून पसरणे) हे खरं तर ट्रिकी आहे थोडं फार. मिश्रण गरमच असं पाहीजे नाहीतर पसरता येत नाही.
पातळ लेअरच्या सुरीने खूणा करून पट्या कापून घ्यायच्या.
पट्या गुंडाळून वड्या करायच्या.
सगळ्या वड्या गुंडाळून झाल्यावर त्यावर तेल गरम करून फोडणी करून पसरवायची.
वरून ताजी कोथींबीर आणि नारळाचा चव पसरायचा.
मिश्रण पटकन पसराव लागतं नाहीतर गोळा होऊ शकतो.
शिजवण्यासाठी बरोबर ४.५ मिनिटं पुरतात. ( अर्थात मायक्रोवेव्हच्या पॉवरवर अवलंबून आहे)
मिश्रण कालथ्याने एका डिरेक्शनमध्येच ओढायचं
जेवढा पातळ लेअर तेवढ्या वड्या नाजूक होतात.
अच्छा धन्यवाद येळेकर ...
अच्छा धन्यवाद येळेकर ... काही ठिकाणी कुकरमध्ये करतात अस पण सांगितल आहे म्हणुन विचारल...
आनंदघन_, मायबोलीवरच बिल्वाने
आनंदघन_, मायबोलीवरच बिल्वाने कुकरमधल्या सु.व.ची कृती दिलेली आहे.
http://www.maayboli.com/node/18691 इथे पहा.
आयला ! मी चुकून झट्पट
आयला !
मी चुकून झट्पट सुरळीच्या वड्या ऐवजी घाईघाईत - 'झुरळाच्या वड्या' - असे वाचले!
क्षमस्व!
आज केल्या होत्या. मस्त झाल्या
आज केल्या होत्या. मस्त झाल्या आणि अगदी झटपट.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उरलेला मठ्ठा गाळून घेतला आणि
उरलेला मठ्ठा गाळून घेतला आणि त्यात बेसन + मुगाचे पीठ घालून केल्यात.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![suva2_0.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u26225/suva2_0.jpg)
वेगळ्या अँगलने फोटो.
जरा पातळ चालल्या असत्या का
जरा पातळ चालल्या असत्या का लोला?
नको, काहीतरी गुंडाळलंय हे
नको,:फिदी: काहीतरी गुंडाळलंय हे दिसतच नाही मग.
अरे वा .. पिठात ब्राऊनिश कण
अरे वा ..
पिठात ब्राऊनिश कण दिसतात कसले तरी .. ह्यातही दालचिनी आहे का? की मठ्ठ्यातलं वाटलेलं जीरं वगैरे आहे?
पीठ आख्ख्या मुगाचं आहे, ते
पीठ आख्ख्या मुगाचं आहे, ते हिरवट आहे.
मी वरील दिलेल्या प्रमाण
मी वरील दिलेल्या प्रमाण घेवुनच वड्या करायला घेतल्या. मी संगळ्यांचेच तुकडे पडले. काय चुकले असेल?
मी वर दिलेल्या प्रमाणातच आणि
मी वर दिलेल्या प्रमाणातच आणि दिलेल्या वेळेनुसारच वड्या केल्या, पण सर्व वड्या तुटल्या. माझे काय चुकले असेल?
सुरळीच्या वड्याचे पीठ पसरताना
सुरळीच्या वड्याचे पीठ पसरताना डोश्याप्रमाणे पळीने मध्यावर घालून पेपर डोश्याप्रमाणे एका दिशेने गोल गोल पसरावे. हे सोपे पडते.
माझ्या मायक्रोवेव ला
माझ्या मायक्रोवेव ला सेटिङ्ग्स बदलाता येत नाही..सांगितला वेलाप्रमाणे पीठ खूप पातळ होत म्हणून मी आणखीन ३ मिनिट शिजवलं, मात्र पीठ पसरून अर्धा तास झाला तरी अजून ओलसरच आहे..माकाचू..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मला किती घटत हव ते जमल नाही बहुदा..
फ़ोइल वर लावलेला सगळ्या पट्टा तश्याच टाकून दिल्या...
बरीच वर्षं बुकमार्क करून
बरीच वर्षं बुकमार्क करून ठेवलेली रेस्पी आज हिम्मत करून बनवून पाहिली (सुरळीच्या वड्या प्रचंड आवडणारा पदार्थ पण परदेशात फारसा मिळत नाही) इतकं अफाट सोपं प्रकरण असेल असं वाटलं नव्हतं. थॅंक्यु थॅंक्यु!!
(११०० वॉट मायक्रोवेव्हसाठी साडेचार मिनिटं फार झाली. त्यामुळे पाहिजे तितक्या पातळ झाल्या नाहीत. पुढच्या वेळी वेळ कमी करून किंवा पाणी वाढवून बघेन)
एकदम एरर प्रुफ रेसिपी,
एकदम एरर प्रुफ रेसिपी, साडेचार मिनिट पर्फेक्ट आहेत, खुप दिवसाने केल्या त्यामुळे अगदी पातळ झाल्या नाहित..
![unnamed (7).jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u170/unnamed%20%287%29.jpg)
आज मी पहिल्यांदाच सुरळीच्या
आज मी पहिल्यांदाच सुरळीच्या वड्या केल्या. उत्तम जमल्या. रेसिपी अगदी परफेक्ट आहे.![20220326_114129-COLLAGE.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u99/20220326_114129-COLLAGE.jpg)
सुरळीच्या वड्या, झटपट / ५
सुरळीच्या वड्या, झटपट / ५ मिनिटे हे शब्द एकाच शिर्षकात आलेले फार आकर्षक वाटले.
सोपे दिसतेय. या रेसिपीने करणारच ASAP !
नूडल्स, मोमो, उकडीचे मोदक असे slimy texture चे पदार्थ आवडत नाहीत पण या वड्या बेहद्द पसंत आहेत.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
आज बघितली आणि लगेच सुरळीच्या वड्या केल्या.
Pages