Submitted by प्रिति १ on 10 September, 2013 - 09:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ भांडे उडदाची डाळ, १ भांडे हरभरा डाळ, १ चहाचा चमचा जिरे, १ मोठा कांदा बारीक चिरुन, १ चमचा तिखट, मीठ चवीनुसार, १ चमचा तेल, मोहरी, हींग, १ वाटी दही.
क्रमवार पाककृती:
उडदाची डाळ आणि हरभरा डाळ १ चहाचा चमचा जिरे घालुन भरड दळुन घ्यावी / आणावी. वरील भरडा अर्धी वाटी घ्यावा. त्यात बारीक चिरलेला कांदा, तिखट, मीठ दही घालुन कालवावे. आवडत असल्यास १/२ चमचा साखर घालावी. वरुन तेलाची मोहरी , हींग घालुन फोडणी द्यावी मग कालवावे.
अधिक टिपा:
वरील दांगर चट्णी ऐवजी बदल म्ह्णुन मस्त लागते.
भाकरी बरोबर खायची पधत आहे.
माहितीचा स्रोत:
हमखस स्वयंपाक पूस्तक.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सीमाने पण एक डांगराचे कृती
सीमाने पण एक डांगराचे कृती दिली आहे. ही थोडी वेगळी आहे. ट्राय करीन ही पण.
वाटली डाळ पण यालाच म्हणतात
वाटली डाळ पण यालाच म्हणतात का?
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115794.html?1157605219
वाटली डाळ ईथे वाचा.
उडीद डाळ,हरबरा डाळी बरोबर एक
उडीद डाळ,हरबरा डाळी बरोबर एक चमचा तान्दूळ खमंग भाजून मिक्सरवर भरडा काढा,तान्द्ळामुळे डान्गर मिळून येते चोथापाणी होत नाही!
प्रिति, दोन्ही डाळी भाजाव्या
प्रिति, दोन्ही डाळी भाजाव्या लागतील. तेवढा एक शब्द राहीलाय लिहायचा.
आम्ही या डांगरात मोहरी भिजवून
आम्ही या डांगरात मोहरी भिजवून फेसून घालतो. मस्त होते. हो. डाळी भाजून घेणे.
खरचं दिनेशदा, डाळी
खरचं दिनेशदा, डाळी भाजल्याशिवाय खमंगपणा येणार नाही.
आमच्याकडे टरबुजसदृष्य फळाला
आमच्याकडे टरबुजसदृष्य फळाला डांगर म्हणतात.
करुन बघाव लागेल, पण ते डाळी भाजणे म्हणजे जरा.....