भारतीय सणांचे अनर्थशास्त्र
त्या दिवशी भल्या पहाटेच चक्रधर माझ्याकडे आला होता. त्याला माझ्याकडून प्रवाशीबॅग हवी होती पंढरपूरला जायला. असा अचानक चक्रधर पंढरपूरला जायची तयारी करतोय हे ऐकून मी उडालोच. आदल्या दिवशीच माझे त्याच्याशी बोलणे झाले होते. एका खासगी कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला चलतोस का म्हणून विचारले तर म्हणत होता की, त्याला निदान एक पंधरवडा तरी अजिबात फुरसत नाहीच. शेतीची आंतरमशागत करायचीय, फवारणी करायचीय, निंदन-खूरपण करायचेय. अर्थात तो खोटेही बोलत नव्हता. त्याचे शेत माझ्या शेतापासून थोड्याशाच अंतरावर असल्याने मला त्याच्या शेतीची आणि शेतीतील पिकांची इत्थंभूत माहिती होती.
चक्रधर शेती करायला लागल्यापासून पहिल्यांदाच त्याच्या शेतीत इतकी चांगली पिकपरिस्थिती होती. यंदा त्याने छातीला माती लावून सार्या गावाच्या आधीच कपाशीची धूळपेरणी उरकून टाकली होती. पावसानेही आपला नेहमीचा बेभरंवशाचा खाक्या सोडून चक्रधरला साथ दिली आणि त्याची कपाशीची लागवड एकदम जमून गेली. नशीब नेहमी धाडसी लोकांनाच दाद देत असते याची प्रचिती यावी असाच हा प्रसंग होता. त्यामुळे हुरूप आलेला चक्रधर दमछाक होईपर्यंत शेतीत राबायला लागला होता. त्याला विश्वास होता की, यंदा आपली "इडापिडा टळणार आणि सावकाराच्या पाशातून मुक्ती मिळणार". भरघोस उत्पन्न आले आणि कर्मधर्म संयोगाने जर भावही चांगले मिळालेत तर ते अशक्यही नव्हते. त्यामुळे कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला येत नाही म्हटल्यावर मलाही फारसे नवल वाटले नाही.
पण चक्रधर आता असा अकस्मात पंढरपूरला जायची तयारी करतोय हे मला अनपेक्षित होते. नेमके काय गौडबंगाल आहे हे जाणून घ्यायची माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी प्रथम त्याच्या हातात प्रवाशी बॅग दिली, प्रवासाला शुभेच्छा दिल्या, येताना माझ्यासाठी पांडुरंगांचा प्रसाद घेऊन यावा, अशी विनंती केली आणि मग हळूच विचारले होते,
"काय चक्रधर, असा अचानक कसा काय बेत आखला बुवा पंढरपूरचा?"
"आरं, मी कसला काय बेत आखतो पंढरीचा? तो पांडुरंगच मला बोलवायला आलाय ना स्वतःहून" इति चक्रधर.
"स्वतःहून थेट पांडुरंगच आला तुला निमंत्रण द्यायला?" आश्चर्याने डोळे विस्फारून मी विचारले.
"हं मग? इच्छा त्या पांडुरंगाची. दुसरं काय?" चक्रधर निर्विकारपणे सांगत होता.
"अरे, पण मी तर ऐकलंय की पांडुरंग निर्गुण-निराकार असतो. शिवाय तो बोलत पण नसतो" या विषयातील आपले तुटपुंजे ज्ञान उगाळत मी बोललो.
"तसं नाही रे, पंढरीचा विठोबा स्वप्नात आलाय तो त्या रावसाहेबांच्या" माझ्या प्रश्नाचा उबग आल्यागत चक्रधर बोलत होता. पण आता मला संवाद थांबवणे शक्य नव्हते. माझी उत्कंठा शिगेला पोचली होती.
"रावसाहेबांच्या स्वप्नात? रावसाहेब आणि तुला, दोघांनाही बोलावलं होय?" मी प्रश्न फेकलाच.
"आरं बाबा, तसं नाही रे. आत्ता पहाटेपहाटे विठोबा-रुक्मिणी दोघंबी रावसाहेबांच्या स्वप्नात आलेत आणि रावसाहेबांना आदेशच दिला की चक्रधरला तातडीने पंढरीला पाठवून दे. बिचारे रावसाहेब धावतपळत माझ्याकडे आलेत आणि म्हणालेत की, तू आताच्या आत्ता सकाळच्या गाडीने तातडीने पंढरपूरसाठी नीघ. मी पैशाची अडचण सांगायच्या आधीच रावसाहेबांनी माझ्या हातावर जाण्यायेण्याला पुरून उरतील एवढे पैसे पण ठेवलेत. लई मायाळू माणूस आहे बघा आपले रावसाहेब." माझ्या प्रश्नाच्या सरबत्तीला वैतागलेल्या चक्रधरने एका दमात सगळे सांगून टाकले आणि झपाझप पावले टाकत निघून गेला.
पंढरीची वारी करून चक्रधर जेव्हा परतला तेव्हा सारेच काही बदललेले होते. फवारणी अभावी कपाशीची वाढ खुंटून झाड खुरटले होते. मशागत व खुरपणी अभावी तणांची बेसुमार वाढ झाली होती. आल्याआल्या मशागत सुरू करावी तर पाऊस सुरू झाला होता. पाऊस नुसताच सुरू झाला नव्हता तर ठाण मांडून बसला होता. आकाशातील ढग पांगायचे नावच घेईना. म्हणजे झाले असे की, जेव्हा उघाड होती आणि मशागत करण्यायोग्य स्थिती होती तेव्हा चक्रधर पंढरपुरात होता आणि आता चक्रधर शेतात होता तर पावसामुळे मशागतीचे काम करणे अशक्य झाले होते. शेवटी तणाची वाढ एवढी झाली की शेतात जिकडेतिकडे गवतच गवत दिसत होते. कपाशी गवताखाली पूर्णपणे दबून गेली होती. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. एकावर्षात सावकाराच्या म्हणजे रावसाहेबाच्या कर्जाच्या पाशातून मुक्त व्हायची गोष्ट दूर, उलट कर्जबाजारीपणाचा डोंगरच वाढत जाणार होता.
रावसाहेब सावकार मात्र आनंदी होते. त्यांनी स्वप्न पडल्याची मारलेली थाप त्यांना मस्तपैकी कामी आली होती. ऋणको जर स्वयंपूर्ण झाला तर धनकोची दुकानदारी कशी चालेल? त्यासाठी ऋणको नेहमीच कर्जात बुडूनच राहावा, हीच धनकोची इच्छा असते. त्यासाठीच नाना तर्हेच्या कॢप्त्या लढविण्याचे कार्य धनकोद्वारा अव्याहतपणे चाललेले असते.
मी जेव्हा ही गोष्ट अनेकांना सांगतो तेव्हा त्यांना सावकाराचाच राग येतो. कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचीही भाषा केली जाते मात्र शेतीच्या ऐन हंगामातच पंढरपूरची यात्रा का भरते? याचे उत्तर कोणीच देत नाही. पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तवर्गामध्ये शेतकरी समाजच जास्त आहे. ज्या वेळी शेतकर्यांनी आपल्या शेतीतच पूर्णवेळ लक्ष द्यायची गरज असते, नेमकी तेव्हाच आषाढी किंवा कार्तिकीची महिमा का सुरू होते? याचा धार्मिक किंवा पुराणशास्त्रीय विचार करण्यापेक्षा तार्किक पातळीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
संपूर्ण भारतवर्षात शेतीचा हंगाम सर्वसाधारणपणे जून महिन्यामध्ये सुरू होतो आणि डिसेंबर मध्ये मुख्य हंगाम म्हणजे खरीप हंगाम संपतो. विचित्र गोष्ट अशी की, भारतातील सर्व मुख्य सण याच काळात येतात. जून मध्ये हंगाम सुरू झाला की शेतीच्या मुख्य खर्चाला सुरुवात होते. आधीच कर्ज काढून शेती करणार्याला हे सण आणखीच कर्जात ढकलायला लागतात. या सणांच्या खर्चातून शेतकर्याला बाहेर पडताच येणार नाही, अशी पुरेपूर व्यवस्था झालेली आहे, हेही ठळकपणे जाणवते. या काळात येणार्या सर्व सणांचे त्या-त्या सणानुरूप करावयाच्या पक्वान्नाचे मेनू ठरलेले आहेत. नागपंचमीला करंजी, लाडू, चकल्या कराव्या लागतात. रक्षाबंधनाला राखी बांधायला भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जायचेच असते. मग एकाचा खर्च प्रवासात होतो तर दुसर्याचा पाहुणचार करण्यात. पोळा आला की बैलाला सजवावेच लागते. घरात गोडधड रांधावेच लागते. त्यातही एखाद्या चाणाक्ष काटकसरी शेतकर्याने पोळ्यानिमित्त घरात पंचपक्वान्न करून खाण्यापेक्षा तेवढ्याच पैशात शेतामध्ये दोन रासायनिक खताची पोती घालायचे ठरवले तरी ते शक्य होत नाही कारण या दिवशी शेतकर्याने आपल्या घरी गडीमाणूस जेवायला सांगणे, हा रितिरिवाज लावून दिल्या गेला आहे. परका माणूस घरात जेवायला येणार असल्याने पंचपक्वान्न करणे टाळताच येत नाही. अशा तर्हेने शेतकर्याला खर्चापासून परावृत्त होण्याचा मार्गच बंद करून टाकल्या गेला आहे. शिवाय पोळा हा तीन दिवसाचा असतो. वाढबैल, बैल आणि नंदीपोळा. हे तीन दिवस बैलाच्या खांद्यावर जू देता येत नाही. मग होते असे की जेव्हा उघाड असते आणि शेतात औतकाम करणे शक्य असते, त्यावेळेस पोळा असल्यामुळे काम करता येत नाही. पोळा संपला आणि जरका लगेच पाऊस सुरू झाला तर मग पावसामुळे काम करता येत नाही. कधी कधी या तर्हेने आठवडा किंवा चक्क पंधरवडा वाया जातो. मग त्याचे गंभीर परिणाम पिकांना भोगावे लागतात.
हरितालिका, ऋषिपंचमी, मंगळागौर, कान्होबा, महालक्ष्मी-गौरीपुजन, श्रावणमास याच काळात येतात. आखाडी व अखरपख(सर्व पितृदर्श अमावस्या) या सणांचा मारही खरीप हंगामालाच सोसावा लागतो. गणपती बाप्पा आले की ठाण मांडून बसतात. शारदादेवी, दुर्गादेवी यांचे नवरात्र पाळायचे नाही म्हटले तर त्यांचा प्रकोप होण्याची भिती मनात घर करून बसली असते शिवाय यांना यायला आणि जायला गाजावाजा व मिरवणूक लागते. बाप्पांना दहा-पंधरा दिवस मोदक पुरवावेच लागतात. बदाम, नारळ खारका द्याव्याच लागतात. दुर्गादेवीची ओटी भरावीच लागते. ते संपत नाही तोच दसरा येतो, दसर्याची नवलाई संपायच्या आधीच भुलोजी राणाच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या भुलाबाई येतात. भोंडला, हादग्याला जुळूनच कोजागरी येते.
शेतीचा हंगाम अगदी भरात असतो. ज्वारी हुरड्यावर, कपाशी बोंडावर आणि तुरी फ़ुलोर्यावर येण्याला सुरुवात झालेली असते. अजून पीक पक्व व्हायला, बाजारात जायला आणि शेतकर्याच्या घरात पैसा यायला अजून बराच अवकाश असतो आणि तरीही आतापर्यंत डबघाईस आलेल्या शेतकर्याचे कंबरडे मोडण्यासाठी मग आगमन होते एका नव्या प्रकाशपर्वाचे. दिव्यांची आरास आणि फटक्याच्या आतषबाजीचे. एकीकडे कर्ज काढून सण साजरे करू नये म्हणून शेतकर्याला वारंवार आवाहन करणार्या शहाण्यांचे पीक येते मात्र दुसरीकडे हे सर्व सण शेतकर्यांच्या दारासमोर दत्त म्हणून उभे ठाकत असते. दिवाळी जसा प्रकाश आणि आतषबाजीचा सण आहे तसाच पंचपक्वान्न व वेगवेगळे चवदार पदार्थ करून खाण्याचा सण आहे. शेतकर्याने जरी सण साजरा करायचे नाही असे ठरवले तर शेजार्याच्या घरातून खमंग वासाचे तरंग उठत असताना शेतकर्याच्या मुलांनी काय जिभल्या चाटत बसायचे? दिवाळीला नवे कापड परिधान करायचे असते. नवीन कापड खरेदीसाठी पुन्हा कर्ज काढायचे किंवा कापड दुकानातून उधारीवर खरेदी करायची. लक्ष्मीपूजनासाठी स्पेशल दिवस नेमला गेला आहे. शेतीत पिकविलेला कोणताच शेतमाल जर विक्रीस गेला नसेल तर शेतकर्याच्या घरात लक्ष्मी तरी कुठून येणार? मग लक्ष्मीपूजन तरी कोणत्या लक्ष्मीचे करायचे? शेतकरी ज्या लक्ष्मीचे पूजन करतो, ती लक्ष्मी उसणवारीची असून तिचे मालकीहक्क सावकार किंवा बॅंकेकडे असतात. त्याच्या घरावर झगमगणार्या आकाशदिव्यांचे कॉपीराईटस जनरल स्टोअरवाल्याच्या स्वाधीन आणि घरात तेवणार्या दिवावातीतील तेलाचे सर्वाधिकार किराणा दुकानदाराच्या ताब्यात असतात. शेतीचे खर्च आणि या सर्व सणांचे खर्च भागवण्यासाठी शेतातील उभे पीक शेतकर्याच्या घरात पोचायच्या आधीच गहाण झालेले असते. या सर्व सणांनी शेतकर्याला पुरेपूर कर्जबाजारी करून त्याच्या कमरेला धडूतही शिल्लक ठेवायचे नाही, असा निर्धारच केलेला दिसतो.
आणि सर्वात महत्त्वाची आणि उपराटी बाब अशी की डिसेंबरमध्ये माल बाजारात जायला लागला आणि शेतकर्याच्या घरात पैसा यायला लागला की अचानक सणांची मालिका खंडीत होते. गाढवाच्या सिंगाप्रमाणे सण नावाचा प्रकारच गायब होतो. डिसेंबर नंतर जे सण येतात ते निव्वळच बिनखर्चिक असतात. "तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणत तिळगुळाच्या भुरक्यावरच तिळसंक्रांत पार पडते. बारा आण्याच्या रंगामध्ये होळीची बोळवण केली जाते. तांदळाची खीर केली की अक्षय तृतीया आटोपून जाते. खरीप हंगामात येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी घराघरात साजरी केली जाते. मात्र उन्हाळ्यात येणारी रामनवमी व हनुमान जयंती केवळ मंदिरातच साजरी केली जाते आणि शेतकर्यांना पदरचा खडकूही न खर्च करता फुकटातच प्रसाद खायला मिळतो. म्हणजे असे की शेतकर्याच्या घरात जेव्हा त्याच्या कमाईचा पैसा येतो, तेव्हा त्याने त्या पैशाने सण वगैरे साजरे करण्याची अजिबात सोय नाही. स्वतः मिळविलेल्या मिळकतीतून नवीन कपडे खरेदी करायचे नाहीत. स्वत:च्या मिळकतीच्या पैशाने गोडधड-पंचपक्वान्ने करून मुलाबाळांना खाऊ घालायची नाहीत. बहिणीने भावाच्या घरी किंवा बापाने पोरीच्या घरी जायचे नाही. केवळ आणि केवळ माल विकून पैसा आला की त्याने किराणा, कापड दुकानाची उधारी फेडायची. बॅंका किंवा सावकाराची कर्जफेड किंवा व्याज फेड करायची आणि पुढील हंगामातील शेतीसाठी नव्याने कर्ज घ्यायला तयार व्हायचे. अजबच तर्हा आहे या कृषिप्रधान म्हणवणार्या देशातील सणांच्या संस्कृतीची.
सणांच्या निर्मितीमागचे ऐतिहासिक महत्त्व विशद करणारे पुराणशास्त्री काहीही म्हणोत, परंतु शेतीमधल्या मिळकतीचा संचय शेतकर्याच्या घरात होताच कामा नये, शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे. ज्या हंगामात शेतीमध्ये शेतकर्याने स्वतःला झोकून देऊन कामे करायची असतात त्याच काळात इतक्या सणांचा बडेजाव शेतीव्यवसायाला उपयोगाचा नाही. उत्पादनासंबंधी आवश्यक तो खर्च करावयाच्या काळात सणासारख्या अनुत्पादक बाबीवर अनाठायी खर्च करणे, शेतीव्यवसायाला कधीच फायदेशीर ठरू शकणार नाही. सणांचे अनर्थशास्त्र शेतीच्या अर्थशास्त्राला अत्यंत मारक ठरले आहे, ही खूणगाठ मनाशी बांधूनच पुढील वाटचाल होणे अत्यंत गरजेचे आहे.
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------
(पूर्वप्रकाशित - देशोन्नती दिवाळी अंक-२०१२)
ही जी सणांची जंत्री दिलीय
ही जी सणांची जंत्री दिलीय त्यात किती खर्च येतो ते परत एकदा बघा.
नागपंचमीला करंजी, लाडू, चकल्या कराव्या लागतात
>>
हे मी पहिल्यांदाच ऐकले. नागपंचमीला करंजी, लाडू, चकल्या केल्या तर मग दिवाळी काय करतात तुम्ही?
रक्षाबंधनाला राखी बांधायला भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जायचेच असते. मग एकाचा खर्च प्रवासात होतो तर दुसर्याचा पाहुणचार करण्यात.
>>
राखी काय एवढी महाग आहे का? प्रवास का फक्त रक्षाबंधनालाच करतात का? एरवी भाऊ बहीण एकमेकांकडे जात नाहीत का?
रक्षाबंधनानिमित्त हा प्रवास ए.सी. गाडी/बस किंवा विमानाने करतात का?
पाहुणचार काय फक्त रक्षाबंधनालाच होतो का? एरवी जर कोणी घरी आला तर तुम्ही "पाहुणचार" म्हणून काय करता?
पोळा हा तीन दिवसाचा असतो.
>> पोळा विषयी मला खरंच जास्त माहिती नाहीय.
हरितालिका, ऋषिपंचमी, मंगळागौर, कान्होबा, महालक्ष्मी-गौरीपुजन, श्रावणमास याच काळात येतात. आखाडी व अखरपख(सर्व पितृदर्श अमावस्या) या सणांचा मारही खरीप हंगामालाच सोसावा लागतो.
>>
हरितालिका - फक्त स्त्रियाच साजरा करतात. ते ही उपास करुन.
ऋषिपंचमी - उपास आणि सप्त ऋषींची पूजा. ती ही साधीच असते. उगाच थाटमाट नसतो त्यात.
मंगळागौर - ब्राम्हण स्त्रिया साजरा करतात. ते ही नवीन लग्न झाले की पहिली पाच वर्षे.
आखाडी - म्हणजे गटारी म्हणायची का? तर मग नाही केली तरी चालते.
अखरपख(सर्व पितृदर्श अमावस्या) - यादिवशी पितरांना गोडाचा नैवेद्य असतो. यात काही जास्त खर्च येत नसावा.
राखी पोस्टाने पाठवता येते,
राखी पोस्टाने पाठवता येते, पाठवली जातेही.
>>>> लिंबूकाकांना
>>>> लिंबूकाकांना धरा.........या सर्वांना तेच जवाबदार आहेत......... <<<<
मी? असेन बोवा, पण मग पाच दहा पन्धरा हजार वर्षांपूर्वीही मीच जन्मलेलो होतो हे सगळे ठरवायला, केरळात देखिल आद्य शंकराचार्य म्हणून मीच जन्मलो, अन आताचा जन्म हा माझा कितव्यान्दातरीचा पुनर्जन्म आहे हे तुम्हाला मान्य करावे लागेल, बघा बोवा! अन हे मान्य केलेत की तुम्ही ९९% हिन्दुधर्म मान्य केलात असे झालेच!
मुटेसाहेब, या लेखातील मते पटली नाहीत.
मानसपूजा हा ही एक पर्याय आहे.
मानसपूजा हा ही एक पर्याय आहे. उत्तम पैकी मानस पूजा करता येते. देव आणि आपले नाते पैशाने डिफाइन करण्यासारखे नाही.
बैल हा शेतकर्याचा अॅसेट तर. जसे आजकाल वाढदिवस आप्ण वीकेंडला साजरे करतो तसे बैलपोळा नांगरणी व इतर जरूरी कामे करून मग साजरा करू शकतो. त्या मेहनती प्राण्याला आराम देऊ शकतो. थोडी फ्लेक्सिबिलिटी पाहिजेच की. शिवाय प्राण्यांना नेहमीच उत्तम वागणूक दिली पाहिजे. परदेशातले शेतकरी कुठे हे पोळा वगैरे पाळतात. काम व आरामाचे सायकल प्राण्यांचे पाळावे लागतेच. उघीर जमातीचे लोक, मेंढपाळ इत्यादी भटक्या जमातींचे पूर्ण जीवनचक्र प्राण्यांच्या लाइफ सायकलशी निगडीत असते.
एक परसेक्युशन काँप्लेक्क्ष असतो तसा वरील लेखाचा प्रकार वाटतो आहे.
साती, राष्ट्रीय सणांच्या आधी,
साती,
राष्ट्रीय सणांच्या आधी, बियरचा खप वाढतो
दिवाळी जर साजरी केली नाही तर
दिवाळी जर साजरी केली नाही तर "बोनस" मिळेल का ????????? विचार करुन ठरवा..
अन हे मान्य केलेत की तुम्ही
अन हे मान्य केलेत की तुम्ही ९९% हिन्दुधर्म मान्य केलात असे झालेच! >>>>> हिंदुच आहे मी .. न मानायला काय झाले
मी फक्त " एस " फोर "देव" याला मानत नाही... बाकी सब ठिक है
उदयन, त्यांच्यात पुनर्जन्मावर
उदयन, त्यांच्यात पुनर्जन्मावर विश्वास असणे हे हिंदू असण्याचे prerequisite आहे.
अच्छा......मी एक गरीब आणि
अच्छा......मी एक गरीब आणि सभ्य हिंदु असल्याने....माहीत नव्हते
म्हणजे असे की शेतकर्याच्या
म्हणजे असे की शेतकर्याच्या घरात जेव्हा त्याच्या कमाईचा पैसा येतो, तेव्हा त्याने त्या पैशाने सण वगैरे साजरे करण्याची अजिबात सोय नाही. स्वतः मिळविलेल्या मिळकतीतून नवीन कपडे खरेदी करायचे नाहीत. स्वत:च्या मिळकतीच्या पैशाने गोडधड-पंचपक्वान्ने करून मुलाबाळांना खाऊ घालायची नाहीत. बहिणीने भावाच्या घरी किंवा बापाने पोरीच्या घरी जायचे नाही. केवळ आणि केवळ माल विकून पैसा आला की त्याने किराणा, कापड दुकानाची उधारी फेडायची. बॅंका किंवा सावकाराची कर्जफेड किंवा व्याज फेड करायची आणि पुढील हंगामातील शेतीसाठी नव्याने कर्ज घ्यायला तयार व्हायचे.
<<
दिवाळी झाल्यानंतर तुळशीचे लग्न लागते. मग त्यानंतर नक्की काय सुरु होते, मुटे जी?
सांगा पाहू?
..
तुमचे शेतकी विषयाचे लेख एकदा वाचले पाहिजेत, असे मी म्हटलोच होतो.
हा लेख वाचल्या नंतर तुम्ही लोकांच्या तुमच्याबद्दलच्या भ्रमाचा भोपळा फोडण्याचे काम इमानेइतबारे करीत आहात, असेच म्हणावेसे वाटले.
हे काम असेच नेटाने सुरू ठेवावे ही विनंती व शुभेच्छा.
-***-
लिंबाजीराव,
एका वाक्यात 'लेखातील मते पटली नाहीत' इतकेच?
काय हे?
बरे, तुमचा आयडी ह्याक झाला म्हणावे तर त्याच्या वरचे ९९% हिंदू व कितव्यान्दातरीचा पुनर्जन्म इ.लॉजिक तुमच्याशिवाय कुणीच लावू शकत नाही
काय हो?
प्रत्येक जन्मी मनुष्य होण्याइतके पुण्य आहे, पण जन्ममरणाच्या फेर्यातून सुटण्या इतके नाही, अशी तुमची कण्डीशन दिसते. तुम्हारे कर्मविपाक अकाऊंटमें कुछ गडबड तो नही?
इब्लिस, ते तुम्हाला आणि मला
इब्लिस, ते तुम्हाला आणि मला अज्ञानांधकारातून बाहेर काढण्यासाठी अवतार घेताहेत हो.
पोळ्याला औत जुंपायचं नाही, पण
पोळ्याला औत जुंपायचं नाही,
पण ट्र्याक्टर हाकलायला कुणी बंदी घातली आहे का?
किती शेतकरी सध्या बैलजोडी ठेवतात? परवडते का ठेवायला?
या निमित्ताने मुटेंनी त्यांचे
या निमित्ताने मुटेंनी त्यांचे सगळे लेख वर काढून घेतलेत
सगळे नाही बरं. जे लेख वर
सगळे नाही बरं. जे लेख वर काढले नाहीत तेच वाचण्यासारखे असतील का?
मला नक्कीच वाटतंय, त्यांचे
मला नक्कीच वाटतंय, त्यांचे काहीतरी बिनसलेय.
पण दिनेश, हा लेख मुळात जुना
पण दिनेश, हा लेख मुळात जुना आहे. तो आता इथे डकवलाय.
रात्री उशीरा बघितल. सगळे जुने लेख वर आलेले... खरच काहीतरी बिनसलय खरं. पण काय, हे ते सांगायला तयार नाहीत.
त्यांनी या आणि आधीच्या
त्यांनी या आणि आधीच्या धाग्यावरचे प्रतिसाद मनाला लावून घेतलेत, पण जर प्रतिसादकांच्या बाजूने विचार केला तर नक्कीच त्यांना देखील त्रुटी कळून येतील.
असो!
उपरोधिक लेख लिहायचा होता का ?
उपरोधिक लेख लिहायचा होता का ?
तसा वाटत नाही आहे पण शंका आली.
मुटेजी, जरी वरील लेखातील
मुटेजी, जरी वरील लेखातील तुमची मते पटली नसली, तरी त्यातिल सूत्र "म्हणजे रावसाहेबाने (सावकाराने) ऋणकोला चैनीमधे अधिकाधिक गुन्तवुन ठेवणे व अधिकाधिक कर्जातच कसा राहील हे बघणे" हे सूत्र या भारत देशाबाबत मात्र केव्हापासून लागू केले जात आहे असे वाटते. खास करुन खुल्या अर्थव्यवस्थेनंतर हा प्रकार जास्त होतोय असे माझे मत. पण हे मत मुद्देसूदपणे तपशीलात मांडणे मला वेळेअभावी अवघड जात आहे. पण थोडेस्से हे असे आहे की "खिशात नाही फद्या, अन नजरेसमोर जाहिरातीच्या मार्याद्वारे स्वप्ने तरळवली जाताहेत ती स्वप्नसुंदर्या/गाडीघोडे तसेच दारूसारख्या व्यसनी बनविण्यार्या गोष्टींचे गोडवे-महापूर/प्रतिष्ठापना इत्यादींची" अन यामुळे ती ती स्वप्ने साकारू शकली नाहीत (बहुधा ते अशक्यच असते) की नैराश्यग्रस्ततेतून आत्यंतिक बेभान व बेफाम झालेल्या प्रचंड मोठ्या जनसंख्येस त्याचे लक्ष विचलित करण्याकरता, कुठल्याश्या देशात बैलाबरोबरच्या झुंजीमधे जसे लाल कापड घेऊन माणुस फिरतो, तसे "ब्राह्मण व ब्राह्मण्यत्व" हे मुद्दे लाल कापडाप्रमाणे वापरायची व बेभान/बेफाम जनसन्ख्येला साडेतिन टक्यांवर छू करुन सोडायाची पद्धत राजकारण्यान्नी पाडली आहे. अन अशा राजकारण्यांनी अशा जनतेला "छूऽऽ" केले की काय होते हे भांडारकर संस्थेवरील हल्ला व दादोजी कोंडदेवाचा पुतळा उखडून त्याची वासलात लावण्याच्या घटनेत बघितलाच आहे. १९४८ मधेदेखिल याच "छूमंतराचा" प्रयोग करण्यात आला होता.
या सर्व भानगडीत देशी नादान लोकांबरोबरच परकीय वित्तपुरवठा करणारे/या देशात येऊन धन्दा करु पहाणारे/या देशाचा धर्मच बदलून टाकू पहाणारे, यांचा सूप्त/छुपा व प्रच्छन्न सहभाग कसा किती किती आहे हा संशोधनाचा विषय आहेच, पण अंती आश्चर्यचकीत करुन सोडणारा असेल. प्रश्न इतकाच असेल की आमच्या पुढच्या पिढ्या ते आश्चर्य करताना हिंदूच राहिले अस्तील, की अजुन कुणी काही बनले असतील हा जरी औत्सुक्याचा भाग असला तरी ते पहायला आपण कुणीच असणार नाही. ही परिस्थिति पुढल्या पिढ्यांवर येऊ नये असे वाटत असेल, तर वेळिच येथिल समाजाने "हिंदू" म्हणून जागृत होणे अपेक्षित आहे.
यावर कितीतरी सखोल विवेचन करणे शक्य आहे, वेळेअभावी मला अवघड जाते आहे.
ऋण काढून सण करू नका असं
ऋण काढून सण करू नका असं गाडगेबाबा आणि इतर प्रबोधनकारांना, संतांना का सांगावेसे वाटले असेल ?
लिंबुजी काय हे. अहो जरा
लिंबुजी काय हे.:अरेरे: अहो जरा पुणेरी शुद्ध भाषेत आम्हाला समजेल असे लिहीत जा हो. तुमची भाषा पार पेशवाईतली वाटते. मुळात इथे हिंदु धर्म आलाच कुठुन? सणावाराबद्दल जरी लिहीले असले तरी बाकी ते ब्रिगेडी, परदेशी यांचा इथे काही संबंध आहे तरी कुठे?
राहता राहीला कर्जाचा प्रकार, तर त्याबद्दल आपणच ( म्हणजे त्या चक्रधर सारखे लोक ) उपाय योजना करायला नको का? काय गरज पडली त्याला शेतीचे काम सोडुन वार्या करायची? पांडुरंगाने सांगीतले का की घरच्यांना वार्यावर सोड आणी माझ्या नावाने टाळ कुटत बस.:राग: कुठल्याही गोष्टीसाठी देवाला वेठीस धरणे हाच मोठा माणसाचा अपराध असतो नव्हे तो आहेच.
बरेच लिहीले असते, पण वेळ नाही.
सगळ्या
सगळ्या शहरी-सुखवस्तू-मध्यमवर्गीय-उच्चवर्णिय लोकांचे प्रतिसाद आले का?
नसतील तर अजून काही पाने वाढवा. म्हंजे मग तुम्हाला शेती, शेतकरी, गरीबी इ.इ.इ. बद्दल काहीही कसे माहिती नाही, तुम्ही सर्व गेंड्याच्या कातड्याचे असंवेदनशील दुष्ट-वाईट्ट लोक कसे आहात याबाबत खडसावून तुमचे डोळे उघडायला मुटे'जी' येतील.
लिंब्याजींना आवरा! उद्या 'ओल्या नारळाची करंजी' अशा धाग्यावर देखील त्याची "ब्राह्मण, ब्राह्मणेतर, भांडारकर आणि ब्रिगेड' कॅसेट वाजवली तर आश्चर्य वाटणार नाही. उदा- 'ओला नारळ हा कोकणाचे आणि ब्राह्मणत्वाचे प्रतिक आहे. त्याला खोवण्याची क्रिया असलेली ही पाककृती १९४८ पासूनच्या छुप्या आणि उघड ब्रिगेडी अजेंड्याचेच उदाहरण आहे इ.इ.इ.'
लिंटिं, गरीब बिचार्या ठेविले
लिंटिं, गरीब बिचार्या ठेविले अनंते तैसेची रहावे म्हणणार्या जनतेला आवाक्याबाहेरची स्वप्ने दाखवायची हे कळले. त्याचा पुढच्या वाक्यांशी संबंध कसा जोडायचा ते माझ्या टाळक्यात शिरत नाही आहे. समजावूनच सांगाच कृपयाच.
सध्याच्या प्रमाण मराठी भाषेत लिहाल तर उपकृत होईन.
>>> लिंब्याजींना आवरा!
>>> लिंब्याजींना आवरा! <<<<
आगाऊ, मी मांडलेला विषय कळत नसेल, कळून घ्यायचा प्रत्यत्न जरुर करशीलच.
१. मुटेंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या उदाहरणातील शेतकरी चक्रधर नावाच्या/ड्रायव्हरच्या अनवस्थेला त्याला मिसगाईड करणारा सावकार रावसाहेब कारणीभूत आहे.
२. हेच मिसगाईड करण्याचे सूत्र पकडून, ये देशीचे केवळ शेतकर्याबाबतच नव्हे तर तमाम जनतेसमोर विविध प्रलोभने/जाहिराती इत्यादी मार्फत विविध चैनीच्या/व्यसनांच्या/गैरवाजवी/बिनगरजेच्या भोगवस्तूंचा पुरवठा व सवय लावण्याचे कार्य (मिस्गाईड), नफ्याकरता / वा जनतेला उल्लू बनवून कशात तरी गुंतवुन ठेवण्याकरता केला जातोय.
३. अंतिमतः, यामुळे परिस्थितीत सुधारणा वगैरे काही न होता, प्रत्यक्षात व्यक्ति अनावश्यक गरजेच्या गोष्टी खरेदी करु पहाते, अनावश्यक्/अन्प्रॉडक्टीव्ह स्वप्ने बघते, तसे वागू पहाते, खरेदी करते/कर्जबाजारी होते, वा त्या त्या गोष्टी न मिळाल्यामुळे रूष्ट होते, तेव्हा अशा बहुसन्ख्येने असलेल्या रूष्ट जनतेचा संताप म्हणा वा साठलेली वाफ कुठेतरी ढकलण्याचे कार्य लाल कापड व बैलाचे उदाहरण देऊन, राजकारणी कसे छूमंतर करतात हे अंतिम सत्य सांगितले.
यात संपूर्णपणे दीर्घकालीक व सूक्ष्मपणे चालू रहाणार्या घडामोडींचे वर्णन अत्यंत थोडक्यात करायचा प्रयत्न केला, तर त्यात काय चूकले?
. . शेवटी लिंबुकाका......नी
.
.
शेवटी लिंबुकाका......नी आपले "ब्रह्मास्त्र" काढले ...;)
बरं. त्या कायद्याला होणारा
बरं. त्या कायद्याला होणारा विरोध, त्यासाठीचे मुद्दे(?), हेही एक लाल कापडच आहे हे कळले. धन्यवाद.
लेखाचा विषय, त्यात व्यक्त
लेखाचा विषय, त्यात व्यक्त झालेला सूर आणि दिलेली उदाहरणे हे एकमेकांशी मेळ खात नसताना लेखकाला काय म्हणायचे आहे हे समजावून घेऊन प्रतिक्रिया देऊ गेलं कि प्रतिसादांमुळे आपण कुठे होतो या गोंधळात आणखीच भर पडतेय. एक अभूतपूर्व भूलभुलैय्या दिसतोय. त्यातून वाट काढतांना गेल्या पिढीत अनेक विचारवंत ( गेली पिढी म्हणजे १९९१ च्या काळातली बरं का ) चंगळवादावर भाषणं का देत बरं ? त्याआधी गाडगेबाबांसारखे संत उगाचच प्रबोधन का करीत असत ? समोरचा ऑडीयन्स ज्ञानी असताना खरं तर अशा प्रवचनांची आवश्यकता असते का ? जादूटोणा विरोधी कायद्याची आवश्यकता तरी का पडावी बरं ? आसाराम बापूंचा तरी निषेध का व्हावा बरं ? लोकांना नाही का कळत ? आणि कळत असेल तर मग प्रश्नच राहत नाहीत ना ? अज्ञानाचा फायदा हे एक मिथ्य आहे असं वाटतं.
आहे ना असंबद्ध प्रतिसाद ?
ऋण काढून सण केल्याने शेतकरी नागवला जातो हे मुटेंना सांगायचे असेल तर जागा चुकलीये कि आख्खा लेख ? कि उदाहरणे कि आणखी काही ? कि असं काहीच नाही ?
आता आयटीवाल्यांमुळे आणि ६व्या
आता आयटीवाल्यांमुळे आणि ६व्या कमीशनमुळे शेतकर्यांचे १२ वाजले हेही लिहुनच टाका म्हणतो एकदा.
किरण +१
भारत सरकार, कृषी विद्यापीठे,
भारत सरकार, कृषी विद्यापीठे, हवामान खाते,पगारी अर्थतज्ज्ञ, (५ रुपये किलो दराने कांदा खरेदी करणारे) ग्राहक या यादीत आणखी एक भर.
हेच मिसगाईड करण्याचे सूत्र
हेच मिसगाईड करण्याचे सूत्र पकडून, ये देशीचे केवळ शेतकर्याबाबतच नव्हे तर तमाम जनतेसमोर विविध प्रलोभने/जाहिराती इत्यादी मार्फत विविध चैनीच्या/व्यसनांच्या/गैरवाजवी/बिनगरजेच्या भोगवस्तूंचा पुरवठा व सवय लावण्याचे कार्य (मिस्गाईड), नफ्याकरता / वा जनतेला उल्लू बनवून कशात तरी गुंतवुन ठेवण्याकरता केला जातोय.
>> लिंब्या, जरा डोळे उघडून बघ. हे "ये देशीच" नव्हे तर अख्ख्या जगभरात चालू आहे. मास मीडीयाचे काही मजेदार सिद्धांत आहेत, तेपण कधीतरी एकदा वाचून बघ.
जाहिराती, त्यामागचे अर्थशास्त्र हे भारतासोबतच अख्ख्या जगाच्या अर्थकारणावर अवलंबून आहे.
.
गंमत म्हणजे असे विचार मांडण्यासाठी आपल्याकडे बरेचसे ज्ञान असायलाच हवे असे नाही. वरच्याच लेखाचं उदाहरण घ्या ना!!!! भारतीय सण, त्यांची संस्कृती, कृषीसंस्कृतीचा त्यावर पडलेला प्रभाव, लोककथा, या कश्शाचाही अभ्यास करायचा नाही, विचार करायचा नाही. आपल्या मनात आलं की सण या सर्वांना जबाबदार. लग्गेच लिहून टाकावं. . शेतकरी कर्ज काढून सण साजरा करतात त्याविर्रोद्धा आम्ही बोलणार नाही. "सण जबाबदार" असे आमचे ठाम्मत. प्रतिसादात लोक काहीका बोम्ब मारेनात काआपल्याला काय फरक पडतो? आपण दुसरा लेख लिहायच्या मागे लागावं.
"अख्खं जग जे काही करत आहे, हजारो वर्षे जे काही करत होते, आणि यापुढील हजार वर्षे जे काही करणार आहे ते आपल्याविरूद्धच आहे. आपल्याविरूद्ध कटकारस्थाने करून इतरांना प्रचंड फायदा होतो" कारण, आपलं कधी काही चुकत नसतंच ना!!!!!!
Pages