आले! आले!! आले!!!
'मायबोली' टीशर्ट आले! सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
यावर्षी एक अभिनव प्रयोग म्हणून आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत. त्यांचं सुलेखन केलं आहे 'श्री. कल्पेश गोसावी' या प्रख्यात सुलेखनकाराने.
टीशर्ट दोन रंगात उपलब्ध आहेत- पांढरा आणि मरून. यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
टीशर्टाची किंमत आहे २००/- रूपये मात्र.
(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.) टीशर्टांचे पैसे 'वर्षाविहारा'च्या पैशांबरोबर द्यायचे आहेत. त्याची माहिती थोड्याच दिवसात देण्यात येईल. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टाची ऑर्डर नोंदवायची, कारण २३ जून, २००९ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
ऑर्डर कशी नोंदवाल?-
tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.
ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टीशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टीशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकामार्फत
८. किती टीशर्ट?
९. रंग कोणता?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
XS - 34
S - 36
M - 38
L - 40
XL - 42
XXL -44
महत्त्वाचे-
१. टीशर्ट 'राऊंड नेक' प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. टीशर्ट देशाबाहेर (गेल्या वर्षीसारखे) पाठवले जाणार नाहीत यावर्षी. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुण्या-मुंबईतल्या मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? तर, झटपट ऑर्डर नोंदवा.
दि.२६-६-०९ विशेष सूचना:-
टी शर्टची ऑर्डर घेणे आता बंद झाले आहे तेव्हा कोणीही आता टी शर्टची ऑर्डर पाठवू नये...
टी शर्टसचे पैसे प्रत्यक्ष भरण्याचे आणि टी शर्टस मिळण्याचे ठिकाण व वेळः-
पुणेकर मायबोलीकरांसाठी:
तारीख: ११जुलै (शनिवार) आणि १२ जुलै,२००९ (रविवार)
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा
वेळ: सं. ५.३० ते ८.००
मुंबईकर मायबोलीकरांसाठी:
तारीख: १२ जुलै,२००९ (रविवार)
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००
पैसे टी शर्ट समिती सदस्यांकडे भरून टी शर्टस घेऊन जावेत... ज्यांनी ऑनलाईन पैसे भरले आहेत त्यांनीही आपले टी शर्ट याचवेळी घेऊन जावेत.
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
रंगित टि
रंगित टि शर्ट आहे तो नक्की मरून आहे कि टोमॅटो रेड?
मुलिंसाठी टि-शर्ट ची उंची कमी जास्त असणार आहे का? की सगळे सरसकट आहेत?
आहा मस्त!
आहा मस्त! मी वविला येऊ शकणे जरा मुश्कील आहे पण टिशर्ट हवाय. मरून कलरचा.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
सुलेखनं
सुलेखनं सुंदर दिसतायत.
अहो, शिवाय
अहो, शिवाय ऑनलाईन पैसे कसे द्यायचे ते ही सांगा इथे.
टिशर्ट
टिशर्ट मागच्यावेळेपेक्षा वेगळे वाटत आहेत.. सुलेखनाची कल्पना मस्तच...:)
...
राउंड नेक
राउंड नेक टी शर्ट आवडतच नाही मला तरी
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
तरी म्हणलं
तरी म्हणलं दिप बोलला कसा नाही. सगळे एक बोलतात आणि हा चौथंच बोलतो नेहमी
दिप्या....
दिप्या.... मरुन कलरच्या राउंड नेक टी शर्ट वर पांढर्या किंवा विजलेल्या पांढर्या ( ऑफ व्हाईट) रंगाचा शर्ट किंवा जर्क्स घालुन बघ, चिकना दिसशील ..
कॉलरचे
कॉलरचे टी-शर्ट पण आणा. सुलेखनाची कल्पना सहीच. मरुन रंग मस्तच दिसतोय.
मुलींसाठी
मुलींसाठी आणि मुलांसाठी सरसकट एकाच आकाराचे टी-शर्ट आहेत...
टी-शर्टचा रंग मरुन आहे.. टोमॅटो रेड नाही...
ऑनलाईन पैसे भरण्याचे डिटेल्स जे ऑनलाईन पैसे भरणार आहेत त्यांनाच कळविण्यात येणार आहेत...
मी जर
मी जर लिहिलेल चालणार नसेल तर समितीने तसं सांगाव प्रत्यक्ष.
मी स्वतः हे ही एडीट करतोय !
*********************
'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही !
'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !
अरे कालरचे
अरे कालरचे टी-शर्ट बनवा रे पुढल्या वेळी.. म्हणजे हापिसला पण घालता येतील..
ह्या वर्षी
ह्या वर्षी टोप्या नाहीत का?
सुलेखन
सुलेखन मस्तच!!!
ओहो.. काय
ओहो.. काय सुरेख आहेत दोन्ही टीशर्ट्स! अमरिकेत येतील काहो!?
ऑनलाईन पेमेंट असेल तर नक्की घेईन मी..
www.bhagyashree.co.cc
मला पण
मला पण हवेत टि- शर्टस!!!
आणि कधी आहे व.वि.?? कुठे?? केव्हा??
आयटी
आयटी गर्ल्,यावेळी टोप्या नाहीत...
नीधप,कृपया वर विचारलेली सर्व माहिती भरून तुमच्या ऑर्डरची मेल आम्हाला पाठवा..
बीएसके,यावर्षी देशाबाहेर टी शर्टस पाठवणे शक्य होणार नाहीये.. तेव्हा तुम्हाला टी शर्ट हवा असेल तर पुण्यामुंबईतील मायबोलीकरांना किंवा तुमचे कोणी नातेवाईक इथे असतील तर त्यांना तुमचा टी शर्ट घेऊन ठेवायला सांगा. अर्थात त्याआधी ऑर्डरची मेल पाठवा सगळी माहिती भरून...
अमृता,वविसंदर्भातले डिटेल्स वविसंयोजकांकडुन काही दिवसातच मायबोलीवर देण्यात येतील..
>>हे मयबेली
>>हे मयबेली दिसतय !!!>> कुलदीप मनी वसे ते स्वप्नी दिसे.. (फक्त म्हण आठवली.)
दक्षिणा, म्
दक्षिणा,
म्हण आठवली चांगलच आहे मयबेली का माझ्या स्वप्नात येईल? पण जरा नीट बघितलस तर ते मयबेली अस दिसतय. असो बाकिच्या लोकांना ते जर मायबोली वाटत असेल तर विषय संपतो आपोआप.
*********************
'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही !
'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !
छान आहे
छान आहे सुलेखन. मरून रंगाचा टी-शर्ट मस्त आहे.
यावेळी
यावेळी टोप्या नाहीत...
माझा हिरमोड झालाय..
कुलदिप.. रिफ्रेश करुन बघ.. वेगळे दिसेल !!
सालाबादप्
सालाबादप्रमाणेच, याही वर्षी टीशर्टाला कॉलर नाही, तसच खिसाही नाही!
सबब मी घेणार नाही
(बिन कॉलरचे काही घातले की आमची आधीच बगळ्यासारखी मान अधिकच लाम्बुडकी उन्च वाटते ना!
शिवाय खिशात थोडेफार रुपये, पेन, जेल्युसिल, लायसन, चाळीशी वगैरे ठेवता येते!
पण बहुधा टी-शर्ट समितीला हे प्रॉब्लेम भेडसावत नसावेत!
बायदिवे, टी-शर्ट समितीत फक्त लेडिजचा भरणा आहे का????
किन्वा, आयटीवाल्यान्चा? हो ना! कारण त्यान्ना पेन पेन्सिल वगैरे क्षुल्लक गोष्टिन्ची आवश्यकता नस्ते! सगळे काम कसे? कीबोर्डवरुन! )
नीधप,कृपया
नीधप,कृपया वर विचारलेली सर्व माहिती भरून तुमच्या ऑर्डरची मेल आम्हाला पाठवा..<<
अहो पाठवली की. तुमचा रिप्लाय पण आलाय. आता साइझच काय तो पाठवायचा बाकी आहे.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
मस्तच... मला
मस्तच...
मला पण कमीतकमी दोन हवी आहेत....
मस्त आहेत.
मस्त आहेत. दोन्ही कलर्स छान आहेत. दोन्ही कलर्स घेणार.
..............................................................................
गावोगावी बापू झाले, बापूंचेही टापू झाले
भक्त आंधळे न्हाले न्हाले, देव बनूनी बापू आले!
मी उसगावात
मी उसगावात स्मॉल साईझचा टी-शर्ट घेते. ईथे मुलान्चे आणि मुलीन्चे सेम आहेत तर XS size घ्यावा का? मी मुलगी आहे हे चाणाक्ष वाचकान्नी ओळखले असेलच
व्वा!! म्हण
व्वा!!
म्हणजे याही वर्षी पावसाचा मस्त आनंद लूटता येईल..
चहा-सदरा( T-Shirt) मस्तचं दिसताहेत. तो 'मरुन' पण कीती 'जिवंत' वाटतोय ना!!
सुलेखन
सुलेखन फारसे आवडले नाही. पण केवळ मायबोलीचा टि-शर्ट म्हणुन घेणार. कदाचित प्रत्यक्ष बघितल्यावर अवडेल अशी आशा धरुन.
=== I m not miles away ... but just a mail away ===
मिहीर,
मिहीर, फोटोतल्या अक्षरान्च्या आकारापेक्षा, किमान पाचपट मोठा आकार प्रत्यक्षातल्या अक्षरान्चा असणार आहे, तेव्हा ती चान्गलीच दिसतील असे वाटते काळजी नसावि
लिम्बू ...
लिम्बू ... आकार काहीही असला तरी मला ते सुलेखनच आवडले नाहीये. त्यामुळे प्रत्यक्षात चांगली दिसण्याचा प्रश्नच नाही. कारण विचाराल तर me too somewhat agree with Kuldeep. मलाही ते चित्रामधे जरा मयबेली वाटतय. नीट लक्ष देउन बघितले की समजते, पण मग सुलेखन म्हणजे कसेही, कुठल्याही अंतरावरुनही बघितल्यावर नीट समजले पाहीजे आणि स्पष्ट दिसले पाहीजे. अर्थात हे पूर्णपणे माझे मत. त्यामुळे ह्यावरुन कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये ही इच्छा !!
=== I m not miles away ... but just a mail away ===
Pages