४ वाटी नारळाचा चव..[मी २ नारळ घेतले आहेत]
३ वाटी साखर.
२ वाटी मिल्क पावडर..][मी नेस्टले एव्हरीडे मिल्क पावडर वापरली आहे.]
१ टी स्पून वेलची पूड..
या वड्या करण्याची पद्धत नेहमीपेक्षा वेगळी आहे पण सोपी आहे.
.मिश्रण सैल होणे,खूप गोड होणे वगेरे प्रकार होत नाही..
नारळ खवल्यावर तो चव फ्रीज मधे ३ ते ४ तास ठेवावा.वड्या करायच्या १५ मिनिटे आधी फ्रीज बाहेर काढुन ठेवा..असे केल्याने त्यातील पाणी आळते व चव कोरड होतो..
आता जाड बुडाच्या प्रेशर पॅन /कढई मधे चव व साखर हाताने एकत्र कालवुन घ्या.
मध्यम गॅस वर हे मिश्रण उलथन्याने सतत ढवळत शिजायला ठेवा.
आधी साखरेचा पाक होऊन मिश्रण पातळ होईल नंतर ते शिजु लागेल.
मिश्रण घट्टसर झाले कि गॅस बंद करा .वेलची पूड टाकुन एकदा ढवळा.
आता त्यात मिल्क पावडर थोडी-थोडी घालुन मिश्रण छान घोटुन घ्या.
मिश्रणाचा घट्ट गोळा तयार होईल..
एका ताटाच्या मागील बाजुस तूपाचा हात लावुन त्यावर हा शिजलेला गोळा पसरा.नंतर लाटण्याला तूपाचा हात लावुन ते या मिश्रणावर फिरवा.त्यामुळे एकसारखा पातळ थर तयार होईल.आता सुरीने वड्यांचा आकार कापा.थंड झाल्यावर या वड्या सुरी/उलथन्याने सोडवुन डब्यात भरा..
१]खवलेला नारळ फ्रीज मधे कमीत कमी २ ते ३ तास ठेवावा.
२] मिल्क पावडर वापरल्याने वडी पांढरीशुभ्र होते.खुटखुटीत होते.
वॉव..सोपी आहे
वॉव..सोपी आहे रेसिपी.....मस्त...फोटो कुठाय????
अनिश्का, धन्यवाद.फोटो दिला
अनिश्का,
धन्यवाद.फोटो दिला आहे.
.
छान आहे गं.......असा पटकन हात
छान आहे गं.......असा पटकन हात घालुन काढता आला असता तर????
मस्त. आईच्या हातच्या वड्यांची
मस्त. आईच्या हातच्या वड्यांची आठवण आली.
स्लर्प
स्लर्प
छान आहे . आजच करणार.
छान आहे . आजच करणार.
छानेत!
छानेत!
मस्त आहेत.
मस्त आहेत.
वॉव सुलेखा.. कित्ती मस्त? मला
वॉव सुलेखा.. कित्ती मस्त?
मला खोबर्याची वडी भयंकर आवडते.
आहाहा.... मस्त दिसतायत वड्या!
आहाहा.... मस्त दिसतायत वड्या!
http://www.maayboli.com/node/19025 माझी रिक्षा
मस्त.! साबांच्या हातच्या
मस्त.! साबांच्या हातच्या वड्यांची आठवण आली.त्या त्यात बटाटे कुस्करून घालायच्या.मी गुळाच्या करते. त्याही
खमंग होतात.
छान दिसताएत वड्या. एक शंका,
छान दिसताएत वड्या.
एक शंका, मिल्क पावडर सगळ्यात शेवटी मिश्रण शिजवल्यावर घातल्याने थोडी कच्चट चव नाही लागत का?
एक प्रश्न . मिल्क पावडर च्या
एक प्रश्न . मिल्क पावडर च्या ऐवेजी काजु पावडर चालेल का ?
नाही लागत कच्चट चव. खवा
नाही लागत कच्चट चव. खवा घातल्यासारखी चव येते. अर्थात मी दोन वाट्या मिल्क पावडर घालून नाही केल्या कधी वड्या. जास्तीत जास्त दोन डाव वगैरे घातली आहे मिल्क पावडर वड्यांमधे.
ओके. करून बघेन. मला आवडतात
ओके. करून बघेन. मला आवडतात नारळाच्या वड्या.
मस्त! मी पण मिल्क पावडर घालून
मस्त! मी पण मिल्क पावडर घालून करते नारळाच्या वड्या.
मी २ वाट्या नारळाचा चव असेल तर अर्धी वाटी मिल्क पावडर घालते. पण गॅस बंद केल्यावर नाही घालत. मि पा घातल्यावर एखादं मिनीट ठेवते गॅसवर. मिश्रण आळत आलं की २ चमचे साखर पुन्हा घालायची. त्याने वड्या शुभ्र आणि खुटखुटीत होतात.
काल केलेल्या वड्यांचा हा झब्बू.
सह्ही दिसतायत वड्या बिल्वा
सह्ही दिसतायत वड्या बिल्वा
बिल्वा, वड्या देखण्या आहेत!
बिल्वा, वड्या देखण्या आहेत!
मस्त रेसीपी सुलेखा. माझ्या
मस्त रेसीपी सुलेखा. माझ्या मामीनी यात कोको पावडर घालून केल्या आहेत. बरेचदा गुलकंद घालून पण करतात.
बिल्वा वड्या मस्त दिसत आहेत.
अहा..मस्तच !
अहा..मस्तच !
बिल्वा वड्या मस्त आहेत!
बिल्वा वड्या मस्त आहेत!
मिल्क पावडर च्या ऐवेजी काजु
मिल्क पावडर च्या ऐवेजी काजु पावडर चालेल का ?
वॉव सुलेखा,सुबक आहेत
वॉव सुलेखा,सुबक आहेत वड्या...
बिल्वा,तुझ्या ही मस्त दिसत आहेत
माझी पण रिक्शा
माझी पण रिक्शा http://www.maayboli.com/node/35170
सुलेखा तुझ्या वड्या छानच
सुलेखा तुझ्या वड्या छानच आहेत.
त्याने वड्या शुभ्र आणि
त्याने वड्या शुभ्र आणि खुटखुटीत होतात. >> धन्यवाद बिल्वा. तुझ्या पद्धतीने एकदा करुन बघेन.
मला अश्या पांढर्या शुभ्र वड्या करणार्यांच फारच कौतुक वाटत.
सुलेखा यांच्या वड्या पण मस्तच.
मोगम्बो खुश हुवा मला ढोकळा चि
मोगम्बो खुश हुवा मला ढोकळा चि रेसिपि हवि आहे
वाह..काय कमाल दिसत आहेत
वाह..काय कमाल दिसत आहेत वड्या....सोप्या आहेत...करून बघणार...
@बिल्वा एक नंबर आहेत वड्या....
स्लर्प ऽ.... दोन्ही वड्या
स्लर्प ऽ....
दोन्ही वड्या भारीएत अगदी ....
सुलेखाताई काल तुमच्या
सुलेखाताई काल तुमच्या पद्धतीने नारळी वड्या केल्या. काय पटकन आणि चविष्ट झाल्या हो.