२०० ग्राम छोले
१ मध्यम बटाटा
२ मध्यम कांदे
२ टोमॅटो
चिंचेचा कोळ
गुळ
आले मिरची पेस्ट
धने जिरे पूड
कसुरी मेथी
आमचूर पावडर
छोले मसाला
तिखट
मीठ
तेल
जिरे
हळद
छोले रात्रभर गरम पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी प्रेशर कुकरमध्ये छोले शिजण्यास टाकावे. त्यासोबतच एका छोट्या सुती कापडात साधारण १ टेबल स्पून चहा पावडर बांधून ती कापडाची पुरचुंडी ह्या छोले सोबतच शिजवायला टाकावी म्हणजे छोल्यांचा रंग कायम राहतो. त्यासोबतच बटाटा पण शिजवून घ्यावा. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. आले मिरचीची पेस्ट करून ठेवावी. उकडलेला बटाटा कुसकरून ठेवावा. शिजवलेल्या छोल्यातले अगदी थोडे छोले बाजूला करून मिक्सरवर वाटून ठेवावे.
गरम तेलात जिरे, हळद घालून फोडणी करून घ्यावी. त्यानंतर आले मिरची पेस्ट परतून घ्यावी. बारीक चिरलेला कांदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. त्यानंतर टोमॅटो मउ होईपर्यंत परतून घ्यावा. आता चिंचेचा कोळ घालून २ मिनिट परतावे. बटाटा आणि वाटलेले छोले टाकून परतावे, यामुळे ग्रेवी दाट होण्यास मदत होते . कसुरी मेथी घालून परतावे. शिजवलेले छोले टाकून परतावे. आपल्याला जितका रस हवा असेल त्यानुसार गरम पाणी घालावे. मीठ, गुळ , आमचूर पावडर, धने जिरे पूड, तिखट, छोले मसाला सगळे घालून २/३ उकळी येऊ द्यावयात.
सोपी आहे पाकृ! पण चहाचा वास
सोपी आहे पाकृ! पण चहाचा वास नाही का लागत छोल्यांना?
शिजवताना लसूण ठेचून घालायचा
शिजवताना लसूण ठेचून घालायचा आणि दालचिनीचे काही तुकडे छोल्यांत टाकायचे..
छोल्यांना मस्त स्वाद येतो अशाने...
चहाचा वास बाकी छोले मसाला आणि
चहाचा वास बाकी छोले मसाला आणि इतर गोष्टींच्या वासात लक्षातही येत नाही पण चहा पुरचुंडी टाकणे हे ऑप्शनल आहे. मला स्वतःला लसून चिंच गुळ बरोबर नको वाटतो पण टाकल्यास हरकत नाही. मुळात ही पाक्रु तीच तीच रेसिपी करून कंटाळा आला असल्यास पंजाबी छोलेला एक चांगला पर्याय आहे.