ही पाककृती मी ट्राय केलेल फिलोपिनो स्टिकी राईस केक - 'बिखो' - चे देशी व्हर्जन आहे
साहित्यः
२ कप नारळाचे दूध
२ कप पाणी,
२ कप चिकटसर शिजणारा ग्लुटेनस तांदूळ (मी जॅस्मिन राईस वापरलाय)*
पाव कप नारळाचा चव / डेसिकेटेड कोकोनट (ऑप्शनल)
साख / ब्राऊन शुगर चवीनुसार
१ टबल स्पून तूप + थोडे पॅन ग्रीस करायला लागेल
केशर-वेलची सिरप / लवंग / जायफळ - आपल्या आवडीनुसार स्वाद निवडा.
सजावटीसाठी बदामाचे काप वगैरे वगैरे....
कॅरॅमल टॉपिंग (ऑप्शनल):
१ कप नारळाचे दूध
१ कप कंडेन्स्ड मिल्क
चमचाभर ब्राऊन शुगर
स्वादासाठी - वरती केक साठी जो स्वाद वापरलाय तोच (ऑप्शनल)
क्रमवार कृती:
१. ऑव्हन १८० डिग्री सेंटीग्रेड ला तापत ठेवा.
२. एका चौकोनी / आयताकृती बेकिंग डिश ला तूप लाऊन घ्या.
३. एका पातेल्यात नारळाचे दूध + पाणी + आपल्या आवडीचा स्वाद एकत्र करा. त्यात तांदूळ घालुन एक उकळी येऊ द्या. आणि मग मंद आंचेवर पाणी/ना दूध आटुन भात शिजेपर्यंत ढवळत रहा. भात खाली लागु देऊ नका.
४. आता आंच बंद करुन त्यात साखर आणि तूप घालुन नीट ढवळून घ्या.
५. हा तयार भात, तूप लावलेल्या बेकिंग डिश मधे ओता आणि साधारण १५ मिनीटे बेक करा,
६. कडा ब्राऊनीश झाल्यावर बाहेर काढा आणि बदाम वगैरे लावुन सजवा.
७. कोमट झाल्यावर तुकडे कापा आणि खा
टॉपिंग वापरणार असाल तर... स्टेप ५ नंतर पुढे....
६. भात बेक होत असताना एकीकडे टॉपिंगसाठीचे ना दूध + कंडेन्स्ड मिल्क + ब्राऊन शुगर + आपल्या आवडीचा स्वाद एका पातेल्यात एकत्र करा आणि मध्यम आंचेवर गरम करायला ठेवा.
७. मिश्रण मधुन मधुन ढवळत रहा. मिश्रण साधारण घट्ट व्हायला लागले की आंच बंद करा.\\
८. आता ओव्हन मधला केक काढुन त्यावर हे टॉपिंग नीट पसरा.
९. अजुन साधारण १५ मिनीटे बेक करा.
१०. वरतुन खोबरे/ बदाम काप वगैरे पसरा.
११. केक कोमटसर झाला की चौकोनी तुकडे कापुन खा... व्हिप्ड क्रिम / व्हॅनिला आईस्क्रिम बरोबर सर्व्ह करा.
आंतरजालावर भटकताना 'बिखो' नावाचा प्रकार बघितला. कन्सेप्ट आवडली म्हणून करुन बघावा म्हंटल पण मुहूर्त लागेना. शेवटी आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रसादालाच हा प्रकार करायचे ठरवले
बिको हा मूळ फिलिपिनो रेसिपी आहे. यात तांदूळ, नारळाचे दूध आणि पाम शुगर हे मुख्य घटक. स्वादासाठी पॅनदॅन ची पाने वापरतात.
मी देशी व्हर्जन म्हनून आपण नारळी भातासाठी जे जिन्नस वापरतो ते वापरले आहे (ना दूध सोडुन). याची चव नारळीभातासारखीच लागते, फक्त जरा खरपूस कॅरॅमल टॉपिंग घातले तर आणखिनच छान लागते
अधिक टीपा:
१. ग्लुटेनस राईस वापरल्याने केक मधे बाईंडींग साठी अंडे वगरे घालायची गरज पडत नाही.
२. साखरे ऐवजी गूळ, ब्राऊन शुगर वापरता येइल.
३. मी केशर सिरप + लवंग फ्लेवर वापरला आहे. व्हॅनिला, बटरस्कॉच असे फ्लेवर्स ट्राय करता येतिल.
४. नारळाचा चव ऑप्शनल आहे. मी अर्ध्या मिश्रणात चव घातला आनि अर्ध्यात नाही (नवर्याला आवडत नाही). त्याऐवजी बदाम्/काजु वगरे पावडर वापरु शकता येइल.
५. चॉककलेट फ्लेवर पण ट्राय करता येइल
लाजोजी, स्लर्पी.. तोंडाला
लाजोजी, स्लर्पी.. तोंडाला पाणी सुटलं..
माझ्या नावचा एक घास काढून मग खा, नाहीतर पोट दुखणार तुझं नक्की.
आवडला हा प्रकार!
आवडला हा प्रकार!
वॉव! मस्त.. मी तुझ्या घरी /
वॉव! मस्त.. मी तुझ्या घरी / शेजारी राहायला येवु का?
लाजो, जियो यार!! तुस्सी ग्रेट
लाजो, जियो यार!! तुस्सी ग्रेट हो!!
फोटो तर कमाल आलाय!
यम्म्म..
यम्म्म..
लाजो, हे प्रकरण मस्त दिसतंय
लाजो, हे प्रकरण मस्त दिसतंय एकदम. कॅरॅमल टॉपिंगनं तर आणखीनच मजा येईल.
मस्तच दिसतंय. असाच एक
मस्तच दिसतंय.
असाच एक श्रीलंकन पण प्रकार असतो. नारळाचे दूध आणि त्यांचा गूळ वापरून करतात.
नाही आवडली ही पाकृ समहाऊ
नाही आवडली ही पाकृ समहाऊ
धन्यवाद! मामी<<< मला आनि
धन्यवाद!
मामी<<< मला आनि नवर्यालाही कॅरॅमल टॉपिंग वाला जास्त आवडलाय
दिनेशदा<<< हो. आपल्या एशियाई रिजन मधे जवळ जवल सगळ्याच देशात नारळ + तांदुळ वापरून गोड पदार्थ केले जातात
मंजुडी<<< नो वरीज ... फक्त का नाही आवडली ते सांगशिल का?
मंजूडी +१. फोटोवरून तरी मला
मंजूडी +१. फोटोवरून तरी मला अॅपेटायझिंग नाही वाटला हा प्रकार.
तयार वड्यांचे फोटो मलातरी खूप
तयार वड्यांचे फोटो मलातरी खूप अॅपेटायझिंग वाटले पण तरिही हा प्रकार आधी कोणीतरी केलेला आयता खाउन बघितल्याशिवाय करावासा वाटत नाहीये हे खरं. भाताच्या गोड वड्या ही आयडिया मला (मनाला) टेम्टिंग वाटत नाही हे माझं कारण.
लाजो, न धुतलेला, न परतलेला
लाजो, न धुतलेला, न परतलेला चिकट तांदूळ थेट शिजवून पुन्हा बेक करून खाणे ही कल्पनाच मला अपील झाली नसावी बहुतेक... शिवाय गोड भाताच्या वड्या आणि त्यावर मिल्कमेडचं टॉपिंग.
पण हे काही तुला उद्देशून नव्हे, मी एकूणातच 'बिखो' या मूळ पाकृबद्दल म्हणते आहे.
हा पदार्थ तू लिहिलायस म्हणून 'नाही आवडला' असं म्हटलं तरी...
सुन्दर. यम्मीच लागणार हे
सुन्दर. यम्मीच लागणार हे प्रकरण!
Filipino/Vietnamese/Thai desserts साठी taste develop झाल्या शिवाय बर्याच जणान्ना हे झेपणे कठीण.
मला आवडला हा प्रकार. थोड्या
मला आवडला हा प्रकार. थोड्या प्रमाणात करून बघेन एकदा.
ओके मंजुडी.... न धुतलेला, न
ओके मंजुडी....
न धुतलेला, न परतलेला चिकट तांदूळ थेट शिजवून पुन्हा बेक करून खाणे <<< तांदूळ न धुता वापरणे मलाही पटत नाही त्यामुळे मी २ वेळा पाण्यातुन काढलाच. परतायची गरज नाही कारण बेक करतोय आणि चिकट रहात नाही कारण बेक केल्यावर चिकटपणा जाणवत नाही...व्यवस्थित खुटखुटीत झाल्यात वड्या....मिल्क्मेडचे टॉपिंग बेक केल्यामुळे थोडे सॉफ्ट टॉफी सारखे झाले आहे... चिवट/चिकट नाही...
मुळ पाककृती मधे मला हवे ते बदल मी केलेत त्यामुळे घरी आणि मैत्रिणींना दिला त्यांना आवडले.... असो... पसंद अपनी अपनी
शुम्पे, पार्सल करु का?
Filipino/Vietnamese/Thai desserts साठी taste develop झाल्या शिवाय बर्याच जणान्ना हे झेपणे कठीण<<< खर आहे म्हणूनच मी ओरिजीनल रेसिपी मधे वापरलेले पॅनडॅन नाही वापरले.. कारण तो स्वाद आवडेल असं वाटलं नाही/.... देशी फ्लेवर्स वापरले.
व्वा! मस्तच! मला स्टिकी राइस
व्वा! मस्तच!
मला स्टिकी राइस विथ मॅन्गो (थाय) आवडतो म्हणजे हा नक्कीच आवडणार!
करुन खाणार आणि तुला फक्त
करुन खाणार
आणि तुला फक्त फोटो देणार
नेहमीच्या नारळी भातापेक्षा
नेहमीच्या नारळी भातापेक्षा वेगळी पण नारळाचे दुध व टॉपिंग मुळे चव छान असणार !!
खूपच मस्त एकदा करुन पहाणार
व्वा! मस्तच..........
व्वा! मस्तच..........
शुम्पे, पार्सल करु का?>> नेकी
शुम्पे, पार्सल करु का?>> नेकी और पूछ पूछ?
पानदानसाठी पर्याय म्हणून
पानदानसाठी पर्याय म्हणून केवडा इसेन्स वापरता येईल. ते झाड याच कूळातले आहे.
धन्यवाद पानदानसाठी पर्याय
धन्यवाद
पानदानसाठी पर्याय म्हणून केवडा इसेन्स वापरता येईल. ते झाड याच कूळातले आहे.<<<<, हम्म.... केवडा फ्लेवर मला एव्हढा आवडत नाही... खुप स्ट्रॉंग वाटतो.....
मस्तच ..
मस्तच ..