भ्रमंती : यमाई देवी मंदिर, औंध संस्थान

Submitted by मुरारी on 19 August, 2013 - 12:45

चित्रगुप्त यांनी सुरु केलेल्या चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी धाग्यामुळे पाच सहा महिन्यांपूर्वी साताऱ्याजवळील औंध येथे केलेल्या भ्रमंतीची आठवण झाली .

औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्रीमूळपीठ देवीचे जागृत स्थान आहे. शिवाय गावात पद्माळें, नागाळें व विशाळें हि तीन तळी अस्तित्वात होती, त्यापैकी विशाळे हे तळे बुझलेले आहे. व उर्वरित दोन तळी अस्तित्वात आहेत.
इ.स. १००० ते ११५० पर्यंत औंध वरती देवगिरीच्या यादवांचा अंमल होता.
सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात.
१६ शतकात शिवाजींनी बादशाही विरुध्द अभारलेल्या बंडा मुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजल खानाने तुळजापूर व पंढरपूर हि ठिकाणे फोडल्यावर औंधकडे मोर्चा वळवला तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्रीयामाई देवीला लहानश्या देवळात बंध करून टाकले व तिच्या देवळाला मास्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध मधील दीपमाळ व तिचे सौदर्य पाहून अफजल खानाचे सुध्दा तिला फोडण्याचे धाडस झाले नाही असे बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे.
इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतरच्या १८११ चा कालावधी वागळ्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा अंमल चलू राहिला.

संदर्भ: औंध संस्थानाचा माहिती फलक

अतिशय सुंदर असे राजेशाही यमाई देवीचे मंदिर हे तेथे असलेल्या लाजवाब चित्रांमुळे अधिकच खुलून दिसते
सदर चित्रे हि राजा रवि वर्माने काढली आहेत असे म्हणतात , इतक्या वर्षांनंतर सुद्धा हि चित्रे तितकीच ताजी , मोहक वाटतात .

१. देवळाच्या सुरुवातीस असलेली हि प्रचंड दीपमाळ
lklkj

२. देऊळ हे एखाद्या राजवाड्यासार्खेच सजलेले आहे
lklkj

३.छतावर असलेले नक्षीकाम आणि काचेची मौल्यवान झुंबरं
vgg

प्रत्येक खांबावर २ मोठी या हिशोबात चित्र लावलेली आहेत.
चित्रांमध्ये अगदी दुर्गा सप्तशती ते शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग चितारलेले आहेत

४. vv

५. a

६.a

a

८.dd

९.a

१०.a

११.a

१२.b

१३.a

१४.a

१५.a
१६.a
१७.a
१८.a
१९.a
२०. a

देवळाबाहेरील एक वीरगळ
a

देवळाचा सुंदर कळस
aa

राजवाड्याची पडझड झाल्याने तो पर्यटकांना बघू देत नाहीत .
एकूण चित्रकलेची आवड असणार्यांना यमाई देवीचे देऊळ म्हणजे खाशा पर्वणीच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

औंध बद्दल ऐकून आहे आणि एकदा जायचे आहे . मुंबई पुणयाकडून रेल्वेने आल्यास कुठे उतरावे ?साताऱ्याहून कोणती बस जाते ?चित्रे नी माहितीमुळे उत्सुकता वाढलीय .

यमाई देवीचे मंदिर फार सुंदर आहे.

देवळातील चित्रे औंध संस्थानचे राजे श्रीमंत भवानराव उर्फ बाळासाहेब महाराज पंतप्रतिनिधींनी स्वतः काढलेली आहेत. ते उत्कृष्ट चित्रकार होते. त्यांच्या निमंत्रणावरुन राजा रविवर्मा औंध संस्थानामधे येऊन राहिले होते, त्यांनी तेथे चित्रेही रंगवली. मात्र ती चित्रे औंधच्या म्युझियममधे ठेवलेली आहेत. सैरन्ध्री, दमयंती इत्यादी. फार फार सुंदर पेंटींग्ज आहेत ती. औंधचं हे म्यूझियम खास बघावं असंच आहे. ठाकूरसिंगांचं 'ओलेती' हे सुप्रसिद्ध तैलचित्रही तेथे आहे. त्याव्यतिरिक्त हेन्री मूरचे चाइल्ड अ‍ॅन्ड मदर हे शिल्प, फ्रान्सिस गोयाची तसेच इतरही वेस्टर्न युरोपियन पेंटर्सची भवानरावांनी स्वतः जमवलेली चित्रे, त्यांच्या खाजगी संग्रहातली सोळा हजारांहून अधिक पुस्तके असलेली रिसर्च लायब्ररी असा बहूमोल खजिना या म्यूझियममधे पहायला मिळतो. खूप सुंदर परिसर मेन्टेन केला आहे हा.

जवळच किन्हईच्या देवीचेही मंदिर आहे, त्यातही फार सुंदर तैलचित्रे टांगलेली आहेत. त्यात काही चित्रकार धुरंधरांचीही पेंटींग्ज आहेत.

धन्यवाद! दर्शन झाले.

आमची दोन कुलदैवते! जेजुरी आणि कोल्हापूरची अंबाई! पण काही वर्षांपूर्वी माझ्या एका काकांनी असे सांगितले की खरे तर आपले कुलदैवत कोल्हापूरची अंबाबई नसून औंधही यमाई आहे. आजवर दर्शन झालेले नव्हते, तुमच्यामुळे झाले, यासाठी आभार! प्रत्यक्ष जायची इच्छा आहेच.