फुलपाखरू (बडबड गीत)

Submitted by सत्यजित on 14 April, 2008 - 05:03

फुलपाखरू फुलपाखरू
पिवळं पिवळं धम्मक
कधी फुल कधी पाखरू
कशी करत गंम्मत

सगळ्यांना फसवून
खदाखदा हसतं
पंखांचे हात करुन
टाळ्या पिटत बसतं

इकडे तिकडे बागडून
खुप खुप थकलं
मधाच कोल्ड्रींक पित
फुलावर बसल

उडता उडता फुलपाखरू
एकदम गडप झालं
जादुचा मध पिऊन
त्याच फुल होतं झाल...

मी जादूची काडी काढून
सुर्रकन फिरवली
फुल झाली फुलपाखरं
भुर्रकन उडवली... Happy

-सत्यजित.
सत्याच्या पलिकडले...

गुलमोहर: 

गोड आहे रे सत्या फुलपाखरू : )

सत्यजित, फुलपाखरू छानच आहे. तू कविता मधे का नाही टाकत. ही अद्भूतरम्यता कवितेतच असते. असा अद्भूतातला प्रवास खूप छान असतो नाही. जी.ए.कुलकर्णी म्हणतात की नाही कळला अर्थ कवितेचा तर तिच्या शब्दांवरून फुलपाखरासारख हिंडून यायच. इथे तर तुझी कविताच फुलपाखरू झालय.

सत्यजित, मी बेडेकर एम शी सहमत. इतका सुंदर कल्पना विलास खुप अप्रतिम

हे काहिच्या काही नाही. हे काहिच्या काही छान आहे.

छान आहे कविता...फुलपाखरासारखी Happy