Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 October, 2012 - 05:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी मुगडाळ
१ मोठा कांदा
१ चमचा आल्,लसुण,मिरची,कोथिंबीर पेस्ट
२ चिमुट हिंग
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा गोडा मसाला (ऑप्शनल)
तेल
चवीनुसार मिठ
क्रमवार पाककृती:
मुगाची डाळ ४-५ तास भिजत ठेवा. नंतर धुवुन पाणी निथळवून ती मिक्सरमधुन वाटून घ्या. वाटताना पाणी आजिबात घालू नका.
आता वरील जिन्नसातील तेल सोडून सगळ वाटलेल्या डाळीत एकजीव करा.
कढईत तळण्यासाठी तेल गरम करत ठेवा. चांगले तापले की त्यात चमच्याने छोट्या छोट्या भज्या टाका.
चांगल्या खरपूस झाल्या की सर्व्ह करा. सोबत सॉस, चटणी काहीही चालेल.
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी १ प्लेट
अधिक टिपा:
मुगाची डाळ पथ्याची, पचायला हलकी म्हणून आजारी, चणाडाळ न चालणार्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
ह्याच मिश्रणात पालेभाज्या कापुनही मिक्स करता येतात.
गॅस नेहमी मिडीयम ठेवायचा.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त जागू.
मस्त जागू.
जागू, मस्त भजी ! ( पण आराम कर
जागू, मस्त भजी !
( पण आराम कर थोडे दिवस आणखी !)
मस्तच !!! दिनेशदांना अनुमोदन
मस्तच !!! दिनेशदांना अनुमोदन
स्वाती, दिनेशदा, नुतन
स्वाती, दिनेशदा, नुतन धन्यवाद.
हो सध्या जेवण मी करत नाही. बाई ठेवली आहे जेवण करण्यासाठी. हे असे नाश्त्याचे प्रकारच मोठ्या लेकीसाठी करते शाळेतून आल्यावर खाण्यासाठी. स्वयंपाक घरात काही बनवले नाही की चैनच पडत नाही मला. बाकीचा वेळ आरामच करते.
जागू काय उपासाच्या दिवशी
जागू काय उपासाच्या दिवशी त्रास देतेस.:फिदी:
मस्त! कुरकुरीत दिसतायत भजी. मोठी लेक सध्या जाम खुशीत असेल, आई तिची पण काळजी घेतेय बाळाबरोबर.
टुनटुन ती मला सांगते आता तू
टुनटुन ती मला सांगते आता तू कधीच ऑफिसला जाऊ नकोस
जागुतै, मस्तच फोटो आणि
जागुतै, मस्तच फोटो आणि पाकृ!
आणि तुला केव्हढा उत्साह आहे!
मागच्या आठवड्यात गणपति बाप्पांच्या दर्शनासाठी/आरतीसाठी आलेल्यांसाठी केलेल्या स्वयंपाकात दोनवेळा मुग-भजी केली. पण एकदाही फोटो काढायचे किंवा पाकृ लिहायचे सुचले नाही!
नैवेद्याच्या पदार्थात कांदा-लसुण चालत नसल्याने कांदा-लसुण न घालता केली होती. तशीही चांगली लागतात.
मस्त दिसतात भजी. फार
मस्त दिसतात भजी. फार वर्षापुर्वी एका गुजराथी काकींकडे खाल्ली होती मुगाची भजी. त्यात त्यांनी काळेमिरी टाकली होती.
मला एक सांग, ही मुगाची भजी, मेदुवडे यासाठी डाळ किती वेळ भिजवायची आणि वाटल्यावर कितीवेळाने तळावेत? कारण असे डाळ भिजवलेले माझे पदार्थ खुप तेलकट होतात. पुर्वी भारतात मी असे प्रकार केले तर तेवढे तेलकट होत नव्हते. पाणी, हवामान याचा काही परिणाम होत असेल का?
मूगाची डाळ ४ तास आणि ऊडदाची
मूगाची डाळ ४ तास आणि ऊडदाची डाळ ६ तास भिजवली तर पुरते.
वाटल्यावर लगेच करायचे. ( गरज असल्यास म्हणजे कृतीत लिहिलेले असल्यास फेटून वगैरे, आंबवायचे असेल तर मात्र, आंबल्यानंतरच पण सहसा वड्यासाठी आंबवत नाहीत.)
पाणी आणि हवामानाचा नाही, पण तेलाचा आणि तेलाच्या तपमानाचा, तळण्याच्या वेळाचा परीणाम होतो.
ह्यात बडिशोप आणी आल्याचे
ह्यात बडिशोप आणी आल्याचे बारिक तुकडे पण खुप मस्त लागतात.
धन्यवाद दिनेशदा. मी डाळ
धन्यवाद दिनेशदा. मी डाळ वाटल्यावर लगेच करुन बघीन.
धन्यवाद दिनेशदा. मी डाळ
धन्यवाद दिनेशदा. मी डाळ वाटल्यावर लगेच करुन बघीन.
जागु मस्तच रेसिपी आणि सोपी
जागु मस्तच रेसिपी आणि सोपी सुद्धा. कुरकुरित पणा साठी काय घालतेस?
मस्तच. महालक्ष्मी च्या देवळात
मस्तच.
महालक्ष्मी च्या देवळात गेल्यावर मागच्या बाजूला मिळणारी मूगडाळ भजी खावीच हा नियम आहे.
मस्तच फोटो आणि पाकृ.........
मस्तच फोटो आणि पाकृ.........
सही जागुतै. थोडी भिजलेली
सही जागुतै. थोडी भिजलेली मुगडाळ बाजुला काढून, नंतर वाटलेल्या डाळीत मिक्स करावे. छान लागते मध्ये मध्ये अशी डाळ.
सगळ्यांचे धन्यवाद. दक्षीणा अग
सगळ्यांचे धन्यवाद.
दक्षीणा अग मी कुरकुरीत होण्यासाठी काही घालत नाही. गॅस मंद पेक्षा जास्त ठेवायचा आणि भजी तळायची मग कुरकुरीत होतात.
जागु, मस्त आणि सोपी रेसिपि.
जागु, मस्त आणि सोपी रेसिपि. धन्यवाद.
आणखी एक टिप अर्धी सालासकट
आणखी एक टिप अर्धी सालासकट मुगाचि डाळ आणी अर्धी बिन्सालाची दाळ घ्यायची..एक्दम क्रिस्पी होतात.
मस्त होतात ही भजी. आज केली
मस्त होतात ही भजी. आज केली होती. फक्त ऐन वेळी पीठ थोडे पातळ वाटले म्हणून मी तांदळाची पिठी टाकली होती. धन्यवाद जागू.
मस्त! आले + लसूण न घालताही
मस्त! आले + लसूण न घालताही छान होतात.चेंबूरला लाल तिखटाची मूग भजी मिळतात.त्यात कांदा नसतो.
चव अगदी किंचित आंबट असते. कदाचित आंबवून करत असतील.
यात मासे कोणते घालायचे ?
यात मासे कोणते घालायचे ?
मस्त रेसिपी ! मला खूप
मस्त रेसिपी ! मला खूप दिवसांपासून करायची आहेत. आता लवकरच करेन !
यात मासे कोणते घालायचे ?
यात मासे कोणते घालायचे ? >>>>
आता वरील जिन्नसातील तेल आणि
आता वरील जिन्नसातील तेल आणि डाळ सोडून सगळ वाटलेल्या डाळीत एकजीव करा.>> तेल आणि डाळ यातले डाळ काढून टाकणार का?
बाकी रेसिपी आणि फोटो फारच तोंपासू!
विजय, पराग कोलंबीचे तुकडे,
विजय, पराग कोलंबीचे तुकडे, पापलेटचा खिमा करुन तळले तरी चालतील
येळेकर, प्रज्ञा, सहेली धन्स. करते बदल.
फोटू मस्तच... माझे favourite
फोटू मस्तच... माझे favourite भजी … अप्रतिम ।पन हल्ली तळण कमी केलय…
diet Conscious लोकांना अजून एक उपाय ।हेच पीठ्ह थोडं घट्ट भिजवायचा आणि अडली पात्रात किंवा MW मध्ये होऊ द्यायचा ।अनि त्याचे काप करून ढोकळया सारखा फोडणी द्यावी ।हे हि मस्तच लग्त। अर्थात भाजिंची चव येत नाही ।पन ह्याची एक वेगळीच चव येते । शिवाय guilt free