Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35
वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????...
मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी होते अहो मध्ये. ललिचे
मी होते अहो मध्ये. ललिचे रोप्स घट्ट करेस्तोवर मी झाडावर उभी. मग केश्विचे रोप्स घट्ट करेपर्यंत मी मचाणावर उभी!!>>>
हो! आणि त्यावेळी मंजीने म्हणून घेतले की दोन्ही छत्र्या सध्या वरती आहेत
Mami la sanga baghu tya 3
Mami la sanga baghu tya 3 baalakanbaddal
७-८ वर्षांपासून मायबोलीवर
७-८ वर्षांपासून मायबोलीवर असूनही कधी ववि ला जायचा चान्स नव्हता आला त्यामुळे स्वतःच confuse होतो जाऊ कि नको त्यात बायकोला सांगीतले कि मायबोलीचा असा ववि आहे म्हणून ती लगेच तयार पण झाली
( शेवटी फिरायला जायचं आहे ना मग काय )

Registration पासून ते ववि समारोपापर्यंत सगळे नियोजन अतिशय सुंदर होते - संयोजक खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.. तुमच्या सगळ्यांमुळे अस वाटलच नाही कि पहिल्यांदाच भेट्तोय असं.
वर कुणीतरी म्हट्ल्याप्रमाणे मी पण अंदाज लावत होतो कि हा कोणता आय डी असेल वगैरे वगैरे, विनय भिडे म्हणजे मला एकदम कोणी जाड्या ४५-५० वयाचा असेल असे वाटले होते :-), आणी घारुअण्णा तर एकदम रजनीकांत स्टाईल
असो, एकदाची बस आली ठाणे स्टेशन ला आणी विनय ने हजेरी घेतल्यावर जो मंगलगाणी-दंगलगाणी सुरु झाली ती थेट विसावा पर्यंत.. खूप खूप मज्जा आली..
विसावा मधला स्विमींग पूल, त्यात व्हॉलीबॉल मग दहीहंडी चे थर( दह्याचा हंडा सोडून ) नंतर सगळ्यांचे Adventure Games..एकूणच खूप धमाल सगळी..
सगळ्यात छान म्हणजे स्कीट- अप्रतिम होते. वैभव ची खूप दया येत होती- अस वाटत होतं की गुरुजींना स्वत: उठून सांगाव कि जाउ द्या हो त्याला बिचार्याला
थोडक्यात खूप खूप धम्माल मज्जा केली..
हुश्श!! ( संपल एकदाचं- अर्धा तास लागला) आपलं वाचनच बरंय, लिहीण माझा प्रांत नाही हे कळलच असेल ना आता
सर्व संयोजक, स्कीट चे कलाकार्स, सां.स. चे कार्यकर्ते आणी वविकर्स मायबोलीकर्स खूप खूप धन्स पुन्हा एकदा.
मी केला होता हां फोन. कोण्णी
मी केला होता हां फोन. कोण्णी म्हणून लिहिलं नाइ ना हे!
काय धम्माल मजा आली !!
काय धम्माल मजा आली !! व्वा.
टू मच धम्माल
विनय भिडे म्हणजे मला एकदम
विनय भिडे म्हणजे मला एकदम कोणी जाड्या ४५-५० वयाचा असेल असे वाटले होते
>>
हो हल्ली थोडा जाडा झालाय तो
संयोजन लाभतं भिड्यांना.. लगेच
संयोजन लाभतं भिड्यांना.. लगेच गुट्गुटीत बालक तरतरीत होतात...
त्याचवेळी एका विशिष्ट
त्याचवेळी एका विशिष्ट आय-डीच्या चेहर्यावर उमटलेले "हॅ! काय बालिशपणा चाललाय! बोअर करतात च्या मारी!" हे भाव मी आणि मंजीनं पाहिले. >>> इमेल करून कळव गं, लले. फिदीफिदी>>>> अग तिच कशाला मी ही कळवू शकते तुला नाव
इतकी तर आता ओळखायला शिकलेय मी इथे राहुन राहुन 
यावेळ्च्या वविच आणखी एक
यावेळ्च्या वविच आणखी एक विशेष... बर्याच छत्र्या आणि कुळकर्णी जमा होते ...
मुंबैच्या बशीत तर... कुलकर्णी कुलं-संमेलनच करायचा घाट घालत होते....
पण छे त राहुन च गेलं
फ्रेंच आणि डुआय अशा संमेलनातुन लग्न जमतात असं एकुन होतो.. काही जमल नाही राव
better luck next Time....तोपर्यंत
आता ओळखायला शिकलेय मी इथे
आता ओळखायला शिकलेय मी इथे राहुन राहुन>>>>> कवे सगळ्यांनाच माहीती आहे.... उगाच त्यावरुन चर्चा कशाला.... पालथ्या घड्यावर सारख पाणी घालुन काही उपयोग नाही..... उगाच पाणी आणि वेळ वाया... आणि पोष्टीपण.....
अण्णा तुमची शंभर नंबरी पोस्ट
अण्णा तुमची शंभर नंबरी पोस्ट आहे ही........ म्हणजे पोस्ट नंबर १०० आहे
. उगाच त्यावरुन चर्चा कशाला.>> हे बाकी खर आहे
१०० पोष्टीत घारुआण्णा आघाडीवर
१०० पोष्टीत घारुआण्णा आघाडीवर आहेत.
मला कळवा हं कोण आयडी ते!
मला कळवा हं कोण आयडी ते!
Gharu, your post is bit
Gharu, your post is bit personal !
ववी मस्त... कविताने लिहिलेलं
ववी मस्त... कविताने लिहिलेलं आणि मुंबईकर्स ने सादर केलेलं नाटूकल पण सहीच.. त्यातून माझ्य लेकीला आवडलेलं भोलानाथचं गाणं तर एक नंबर...
अचानक काही बायकांच्या हातावर मेंदी कशीकाय अशा विचारात असतानाच पुनम ने दाखावलेली मेंदीवाली... मेंदी काढण्याची हौस .. असं बरच काही या ववीमधे... माझी लेक पण खूष मेंदी काढायला मिळाल्याने... मस्तच यावर्षीचा ववी..
तेव्हडे अॅडव्हेंचर स्पोर्टस मात्र मी मिसले... म्हाणजे गेलेच नाही तिथे ..
सार्व संयोजकांचे मनापासून आभार...
>>>> हे भाव मी आणि मंजीनं
>>>> हे भाव मी आणि मंजीनं पाहिले. <<<<< कोण? कोण ते?
वविमध्ये मेहंदी हा प्रकार पण
वविमध्ये मेहंदी हा प्रकार पण नविनच होता..
- -
तर.... १) गेल्यावर्षीचा
तर....
१) गेल्यावर्षीचा दशकपुर्तीचा नितांतसुंदर असा वविसोहळा साक्षात मायबोली प्रशासकांच्या उपस्थितीत अनुभवला. त्यामुळे यंदा वविचे वारे वहायला लागल्याबरोबरच आमच्याही घरात एका वादळाला सुरवात झाली!
२) यंदा ओवा आणि बाळओवाला पण ही धम्माल मिळावी अशा उदार विचाराने मी मोर्चेबांधणीला सुरवात केली. संयोजक आकर्षक घोषणा आणि उपक्रम घेऊन माझ्या मदतीला सज्ज होतेच!
घरच्या आघाडीवर "बघू बघू..... तारीख-ठिकाण तर कळू दे" पुढे बोलणं जाईना... मग मी ज़रा शाहाणपणा करून माळशेजला जातोय असे मधाचे बोट लावून ठेवले. जे नंतर माझ्यावरच उलटले.... तारीख कळल्यावर तर "हरे राम.. " त्याच दिवशी ओवाचे नेमके पुण्याला काही काम निघाले. आणि "यंदा जाईन तर सकुसप" अशी प्रतीज्ञा केलेल्या माझे धाबे दणाणले. ववि घडणे जवळपास रद्दच झाले.
त्या आकर्षक टी-शर्ट्स वर मात्र माझा डोळा होताच.. पण वविला जाणेच रद्द होत असल्याने उत्साह गेला होताच. आणि कामाच्या गडबडीत अंतीम तारीख केव्हा निघून गेली कळलं पण नाही.....
पण...........
३) एव्हाना आई कुठे तरी भटकायला जाऊ म्हणतेय आणि बाबाला जमत नाहिये याची कुणकुण आमच्या चिरंजीवांना लागली होतीच!! मग त्याचा त्याचा हिशोब करून त्याने "ए, कस्लं बोअर होतंय..... होमवर्क आणि तबला क्लास यातच वीकएण्ड संपतो पण... आपण आता कुठेतरी पिकनिकला जाऊ नं......... " चा घोषा लावला. आता ह्या संधीचा फायदा घेण्याइतकी मी चाणाक्ष आहेच!
"आता पावसात भटकायला कुठेतरी जायचंच, तर ववि काय वैटेय?? तुला स्वत:ला ड्रायव्हिंग पण नै करावं लागणार (शाब्बास रे माझं सुपीक डोकं! ) आणि छान ग्रुप असला तर अजून धम्माल येईल......." असा माझा घोडं पुढे दामटवण्याचा प्रयत्न! शेवटी ओवाने चक्क पुण्याचे काम पुढे की हो ढकलले!! हुर्रे!! लग्गेच इथे येऊन सगळ्यांना सतावायला सुरवात... कां ओळखा पाहू?! "टी-शर्ट" !!! आता तर टी- शर्ट उणीव जास्तीच जाणवायला लागली......
मग ज्यांनी घेतलेत, पण जे वविला जात नाहियेत त्यांच्याकडून अगदी मूळ किंमतीपेक्षा जास्ती दराने भाड्याने मिळवण्याचा पण उपाय मी सुचवून पाहिला. काही मैत्रिणी मदतीला धावून आल्याही. आणि घारूआण्णांनी प्रत्येक पिक-अप पॉइण्टवर चेंजिंग रूम्सची सोय करायला संयोजकांना सुचवून आपल्या चा-पार्टीची सोय करून घेतली!! पण म्हणतात नां, "इच्छा तिथे मार्ग" - अगदी 'प्रयत्ने कीबोर्डची बटणे बडविता टी-शर्ट ही मिळे!" असे झाले की! पुण्याहून हिम्सकूलची पोस्ट पडली आणि मला अर्जुनाप्रमाणे फक्त तो M ४० चा टी-शर्टच दिसू लागला!
४) एवढी सगळी तयारी झाल्यावर आता मोर्चा वळला, "मुंबई-पुणे बस - अंतीम रूट्स" च्या धाग्यावर. तिथे रीयाने यथेच्छ उच्छाद मांडला होताच!
बरं, एवढे करून ह्या बयेने आधी ठरल्यप्रमाणे टांगच मारली. तेवढ्यात अपेक्षेपेक्षा जास्तीच मदत योग्य स्थळी पोहोचल्याचा टी-शर्ट समितीचा धागा सुखावून गेला. आता, "चलो मुरबाड!!" (हे सगळे नमनाला घडाभर तेल बरं कां मंडळी!
संक्षिप्त चारोळ्यांवर उतारा हवाय नां?! आता घ्या!! )
५) शनिवारपासूनच लेकाची घाई/ भुणभूण, माझा फसफसणारा उत्साह यांना तोंड देत ओवाची तयारी - लेकाचा होमवर्क - पूर्ण केला, स्कूल प्रोजेक्टची तयारी - करून ठेवली, सोमवारसाठी युनिफॉर्मला इस्त्री -करून ठेवली, सोमवार-मंगळवारची डब्याची भाजी - आणून ठेवली, त्या दोघांचे स्विमिंग ड्रेस - शोधून ठेवले, संयोजकांशी बोलून पिक-अप पॉइंट ठरवला, बॅग - पॅक केली, लेकाने हट्ट केलेला खाऊ - घेतला, ओवीच्या 'हे घालू कां ते घालू, पाण्यात नक्की नको उतरू नां, टी-शर्ट मिळेल नां, रीया कां नाही येतेय, वैभ्याला फोन केलास कां" इ इ प्रश्नांना उत्तरे - दिली. ५ चा अलार्म - लावला, उत्साहाने वविच्याच गप्पा मारणार्या ओवी आणि बाळओवाला अखेरीस झोपवले!
६) एकदाचा तो चिरप्रतीक्षित 'ववि'वार उजाडला! आम्ही आवरून आंघोळी उरकेपर्यंत वैभ्याचे ३ फोन!! देवा रे! मला वाटले आता बस चुकतेय आपली........ पण माझ्यावरून परीक्षा केली असल्याने ओवा निवांत.... शेवटी ६ ला वैभवला फोनले..... तर बस दादरहून सुटत होती! संयोजक, लक्ष द्या! मग निवांत रमत गमत ६.३० ला स्टॉपवर आलो..... तरी बसचा पत्ता नाही.... मग परत फोनले, तर जाई यांना उशीर झाल्याचे कळले....
बरीच वाट पाहिल्यावर आणि बर्याच बसेस गेल्यावर शेवटी एका बसच्या खिडकीत एकदाचे 'देवदर्शन' झाले!! हुर्रे!! चढलो एकदाचे! बाकी, बस म्हणजे संयोजकांच्या कल्पकतेची कमालच होती हां!!
आता वर्षेत विहरायला जायचंच, तर भिजायला पाहिजेच! गळके छत आणि खिडक्या, ओल्या सीट्स आणि खाली साचलेले पाणी असलेली बस ठरवून संयोजकांनी त्यांच्यापरीने पुरेपूर काळजी घेतली होतीच! कमी सीट्स आणि जास्तीतजास्त भरती करून गाणी-बजावणीवाले शेवटर्यंत बसूच शकणार नाही अशीही व्यवस्था केली होती!
७) बसल्यापासून लेकाचा एकच प्रश्न - "ठाणे कधी येणार?" कारण ठाण्यापासूनच खरा कल्ला सुरु होतो असं त्याला सांगितलं होतं नां! त्याला 'कल्ला' म्हणजे काय ची जाम उत्सुकता!
मग एकेक पिक-अप पॉइंट कव्हर करत करत ठाण्यात येऊन धडकलो........... आणि सुरु झाली खरी ववि धम्माल! वैभवची ढोलकी रंगात येऊ लागली! आनंदसुजू, घारूआण्णांनी आपापल्या जागा धरल्या, आ.मै., विनय, बा.बु., नील, आयडू इ इ खंदे शिलेदार सरसावून बसले.... आपलं उभे राहिले मोक्यांच्या जागी.... मग काय - "गणपती बाप्पा मोरया" करून मंगलगाणी- दंगलगाणी सुरु!!!! अगदी अभंग, भक्तीगीते, बडबडगीतांपासून ते सगळी लेटेश्ट हटके गाणी हजेरी लावून गेली! आणि गाण्यांची विडंबने तर काही विचारूच नका!! ढोलकीचा ताल, सगळ्यांचा साभिनय सूर, विडंबनामुळे उडणारे हास्याचे फवारे, त्यातच बसला बसणारे धक्के, कचाकच लागणारे ब्रेक्स, अजुबाजूच्या ट्रॅफिकच्या बसवर रोखलेल्या उत्सुकतेच्या नजरा, मधेच कोसळणारा पाऊस, सगळीकडे आग्रहाने फिरणारा आणि हातोहात संपणारा खाऊ या सगळ्याची मिळून अश्शी काही भट्टी जमून येते, की ही सगळी फक्त त्यांतला एक होऊन अनुभवायचीच बाब आहे मंडळी!
८) या सगळ्यात 'विसावा' कधी आला कळले पण नाही!
अ-हा-हा! काय सुंदर हिरवाकंच स्पॉट होता तो! आत शिरतांनाच सगळीकडे "चं.गो. च्या चा" लावलेल्या पाहून एकदम कॉलेजचे वेडे दिवस आठवून नॉस्टॅल्जिक झाले!! पण नंतर नंतर मात्र ते 'पसरणे-आवरणे' टाईप्स सारखे दिसून खुपायलाही लागले.... हो, खोटं कां बोला? कॉलेजनंतर आता कित्ती पावसाळे उलटलेत नै?! आता उशीर झालाच असल्याने भराभर सामान टाकून नाश्ता शोधला. मिसळ-पाव ('काही म्हणा, बेडेकर मिसळला पर्याय्च नाही' हा पुणेरी आवाज ऐकू आलाच तितक्यात ) इडली साम्बारचा चवीचवीने फडशा पाडला. इथे संयोजकांनी पहिले शिस्तीत ओळख परेड घेण्याचा प्रयत्न केला.... पण पुणे-मुंबईकरांची भरतभेट, बाळगोपालांना लागलेले जलविहाराचे वेध, कानांत वारं भरल्या वासरागत झालेली काही मंडळी .... यांमुळे ते लवकरच आटोपते घ्यावे लागले.
९) आता इथून पुढे ववि लेक अद्वैतने फूल्टू एन्जॉय केला असल्याने तो त्याच्या शब्दांत!
"आई कैप्प्ण सांगते.... 'मायबोली' म्हणजे कसं, शशांक काकांच्या छानछान कविता असतात, वर्षा दिदीची सुंदर चित्र असतात. गोष्टी असतात. पण इथे तर सगळे आई-बाबाचे फ्रेण्ड्स जमलेत. ते शशांक काका नाहीच आलेत. हां, तो ढोलकी काका मात्र आहे! कस्ला वाजवतो नां तो!! सह्ही!! पण तो 'कल्ला' प्रकार पाहून मी घाबरलोच! बाबा पण चक्क गात होता त्यांच्यात. शी! यापेक्षा आम्ही स्कूलबस मधे कसे शहाण्यासारखे बसतो. मी मग आपलं आपलं मागेच जाऊन बसलो! तिथे काही फ्रेण्ड्स पण केले. याssहू!! आईने प्रॉमिस केलेलं वॉटर पार्क मात्र आहे इथे!!!!
पाण्यात खूप धम्माल केली!! खूप खेळलो!! आई नव्हतीच आली सारखं पकडून ठेवायला. घसरगुंडीवरून खूप घसरलो. तिथे माझी सानिकाशी दोस्ती झाली. त्या मामा लोकांनी मस्त मनोरा केला होता पाण्यात!! सगळे एकदम झक्कास मस्ती करत होतो. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवले तरी कोणीच ओरडत नव्हते! मग, शेवटी आईने ओरडून मला आणि बाबाला बाहेर काढले. मग आम्ही अॅडव्हेंचर स्पोर्ट्स बघायला गेलो!! कित्ती मजा!! चक्क काही मावश्या वर उंच झाडावर चढून दोर्यावरून चालत होत्या, मग दुसर्या झाडाजवळ पोहोचले की झूम्मकन खाली!!! पण आई बाबाने ते काही केले नाही. मग मला भूक लागली. लंचला जिलेबी आणि गुलाबजाम होते!! मी खूप जिलेब्या खाल्या!! बाकी काही मला नाही आवडलं. तोपर्यंत माझ्या सगळ्या फ्रेण्ड्सची जेवणं झाली! मग आम्ही बागेत खूप खेळलो. मी सानिका, श्रेयस, श्रीशैल आम्ही खूप मस्ती केली. अजून पण बरीच छोटी छोटी मुलं होती.
आई आणि काही मावश्या हातावर मेंदी काढून घेत होत्या.... लहान मुलींसारख्या नंबरावरून वाद पण घालत होत्या. सानिकाने पण मेंदी काढाली. पण आईने "बॉईज नाही काढत" म्हणून मला नाही म्हटले.
बाकीचे मामा मावशा त्यांचा तो 'कल्ला' करत होते. मधेच भांडत पण होते. चॉकलेट्स वाटतांना दिसले की आम्ही तिथे जाऊन धडकत होतो!
मग त्यांचा काहीतरी प्रोग्राम होता. तेव्हा श्यामली मावशीने मला आणि सानिकाला झोपाळ्यावरून उठवले. मग ना, एका स्कूलचे नाटक दाखवत होते.... एक 'गुरुजी' नावाचे सर होते. आणि त्यांच्या वर्गात वेडी मुलं होती. त्या मावशा रिबीनी बांधून खूप मस्त दिसत होत्या. त्यात सानिकाची आई होती! वैभ्याकाकाला मात्र काहीतरी होत होते - शू लागली होती भौतेक. मग त्यांच्या स्कूल मधे एक सुंदर बाई आली. ती सारखा त्या सरांचा हात पकडत होती. असं कधी करतात कां?? तरी सगळे मावशा काके/ मामे खूप हसत होते. आम्हाला बोर झाले. मग मी मागे फळ्यावर चित्र काढत होतो.
नंतर नां, चक्क "सांग सांग भोलानाथ" वर डांस झाला! धमाल वाटलं एकदम! पण ते काका उगीच सारखी चड्डी वर करत होते.
मग नां आम्ही परत खेळायला पळालो. मग सगळ्यांनी ग्रुप फोटो काढला. मग आम्ही सामान भरले. आई म्हणाली की, आता निघायची वेळ झालीये. पण तिच्या गप्पा संपल्याच नव्हत्या. माझं पण खूप खेळणं राहिलं होतं.
पण सगळे बस मधे बसले! याssहू!!! सानिका माझ्यासोबत बसली! मग कविता मावशीने मला मस्त गोष्ट सांगितली. खाऊ दिला.
सगळ्या वेड्या लोकांचा कल्ला सुरुच होता, मी मुळीच गेलो नाही. मी आई बाबाजवळ पण गेलो नाही. मग अंधार पडल्यावर सानिकाचे घर आले. मला खूप वाईट वाटले. मग मी आणि श्रेयस खेळलो. मग मला खूप कंटाळा आल्यावर आणि मी झोपल्यावर मग आमचे घर आले!
आईने मला प्रॉमिस केलेय की ती पुढच्या वेळी परत मला नक्की घेऊन जाईल!!
१०) लोक्स! मुख्य म्हणजे मला अगदी मापाचा टी-शर्ट मिळाला!
परत एकदा धन्स रे हिम्सकूल!


ते कविन चे नाटुकले आणि डान्स एकदम धम्माल! इतक्या वेळेवर तयारी करून पण एकदम सहज सुंदर आणि उत्स्फुर्त काम होते सगळ्यांचे! आणि हो, निघतांना संयोजकांनी एक सुंदर गिफ्ट दिले! उघडून बघते तर दिवा!! परत एकदा संयोजकांच्या कल्पकतेचे कौतुक वाटले, की काही कुरबुरी/ तक्रारी असल्याच तर आधीच दिवा! पण नंतर कळले, की ते रिसॉर्ट वाल्यांकडून होते! दिवसभरात त्यांनाही 'मायबोली'ची लागण झालीच म्हणायची!!
बर्याच गोष्टी राहिल्याच याही ववि मधे! मंजुडीला तिच्या रेसिपीज आणि सल्ले कित्ती उपयोगी पडतात ते सांगायचे राहिले, अश्विनी केचं ऑफिस माझ्या ऑफिस जवळच आहे ते सांगायचं राहिलं... विन्याला "तो एखाद्या शिवसैनिकासारखा दिसतो" असं ओव्याने म्हटलेलं सांगायचं राहिलं. मुग्धा, सामीशी गप्पा राहिल्या.... निलीमाला ती खरंच खूप गोड आहे हे सांगायचं राहिलं. बर्याच जणांशी बोलणं राहिलंच......... तर ते आत पुढच्या वविला! चटक लागतेच अशी ववि ची!!!
नसलेल्यांना खूप मिस केलं हां....
आणि हो, माझ्या लेकाला सांभाळल्या बद्द्ल कविन आणि निंबुडाचे आभार!! तो आम्ही सोडून बाकी सगळ्यांकडे होता. आमच्याकडे अज्जिबात बघत पण नव्हता!
बाकीचं बरंचसं एव्हाना सांगून झालंच आहे! अजून काही आठवलं तर अॅड करा रे सगळ्यांनी!!! आणि हे एवढं मोठं लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न. सांभाळून घ्या!!
आं! हा चार-चार अंगठ्यांवाला
आं! हा चार-चार अंगठ्यांवाला हात कुणाचा?

मस्त धमाल केलीय सगळ्यांनी, मी
मस्त धमाल केलीय सगळ्यांनी, मी मिसलं.
ओवे, याला म्हणतात वृत्तांत!
ओवे,
याला म्हणतात वृत्तांत! जुग जुग जियो.
स्सेम प्रश्न अनेकांना पडला
स्सेम प्रश्न अनेकांना पडला असेल पण ललि खरी हिम्मतवान

मस्त वृत्ताम्त ओवी
मस्त वृत्ताम्त ओवी
ओवी, मस्त लिहिलायस वृत्तांत!
ओवी, मस्त लिहिलायस वृत्तांत! अद्वैतचा स्पेशल वृत्तांत तर लै भारी.
कविननं लिहिलेलं नाटक होतं का?
कविननं लिहिलेलं नाटक होतं का? वा, शाब्बास कविन! माबोवर टाकणार ना?
विन्याला "तो एखाद्या
विन्याला "तो एखाद्या शिवसैनिकासारखा दिसतो" >> या मतप्रदर्शना बद्दल ठोकमत वाले बागळे दोन्ही हात सरसावत निषेध नोंदवत आहेत, असे चित्र डोळ्या समोर उभे राहिले.. :p
ओवी... वृत्तांत एकमद झकास.. अद्वैतच मनोगतं आवडलं. पुलात जाम मजा केली त्याने.
तो एखाद्या शिवसैनिकासारखा
तो एखाद्या शिवसैनिकासारखा दिसतो >>>
इतकी वर्षं नव्हता हो दिसत, गेल्या काही दिवसांतच त्यानं स्वतःचं ते तसं रूप करून घेतलेलं आहे ...
ओवी, मस्तच वृत्तांत.. तुझा पण
ओवी, मस्तच वृत्तांत.. तुझा पण आणि लेकाचा पण...
आणि ओव्याला घेऊन आल्याबद्दल तुझे हार्दिक आभार. त्यानिमित्ताने दोन तीन वर्षांनी भेट झाली आमची. तुम्ही मुंबईला गेल्यापासुन फारसा काँटॅक्ट नाही राहिलेला आमचा. छान वाटलं त्याला अचानक भेटुन.. आणि तुझी ओळख पण झाली.
ओवे मस्त लिहिलयेस
ओवे मस्त लिहिलयेस
ओवी झक्कास वृत्तांत आणि बाळ
ओवी झक्कास वृत्तांत
आणि बाळ ओव्याला सांग श्यामली मावशी संयोजक मोडात होती, तिथे झोका हालला असता तर लुटुपुटच्या मास्तरांना आणि विद्यार्थांना इजा झाली असती म्हणून उठवलं हां.
त्याबद्दल श्यामलीमावशीकडून सॉरीच बाळांनो आणि भरपाई म्हणून पुढच्या वेळेला तुमच्यासाठीपण काहीतरी नक्की करु हे प्रॉमिस
Pages