ववि२०१३-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35

वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????... Happy Happy

मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्‍या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"स्वतंत्र वृत्तांत" होतील असे 'दमदार' विषय

१) अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स
२) मुंबईकरांचं नाटक आणि बोलानाथ डांस
३) रिसॉर्टभर मुक्तहस्ते पसरलेल्या ओरिजिनल आणि तोतया चंगोंच्या चारोळ्या.
४) मुंबईच्या बशीतला दंगा
५) पुणे बशीतला दंगा आणि सहा अधिक सहा तासांची लांबलचक पण तरीही अजिबात कंटाळा न आलेली मॅरेथॉन राईड.
६) सांस्कृतिक समिती आणि संस्कृती संवर्धन.
७)

पहिल्यांदा आलेल्या लोकांनी लिहा कृपया..

अरे! खुप्पच धम्माल केलीय वाट्तं सगळ्यांनी... जरा पटापट सचित्र वृत्तांत नि नाट्काचे रेकॉर्डिंग पण येवु देत Happy

लोक्स काल अगदी फार म्हणजे फारच वेगळी गोष्ट घडली.

माबोकरांची संख्या १०० च्या आसपास होती. तो रिसोर्ट बराच मोठा होता आणि अजूनही बरेच ग्रूप आलेले होते.
ते सगळेच आपला कल्ला बघत होते. माबो चे बॅनर, माबोचे टिशर्ट यामुळे त्यांना आपल्या ग्रूप चे नाव सहज समजले.

कार्यक्रम संपत आल्यावर त्यातल्या एका ग्रूपमधल्या एकजण तिथे माईकजवळ येऊन, मला जरा बोलायच आहे मी बोलू का म्हणाल्या. लोक बरेच असल्यामुळे आम्हाला वाटल की त्या माबोकरांपैकीच आहेत. पण त्या माबोकर नव्हत्या आणि त्यांनी तिथे येऊन माबोकरांच आणि तिथे झालेल्या सगळ्या कार्यक्रमाच जाहीर कौतुक केलं. सगळ्यात महत्वाच म्हणजे मी लवकरच माबोकर होणार आहे असंही त्या म्हणाल्या.

हॅट्स ऑफ टू मायबोली.

काही अवांतर

वाविच्या बाफ़वर घारुअन्ना हे नाव वाचुन फार aged व्यक्ती असेल असे वाटले होते
पण अंदाज चुकला

मंजिरी सोमणला काही काळ मी पूनम समजले
शेवटी जेवान्याच्या टेबलावार हां गैर समज दूर झाला
पूनम हीच पौर्णिमा आहे का
तीच्या कथा मला आवडतात

मेधाताईनी आणलेली मिठाई फार छान होती

थंड काही काळ श्रीशैल नावाचा मुलगा आहे या संभ्रामात होती Lol
बसमधे झालेले गाण्याचे विडंबन जबरदस्त होते

स्किट कविनने लिहीलेले होते

निघाताना रिसोर्ट वाल्यानी सर्वाना एक छान गिफ्ट दिले

निघाताना रिसोर्ट वाल्यानी सर्वाना एक छान गिफ्ट दिले >> वस्तु स्वरुपात कि आठवणींच्या स्वरुपात ...

तिकडच्या काही पोस्ट्स इथं पेस्ट करतो.
ठरल्याप्रमाणे चारोळीवृत्तांत लिहा..

हिम्सकूल | 29 July, 2013 - 09:33
यंदाचा पुण्याहून येणारा वविचा वृत्तांत चारोळीमय असणार आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी...

आपण रिसॉर्ट वर असताना नंदिनी मॅडम चा फोन येऊन गेला.. त्यांनी पहिल्यांदाच वविला येणार्‍यांना कम्पल्सरी वृत्तांत लिहायला सांगितला आहे. आणि न लिहिल्यास वृत्तांत कसा लिहावा ह्याची त्या स्वतः शिकवणी घेणार आहेत..

होता काल नेहमीचाच रविवार वगैरे वगैरे..
देव काका म्हणती त्याला वविवार वगैरे वगैरे...

केदार जाधव | 29 July, 2013 - 09:39
हिम्सकूल ,
वाह वाह वगैरे वगैरे स्मित

देवा | 29 July, 2013 - 09:47
तर चारोळीमय वविवार

आम्ही सकाळी सकाळी मयास फोन केला
दहा मिनिटात येतो त्याचा निरोप आला
पंधरा मिनिटात मग आम्ही प्रयाण केले
पोचलोच दोन मिनिटे, थांबा नजिक आला

थांब्यास आम्ही जाता हाय हॅलो झाले
श्यामली होती तिथेच तिथे मंजिरीही होती
तिथले दृष्य अजोनी नयनरम्य झाले
नतद्रष्ट आणि राम ही जोडगोळीही होती

क्रमशः

दिवे दिलेत रिसॉर्टने! Proud
ववि सालाबादप्रमाणे दणदणीत! सर्वांचे वृ धमाल. Lol
**
वविला केली चिकार धमाल वगैरे..
वृत्तांत वाचून म्हणा रे कमाल वगैरे!
**
पावसात सांभाळा तोल
पावलं जातात घसरत
त्यातही काल करत होते
वविकर दोरीवरची कसरत
**
मुंबई असो की पुणेकर
एकमेकांशी सलगीनं वागतात
असा उत्तम ववि व्हायला
हातात हात लागतात.
**
चारोळीमय वृ क्रमश:

मुंबई असो की पुणेकर
एकमेकांशी सलगीनं वागतात
असा उत्तम ववि व्हायला
हातात हात लागतात.
>>>
क्या बात है! हे म्हंजे फारच भारी वगैरे..
तरळली पुन्हा द्रूष्ये कालची सारी, वगैरे! Happy

ओये!
तिकडच्या म्हणजे कुणीकडच्या या चारोळ्या?
ठोकताय अन्य कोणत्या बाफवर आरोळ्या?

ठरल्याप्रमाणे

प्रथम नाशिककरांची पूजा

सहा तासाचा प्रवास करुन दाखविले मुरबाडचे टोक वगैरे
हवा करुन न आलेल्या ना.करांच्या बैलाला....... वगैरे

आता ववि

अशी पाहीली मी आनंदाजी तिजोरी
गवतात चालताना पावसाची हजेरी
कधी संपली वेळ वविची कळलेच नाही
वाटे यावे पुन्हा ती दाखवाया मुजोरी

धन्यवाद केश्वि, साजिरा.
**
कालच जणू नवा शोध लागला
देवाची बायको म्हणे देवी
लग्न झाले, झाला सकु ववि
तरीही शिल्लक तुझ्यातला कवी?
**
इडल्या चांगल्या होत्या,
खराब झाली चटणी
आनंदे खाल्ली मिसळ
कशाला शोधावे मुसळातले कुसळ?
***
क्रमश:

Happy
धम्माल ववि! आणि आता एकसेएक वृत्तांत!! Happy यंदा लिहायचा प्रयत्न करणारेय....... Wink 'मुद्देसुद' वृ लिहिण्यासाठी 'आत्या' उर्फ मंजिरी सोमण आणि 'ववि - अद्वैतच्या नजरेतून' लिहिण्यासाठी हिम्स्कूलची आगावू परवानगी मिळवून ठेवतेय! (इथेच) Happy

सह्ही! सॉल्लिड धम्माल केलेली दिसत्येय!

भारतातुन १७ जुलै ला परत आले त्यामुळे ववि थोडक्यात हुकला याचे वाईट वाटत्येय Sad

चहा सांडला नाही. यापुढे कधीही सांडणार नाही. तस्मात इतिहासजमा. Proud

(श्यामली, तु पुढे बसलेली असताना बसमध्ये ही दोनोळी जन्मलेली.. तुझ्यापर्यंत पोचली का?)
कवींचा काही नाहीच नेम वगैरे
होईल इथे तुझाच गेम वगैरे..!!

पूनम, वविबसरूट्बाफावरच्या पोश्टि वगैरे

कालची धमाल होती वेगळी
पाण्यात डुंबणे .. दोर्‍यांवरुन चालणे वगैरे वगैरे...
कामात ओझ्याच्या आज मात्र आठव्वुन सारे ...
फ़क्त हसणे वगैरे ....

लोक्स
असे तुकड्यांतुनी काय वाचावे वव्विला..
जणु पाणिपुरी मोडुन खाणे...
पचनी कसे पडावे हे
अर्ध्या पुरीतुन थांबवणे खाणे वगैरे.....

Adventure kelelya lokanni aaj kaay kaay dukhtay tyaachahi vruttant lihaa bar Wink
Sakaali uthlyavar talpaayapaasun haatachya botaparyant anek avayav bolat hote

हो ती पाठवली माझ्यापर्यंत कोणीतरी. मग मलाही काही ओळी होतील की काय अशी भिती वाटली म्हणून कान बन्द करुन बसले होते Wink

कमी शीटांच्या बशीतुने तो उत्साह
भरभरुन ओसांड्णे वगैरे ...
मध्ये चाले गाण्यांचा गलका
पुढे मागे झोपणे वगैरे....

साजि-यानी का आशुनी यन्दा काही स्मृतीस्थळं निर्माण करा अशी सूचना संयोजकांना दिली आहे. कारणं आणि मिमांसा तेच करतील

चहा न सांडता ववि पार पडलाच कसा असा मिनुसवाल पुणेकरांना पडलाच आहे. पण ते नंतर कधीतरी

Pages