सारणासाठी:
१. हिरवे मूग - दोन ते अडीच वाट्या
२. एक मध्यम बटाटा उकडून
३. आमचूर पावडर किंवा चाट मसाला - १ चमचा
४. बडिशेपेची पावडर - १ चमचा
५. गरम मसाला - १ चमचा
६. जिर्याची पूड- १ चमचा
७. आलं आणि मिरची वाटून - दोन चमचे
८. तिखट, मीठ, साखर - चवीनुसार
९. चिरलेली कोथिंबीर - १ वाटीभर
पारीसाठी: कणीक, मीठ, तेल, पाणी.
१. मूग भरपूर पाण्यात भिजत घालून, मग पाणी उपसून त्याला मोड येऊ द्यावेत. या प्रक्रियेला साधारण अठरा तास लागतात. तो वेळ पाककृतीच्या वेळेत गणलेला नाही.
२. मोड आलेले मूग कुकरच्या क्षमतेप्रमाणे एक किंवा दोन शिट्या देऊन शिजवून घ्यावेत. मी वरण भाताबरोबर शिजवून घेतले. मुगात अजिबात पाणी घातले नव्हते. अगदी मऊ लगदा होईपर्यंत मूग शिजवायचे नाहीत. दाणा किंचीत टसटशीत राहिला पाहिजे.
३. मूग थंड झाल्यावर मिक्सरमधे भरडसर वाटून घ्यावेत.
४. ते भरड वाटण एका भांड्यात घेऊन मग त्यात सारणासाठी असलेले सर्व घटक एकेक करून घालून पराठ्याचे सारण नीट तयार करून घ्यावे.
५. स्टफ्ड पराठ्यांसाठी नेहमी भिजवतो तशी कणीक भिजवून घ्यावी.
६. तयार केलेलं सारण कणकेच्या पारीत भरून नेहमीसारखे पराठे लाटून, तव्यावर तेल सोडून भाजून घ्यावेत.
७. लोणी/ दही/ सॉस/ चटणीबरोबर गरमागरम गट्टम करावेत.
व्वा मस्त आहेत.... सोमवारी
व्वा मस्त आहेत.... सोमवारी हाच नाश्ता..
भारीच दिसतायत. करून बघण्यात
भारीच दिसतायत. करून बघण्यात येतील.
मस्तच आणि पौष्टिक.
मस्तच आणि पौष्टिक.
आत्तापर्यंत फक्त मो.मु.चे
आत्तापर्यंत फक्त मो.मु.चे धिरडे केले होते. आता पराठे करुन बघेन.
बाकी पराठा न फाटता लाटलेला आहे(जे मला कधीही जमलेले नाही.) पराठा ईतका छान लाटणार्या ग्रुहिणींचे मला खुप कोतुक वाटते.
करणार.
करणार.
पिन्कि ८०, धन्यवाद! पराठ्याची
पिन्कि ८०, धन्यवाद!
पराठ्याची कणीक पोळीपेक्षा किंचीत सैल आणि अगदी मऊ तुकतुकीत भिजवली की पराठा व्यवस्थित लाटता येतो.
मस्त
मस्त
काय मस्त रेसिपी आहे.. एकदम
काय मस्त रेसिपी आहे.. एकदम टेस्टी प्रकरण दिसतेय हे तर..
सोपी आहे पाकृ. आजच मूग भिजत
सोपी आहे पाकृ. आजच मूग भिजत घातलेत. उद्या करून पाहणेत येइल.
मस्त रेसिपी आहे.
मस्त रेसिपी आहे.
मस्त खमंग दिसतोय पराठा. माझी
मस्त खमंग दिसतोय पराठा.:स्मित: माझी मुलगी उसळी खात नाही, पण कुठलेही पराठे तिला चालतात. हा पौष्टीक पराठा त्यात बटाटा पण ती असल्याने आवडीने खाईल.
मस्त.
मस्त.
छान आहे आयडिया मूग वापरायची,
छान आहे आयडिया मूग वापरायची, मस्त रेसिपी....
वॉव! छान कल्पना आहे!
वॉव! छान कल्पना आहे!
छान आहे कृती.
छान आहे कृती.
मस्त! हेल्दी रेसिपी..
मस्त! हेल्दी रेसिपी..
उद्याच करतेय पराठे..
उद्याच करतेय पराठे..
मस्त यम्मी रेसिपी. मूग
मस्त यम्मी रेसिपी. मूग आवडतातच, नक्की करणार
मस्त आहे कृती, मी सुद्धा याची
मस्त आहे कृती, मी सुद्धा याची धिरडी करते पण आता पराठेही नक्की करुन बघेन.
मस्त पौष्टिक रेसिपी. नक्की
मस्त पौष्टिक रेसिपी. नक्की करणार.
छान आहे रेसिपी , सारण थोडं
छान आहे रेसिपी , सारण थोडं कचोरी टाइप लागेल असं वाटतय :).
इनोवेटिव रेसिपी. करून पाहिली
इनोवेटिव रेसिपी.
करून पाहिली पाहिजे
मस्तच. मिक्स कडधान्ये घालून
मस्तच. मिक्स कडधान्ये घालून पण करता येईल. पौष्टिक आणि चमचमीत.
धन्यवाद मंजूडी.
वेगळा प्रकार. .... उरलेल्या
वेगळा प्रकार. .... उरलेल्या उसळीला पण चांगला पर्याय आहे.
झक्कास!!!!
झक्कास!!!!
पिंकी +१. माझाही परोठा
पिंकी +१. माझाही परोठा लाटतांना फाटतो किंवा सारण डोकावत राहतं.
मस्त रेस्पी आणि फोटू. थांकु.
मस्तच. नक्की करणार
मस्तच. नक्की करणार
आज केला आहे. यम्मी यम्मी
आज केला आहे. यम्मी यम्मी झालाय.
मी सारणाच्या मिश्रणाला कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी दिली.
मस्त खमंग पराठा झाला आहे.
थँक्यु मंजुडी
मस्त आहे पाकृ बनाके देखेंगे
मस्त आहे पाकृ
बनाके देखेंगे जी
इ त के छा न आ हे त की... उद्य
इ
त
के
छा
न
आ
हे
त
की...
उद्याच करतेय..!
Pages