दुध(फुल क्रीम किंवा म्हशीचे दूध) १ कप
हेवी क्रीम २ कप
साखर पाऊण कप
पिस्ते पाऊण कप
केशर ८-१० काड्या
दुधामध्ये केशराच्या ५-६ काड्या आणि साखर घालून साखर विरघळेपर्यन्त उकळून घ्यावे.
५-६ पिस्ते बाजूला काढून उरलेले पिस्ते मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावेत.
आता दुध जरा थंड झाले की ते पिस्ते असणाऱ्या मिक्सरच्या भांड्यात घालून मिश्रण एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
आता हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यामध्ये हेवी क्रीम मिसळावे. बऱ्यापैकी घट्ट मिश्रण तयार होईल.
उरलेल्या पिस्त्यांचे काप करून ते वरून घालावेत. तसेच उरलेल्या केशराच्या काड्या घालाव्या.
फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ४-५ तास ठेवावे आणि नंतर आरामात आनंद घ्यावा. फार सुरेख चव लागते. का नाही लागणार म्हणा!
फुल क्रीम दुध आणि हेवी क्रीम वापरल्यामुळे आईस्क्रिममध्ये अजिबात बर्फ लागत नाही. एकसारख्या consistency चे सुरेख आईस्क्रिम लागते.
कॅलरिजचा विचार न करता खावे. खालील माहितीकडे दुर्लक्ष करावे.
गुगलमध्ये 1 cup heavy cream calories अशाप्रकारे सर्च केले असता खालील माहिती सापडली.
Calories in:
1 cup heavy cream = 315
1 cup full cream milk = 150
1 cup pistachios = 691
1 cup sugar = 773
म्हणजे ह्या पदार्थात जवळजवळ २२४४ कॅलारीज आहेत आणि १ कप आईस्क्रीम खाल्ले तर ७४८ केलारीज पोटात गेल्या की काय!
जाऊदे पण , एखादेवेळी चालते!
मधे वेगवेगळ्या फ्लेवरचे
मधे वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रिम आणून पाहिले पण एकही आवडले नाही. मग एकदम ऑथेंटिक केशर्-पिस्ता आईस्क्रिम खावेसे वाटले आणि थोडे प्रयोग केले.
दुध आटवा मग थोडा वेळ फ्रिजमधे ठेवा मग पुन्हा एकदा ब्लेंडरमधून फिरवा, असे complicated प्रकार करायचे नव्हते. तसेच लागणारे साहित्यही मिळायला फार अवघड नाही. करायला आणि खायला मजा आली.
लग्गेच करणार. घरी आहे हेवी
लग्गेच करणार. घरी आहे हेवी क्रीम नेमकं.
अरे देवा! भुकेच्यावे़ळी काय
अरे देवा! भुकेच्यावे़ळी काय हा अत्याचार!
सहीच
सहीच
धन्यवाद स्वाती,
धन्यवाद स्वाती, येळेकर,जाई
केल्यावर जरूर इथे लिहा.मी दुध फक्त साखर विरघळण्याइतके आणि पिस्त्यांची पूड नीट मिक्स होण्याइतपत घेतले. क्रिमचे प्रमाण थोडेसे वाढवले तर अजून छान लागेल असे वाटतेय. मी २ कप सुद्धा जरा घाबरत्-घाबरतच घातले.
मस्त दिसतोय दुसरा फोटो.
मस्त दिसतोय दुसरा फोटो.
लै भारी!
लै भारी!
वाव! मस्तच
वाव! मस्तच
यवतमाळात हेवी क्रिम मिळणं
यवतमाळात हेवी क्रिम मिळणं अशक्य आहे, अमुलचे क्रिम चालेल का?
एकदम तोंपासु आहे.
फोटो मस्तच! आत्ताच अमुल मँगो
फोटो मस्तच! आत्ताच अमुल मँगो आइस्क्रीम खाल्लं.. हे ट्राय करेन..
केकसाठीचे व्हिप केलेले क्रीम
केकसाठीचे व्हिप केलेले क्रीम उरले आहे. ते वापरले तर चलेल का? आणि हेवी क्रिम म्हणजे नक्की काय आणि पुण्यात कुठे मिळते
फोटो मस्त आहे.. तोंपासु!
फोटो मस्त आहे.. तोंपासु!
मस्त मस्त........माझी लाळ
मस्त मस्त........माझी लाळ गळुन डेस्क चिकट व्हायच्या बेतात आलेलं......
घरातली साय चालेल का?
घरातली साय चालेल का?
हेवी क्रिम म्हणजे बासुंदीच्या
हेवी क्रिम म्हणजे बासुंदीच्या consistency चे क्रिम. चु भु दे घे.
थोड्यावेळात लिहिते.
.माझी लाळ गळुन डेस्क चिकट
.माझी लाळ गळुन डेस्क चिकट व्हायच्या बेतात आलेलं..................:D
सारीका अमुलचे क्रिम चालू शकेल
सारीका
अमुलचे क्रिम चालू शकेल असे वाटतेय.
वर्षा_म
त्यामुळे नक्की सांगू शकत नाही.
केकसाठी कसे क्रिम लागते ह्याची मला कल्पना नाही.
गीता, घरातली साय चालू शकेल कदाचित, पण क्रिमची consistency सायीला नसणार ना..
प्रतिसादास उशिर झाल्याबद्दल सॉरी आणि सगळ्यांचे आभार
वीकेन्डला केलं हे आइस्क्रीम.
वीकेन्डला केलं हे आइस्क्रीम. पिस्त्यांऐवजी घरात होते म्हणून बदाम वापरले. जहबहरीही होतो हा प्रकार!!

कुल्फीच म्हणता येईल आइस्क्रीमपेक्षा.
'कित्ती लोडेड आहे!' असं म्हणत 'बरं आता अजून एकच चमचा' असं करत संपवलं.
रेसिपीसाठी धन्यवाद.
मी करून पाहिलं वीकेन्ड ला.
मी करून पाहिलं वीकेन्ड ला. मस्त झालं होतं! फोटो काढायला चान्स मिळाला नाही!
वॉव! धन्यवाद स्वाती आणि
वॉव! धन्यवाद स्वाती आणि मैत्रेयी!
कुल्फी स्टँड्मधे लावल्यानंतर कुल्फी बाहेर काढू तेव्हा फार टेम्टींग दिसेल असा विचार मनात आला.

मलापण बरेच वेरीएशन करून बघायचे आहेत पण...
करणार लवकरच.
करणार लवकरच.
फोटो मस्त आहे...........
फोटो मस्त आहे...........
करून बघणार! माझा सगळ्यात
करून बघणार! माझा सगळ्यात आवडता फ्लेवर आहे हा!
काल हे आईस्क्रिम केले. मस्त
काल हे आईस्क्रिम केले. मस्त झाले. आणि महत्वाचे म्हणजे खरच झटपट झाले
३ कप हेवी क्रीमच वापरले तर?
३ कप हेवी क्रीमच वापरले तर? मी करून बघते हे अजून लोडेड व्हर्जन