कॉसमॉस बीएमएम २०१३ स्पर्धेचा विजेता टोरांटोचा रवी दातार

Submitted by अजय on 6 July, 2013 - 01:58

कॉसमॉस बीएमएम २०१३ स्पर्धेचा विजेता टोरांटो कॅनडाचा रवी दातार.

दुसरा क्रमांक टोरांटो कॅनडाची समीधा जोगळेकर

तिसरा क्रमांक न्यूजर्सी चा अक्षय अणावकर
finale-2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्याच फेरीत कॅनडाच्या दोन्ही कलाकारांनी जमीन-आसमानाचा फरक जाणवून दिला.. शास्त्रीय संगीत तिकडे जास्त होतं की काय कोण जाणे... असं वाटलं की बाकीचे फार काही करू शकणार नाहीत (३७, ३४ टक्के पहिल्या दोघांना आणि नंतर ५, ७, ४, २ टक्के इतर)..
पण पुढच्या फेरीत इतरानी आपले गूण दाखवायला सुरूवात केली.
राहूल देशपांडेने राहूलदादा, राहूलजी इत्यादी बिरुदांची हसत्-खेळत हजेरी घेतली.
काही चांगल्या सूचनाही दिल्या. प्रशांत दामलेनी एका दुसर्‍या Comment मधे आपली जाणीव करून दिली.
बाकी कार्यक्रम उत्तम. (दुसर्‍या दिवशी सकाळीच माझा कार्यक्रम असल्याने हा पूर्ण पाहिला नाही).

सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन !! खूप सुंदर झाला कार्यक्रम. रवी-समिधा दोघेही खूप छान गायले. डावं-उजवं करणं अवघड होतं. पण माझे वैयक्तिक मत आहे की गाणं गाताना चेहर्यावर त्या गाण्यातील भाव उमटले पाहिजेत तरच त्याच्यात अधिक रस भरतो. अमेरिकावाले ते करत होते पण कॅनडावासींमधे तो अभाव जाणवला. रवीचे थोडेतरी expressions होते पण समिधा अगदी निर्विकार चेहरा ठेवून गाणी म्हणत होती. तिचा आवाज, सूर, तयारी सगळंच अप्रतीम होतं पण जरा भाव दाखवू शकली असती तर ते अजून शंभरपटीने जास्त रंगलं असतं आणि ती विजेती ठरली असती. अमेरिकेतील लोकांनी light songs, लोकसंगीत खूप छान गायले पण शास्त्रीय संगीताची तयारी कुठेतरी कमी पडली असं वाटलं. तिथे कॅनडावासींनी बाजी मारली. असो. पण कार्यक्रम चांगला झाला. एखादी judge's round/spontaneous song singing अशी फेरी असती तर अजून मजा आली असती.

अरे वा, विजेत्यांचे आणि सहभागी कलाकारांचे अभिनंदन ! रवी दातार आणि समिधा जोगळेकर छानच गातात Happy

हा कार्यक्रम इतरांना बघता येईल का ? यु-ट्यूबवर अपलोड करणार आहात का ?

Back to top