पहिल्या दिवसाची क्षणचित्रे:
१. ढोल्/ताशे/लेझीमच्या जोडीने आलेल्यांचे स्वागत.
२. नाश्त्यासाठी उपमा/दिलपसंद
३. आभाने (अजय/भावना ची मुलगी) गायलेले राष्ट्रगीत. मान्यवरांची भाषणे आणि उद्घाटन सोहळा. हा कार्यक्रम काही इतर कामांमुळे येता जाता पहायला मिळाला.
४. लग्नाच्या पंगतीचं पुणेरी जेवण : अळू, बिरड्या, बटाट्याची भाजी, पुरणपोळी, जिलेबी, मठ्ठा, मसालेभात..
५. दुपारी पॅरलल बरेच कार्यक्रम सुरू होते. त्यात पहिला पाहिलं चाहूल नाटक. निकीत आणि अमृता दोघांचही काम मस्त. नॅचरल एकदम. पण पुढल्या कार्यक्रमामुळे अर्ध्यातून जावं लागलं.
६. आजचा सर्वात बेस्ट कार्यक्रम "एक मी आणि एक तो". वैभव जोशी साहेब.. मानाचा मुजरा.. आज अधिवेशनानिमित्त हा कार्यक्रम अनुभवता आला. वैभव्/सौमित्र यांच्या कविता होत्याच. पण दतप्रसाद रानडे यांच सुरेल भावपूर्ण गायन आणि त्याला निखील फाटक यांची तबल्यावर अप्रतीम साथ तेवढ्याच तोलामोलाच्या होत्या.
आता मायबोलीकरांना भेटायला जात आहे आणि रात्री सारेगमपा. तेव्हा बाकी नंतर.
पहिले दोन फोटो मस्त आहेत.
पहिले दोन फोटो मस्त आहेत. ढोल, ताशे, लेझीमचा व्हिडिओ असेल तर बघायला आवडेल.
मस्त! माबोबद्दल माहिती नसलेले
मस्त!
माबोबद्दल माहिती नसलेले लोक काय चौकशी करतात वगैरेही आवडेल वाचायला.
पुणेरी जेवणाच्या थाळीत त्या
पुणेरी जेवणाच्या थाळीत त्या गोल खड्ड्यात पिवळे काय आहे ते ओळखू आले नाही.
सगळे फोटो मस्त. अजून येऊ देत.
अरे व्वा , अपडेट्ससाठी
अरे व्वा , अपडेट्ससाठी धन्यवाद समीर .
लेझिम ढोल स्वागतः
लेझिम ढोल स्वागतः
वा, वा, धन्यवाद समीर. ढोल,
वा, वा, धन्यवाद समीर. ढोल, ताशा ऐकायला मस्त वाटलं. लेझीम खेळणार्या मुलांची प्रॅक्टिस जरा कमी पडली असं वाटलं. असो..
सही!!
सही!!
दै. लोकसत्तामधील बातमी--
दै. लोकसत्तामधील बातमी-- http://www.loksatta.com/bmm-convetion/bmm-convention-event-first-day-145...
छानच. माबोबद्दल माहिती
छानच.
माबोबद्दल माहिती नसलेले लोक काय चौकशी करतात वगैरेही आवडेल वाचायला. >>> +१
मुलांचं लेझीम आवडलं , जरा
मुलांचं लेझीम आवडलं , जरा मोठी क्लिप द्या की रावं.
धन्स समीर एकदम मस्त क्लीप.
धन्स समीर
एकदम मस्त क्लीप. माझी भाची दिसली नाचताना..... एकदम मस्त वाटलं....
धन्स......
ढोल, ताशा ऐकायला मस्त वाटलं.
ढोल, ताशा ऐकायला मस्त वाटलं.
उद्घाटन सोहळ्याचे काही
उद्घाटन सोहळ्याचे काही फोटो-
दीप प्रज्ज्वलन..
प्रॉव्हिडन्सचे मेयर भाषण करताना.. "Please spend a lot of money.."
राष्ट्रगीते- भारत, कॅनडा, अमेरिका
लोला, तू माबोची ऑफिशियल
लोला, तू माबोची ऑफिशियल फोटोग्राफर वाटते आहेस...
पहिला दिवस.
पहिला दिवस.
लोला, मस्त प्रचि.
लोला, मस्त प्रचि.
मस्त फोटो. मुलांचे लेझीम
मस्त फोटो. मुलांचे लेझीम आवडले.
अजून काही कार्यक्रम होते पण
अजून काही कार्यक्रम होते पण त्याबद्दल कुठेही काहीही लिहून आले नाही. म्हणुन इथे टाकतो.
शिकागोवाल्यांनी 'वस्त्रहरण' एकांकिका केली. प्रयोग छान होता. खूप खूप वर्षानी 'वस्त्रहरणातले' काही प्रवेश अनुभवता आहे. मास्तर, गोप्या, सरपंच, दैत्य, देव इत्यादी कामे पण चांगली झाली.
. मालवणी भाषा मात्र (एक दोन पात्र सोडता) कुणाला जमत नव्हती. बरेच शब्द मराठीच्या इतर बोलीभाषांतून घेतलेले होते.
. काकूंच्या आकारावर २/३ विनोद होते पण काकू नॉर्मल वाटल्या.
. यात मानसी करंदीकर यानी (भाईंबरोबर) लावणी केली.