हेकरू हा मासा चवीला तसा साधारण असतो. गुलाबी आणि राखाडी रंगाच्या छटा ह्या माशावर असतात. लहान पणी हा मासा आणला की आमचे चालू व्हायचे हे करू की ते करू ?
१) हेकरू ची खवले, पर, शेपटी काढून, पोटातील टाकाऊ भाग काढून तुकड्या करुन घ्या व तिन पाण्यातून तिन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
२) ह्या तुकड्यांना वरील तेल सोडून बाकीचे सर्व जिन्नस लावून घ्या.
३) गॅसवर तवा चांगला गरम करा नंतर त्यावर तेल टाका व त्यावर तुकडया शॅलो फ्राय करण्यासाठी सोडा.
४) गॅस मिडीयमच ठेवा व ५ मिनीटांनी पलटून दुसरी बाजू ३-४ मिनीटे शिजवून घ्या.
ह्या माशाला तशी खवले खुपच नरम असतात. पटकन निघतात.
चवीला जरा कमीच असल्याने आल-लसुण, पेस्ट लावून रव्यात घोळून तळल्याने अधिक रुचकर लागेल.
मासे अगदी ताजे असतील तर आल-लसुण किंवा नुसत्या लसणीचा वापर तळण्यासाठी नाही केला तरी चालतो. त्यामुळे माशाची खरी चव कळते.
ह्याला पापलेट, बोईट वगैरे सारखाच मधला काटा असतो.
हे करू की ते करू >> हेच नाव
हे करू की ते करू >> हेच नाव वाचल्यावर डोक्यात आलं
जागु अगं काय हे... कुठून
जागु अगं काय हे... कुठून कुठून मासे शोधून आणतेस?? माझ्यासाठी अगदी नविन आहे हा मासा
जागू आमच्याकडे असतो हा मासा ,
जागू आमच्याकडे असतो हा मासा , पण मी कधीच आणत नाही. पण रेसिपी मस्तच आहे.
हे करु कि ते करु ? अखी, अगदी
हे करु कि ते करु ? अखी, अगदी असेच मलाही वाटले
हे काही खुप टेस्टी नाहीत..मला
हे काही खुप टेस्टी नाहीत..मला अगदीच नाही आवडत....:(
जागु तै .. मस्तच आणि नवीन
जागु तै ..
मस्तच आणि नवीन ..
बाकी एकदा मासा साफ कसा करायचा .. त्याची डीटेल टाक ना ..
शाकाहारी साठी ईईईई असेल तरी फार गरजेचे आहे ..मासे वाले प्रत्येक वे ळी योग्य करतात असा नाही..
मस्त तोंपासू
मस्त
तोंपासू
ठिक ठाक
ठिक ठाक
जागू कुठुन शोधून आणतेस ग हे
जागू कुठुन शोधून आणतेस ग हे सगळे मासे ? आणि आमच्यासाठी फोटोसकट रेसिपी पोस्ट ही करतेस. ग्रेट आहेस.
मी बाजारात गेले की तुझे लेख वाचून एक एक ज्ञान पाजळत असते, कोळीणीं ना आच्छर्य वाटत असेल.
जागू कुठुन शोधून आणतेस ग हे
जागू कुठुन शोधून आणतेस ग हे सगळे मासे ? >>+१११
ए जागु तू टाकलेला तो पहिल्या
ए जागु तू टाकलेला तो पहिल्या फोटोतला तुकडा बघ की जरा निरखुन, त्या हेकरुचे दात दिसतायत का ते?:फिदी:
मी ही तेच म्हणणार होते की जागू कुठले कुठले नवीन मासे आणते शोधुन्.:स्मित:
जागू ही ताबोशी आहे का ?
जागू ही ताबोशी आहे का ?