२ वाट्या तांदूळ
बटाटा १ मोठा- १ इंचाचे तुकडे
१ कप ग्रीन बीन्सचे (श्रावण घेवडा?) १ इंचाचे तुकडे
२ मध्यम गाजर थोडे मोठे तुकडे
१ .५ कप कॉलीफ्लावर मध्यम आकारचे तुकडे
आलं लसूण १ टे. स्पून
कांदा १ मोठा उभा चिरून
टोमॅटो २ बारीक चिरून
हि. मिरची ३ उभ्या चिरून
लवंग ५-६
हि. वेलची ५
दालचिनी १ इंचाचे २-३ तुकडे
मसाला वेलची २-३
तमालपत्र ३-४ पानं
काळी मिरी ८-९
दही एक मोठा चमचा
काजू १ वाटी- तळून घेऊन
बेदाणे १/२ वाटी- तळून घेऊन
केशर दोन तीन चिमूट - ३-४ मोठे चमचे दुधात खलून
तूप २-३ चमचे
बिर्याणी मसाला २ चमचे
केवडा इसेंस १ टि. स्पून (ऐच्छिक)
हळद एक लहान चमचा
तळलेला कांदा १ वाटी
बारीक चिरलेली कोथंबीर, पुदीना - दोन्ही मिळून अर्धी वाटी
झाकणाच्या कडेनं लावायला कणीक
१. तांदूळ स्वच्छ धुवून निथळून अर्धा तास ठेवा.
२. तांदळाच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल, १ मसाला वेलची, तमालपत्र घालून उकळी आणावी.
३. तांदूळ एक-दोन कणी राहतील इतपत शिजवून उरलेलं पाणी पूर्णपणे काढून टाकून बाजूला ठेवावे.
४. ज्या पातिल्यात बिर्याणी करायची त्यात तेल तापवायला ठेवावे.
५. सगळा खडा मसाला घालून कांदा घालून परतून घ्यावा
६. कांदा मऊ झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून १-२ मिनीटे परतावे
६. टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परतावे
७. हळद घालावी परत एकदा परतून घ्यावे
८. बिर्याणी मसाला घालावा
९. केवडा इसेंस घालावा, परतावे
१०. दही घालावे
११. बटाटा, गाजर घालून परतावे
१२. उरलेल्या भाज्या घाल्याव्यात
१३. मीठ घालून नीट परतून घ्यावे
१४. भाज्या साधारण ३/४ शिजल्या की गॅस बंद करावा.
१५. भाताचा लेयर लावून लाकडी चमच्याच्या मागच्या बाजूने ५-६ भोकं पाडून त्यात केशराचं दुध घालावं उरलेलं दूध भातावर शिंपडावं.
१६. काजू, बेदाणे घालावेत, कडेने तूप सोडावे
१७. भरपूर बारिक चिरलेली कोथिंबीर, पुदीना घालावा
१८. तळलेला कांदा घालावा.
१९. झाकण लावून कडेनं कणीक लावून बंद करावं
२०. १ ते सव्वा तास मंद आचेवर ठेवावी. जाड बुडाच्या तव्यावर पातिलं ठेवल्यास खाली करपत नाही.
एकावर एक थर:
१. मी शानचा बिर्याणी मसाला वापरते.
२. तेल न वापरता पूर्ण तुपातपण करता येते पण खूपच हेवी होते. काजू, बेदाणे पण तुपात तळून घ्यायचे.
३. दह्याच्या रायत्याबरोबर सर्व्ह करायची
यावेळेस शेफ मिलींद सोवनी यांच्या पुस्तकात दिलेली टीप वापरली आणि फरक जाणवला. खडा मसाला कांद्याबरोबर न परतता काजू / बेदाणे / कांदा तळून घेतानाच तळून घ्यायचा आणि या पदार्थांबरोबरच एकावर एक थर देताना वापरायचा. त्यामुळे उग्र चव न येता सुरेख स्वाद (फ्लेवर) आला.
अंजली, तुझ्या रेसिपीने आज
अंजली, तुझ्या रेसिपीने आज बिर्याणी केली (मायनस केवडा जल आणि सील करायला कणिक) ..
अतिशय चविष्ट झाली .. अनेक आभार!
यावेळेस शेफ मिलींद सोवनी
यावेळेस शेफ मिलींद सोवनी यांच्या पुस्तकात दिलेली टीप वापरली आणि फरक जाणवला. खडा मसाला कांद्याबरोबर न परतता काजू / बेदाणे / कांदा तळून घेतानाच तळून घ्यायचा आणि या पदार्थांबरोबरच एकावर एक थर देताना वापरायचा. त्यामुळे उग्र चव न येता सुरेख स्वाद (फ्लेवर) आला. वर पण ही टीप टाकते.
जबरी. माझी फेवरेट रेसिपी.
जबरी. माझी फेवरेट रेसिपी.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
>>मस्त फोटो!>> +१ अप्रतिम
>>मस्त फोटो!>> +१
अप्रतिम होते ही बिर्याणी! आठवणीने इथे नवीन टीप शेअर केल्याबद्दल धन्यवाद अंजली
धन्यवाद मंजू आणि
धन्यवाद मंजू आणि स्वाती.
बिर्याणी मुरल्यावर दुसर्या दिवशी अजून छान लागली.
अजून एक टीप: मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये इथे उन्हाळा खूप होता. तेव्हा कांदा उभा चिरून, कडकडीत वाळवून ठेवला होता. फ्रीजमध्ये मस्त राहिला. बिर्याणीसाठी हा कांदा वरून घालायला पटकन तळून झाला.
बिर्याणी हि फक्त आणि फक्त
बिर्याणी हि फक्त आणि फक्त मटणाची असते....
सुरेख. काय एकसेएक तोंपासु
सुरेख. काय एकसेएक तोंपासु फोटो आलेत. भाज्या शिजतानाचा, केशर घातलेल्या, सजवलेल्या भाताचा आणि तयार बिर्याणीचा असे सगळेच फोटो भारी
काय भारी फोटो आहेत!
काय भारी फोटो आहेत!
फोटो अप्रतिम आहेत! काही
फोटो अप्रतिम आहेत!
काही दिवसांपूर्वी केवडापाणी मिळालं. ते वापरून करून बघेन.
काल केली बिर्यानी. मस्त झाली.
काल केली बिर्यानी. मस्त झाली. सगळ्यांना आवडली. धन्यवाद अंज्ली!
फोटो एकदम भारी तोंपासु आहेत.
फोटो एकदम भारी तोंपासु आहेत. व्यवस्थित नियोजन करून एकदातरी करणार ही बिर्याणी.
जबरी रेस्पी आणि फोटोसुद्धा.
जबरी रेस्पी आणि फोटोसुद्धा. नक्की करून बघेन आता ह्या रेसिपीने.
ह्या वीकेन्ड ला केली होती.
ह्या वीकेन्ड ला केली होती. एकदम मस्त झाली होती :). एक हेल्प हवी आहे मला, बिर्याणी साठी ब्राउन कांदा कसा करायचा? माझा डीप फ्राय केला की मऊ होतो
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
आज केली अशी बिर्याणी.. ़झकास
आज केली अशी बिर्याणी.. ़झकास झाली.
व्वा अंजली एकदम ढासु दिसतेय
व्वा अंजली एकदम ढासु दिसतेय बिर्याणी.....
बादवे इंग्रो मधे मिळणारा
बादवे इंग्रो मधे मिळणारा फ्राईड ओनिअन कोणी वापरलाय का?
मस्त!
मस्त!
इंग्रो मधे मिळणारा 'फ्राईड
इंग्रो मधे मिळणारा 'फ्राईड अनिअन' कुठल्या तेलात आणि कधी तळला असेल या शंकेने कधी वापरला नाही..मी उन्हा़ळ्यात कांदा चिरून कडकडीत वाळवून ठेवते (जुलै-ऑगस्ट आमच्याकडे भरपूर उन असतं), फ्रिज मधे छान रहातो. अगदी २ मिनीटात छान कुरकुरीत तळला जातो. काही मैत्रिणी कांद्याला तांदळाची पिठी लावून तळतात. त्यानंही कुरकुरीत होतो म्हणे. मी अजून ट्राय केलं नाहीए. किंवा ग्रोसरी स्टोअरमधे नुसता 'Dried Onion' मिळत असेल तर तोही पटकन तळून व्हायला हरकत नाही.
बिर्याणी छान झाली सांगितल्याबद्दल धन्यवाद
अवनमध्ये उभा पातळ कापलेला
अवनमध्ये उभा पातळ कापलेला कांदा तेलाचा हात लावून २७५ डिग्रीजला ठेवला तर छान कुरकुरीत होता. मधून मधून हलवायचा. मी नेहेमी असाच वापरते. तेल अगदी कमी लागतं.
आर्च, छान टिप. करून बघते.
आर्च, छान टिप. करून बघते.
मस्त रेसीपी आहे.
मस्त रेसीपी आहे.
कित्ती छान फोटो आणिपाक्रु! एक
कित्ती छान फोटो आणिपाक्रु!
एक नविन प्रकार कळला.
काल मोदिंनी म्हट्ल्याप्रमाणे प्रत्येकाची/प्रत्येक प्रांताची पद्दत ही वेगवेगळी असते!
पद्धत छानपणे समजून सांगितल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.
आज ही बिर्याणी ट्राय केली.
आज ही बिर्याणी ट्राय केली. मस्त झाली होती. घरच्यांनी सगळी फस्त केली.
धन्यवाद अंजली.
मस्तच!
मस्तच!
अमेझिंग झाली होती ही
अमेझिंग झाली होती ही बिर्याणी. मी आजवर वेगवेगळे पुलाव केले, पण बिर्याणी करायची हिंमत नव्हती. उद्या १७ जणांसाठी करुन न्यायची म्हणून आज ट्रायल घेतली, खूप खूप मस्त झाली होती, झालेले, उद्या होणारे सगळे कौतुक अंजली तुझे. मनापासून धन्यवाद.
आज ह्या रेसिपीने बिर्याणी
आज ह्या रेसिपीने बिर्याणी बनवतेय. मजा येतेय बनवताना. धन्यवाद अंजली.
थँक्यु अंजली, खुपच छान रेसिपी
थँक्यु अंजली, खुपच छान रेसिपी आहे.
प्रतिसाद दिलाय की आठवत नाही
प्रतिसाद दिलाय की आठवत नाही पण सुंदर फोटो आलेत. पाकृ. मस्त आहे, केवड्याशिवाय सर्व पदार्थ घरात पण आहेत. के. इ. नसले तर चालेल का?
या आठवड्यात नक्की करणार.
Pages