वांग्याची मुगडाळ घालून केलेली भाजी (South Indian Style)

Submitted by स्वप्ना_राज on 30 June, 2013 - 04:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम आकाराची वांगी, अर्धा कप मुगडाळ, ३ सुक्या लाल मिरच्या, मोहरी, अर्धा टीस्पून उडीद डाळ, कढीपत्ता, २ कांदे (बारीक चिरून), हळद, तिखट, हिंग, मीठ, चिंचेचा कोळ

क्रमवार पाककृती: 

वांग्याचे बारीक तुकडे करून पाण्यात भिजवत ठेवा.
मुगडाळ १५ मिनिटं पाण्यात भिजवा. १५ मिनिटं झाकण लावून शिजवा.

तेल गरम करा. त्यात ३ सुक्या लाल मिरच्या, मोहरी, अर्धा टीस्पून उडीद डाळ घालून परता.
हलकी ब्राऊन झाली की कढीपत्ता, २ कांदे (बारीक चिरून) घालून परता.
लालसर झाले की वांगी घालून परता.
हळद, तिखट, हिंग, मीठ घाला. परता.
चिंचेचा कोळ घाला. परता.
शिजलेली मुगडाळ घाला. परता.
गरमागरम सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
तुम्हाला वांगी किती आवडतात त्यावर अवलंबून आहे :फिदी:
माहितीचा स्रोत: 
सदर्न स्पाईस, एनडीटीव्ही गुड टाईम्स, २३ मार्च, २०११
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना, या भाजीमधे मूगडाळ आधी शिजवून घेतली तर ती गिचका होइल ना? मी या भाजीमधे मूग किंवा चणाडाळ घालते तेव्हा दोन तीन तास भिजवून घेते आणि मग वांग्यासोबत शिजवून घेते. त्यामुळे डाळ सुटी राहते आणि भाजी छान दिसते. भाजी शिजत आली की त्यामधे चमचाभर सांबार मसाला घातला की टिपिकल दक्षिणी चव येते.