वट पूर्णिमा

Submitted by हर्शा १५ on 22 June, 2013 - 17:03

वट पूर्णिमा ची विधी आणि कथा ची माहिती लिंक हवी होती इंटरनेट वर. कोणी मदद कराल का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘स्त्री ‘सात जन्म हाच (एकच) पती मिळो’, असे व्रत करते. याचा अर्थ ती स्त्री अनेकातून एकात आलेली असते. तसेच एकपत्नीव्रत घेतलेला पुरुष अशा स्त्रीच्या जीवनात येण्याची शक्यता असते. अशा जोडीची देवाण-घेवाण एका जिवाशीच राहते. तसेच अनेकातून एकात आल्याने साधनेद्वारे शुद्ध पुण्य मिळवून सुख-दुःखाच्या पलीकडे जाणे तिला शक्य होते. एकात आल्याने तिला पती (पतितांचा उद्धार करणारा), म्हणजे गुरु जीवनात येतात. त्यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत जीव-शिव ऐक्य साधणे शक्य होते.

>> सगळे डोक्यावरुन गेले. मी व्रत केले नाही म्हणजे मी एकातुनच आली वाटते Lol

तसेच एकपत्नीव्रत घेतलेला पुरुष अशा स्त्रीच्या जीवनात येण्याची शक्यता असते.

येवढे करुनसुद्धा फक्त शक्यताच? Question.GIF

ही सगळी व्रतवैकल्ये बाईने चांगल्या नवर्‍यासाठी करायची. नवर्‍यांना बायकांसाठी कुठलीही व्रतवैकल्ये नाहीत. म्हणजे थोडक्यात चांगल्या बायका सगळ्याच आहेत पण चांगले नवरे ही खूप म्हणजे खूप दुर्मिळ व अप्राप्य गोष्ट आहे ही वस्तुस्थिती पूर्वापार चालत आलेली दिसते... Wink

ही सगळी व्रतवैकल्ये बाईने चांगल्या नवर्‍यासाठी करायची. नवर्‍यांना बायकांसाठी कुठलीही व्रतवैकल्ये नाहीत. म्हणजे थोडक्यात चांगल्या बायका सगळ्याच आहेत पण चांगले नवरे ही खूप म्हणजे खूप दुर्मिळ व अप्राप्य गोष्ट आहे ही वस्तुस्थिती पूर्वापार चालत आलेली दिसते... >>> नी .. Lol

भविष्यात अमुक तमुक होईल म्हणून अमुक तमुक व्रत अशी काही शास्त्रीय पुराव्यानिशी सिद्ध करणारी समीकरणे आहेत का? नाहीत.
मग मरोत ती व्रते. भविष्यासाठी चांगले काम करणे, चांगला नागरीक असणे, पुढच्या पिढीलाही हाच वारसा देणे... या गोष्टी केलेल्या बर्‍या.

वट पौर्णिमेच्या निमित्ताने एक वडाचे झाड लावले तर नवराच काय.. आसपासच्या अनेकांचे आयुष्य वाढेल.
मी सुपारीचे लावले. Zoka.gifआणि पुजा करुन वाटले असते त्यापेक्षा जास्त छान वाटतेय.

वडाचे झाड लावायला हे निमित्त कशाला हवे?
पण ठिके फांद्या ओरबाडून घरात पुजा करण्यापेक्षा वडाचे झाड लावलेले बरे.

वडाचे झाड लावायला हे निमित्त कशाला हवे?

>> काही गोष्टी निमित्तानेच होतात ना गं आपल्याकडुन..

आणि हे झाड लावणं एक प्रथा म्हणुन रुजलं तर फार छान होईल.

लोला .... इतक्या सात्विक व्रताची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. मी आज पाहिलं नाहीतर काल व्रत केलं असतं.

>>>> ‘या दिवशी प्रकट स्वरूपात शिवतत्त्वस्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते. शक्तीरूपी जाणिवेतून शिवरूपी धारणेशी एकरूप होण्याच्या भावातून हे व्रत केले असता जीव-शिव एकरूपतेची अनुभूती (टीप) येऊ शकते. वायूमंडलातील शिवरूपी लहरींच्या गोलाकार भ्रमणामुळे देहात वैराग्यभावाची निर्मिती होऊ शकते. यामुळे माया त्यागातून होणारे ईश्वराचे अनुसंधानात्मक स्मरण शिवरूपी अधिष्ठानातून जिवाला मिळण्यास साहाय्य होते.’
- एक विद्वान (टीप) (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, वैशाख कृष्ण दशमी (३०.५.२००८), दुपारी ३.२१) >>>> याचं मराठीतून भाषांतर करून कोणी सांगा प्लीजच.

भयंकर विनोदी लेख आहे हो लोलाताई! माझ्या डोक्यावरून विमानेच विमाने गेली. ज्या जणी हे व्रत खरोखरच प्रामाणिकपणे करतात त्यांनाही 'आपण हे का बरे करतो?' असा प्रश्न पडायला लावणारा लेख! Proud

लोलाताई, आयुष्याचे सार्थक झाले हा लेख वाचून. याचा जो कर्ता करविता आहे त्याला कोपरापासून वंदन!!
वेळ असेल आणि टीपी करायचा असेल तर याहून अशक्य कैच्या कै लेखन मिळणार नाही. नमुन्यादाखल -

अ. दात घासणे
उपवासाच्या दिवशी आणि श्राद्धाच्या दिवशी दात घासू नयेत. आवश्यकता वाटल्यास पाण्याने गुळण्या कराव्यात. बारा चुळा भराव्यात अथवा आंब्याच्या पानाने, काष्ठाने किंवा बोटाने दात स्वच्छ करावेत.

आ. स्नान
प्रतिदिन स्नान केले पाहिजे. वायू सरला असता, जोरात रडल्यावर, रागावल्यावर, उंदीर आणि मांजर यांना शिवल्यावर, मोठ्याने हसल्यानंतर अन् खोटे बोलल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे.

ही अशी मौक्तिके पानापानावर उधळली आहेत. Rofl

Biggrin कैच्याकै च...

पुढल्या जन्मी ही बायको / हा नवरा नको, यासाठी कोणते व्रत नाही का?<<< पुढचा जन्म?? अत्ताचा नवरा इतका वाईट आहे का??? Uhoh

दात घासणे / अंघोळ करणे वगैरे तर कहर आहेत Rofl

वायू सरला असता, जोरात रडल्यावर, रागावल्यावर, उंदीर आणि मांजर यांना शिवल्यावर, मोठ्याने हसल्यानंतर अन् खोटे बोलल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे.>>>>

ह्यातलं पहिलं लै भारी आहे..... ह ह पू वा...

लोला तुला कशा काय ह्या लिंका मिळतात ?

लोला ची लिन्क ऑफिस मधे ओपन होत नाहीय. वरचे रिप्लाय वाचून ऊत्सुकता वाढ्लीय.

मागे वाचले होते की वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे महत्वाचे कारण हे की वडाचे झाड उपयोगी आहे आणि पूजा केल्यामुळे शक्यतो ते झाड तोडले जात नाही.
वडाचे झाड दिवशी ५०० गॅलन वाफ बाहेर टाकते त्यामुळे उन्हाळयात झाडाखाली गारवा असतो आणि हवेत ऑक्सीजन चे प्रमाण जास्त असते. ज्येष्ट महिन्यात वडाच्या पारंब्याना कोंब येतात जे औषधी असतात त्यामुळे ते गुरांनी खाऊ नये किन्वा सहज तोडले जाऊ नये म्हणून धागे बांधले जात.
जास्तीत जास्त वडाची झाडे लावली जावीत आणि असलेली झाडे तोडली जावू नयेत म्हणून पूजेची प्रथा सूरू झाली असावी. आजच्या काळात ही लोकं यामागील शास्त्रिय कारणे समजून न घेता त्याचा संबंध जन्मोजन्मि हाच पती वैगरे या गोष्टींशी अजुनही लावतात याचे आच्छर्य वाटते.
माझ्या एका मैत्रीणीने ऊपवास केला आणि ४.५० PM ला सोडला , कारण हे की पोर्णिमा संपली.

दैनिक सनातन प्रभात असे गुगला..
याहून एकसेएक विनोदी गोष्टी सापडतील.. संध्यानंदला टक्कर देईल असे प्रकरण आहे हे... Happy

ज्येष्ट महिन्यात वडाच्या पारंब्याना कोंब येतात जे औषधी असतात त्यामुळे ते गुरांनी खाऊ नये किन्वा सहज तोडले जाऊ नये म्हणून धागे बांधले जात. हे नवीनच वाचले! वडाच्या झाडाकडून
जास्तीत जास्त ऑक्सीजन सोडला जातो एतकेच माहीत होते.

वडाचे संवर्धन व्हावे हा जरी हेतू असला तरी आजकाल शहरीकरणामुळे वड जिकडे तिकडे नसल्याने लोकांनी वडाच्या डहाळ्या तोडायला सुरुवात करून झाडाची नासधूसच केलीय एका प्रकारे.

ज्येष्ट महिन्यात वडाच्या पारंब्याना कोंब येतात जे औषधी असतात त्यामुळे ते गुरांनी खाऊ नये किन्वा सहज तोडले जाऊ नये म्हणून धागे बांधले जात.
<<
नक्की काय औषधी गुण असतात?

Happy 'त्या' काळी वडाची झाडे बक्कळ अन "धागा" हा आयटम त्यामानाने हज्जारो पट किमती असणारे. एका कापसाच्या बोंडातून कपडा विणण्याच्या लायकीचा धागा तयार करायला काय हायउपस करावी लागते याची कल्पना नसलेल्या कुणा आधुनिक इंटरनेटी-पुराणिकाने ठोकलेली लोणकढी आहे ती.

रच्याकने. गुरे वड खातात??

वट पोर्णिमा >>>>>>याबाबत मला असे वाटते की त्याकाळी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची व एकत्र जमण्याची एक सुंदर युक्ती होती.देवाधर्माचे अधिष्टान दिल्याखेरीज लोक बर्‍याच गोष्टी मानत नाहीत.
आपले बरेच सणवार श्रावणात येतात.नाना प्रकारची फुले,पत्री इ. याकाळात विपुलतेने आढळतात.त्यांची
माहिती करून घेण्यासाठी किमानपक्षी सृष्टीसौंदर्य पहाण्यासाठी नाग्पंचमी,हरितालिका आणि श्रावणातले
बरेच सण असावेत.पावसाळी सहल म्हणा!
आपल्या बर्‍याच रूढींना थोडे खरवडले तर विज्ञानावर / निसर्गाच्या सौंदर्यावर आधारित बर्‍याच गोष्टी आढळतात.
पितृपक्षात असणारे कावळ्याला महत्व! हा बाबा ना रुपाचा ना गुणाचा. आवाज ऐकायला नको.विनाकारण
हत्या नको.त्यापेक्षा त्याला पूर्वज दिसतात. संक्रांतीला तीळ्गूळ इतकेच राहिले. पण त्या दिवशी उत्तरायण का
दक्षिणायन चालू होऊन दिवस मोठा होत जातो.दसरा म्हणजे धान्यांच्या लोंबीत दाणे भरु लागतात.दिवाळी
म्हणजे सुगीचे पर्व! harvest time.वगैरे वगैरे!
काशीची गंगा रामेश्वराला आणि रामेश्वराची गंगा काशीला .यात निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्या म्हटला तर
शक्य झाले असते का? पर्यटने मनुजा येई चातुर्य हे समजवून सांगण्यापेक्षा देवाच्या नावावर घातले की बर्‍याच गोष्टी सोप्या होतात.
असो! अवडंबर नको हे अगदी खरे. वैयक्तिक म्हटल्यास मला श्रावण आवडतो.वातावरण छान असते.ते मला
आवडते.बालकवींची खरच कविता आठवते.

सर्च केल्यावर विधी आणि कथा असलेली तीच लिंक मिळाली.
बाकी तिथं काय अगम्य लिहीलंय त्याच्याशी आपल्याला काय करायचंय.. Wink

पर्यटने मनुजा येई चातुर्य यापेक्षा देवाच्या नावावर घातले की बर्‍याच गोष्टी सोप्या होतात.

फक्त त्यासाठी पंडितांच्या ओट्यात हजारो पैसे ओतावे लागतात.

बुडख्याला धागा बांधणे आणि गुरानी कोंब खाणे यातला संबंध नाही कळला.

गुरे झाडावर चढून कोंब खातात का?

आणि समजा, असलेच खात तर त्यांचे खाद्य त्याना द्यायला नको का?

(सारकास्टीक पणे लिहिणार्यांना रीप्लाय करणे बंद केले आहे. )

ज्येष्ट महिन्यात वडाच्या पारंब्याना कोंब येतात जे औषधी असतात त्यामुळे ते गुरांनी खाऊ नये किन्वा सहज तोडले जाऊ नये म्हणून धागे बांधले जात. हे नवीनच वाचले! वडाच्या झाडाकडून
जास्तीत जास्त ऑक्सीजन सोडला जातो एतकेच माहीत होते.
>> येळेकर मी आधीच म्हटले आहे की मी हे कुठेतरी वाचले. हे माझे विधान नाही.
आपले पुर्वज प्रत्येक गोष्टी चा संबंध देवाशी जोडायचे कारण त्यांना माहीत होते की त्याशिवाय लोक ऐकणार नाहीत पण त्यामागे खरी शास्त्रिय कारणे काय आहेत त्यासंबंधात एका लेखात हे आले होते.

देवाधर्माचे अधिष्टान दिल्याखेरीज लोक बर्‍याच गोष्टी मानत नाहीत.> हे मला ही पटते म्हणूनच बर्याच गोष्टी या देवाधर्माशी निगडीत आहेत.

गुरे झाडावर चढून कोंब खातात का? > मीरा प्रश्न विचारायचा म्हणून विचारता का? स्वतःच विचार करा जरा.

जरुर द्यायला पाहिजे.> टुनटुन कोंब हे गुरांचे खाद्य नाही पण कदाचीत पारंब्यांचे कोवळे कोंब खात असतील असेही असू शकेल ना?

सामी मी तेच म्हणतेय की मोठ्या शेळ्या, गाई या उंचावुन कोवळी रोपे, कोंब इत्यादी सहजपणे खाऊ शकतात, पण त्यांच्या पिल्लांना ते शक्य होत नाही. तेव्हा गुराखी असो वा शेतकरी त्यांनी या गुरांसाठी ते उपलब्ध केले तर नाहक वृक्ष तोडणी ( जी मोठी गुरे पिके, लहान रोपे बेधडकपणे तुडवतात अशी ) थांबेल.

वडासाठी पूजा वगैरे अंधश्रद्धा सोडा, पण त्याच्या सावलीत विश्राम मिळतो, पारंब्यांचाही उपयोग तेलासाठी ( डोक्याला लावायच्या ) होतो. वटजटादी या नावाने आहे ते तेल. आता ते आयुर्वेदीक आहे, म्हणून त्याची टिंगल करु नये.

नाहीतर आता विदेशी लोक आपल्याच वस्तुंचे पेटंट घेऊन आपल्याला ते चढ्या भावाने विकतील, नव्हे विकत आहेतच. पण काये ना सोनाराने कान टोचावे लागतात्.:डोमा:

वडाच्या झाडांचे संवर्धन करा, दोर्‍याची नासाडी, इतर वस्तूंची नासाडी करू नका...
हे आज जास्त योग्य होईल. >+++++११११११

शेळ्या पिंपळाची पाने खातात. वडाबाबत कल्पना नाही. रोज देवाधर्मासाठी फुले, पाने, आघाडा, तुळस, आंब्याची पाने, वडाच्या फांद्या , होळीला एरंड तोडणार्‍या समाजाने गुराखी, शेळ्या यांनी केलेल्या नासाडीची चर्चा करणे हा किती मोठा विनोद आहे नै?

किती अवतार झालेत देव संचालक जाणे.:फिदी:

अहो इथे चर्चा चाललीय वडाची ( त्याचेच निमीत्त झाले ना?)

आणी समजा वृक्षाची पाने तोडली तर निदान नवीन तरी येतील, पण अख्खे झाड किंवा फांद्याच उपटुन तोडल्या तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? वरचे विधान नीट वाचा तरी, की उचलला कीबोर्ड आणी बडवला धाडधाड असे आहे?

फुले, पाने वहावी अथवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नाहीतर बाकीही प्रश्न येथे निकालात काढता येतील, नाही का? Proud

शेळ्या पिंपळाची पाने खातात. वडाबाबत कल्पना नाही.
>>
माबोवर शेळी म्हणुन एक सदस्य आहेत्/होते. त्यांना विचारुन पहायला हवे की ते काय खातात. Lol

सामी
<em> हे नवीनच वाचले!वडाच्या झाडाकडून
जास्तीत जास्त ऑक्सीजन सोडला जातो एतकेच माहीत होते.मी आधीच म्हटले आहे की मी हे कुठे
री वाचले. हे माझे विधान नाही.>>>सामी...मला माहित नव्हते.म्हणून कौतुकाने केलेले विधान होते माझे.

ही अजुन एक सनातन सारखिच वेबसाईट, माझ्या फेसबुक वरील एक मैत्रिण याच्या लिंक टाकत असते नेहेमी. कधि कधि तिला ब्लॉक करावे असा विचार येतो पण अजुन तसे झाले नाहिये!

http://www.hindujagruti.org/hinduism/knowledge/category/achardharma-prac...

Why are new clothes worn on an auspiscious day?

On specific days like the festivals, the Principles of specific Deities descend onto the earth and are active in a higher proportion. By wearing new clothes on such days, the clothes absorb the frequencies of the Principles of the Deities and become Sattvik.

Why should one not use brush for cleansing teeth?

The bristles of a toothbrush are made of synthetic material. These bristles emit Raja-Tama particles. As a result, a covering of Raja-Tama frequencies is created around the gums and the teeth.

Why do the dresses from western culture cause distress at spiritual level?

According to the Western culture, the men normally wear clothes like shirt-pant, jeans and T-shirt, Bermuda pant or suit and tie etc. The dresses are Raja-Tama predominant. For this reason the negative energies get attracted towards the clothes. There is a possibility of distress by negative energies.

मी समजु शकते प्रिया७ Happy

Pages