माझ्या आठवणीत हा भाजणीच्या वड्यांचा खमंग वास, बाहेर ऊन पावसाचा खेळ, बरोबरीने मटकीच्या उसळीचा वास आणि मंगळागौरीचा सण असं सगळं एकमेकांबरोबर येतं.
मंगळागौरीच्या दिवशी संध्याकाळी हमखास हा बेत असायचा.........अजूनही बर्याच ठिकाणी असतो.
तर ही घ्या वड्यांची रेसिपी.
एका कुंड्यात २ वाट्या थालिपिठाची सालासकटच्या कडधान्यांची भाजणी घ्या. त्यात अर्धी वाटी दही, १ चमचा तेल, १ चमचा काळा(गोडा) मसाला, २ मिरच्या बारीक चिरून, १ चमचा लाल तिखट,(मिरच्या आणि तिखट आवडीप्रमाणे घ्या.) चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर असं एकत्र करा. हे पीठ कणकेसारखं खूप मळायचं नाही. ओबडधोबडच ठेवायचं.
मग गॅसवर फ्राय पॅन ठेवा. त्यात अगदी थोडं.....साधारण १ चमचा तेल घाला. एका बाऊलमधे तीळ घ्या. मळलेल्या पिठातील लिंबाएवढ्या पिठाच्या गोळ्याला एका बाजूने तीळ थापून घ्या . नंतर एका प्लॅस्टिक कागदावर तिळाची बाजू खाली करून या गोळ्याचा वडा थापून घ्या. हा वडा मध्ये थोडा जाडसर व कडेने पातळ असावा. याला मधोमध भोक पाडा. व आता पॅनमधील तेल गरम झाले असेल, त्यात हे वडे दोन्ही बाजूंनी छान तळून घ्या.
तिळाकडील बाजू जळू नये याकडे लक्ष द्या. कारण तीळ पटकन करपतात.
आधी फुल फ्लेमवर व नंतर मंद गॅसवर हे वडे खरपूस तळून घ्या. व गरम गरमच लोण्याच्या गोळ्याबरोबर सर्व्ह करा.
भरपूर तेलात डीप फ्राय केले तर हे वडे छान फुगतात आणि जास्ती चविष्ट लागतात...............अर्थातच.
शॅलो ...... की डीप.........हे ज्याचं त्याने ठरवावं! कारण वर लोणीही घ्यायचंय हे विसरू नये.
प्रश्नः हे कश्याबरोबर खातात?................(अर्रर्रर्र.............कित्ती तो अवघड प्रश्न!!!!:फिदी:)
उत्तरः..........अं.............हे नारळाच्या चटणीबरोबर खातात सहसा(खरंच?)......पण अं............सॉसबरोबरही छानच लागतं!(होक्का? बर्रबर्र)
असो......................
भाजणीची रेसिपी वेगळी देत आहे.
तिळाची आयडिया भारिये!!
तिळाची आयडिया भारिये!!
ह्यात कांदा घालून शॅलो फ्राय
ह्यात कांदा घालून शॅलो फ्राय केलेत तर याला वडे का म्हणावे? थालिपीठ का म्हणू नये?
भाजणीच्या वड्यांना भोक नका पाडू (लाजरीच्या रोपट्याला दृष्ट नका लावूच्या चालीवर ;-))
फोटो मस्त आलेत! भिजवलेल्या भाजणीचा गोळा भारी दिसतोय.
मला आत्ताच्या आत्ता भाजणीचे वडे आणि दह्यात मिसळलेलं मिरचीचं लोणचं खावंसं वाटतंय
मस्त पाकृ आणि तोंपासु प्रचि
मस्त पाकृ आणि तोंपासु प्रचि
असं काय ते
असं काय ते मंजूडे........थालिपिठात आपण दही कुठे घालतो आणि ते शॅलो फ्राय कुठे करतो?
ते अगदी तव्याला तेलाचा हात पुसून घेऊन करतो ना............!
भाजणीच्या वड्यांना भोक नका पाडू (लाजरीच्या रोपट्याला दृष्ट नका लावूच्या चालीवर ):फिदी:
असो...............
सर्वांना धन्यवाद!
मस्त. आमच्याकडे भाजणीच्या
मस्त. आमच्याकडे भाजणीच्या वड्यात कांदा घालत नाही आणि तीळही वरुन लावत नाहीत. पण वाईट कशाला लागतील म्हणा? खाताना लोणी, नारळाची चटणी वगैरेच असते. शॅलो पेक्षा डीप फ्राय करुनच भारी लागतील.
डीप फ्राय करुनच भारी लागतील >
डीप फ्राय करुनच भारी लागतील > हो, डीप फ्रायच छान लागतात.
आणि आम्ही कांद्याच्या ऐवजी लसूण घालतो. काय छान लागतात, खमंग!
(कांदा घातला की थालिपीठ होते असे आजी म्हणते. )
प्रवासाला जाताना ड्ब्यात घेऊन जायला मस्त पदार्थ आहे.
फोटो फार छान आहेत.
मस्त आलेत फोटो आमच्याकडे
मस्त आलेत फोटो
आमच्याकडे पीठात आलं- लसूण- मिरची- कोथिंबीर वाटण घालून तळतात. दिवाळीला फराळाला कुणाला बोलावलं असेल तर आवर्जून करतात.
छान दिसताएत वडे. मी कधीच
छान दिसताएत वडे. मी कधीच स्वतः केलेले नाहीत. करते एकदा.
वडे सुपरकातिल दिस्तात!
वडे सुपरकातिल दिस्तात!
स्लर्प!! कस्ले तोंपासू
स्लर्प!! कस्ले तोंपासू दिस्ताहेत वडे!!............. (तुला मी मनातल्या मनात माफ केलंय बरंका! कारण पुण्यात अशा पावसाळी हवेत हे असे नुस्ते फोटो बघायचे म्हंजे काय??) .............
भारी फोटो! ५ वा फोटो भारी
भारी फोटो!
५ वा फोटो भारी आहे!
मस्त! विकतच्या भाजणीचे होतील
मस्त! विकतच्या भाजणीचे होतील का असे वडे?
रच्याकने ५ वा फोटो सांगतोय - हायजिनिकली प्रोसेस्ड! कळालं...
दिसताहेतही खमंग. भाजणीत काही
दिसताहेतही खमंग.
)
भाजणीत काही दुसरी भर नाही का घातली. आमच्याकडच्या भाजणीचे वडे तेलात विरघळतील असे वाटतेय. ( माझ्याकडची भाजणी जूनी झालीय आता
ह्यात कडकडीत तेलाचं मोहन
ह्यात कडकडीत तेलाचं मोहन घालतो आम्ही. (आणि भोक पाडतोच हो! :P)
तीळ लावायची आयडिया आवडली. मी थालीपिठात घालतेच तीळ आणि ओवाही. पण तो आतच घालते, वरून थापत नाही.
स्लर्रप.... वडे, पाकृ आणि
स्लर्रप.... वडे, पाकृ आणि फोटू सर्वांसाठीच!
मस्तच दिसताहेत वडे!
मस्तच दिसताहेत वडे!
दह्यात मिसळलेलं मिरचीचं लोणचं
दह्यात मिसळलेलं मिरचीचं लोणचं खावंसं वाटतंय
<<
मी खाणारे आत्ताच्या आत्ता! टुक्टुक
आम्ही हि भोकं पाडतो...
आम्ही हि भोकं पाडतो... वड्याला.
भाजणीचे वडे करताना आम्ही
भाजणीचे वडे करताना आम्ही कांदा आणि कोथींबीर नाही घालत, तीळ भिजवताना घालतो आणि भोके पाडतो वड्यांना, सासुबाई भोके नाही पाडत पण आईकडे भोके पाडतात म्हणून मला सवय आहे, डीप फ्राय करतो. आता अशाप्रकारे करून बघेन.
मंगळागौरीची आठवण, perfect
मंगळागौरीची आठवण, perfect मानुषीताई,भाजणीचे वडे आणि मटकीची उसळ, क्या बात हे, वा.
फोटो आणि पाकृ छान .कडधान्ये
फोटो आणि पाकृ छान .कडधान्ये आणि ज्वारी अगोदर भाजून दळल्यास ' भाजणी' आणि कच्चे पीठ केल्यास 'भरडा ' होतो .दोघांची चव थोडी वेगळी लागते पण भाजणीचे वडे कधिकधी फारच तेल पितात तेलकट होतात .ते कशामुळे ?
सायो, माधवी अन्जली सिन्डी
सायो, माधवी अन्जली सिन्डी मृण्मयी शांकली प्राजक्ता सर्वांना धन्यवाद!
हायजिनिकली प्रोसेस्ड! कळालं... >>>>>>>>>> योगेश :स्मितः! हं..........ज्या प्लॅस्टिकवर वडे थापले ती साखरेची पिशवी होती. त्यावरची अक्षरं दिसताहेत. आणि योगेश विकतच्या भाजणीचे वडे दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे इतर काही पिठं मिसळून होतीलही! पण जो बात घरकी भाजणीमे है.......विकतच्या भाजणीमे नही!(जो बात तुझमे है तेरी तसवीरमे नही च्या चालीवर!
दिनेशदा यात काही मिसळण्याची गरज नाही. उलट यात मी वर म्हटल्याप्रमाणे बाजरी घातली तर पीठ अजूनच मिळून येते. पण जास्त दिवस राहिली तर कडू होण्याची शक्यता.
स्वाती आंबोळे.........ओव्याची आयडिया छाने.
अकू गौरी इब्लिस झंपी सर्वांना धन्यवाद!
एकदम मस्त वडे! आता आलो घरी
एकदम मस्त वडे!
आता आलो घरी की करायला सांगणार!
भारीयेत
भारीयेत
मानु.. येक प्लेट इधर
मानु.. येक प्लेट इधर भी!!!!!!!!!! मस्त दिस्तायेत..पण मला इतके सारे तीळ लावून नकोत
वा मस्त दिसताहेत वडे ... छान
वा मस्त दिसताहेत वडे ...
छान आहे रेसिपी. घरी नेली पाहिजे....
कृष्णा, झकासराव जो
कृष्णा, झकासराव जो एस.....धन्यवाद!
वर्षू आता जरा सोप्पय गं.........येक प्लेट भेजना! अब तुम हमारे कन्ट्रीमे आ गयी!
मी कालच केले होते भाजणीचे वडे
मी कालच केले होते भाजणीचे वडे आणि चिकन चेट्टीनाड (याला म्हणतात भारतीय एकात्मता) . पण आम्ही तीळ लावत नाही. भाजणी आमच्या सासूबाई दोन तीन महिन्यांनी पाठवून देतात. त्यांनी भाजणी पाठवावी म्हणून मग मला "मला ते वडे अज्जिब्बात आवडत नाहीत, पण सतिशला फार म्हणजे फार आवडतात. त्याला विकतच्या भाजणीचे वडे करून घालते, कारण मला भाजणी येत नाही" असे सांगत रहावे लागते.
वड्यांना भोक पाडायला हवंच नाहीतर त्यांना पुर्या का म्हणू नये?
व्वा . मस्तच...
व्वा . मस्तच...
व्वा! छानच. कधी येऊ खायला?
व्वा! छानच. कधी येऊ खायला?
Pages