आंबट बटाटा

Submitted by देवकी on 18 June, 2013 - 13:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम बटाटे,आमटीची पाव वाटी ओले खोबरे, चिंच,गूळ,मोहरी,मेथी,हिंग,१ - १.५छोटा चमचा तेल्,मीठ,हळद.

क्रमवार पाककृती: 

बटाटे सोलून उभे चिरावे. चिप्सप्रमाणे कापावे.
पातेल्यात तेल टाकून मोहरी,मेथी,हिंग अशी क्रमाने फोडणी करून त्यात हळद घालावी.पाणी घालावे.
त्यात चिरलेले बटाटे घालावे.पाव वाटी ओले खोबरे, चिंच पाणी घालून बारीक वाटावे.
बटाटे शिजल्यावर मीठ,तिखट,गूळ घालून वरील वाटण घालावे.

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

वाटण घातल्यावर गॅस मंद ठेवून ढवळावे.उकळी येऊ देवू नये.
खोबर्‍याचा रस फाटू शकतो.
कोकणातील नैवेध्ध्याच्या तसेच समारंभातील पानात आवर्जून केली जाणारी भाजी.
ह्याच पध्द्तीने श्रावणात मिळणार्‍या पोपटी भेंड्यांची भाजी करतात.
ओले खोबरे कमी वाटल्यास थोडे वाढवावे.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टुनटुन ,
धन्यवाद!

दिनेशदा
कारवारी प्रकार आहे ना हा ? >>>>> नक्की माहीत नाही. पण आमच्याकडे व्हायचा.मला
फक्त १-२ टे.स्पूच आवडतो.त्यामुळे माझ्याकडे फारसा नाही होत.
खोबरे मात्र फारच कमी असते.>>>>> खरय! चुकीची दुरुस्ती केलीय.

पिन्कि ८० |
खोबर्याचे वाट्ण न घालता करुन बघेन >>> कोकणात खोबर्‍याशिवाय पदार्थाला सद्गती(सत्+गती) नाही हो!