गवसणीतुन गवसलेले काही नवीन पदार्थ

Submitted by प्रभा on 17 April, 2013 - 08:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गवसणीला लागतात तेच, याशिवाय बटाटा, पनीर, मिरची, कोथिंबीर, तिखट, मिठ, तेल, मिश्र डाळीच पीठ.

क्रमवार पाककृती: 

गवसणी साठी करतो तसेच कणीक व उकडीचे गोळे बनवुन घ्यावेत. आता उकडलेले बटाटे किंवा पनीर घेउन किसुन घ्यावे. त्यात मिरची, तिखट, मिठ, कोथिंबीर व आवडी-प्रमाणे आंबट व चवीला साखर घालून मिसळुन घ्याव. व त्याचे गोळे[ उकडीच्या गोळ्या पेक्षा थोडे लहान] बनवुन घ्यावेत. हे गोळे उकडीच्या गोळ्यात पुरणासारखे भरुन गोळे तयार करुन ठेवावेत. यानंतर कणकेच्या गोळ्यात हा गोळा पुरणासारखाच भरुन हलक्या हाताने पुरीच्या आकाराचे थोडे जाडसर लाटुन घ्यावेत. व तव्यावर दोन्ही बाजुने भाजुन थोडे बटर घालून खरपुस भाजुन घ्यावेत. खायला तयार. फारच मस्त झालेत. नाव काय देता येइल ते बघा.
[२] उकडीत सारण भरुन [ बटाटे, पनीर, किंवा कुठलीही भाजी] गोळे बनवुन घ्यावेत. आता मिश्र दाळीच पिठ घेउन त्यात थोड तिखट,मिठ थोड तेल घालून भज्याच्या पिठापेक्षा थोड घट्ट भिजवुन घ्याव. व उकडीचे गोळॅ या पिठात भिजवुन [बटाटे वड्याप्रमाणे] तळून घ्यावेत. किंवा आप्पे पात्रात घालून आप्पे करावेत. मी हे आप्पे बाउल मधे घेउन यावर दही [ दही- वड्याचे] व खजुराची चटणी घालून त्यावर कांदा, टमाटा , कोथिंबीर [चिरुन] व बारीक शेव घालून सर्व्ह केल. अप्रतीम टेस्ट.
[३] याच प्रकाराने भगरीची उकड घेउन त्यात बटाटा व पनीर किसुन गोळे तयार केले व ते शिंगाड्याच्या पिठात बुडवुन तळले. दही, व चटणी बरोबर सर्व्ह केलेत.

वाढणी/प्रमाण: 
४-५ व्यक्ती.
अधिक टिपा: 

धन्यवाद. दिनेशदा. तुमच्या गवसणीं मुळेच सुचले हे पदार्थ. व आमची छोटीशी पार्टी छान झाली. या बरोबर कैरीची डाळ व पन्ह, शेवटी आइस्क्रीम..

माहितीचा स्रोत: 
गवसणी----
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> नाव काय देता येइल ते बघा
अब्बी में डब्बी, एकात एक, एक से भले दो, खटाटोपो भयंकरः Light 1

रेसिपीज इन्टरेस्टिंग आहेत प्रभाताई.
पण कणकेत उकड, उकडीत सारण इतका खटाटोप माझ्याच्याने होणार नाही. Happy

स्वाती, यात खटाटोप कहीच नाही. गवसणीचीच तयारी करायची. कुकरमधे १-२ बटाटे उकडायचे. किंवा पनीर असेल तर ते वापरायच. तिखट, मिठ वगैरे टाकून गोळॅ बनवुन घ्यायचे.करतांना मजा वाटते.व पोटभरही होत. फोटो टाकायला हवे होते. पण ते तंत्र अजुन समजुन घेतल नाही. पुण्याला असते तर सुनबाइ ने टाकले असते. आता बघेल प्रयत्न करुन. सध्या या क्षेत्रात मी रांगत बाळ आहे. नाही का?

आहारशास्त्र व पाकक्रुती या ग्रुप मधे ,'' आमरस व गवसणी'' ही दिनेशदा ची रेसिपी आहे. ती बघता येइल. मस्त आहेत हे पदार्थ. नक्की करुन बघाच. कळवा कसे झालेत.