एक कप तांदूळ,
मूठभर पोहे
एक कप भात
२ टी स्पून साखर,
२ टी स्पून अॅक्टिव्ह ड्राय यीस्ट
आप्पम साठी खास तवा मिळतो, तो नसल्यास मधे खोलगट असलेला तवा , किंवा शॅलो कढई पण चालेल.
थोडेसे तेल
तांदूळ अन पोहे कमीतकमी चार तास भिजत ठेवावेत.( मी शुक्रवारी सकाळी ऑफिसला जायच्या आधी भिजवते )
भिजवलेले तांदूळ अन भात एकत्र मऊ वाटून घ्यावे. वाटण फार पातळ करू नये .
वाटण होत आले की अर्धी वाटी कोमट पाण्यात साखर विरघळवून घ्यावी व यीस्ट त्यावर शिंपडावे.
५-७ मिनिटात यीस्ट फुलून येईल .
ते मिश्रण पीठात नीट कालवून , झाकून , उबदार जागी ७-८ तास ( रात्रभर) ठेवावे.
आप्पम करताना त्यात चवीपुरते मीठ घालून ढवळावे.
मध्यम आचेवर तवा तापवावा, पळीने पीठ घालून तव्याचे कान पकडून हलवून पीठ गोल पसरून घ्यावे.
कडेने पातळ , थोडा कुरकुरीत अन मधे फुगीर , जाळीदार व्हायला हवा.
नॉन स्टिक तवा असेल तर तेल अगदी कमी लागते - पहिल्यावेळेस थोडेसे घातले तर बस.
एक दीड मिनिटाने हलक्या हाताने उलटावे . आप्पम पांढरा शुभ्र रहायला हवा डाग पडता कामा नये.
सिंडीच्या वाढदिवसानिमित्त कृती
याबरोबर कडला करी नावाची चण्याची डिश एकदम टीपिकल आहे , पण कोल्हापुरी अख्खा मसूर + आप्पम असे कॉम्बिनेशन पण छान लागते.
मी सोना मसूरी तांदूळ वापरते.
काही लोक वाटणात थोडे ओले खोबरे पण घालतात.
फोटो टाकते सवडीने. फेसबूकवर जितक्या सहज आयफोनवरचे फोटो टाकता येतात तसे इथे का येत नाही
कडला करी >> म्हणजे पिठलं
कडला करी >> म्हणजे पिठलं टाईप्स का?
कडला पोडी म्हणजे डाळीचं पिठ... पोडी म्हणजे पीठ... कडला म्हणजे बेसन.... या हिशोबाने कडला करी म्हणजे पिठलं का?
बाकी मला हे आज्ज्ज्ज्जीबात आवडलं नव्हतं कारण मी केरळात कॅण्टीन मध्ये खाल्लेलं
आईला करायला लावेन... कदाचित आवडेल.
ओह हे आप्पम म्हणजे
ओह हे आप्पम म्हणजे आंबोळ्यांसारखे दिसतात ते का? माझा आप्पे आणि आप्पम यात घोळ होतो नेहमी.

फेसबुकावर फोटो पाहिला. भारी.
अरे वा बड्डे गिफ्ट धन्यवाद
अरे वा बड्डे गिफ्ट
धन्यवाद 
माझ्या एका केरळी मैत्रिणीकडे आप्पम आणि मटण करी बेत असतो. व्हेजी लोकं असल्यास बटाट्याची रस्सा भाजी नाही तर अंडा करी.
यीस्ट न घालता आंबवले तर चालेल का ?
कडला- म्हणजे चणे ,अक्खे
कडला- म्हणजे चणे ,अक्खे चणे.
पोडि म्हणजे पीठ.
कडला करि म्हणजे अख्या चण्याची करी!
यीस्ट शिवाय करायचे असल्यास नारळाचे पाणी वा गोवन फेनि वापरता येते पण प्रत्येकाने वेगळा स्वाद येतो.
मला मध्यंतरी एका सोन्याच्या
मला मध्यंतरी एका सोन्याच्या दुकानातून अप्पमचा नॉनस्टिक तवा गिफ्ट आलाय
त्यावर अद्याप कधी आप्पम केले नाहीत. आता एकदा करून बघेन. यीस्टला काही सब्स्टिट्युट नाही का?
कोकणी लोक सुरनळी नावाचे गोड
कोकणी लोक सुरनळी नावाचे गोड डोसे करतात -त्यात तांदूळ + नारळ वाटून , गूळ + ताक घालून आंबवतात.
आप्पमच्या पीठात पण ताक किंवा दही घालून आंबवता येईल, पण चव बदलेल थोडी.
केरळा मधे ताडी वापरतात . इथे मी क्वचित फेणी वापरते . रम सुद्धा वापरता येईल बहुतेक.
मी
मी http://www.maayboli.com/node/5047 रेसीपी वाचून केलेले होते, छान झालेले.
खूप खूप धन्यवाद मेधा. मला खूप
खूप खूप धन्यवाद मेधा.
मला खूप आवडतात आप्पम्. एका केरळी मैत्रिणीच्या घरी बर्याचदा काडला करी आणि आप्पम् खाल्ले आहेत.
आता घरी करून बघते.
प्राची+१. मलाही कधीचा मुहूर्त
प्राची+१.
मलाही कधीचा मुहूर्त लावायचा होता. आता करुन पाहते.
या रेसिपी करता धन्यवाद मेधा.
या रेसिपी करता धन्यवाद मेधा. कडला करीची रेसिपीही टाकण्याचे योजावे.
हे तव्यावर असताना हे ताटात,
हे तव्यावर असताना
हे ताटात, मसुराबरोबर
मेधा, तुझ्याकडे खोलगट, तवा
मेधा, तुझ्याकडे खोलगट, तवा किंवा कढई हवी. डोंबिवलीत तशा कढईत अप्पम घालून मध्यभागी चटणी घालून सर्व्ह करतात.
बरो बर स्ट्यू पण बनवून खातात.
बरो बर स्ट्यू पण बनवून खातात. व्हेज / नॉनव्हेज दोन्ही.
वाह! आवियलबरोबरपण छान लागतात
वाह! आवियलबरोबरपण छान लागतात आप्पम. नाहीतर सरळ वर पीठीसाखर नी तुपाचे थेंब टाकून गट्ट्म!
माझ्याकडं नाहिये आप्पमचाटी. आणावी लागेल आता.
थांकु फॉर रेस्पी. मी आतापर्यंत आयतेच गिळलेत. आता करून बघेन.
आप्पम उलट्त नाही ना?
सायो, आप्पमच्या कढईचाच आहे
सायो, आप्पमच्या कढईचाच आहे पहिला फोटो. पण फार जवळून काढलाय त्यामुळे पूर्ण कढई दिसत नाहीये.
सैलुज रेसिपीवर यीस्ट न वापरता करायची रेसिपी आहे बेकिंग सोडा वापरलाय तिने.
डोंबिवलीतील फडके रोडवरील
डोंबिवलीतील फडके रोडवरील अप्पमवाल्याची आठवण आली. चटणी खुपच चटकदार.