१ रवि, तुम्ही मुळचे कुठले ?
मी माझ्या जन्मापासून टोरांटो , कॅनडा येथेच आहे. त्यामुळे मी अस्सल कॅनडा चा आहे.
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
माझे वडील आणि आजोबा या दोघांना संगीताची अतिशय आवड , तसेच ते दोघेही उत्तम गायक आहेत त्यामुळे आमच्या घरात संगीताचे वातावरण आहे. आणि या मुळे माझ्यातही संगीताची हि परंपरा भिनली आहे. आणि संगीताचा हा वारसा माझ्या पर्यंत पोचला आहे.
३. संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात ? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे ?
मी वयाच्या ६ वर्षापासून संगीताचे शिक्षण घेत आहे
४. संगीतातील तुमचे गुरु कोण ?
माझे वडील श्री. नरेंद्र दातार यांच्या कडे माझे संगीताचे शिक्षण झाले आहे आणि मी अजूनही शिकत आहे.
५. तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल ?
• कलासंगम , कॅनडा आयोजित vocal music competition मध्ये ५ ते १२ वयोगटात माझा १ ला क्रमांक आला , त्यानंतर त्यांचीच शिष्यवृत्ती हि मिळाली. २००६ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या " All India Level" competition मध्ये २रा क्रमांक मिळाला .
• तसेच खाली नमूद केलेल्या अनेक स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक पटकावला :-
• स्वर विहार , Brampton , Canada २००६ - ११ ते १८ वयोगट
• पानोरामा इंडिया २०१२ ची Singing Idol Music Competition ( प्रायोजक - Consulate General of India , Canada )
• बीएमएम सियाटल २००७ येथे सूर पश्चिमेचे या कार्यक्रमात सहभाग .
• वैयक्तिक संगीत सादरीकरण - संगीत पालवी - बीएमएम फीलाडेल्फीया २००९
• उत्तर अमेरिकेतील साहित्य , कला आणि संस्कृती या क्षेत्रात विशेष योगदानाबद्दल पुरस्कार - बीएमएम शिकागो २०११
• कौशल इनामदार यांच्या " कौशल कट्टा " या कार्यक्रमात सहभाग - टोरांटो २०१२
६. . संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात ?
मी भरपूर संगीत ऐकतो आणि सतत नवीन नवीन गाणी शिकण्याचा प्रयत्न करतो . मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मागे तानपुरा लावून सतत गाण्याचा विचार करतो.
७. तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते ? तुमचे आवडते एखादे गाणे ? कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते ?
पं . भीमसेन जोशी - शास्त्रीय संगीतातील आवडते गायक
सोनू निगम - हिंदी चित्रपट संगीतातील गायक
८. आपल्या कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे ?
मी माझे सादरीकरण उत्तम करण्यासाठी , आणि माझ्या आवाजाची ताकद वाढवण्यासाठी रोज नेमाने रियाज करणार आहे .
९. संगीता खेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे ?
मला soccer , basket ball खेळायला आवडते. मित्र मैत्रिणीबरोबर फिरायला आवडते. आणि कधी कधी video games पण खेळायला आवडते.
१०. आपल्या कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत ?
मी आपल्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीच्या वेळेस university मध्ये च राहत होतो आणि प्रचंड व्यस्त होतो. पण त्यातूनही जेव्हा आणि जसा वेळ मिळेल तसा मी गाण्याचा रियाज करायचा प्रयत्न केला.
कृपया इथे जाऊन मला मत द्या - http://www.bmm2013.org/culturalprograms/saregama.html
शब्दांकन - सरिता देशपांडे (मायबोलीकर: रंगीतसंगीत). फोटो: दिपाली खानझोडे
२००८ मधे न्यू जर्सीच्या
२००८ मधे न्यू जर्सीच्या कार्यक्रमात यांचं गाणं ऐकलं होतं मी. घेई छंद अजून लक्षात आहे माझ्या.
http://www.maayboli.com/node/1784
या मुलानेच २००९ फिली बी एम एम
या मुलानेच २००९ फिली बी एम एम ला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला गायले होते ना. १२-१३ वर्षाचा असेल तेव्हा.