मोड आलेले मटकी , मूग, मसूर ( मटकीचे प्रमाण जास्त असावे अथवा आवडीप्रमाणे )एकत्र करून २ वाट्या , आलं , मिरची , लसूण , जिरे ,मीठ , कोथिंबीर , १ चमचा बेसन, तांदळाचे पीठ
मोड आलेले कडधान्ये एका पातेल्यात थोडेसे मीठ टाकून बोटचेपे उकडून घ्यावे . नंतर यातील पाणी काढून टाकून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे , थोडेसे ओबडधोबडच ठेवायचे .
हे सगळी तयारी होई पर्यंत एका पातेल्यात पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवावी.
नंतर ह्यात वाटलेले लसूण , आलं , जिरे, मीठ, मिरची, कोथिंबीर, टाकून निट एकत्र करून घ्यावे. आता ह्यात १ चमचा बेसन, तांदळाचे पीठ मावेल तसे टाकावे. ह्या पीठाची लांबट वळकटी झाली पहिजे.
आता ही वळकटी एका पातळ सुती कापडात गुंडाळून किंवा केळी/ पळसाच्या च्या पानात गुंडाळून १५ -२० मिनिटे उकडावी. थंड झाल्यावर कापून shallow fry किंवा deep fry करावी .
टोमाटो केचअप बरोबर मस्त लागते .
वाह, छानच रेसिपी करुन
वाह, छानच रेसिपी
करुन बघण्यात येईल!!!
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
वा छान आहे रेसिपि.
वा छान आहे रेसिपि.
मस्त वाटतेय. करुन बघणार!
मस्त वाटतेय. करुन बघणार!
छान आहे हा प्रकार.
छान आहे हा प्रकार.
छान वाटत आहे प्रकार... करुन
छान वाटत आहे प्रकार... करुन बघणार ऩक्की
नंतर यातील पाणी काढून टाकून
नंतर यातील पाणी काढून टाकून >>> अहो, पण त्या पाण्यात केव्हढीतरी पोषणमुल्ये असतील. ती अशीच वाया जाऊ द्यायची?
छान आहे. त्या पाण्याचे
छान आहे. त्या पाण्याचे कळण(कढण) करायचे. ताक,जिरे,ओवा,लसूण,आले,थोडे लाल तिखट,मीठ,हिंग
कोथींबीर घालायचे. हवी असल्यास तूप-जिरे, हिंग फोडणी करायची. आल्याऐवजी सुंठपावडर पण चालते.
नंतर यातील पाणी काढून टाकून
नंतर यातील पाणी काढून टाकून >>> अहो, पण त्या पाण्यात केव्हढीतरी पोषणमुल्ये असतील. ती अशीच वाया जाऊ द्यायची?>>> यासाठी मी पातेल्यात वाफण्याऐवजी उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर चाळणी ठेवुन बोटचेपे वाफवते म्हणजे मोड आलेल्या धान्यांचा कच्चेपणा जातो.
इंटरेस्टिंग. न तळता बेक करून
इंटरेस्टिंग. न तळता बेक करून वगैरे एकत्र राहिल का हा सगळा मसाला? हेल्दी होईल तसा जमला तर.
हो , पाण्याचे कढण करायचे,
हो , पाण्याचे कढण करायचे, अन्जू म्हणते तसे. बेक करून पण छान लागेल.